चैत्र नवरात्र 2022 - Chaitra Navratri 2022 In Marathi

Author: योगिता पलोड |Updated Wed, 30 Mar 2022 09:15 AM IST

9 दिवसांपर्यंत चालणारा नवरात्रीचा हा पावन सण 1 वर्षात 4 वेळा साजरा केला जातो. वर्षात दोन वेळा गुप्त नवरात्र च्या रूपात आणि दोन वेळा पूर्ण उत्साह आणि उत्साहाने मार्च आणि एप्रिल च्या महिन्यात चैत्र नवरात्र च्या रूपात आणि दुसरी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये शारदीय नवरात्र च्या रूपात साजरी करतात.


महिषासुर या राक्षसाचा युद्धात पराभव केल्याबद्दल दुर्गा देवीचा आदर आणि उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. महिषासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून कठोर तपश्चर्येद्वारे अमरत्व प्राप्त केले होते आणि केवळ एकच स्त्री त्याचा पराभव करू शकते. त्याला या गोष्टीचा अभिमान होता की कोणती ही स्त्री त्याला कधी ही मारू शकत नाही. अशा स्थितीत, त्यांने तिन्ही लोकांमध्ये (पृथ्वी, स्वर्ग आणि नरक) तांडव करायला सुरवात केली.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव आणि इतर सर्व देवतांनी महिषासुराचा तांडव थांबवण्यासाठी आणि तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी देवी दुर्गा तयार करण्यासाठी त्यांच्या शक्ती एकत्र केल्या. मग देवी दुर्गेने धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि महिषासुराचा अंत करण्यासाठी दैत्य महिषासुराशी भयंकर युद्ध केले आणि शेवटी विजय मिळवला.

नवरात्री या शब्दाच्या अर्थाबद्दल बोलायचे झाले तर नवरात्रीचा शब्दशः अर्थ नऊ-रात्र असा होतो. अशा परिस्थितीत नवरात्र हा नऊ दिवस चालणारा भारतीय सण असून या काळात नऊ देवतांच्या (माता दुर्गेची नऊ रूपे) पूजेचा नियम सांगितला आहे.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

या वर्षी कधी आहे चैत्र नवरात्र

या वर्षी चैत्र नवरात्र 2 एप्रिल पासून प्रारंभ होईल आणि 10 एप्रिल पर्यंत चालेल.

या काळात वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या मान्यता आणि अनुष्ठान विधी केले जातात. बरेच लोक चैत्र नवरात्री मध्ये अखंड ज्योत पेटवतात, तोरण किंवा बंदरबन ठेऊन पूजा करतात, संपूर्ण 9 दिवस उपवास करतात आणि या दिवशी कलश स्थापना करून पूजा सुरू करतात.

कोणत्या दिवशी केली जाईल कोणत्या देवीची पूजा

पहिला दिवस शैलपुत्री देवी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजेची सुरुवात देवी पार्वतीचा अवतार आणि पर्वताची कन्या शैलपुत्रीच्या पूजेने होते. या दिवशी भगवान शिवाची पत्नी म्हणून दुर्गा देवीची पूजा केली जाते. देवी शैलपुत्री नंदी बैलावर स्वार होते, तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे.

दूसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी

द्वितीयेला (दुसऱ्या दिवशी) पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते. या रुपात माता पार्वती योगिनी रुपात दिसते. म्हणजेच हे त्या मातेचे अविवाहित रूप आहे ज्यामध्ये ती भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत होती. ब्रह्मचारिणी देवीची उपासना केल्याने मुक्ती, मोक्ष आणि सुख, शांती, समृद्धी मिळते असे मानले जाते.

तीसरा दिवस- चंद्रघंटा देवी

तृतीयेला (तिसऱ्या दिवशी) आपण चंद्रघंटाची पूजा करतो. ती सौंदर्याचे प्रतीक आहे तसेच, शौर्याचे प्रतीक आहे.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

चौथा दिवस - कुष्मांडा देवी

चतुर्थीला (चौथ्या दिवशी) कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा देवी पृथ्वीवरील वनस्पतींच्या भांडाराशी संबंधित असल्याचे मानले जाते.

पाचवा दिवस- स्कंदमाता

पंचमीला (पाचव्या दिवशी) स्कंदमातेची पूजा केली जाते, जी भगवान कार्तिकेयची आई आहे. देवी स्कंदमाता सफेद रंगाचे प्रतिनिधित्व करते आणि सफेद रंग आईच्या परिवर्तनीय शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिच्या मुलाला धोका असतो. आई स्कंदमाता सिंहावर स्वार होते, तिला चार हात आहेत आणि आईने आपल्या मुलाला हातात धरले आहे.

सहावा दिवस - कात्यायनी देवी

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. अविवाहित मुलींना हवा तो नवरा मिळावा म्हणून, कात्यायनी देवीची पूजा करतात असे मानले जाते; तसेच देवी सीतेने ही चांगल्या पतीसाठी देवी कात्यायनीची पूजा केली होती असे मानले जाते.

सातवा दिवस - कालरात्री देवी

कालरात्री देवी हे देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाते, देवी कालरात्रीची पूजा नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला केली जाते.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफतजन्म कुंडली प्राप्त करा

आठवा दिवस - महागौरी देवी

आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते, ती बुद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा ती गरम झाली आणि तिचा काळा झाला.

नववा दिवस - सिद्धिदात्री देवी

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. असे मानले जाते की माँ दुर्गेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. हा दिवस राम नवमी म्हणून ही ओळखला जातो कारण, हा भगवान रामाचा जन्मदिवस आहे.

नवरात्रीच्या वेळी काय करावे आणि काय करू नये

चैत्र नवरात्री मध्ये राशी अनुसार करा हे उपाय मिळेल देवीचा आशीर्वाद आणि समृद्धीचे वरदान

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer