अंक ज्योतिष - Numerology In Marathi (20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी)

Author: योगिता पलोड | Updated Fri, 18 Feb 2022 04:56 PM IST

कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?

अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.


त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.

अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी, 2022)

अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.

जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.

250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!

मूलांक 1

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)

व्यावसायिकदृष्ट्या, या आठवड्यात तुमच्यासाठी कार्ये व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे आयोजित करणे आवश्यक असेल कारण, कार्ये पूर्ण करण्यात तुम्हाला वेळ कमी वेळ असेल. सोबतच, परदेशातून नोकरीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुम्ही काही नवीन संपर्क साधू शकाल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि यामुळे तुम्हाला वेगळे समाधान मिळेल.

परस्पर समंजसपणाच्या अभावामुळे जोडीदाराच्या नात्यात चढ-उतार दिसून येतात, त्यामुळे शांत राहून त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या आरोग्याच्या स्थितीचे विश्लेषण केल्यानंतर, असा सल्ला दिला जातो की, या आठवड्यात तुम्ही अधि-काधिक पाणी प्या आणि नियमितपणे सफरचंद खा जेणेकरून तुम्ही उत्साही राहाल आणि तुमची प्रतिकार शक्ती ही वाढेल.

उपाय: रविवारी सूर्य देवासाठी यज्ञ करावा.

मूलांक 2

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)

या आठवड्याचा शेवट करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी अधिक अनुकूल असणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल आणि त्यात वाढ होण्याची शक्यता असेल. नवीन नोकरीच्या संधी ही मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे.

जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवू शकाल आणि चांगला नफा मिळवू शकाल. आर्थिक दृष्ट्या आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि तुम्ही त्यांच्या सोबत अनौपचारिक ट्रिप ला जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्यातील जवळीक वाढेल. त्याच वेळी, आरोग्याच्या दृष्टीकोनातून, तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल, कोणती ही मोठी आरोग्य समस्या नसण्याची चांगली चिन्हे आहेत.

उपाय: सोमवारी चंद्रासाठी यज्ञ करा.

आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट

मूलांक 3

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)

करिअरच्या दृष्टीने, या आठवड्यात तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या कार्य क्षेत्राचा विस्तार होईल. या सोबतच परदेशात इच्छित नोकरी मिळण्याची ही शक्यता आहे.

जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ आणि विस्तार पाहण्यास सक्षम असाल. व्यवसायाची वाढ आणि विस्तार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल हे उघड आहे.

जीवनसाथी सोबतच्या नात्यात गोडवा आणि जवळीक निर्माण होईल. तुम्ही एकमेकांसोबत आनंदाचे क्षण शेअर कराल. त्याच बरोबर आरोग्याच्या दृष्टीने ही काळ अनुकूल आहे. तुम्ही निरोगी व्हाल

उपाय: गुरुवारी भगवान शंकराला दूध अर्पण करा.

मूलांक 4

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नोकरीत काही चढ-उतारांचा सामना कराल. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या कृतींचे योग्य नियोजन करावे लागेल. काही काळानंतर तुम्हाला सर्व काही व्यवस्थित चाललेले दिसेल आणि तुम्हाला यश मिळेल.

जर तुम्ही व्यवसायाचे स्वामी असाल तर, अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता जास्त आहे. या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, कौटुंबिक समस्यांमुळे जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत शांतता आणि संयम दाखवून गोष्टी समजून घ्या आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

आरोग्याच्या दृष्टीने, या आठवड्यात भूक न लागल्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि संतुलित आहार घ्या.

उपाय: नियमित 22 वेळा "ॐ दुर्गाय नमः" चा जप करा.

मूलांक 5

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)

करिअरच्या दृष्टीने आठवड्याचा मध्य तुमच्यासाठी फलदायी ठरेल कारण, आठवड्याच्या मध्यात पदोन्नती आणि प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. जे तुम्हाला आनंदाने भरून टाकेल.

आर्थिक दृष्ट्या पैशाचा ओघ चांगला राहील. अशा प्रकारे, पैशांची बचत करणे देखील शक्य होईल. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याची योजना देखील करू शकता.

तुमच्या जोडीदारासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध तुमचे वैवाहिक जीवन सुखकर बनवेल. तुम्ही एकमेकांना साथ देताना आणि त्यांची काळजी घेताना दिसाल. आरोग्य ही चांगले राहील.

उपाय: बुधवारी बुध ग्रहासाठी यज्ञ करा.

मूलांक 6

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. कामात असमाधान, कामाचा अधिक दबाव, सहकाऱ्यांकडून फारसे सहकार्य न मिळणे, इत्यादी संभवतात. अशा स्थितीत तुम्हाला तुमच्या कामांची मांडणी करून हुशारीने काम करावे लागेल.

तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. यामुळे तुम्हाला त्रास ही होऊ शकतो.

वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, मित्रांसोबतच्या संबंधात समस्या उद्भवू शकतात. दुसरीकडे, जोडीदारासोबतच्या नात्यात काही किरकोळ समस्या ही उद्भवू शकतात. तथापि, या समस्यांमुळे तुमच्या नात्यात कोणती ही अडचण येणार नाही. तुमच्या जोडीदाराशी योग्य संवाद साधून तुम्ही या समस्या सोडवू शकाल.

आरोग्याच्या दृष्टीने, त्वचेमध्ये जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा.

उपाय: नियमि 33 वेळा "ॐ शुक्राय नमः" चा जप करा.

मूलांक 7

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)

या आठवड्यात तुमची आवड अध्यात्माकडे अधिक असेल. यामुळे तुमचे मन शांत राहील. याचा परिणाम म्हणून तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमची कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये प्रगती पहायला मिळेल.

जर तुम्ही व्यापारी असाल तर, तुम्हाला काही प्रमाणात यश मिळेल पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक कार्यात गुंतलेले असाल.

आर्थिक दृष्ट्या, या आठवड्यात तुम्हाला चांगल्या उत्पन्नासह खर्चाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून पैशांची बचत देखील शक्य होईल.

नातेसंबंधांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून, तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि गोष्टी संयमाने समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

आरोग्याच्या दृष्टीने, या आठवड्यात तुम्हाला डोके दुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे योग्य झोप घ्या आणि तुमच्या रोजच्या दिनचर्येत योग, ध्यान या सारख्या चांगल्या सवयींचा समावेश करा.

उपाय: नियमित 16 वेळा “ॐ केतवे नमः” चा जप करा.

मूलांक 8

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)

व्यावसायिक दृष्ट्या, तुम्ही या आठवड्यात तुमच्या कामात अधिक व्यस्त असाल. परिणामी तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम आणि इतर फायदे मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे ही पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची कामगिरी ही चांगली राहील.

तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल तर, हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक दृष्ट्या, पैशाचा चांगला प्रवाह बचतीसाठी वाव वाढवेल.

वैयक्तिक जीवन आनंदी असेल. तुमचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. आरोग्य ही चांगले राहण्याची शक्यता आहे.

उपाय: शनिवारी शनिदेवासाठी यज्ञ करा.

मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट

मूलांक 9

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)

करिअरच्या दृष्टीने, हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमच्या प्रयत्नात यश मिळेल. त्यामुळे नोकरीत बढती मिळू शकते. एकूणच, व्यावसायिक आघाडीवर तुम्हाला आनंद वाटेल.

व्यवसायाबाबत बोलायचे झाले तर, चांगला नफा मिळू शकेल. या सोबतच व्यवसायाच्या नवीन संधी ही मिळू शकतात.

जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर, तुमचे प्रेम जीवन आनंददायी असेल. तुमच्या मध्ये प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल. तुम्ही अविवाहित असाल किंवा अविवाहित जीवन जगत असाल तर, या आठवड्यात तुमच्यासाठी चांगले वैवाहिक प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे.

आरोग्याच्या दृष्टीने ही हा आठवडा चांगला जाणार आहे. तुम्ही चांगले आरोग्य अनुभवाल आणि उत्साही राहाल.

उपाय: नियमित 27 वेळा “ॐ भौमाय नमः” चा का जप करा.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer