Personalized
Horoscope
  • Talk To Astrologers
  • Talk To Astrologers
  • Mrunal

गुरु ग्रहाचे विभिन्न भावात फळ लाल किताब अनुसार

वाचा लाल किताब अनुसार बृहस्पती ग्रहाच्या संबंधित प्रभाव आणि उपाय. ज्योतिष मध्ये बृहस्पतीला एक शुभ ग्रह मानले गेले आहे. लाल किताब जी पूर्णतः उपाय आधारित ज्योतिष पद्धती आहे. यामध्ये बृहस्पती ग्रहाच्या विभिन्न भावांमध्ये फळ आणि त्यांच्या प्रभावाच्या बाबतीत विस्तारात व्याख्या केली गेली आहे.

लाल किताब मध्ये बृहस्पति ग्रह

Guru grahache Kundali madhe vibhinna bhavatil fal Lal Kitab chya anusar हिंदू ज्योतिष मध्ये बृहस्पतीला देव गुरु म्हटले जाते. हे धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे आणि कर्क राशीमध्ये उच्च आणि मकर राशीमध्ये निचचा असतो. सुर्य, मंगळ आणि चंद्र देव बृहस्पतीचे मित्र आहे. तसेच शुक्र, बुध, शत्रू आणि शनी व राहू बृहस्पती सोबत सम भाव ठेवतात. लाल किताब मध्ये बृहस्पतीला एक महत्वपूर्ण ग्रह मानले गेले आहे. पिंपळ, पिवळा रंग, सोने, हळदी, चण्याची डाळ, पिवळे फुल, केशर, गुरु, पिता, वृद्ध पुरोहित, विद्या आणि पूजा पाठ हे सर्व बृहस्पतीचे प्रतीक मानले गेले आहे.

लाल किताब अनुसार मित्र ग्रहांसोबत बृहस्पति

चंद्र देवाचा साथ मिळाल्याने बृहस्पतीची ताकद वाढून जाते. तसेच मंगळचा साथ मिळाल्याने बृहस्पतीची शक्ती दुप्पट वाढते. सुर्य ग्रहासोबत बृहस्पतीची मान प्रतिष्ठा वाढते.

शत्रु ग्रहांसोबत बृहस्पति

बृहस्पतीचे तीन मित्र ग्रह होण्याने सोबतच तीन शत्रू ग्रह ही आहेत. हे ग्रह सदैव बृहस्पतीला हानी पोहचवण्यासाठी कारण शोधतात. बृहस्पतीचा पहिला शत्रू बुध आहे, दुसरा शुक्र आणि तिसरा शत्रू राहू आहे.

बृहस्पति ग्रहाचे गुण आणि अवगुण

जगातील प्रत्येक प्राणी आणि वस्तूमध्ये काही गुण आणि अवगुण असतात. ठीक त्याच प्रमाणे आकाशात विवरण करणाऱ्या ग्रहांमध्ये ही गुण आणि अवगुण दोन्ही असतात. बृहस्पती ग्रह मान, प्रतिष्ठा आणि उत्पत्तीचे कारक आहे परंतु निर्बल होण्याने बृहस्पतीचे हे सर्व गुण क्षणात संपतात. जातक आपल्या कर्मांच्या द्वारे आपल्या जन्म कुंडलीच्या प्रबळ आणि उत्तम बृहस्पतीला जो चतुर्थ भावात चांगले फळ देणारा असतो त्याला निर्बल करून घेतो. पिता, बाबा, दादा, ब्राम्हण आणि प्रौढ व्यक्तीला निरादर करण्याने उत्तम बृहस्पती निष्फळ होऊन जाते.

लाल किताब मध्ये बृहस्पतीच्या वाईट प्रभावाचे लक्षण

लाल किताबच्या अनुसार जेव्हा कुंडली मध्ये बृहस्पती पीडित असतो तेव्हा जातकावर निन्म प्रभाव पाहायला मिळतात-

  • डोक्याच्या मधोमध केस उडायला लागतात
  • शिक्षणात व्यवधान उत्पन्न होते
  • नेत्र मध्ये पीडा व्हायला लागते
  • स्वप्नात साप दिसणे
  • व्यक्तीच्या बाबतीत व्यर्थ अफवा उडवणे
  • गळ्यात दुखणे आणि फुफुस आजार होणे

लाल किताब अनुसार बृहस्पतीच्या शांतीसाठी जाणणारे उपाय

जन्म कुंडली मध्ये बृहस्पतीची स्थिती कमजोर असेल तर, लाल किताबच्या संबंधित निन्म उपाय अवश्य केले पाहिजे.

  • हळदीची गाठ पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून उजव्या भुजेवर बांधले पाहिजे.
  • 27 गुरुवार पर्यंत केशराचा टिळा लावणे आणि केशरची पुडी पिवळ्या रंगाच्या कपड्यात किंवा कागदात आपल्या आस पास ठेवले पाहिजे.
  • पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे आणि घरात पिवळ्या रंगाचे पडदे लावणे शुभ असते.
  • घरात पिवळ्या सुरजमुखीचे रोपटे लावले पाहिजे.
  • सोन्याची चैन आणि बृहस्पती यंत्र धारण केले पाहिजे.

बृहस्पति ग्रह संबंधित इतर ज्योतिषीय उपाय

बृहस्पती ग्रहाच्या अशुभ प्रभावांना दूर करणे आणि शुभ फळाच्या प्राप्ती साठी लाल किताब व्यतिरिक्त अन्य ज्योतिषीय उपाय ही केले जातात.

  • व्यक्तीला माता - पिता, गुरुजन आणि अन्य पूजनीय व्यक्तींच्या प्रति आदर आणि सन्मानाचा भाव ठेवला पाहिजे.
  • कुठल्या मंदिर किंवा धार्मिक स्थळावर जाऊन निशुल्क सेवा केली पाहिजे.
  • गुरुवारच्या दिवशी मंदिर मध्ये केळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावला पाहिजे.
  • गुरुवारच्या दिवशी पिठाच्या पेढ्यामध्ये चण्याची डाळ, गूळ आणि हळद टाकून गाईला खाऊ घातले पाहिजे.
  • कारण गुरूला आध्यत्मिक ज्ञानाचे कारक म्हणतात म्हणून बुद्धिजीवी व्यक्ती आणि गुरुजनांचा सन्मान करा.
  • गुरुवार च्या दिवशी ‘ॐ बृं बृहस्पतये नमः!’ मंत्राचा जप करा.
  • गुरुवारी बृहस्पतीच्या वैदिक मंत्राचा जप केल्याने जाडपणा आणि पोट संबंधित आजार दूर होतात.
  • गुरुवारी बृहस्पती देवाच्या पूजेमध्ये गंध, अक्षत, पिवळे फुल, पिवळे पक्वान्न आणि पिवळे वस्त्र यांचे दान करा.
  • बृहस्पती ग्रहाच्या संबंधित हे सर्व उपाय गुरुवारच्या दिवशी बृहस्पतीचे नक्षत्र (पुनर्वसु, विशाखा, पूर्वा, भाद्रपद) आणि गुरूच्या होरा मध्ये केले पाहिजे.

बृहस्पतीच्या संबंधित व्यवसाय आणि पेशा

बृहस्पतीला धर्म, दर्शन आणि ज्ञानचे कारक मानले जाते. न्यायधीश, मॅजिस्टेट, वकील, बँक मॅनेजर, कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर, ज्योतिषी आणि शिक्षक इत्यादी बृहस्पती ग्रहाचे प्रतीक आहे.

शेअर मार्केट, पुस्तकांचा व्यवसाय, शिक्षण आणि धर्म संबंधित पुस्तके, वाकालत आणि शिक्षण संस्थानचे संचालन इत्यादी बृहस्पतीचे प्रतीक रूप व्यवसाय आहे. फायनान्स कंपनी आणि अर्थ मंत्रालय ही बृहस्पतीचे प्रतीक म्हटले जातात.

बृहस्पति संबंधित रोग

गुरुच्या वाईट प्रभावाने व्यक्तीच्या शरीरात कफ आणि चरबीची वृद्धी होते. डायबिटीज, हर्निया, कमकुवत संस्मरणीय, कावीळ, पोट, सूज, बेशुद्ध, कान आणि फुफुस इत्यादी संबंधित रोग होतात.

बृहस्पति ग्रह से संबंधित इतर उपाय

बृहस्पती ग्रहाची शांती आणि त्यांच्या पासून शुभ फळ प्राप्त करण्यासाठी ज्या वस्तूंचे दान केले पाहिजे त्यात साखर, केळी, पिवळा कापड, केशर, मीठ, हळदी, पिवळे फुल आणि पिवळे भोजन उत्तम मानले गेले आहे. या ग्रहाच्या शांतीसाठी बृहस्पतीच्या संबंधित रत्नाचे दान करणे ही श्रेष्ठ होते. दान करते वेळी तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे की, दिवस बृहस्पतीवार असेल आणि सकाळची वेळ असेल. कुठल्या ब्राम्हण, गुरु अथवा पुरोहितला दान देणे विशेष फळदायक असते. बृहस्पती वारच्या दिवशी उपवास ही ठेवला पाहिजे. ज्या लोकांचा बृहस्पती कमजोर आहे त्या लोकांना केळी आणि पिवळ्या रंगाची मिठाई गरीब, पक्षी विशेष करून कावळ्याला दिले पाहिजे. निर्धन आणि ब्राह्मणांना दही भात घाऊ घातला पाहिजे. पिंपळाच्या वृक्षाच्या मुळांमध्ये पाणी अर्पण केले पाहिजे. गुरु, पुरोहित आणि शिक्षकांत बृहस्पतीचा निवास असतो अतः यांच्या सेवेने बृहस्पतीच्या दुष्प्रभावात कमी येते.

बृहस्पतीला अन्य सर्व ग्रहांचे गुरु आणि ब्रह्माजी चे प्रतीक मानले गेले आहे. बृहस्पतीच्या कृपेने जीवनात ज्ञान, धर्म, संतान आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते म्हणून कुंडली मध्ये बृहस्पतीची स्थिती प्रबळ होणे खूप आवश्यक आहे.

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 399/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

AstroSage TVSubscribe

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com

Reports

Live Astrologers