फेब्रुवारी मध्ये मकर राशीमध्ये ग्रहांचा महासंयोग

वैदिक ज्योतिष शास्त्रात ग्रह संक्रमणांना विशेष स्थान दिले आहे. कारण, ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम केवळ सजीवांवरच होत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण देश आणि जगावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसून येतो. हे ग्रह आपल्या जीवनावर नक्कीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतात कारण, प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे गुण आणि स्वभाव असतात आणि एका राशीतून दुस-या राशीत प्रवेश करताना त्यांच्या गुणांमध्ये आणि स्वभावात काही बदल होतात आणि त्याच्याच अनुकूल परिणाम हे जातकांवर दाखवतात कारण, फेब्रुवारीचा महिना सुरु होत आहे आणि प्रत्येक महिन्या सारखे या महिन्यात ही काही ग्रहांचे संक्रमण होईल, ज्यामध्ये मुख्यतः मंगळ आणि शुक्र चे संक्रमण सम्मिलीत आहे परंतु, या दोन्ही ग्रहांच्या संक्रमणासोबत अन्य ग्रहांचे काही विशेष संयोग ही बनणार आहे, ज्यांच्याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे तर, आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ग्रहांचे असे महा-संयोग जे फेब्रुवारी च्या महिन्यात मकर राशीमध्ये बनेल आणि प्रत्येक प्राणीच्या जीवनाला कुठल्या न कुठल्या रूपात प्रभावित करेल.

जीवनातील समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

काय आहे फेब्रुवारी मध्ये ग्रहांचे महा-संयोग?

फेब्रुवारीच्या महिन्यात तसे तर, पाच संक्रमण होणार आहे परंतु, विशेष संयोगाला समजण्यासाठी तुम्हाला मुख्यतः काही विशेष ग्रहांच्या संक्रमणाची काळजी घ्यावी लागेल. हे मुख्य ग्रह आहे: मंगळ आणि शुक्र. सूर्य देव महिन्याच्या सुरवाती मध्ये मकर राशीमध्ये असतील परंतु,13 फेब्रुवारी ला प्रातःकाळी 3:12 वर मकर राशीतून निघून कुंभ राशीमध्ये जाईल.

शनि महाराज आधी पासूनच मकर राशीत संक्रमण करत आहेत. अशा स्थितीत मंगळ महाराज 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:46 वाजता मकर राशीत प्रवेश करतील, जी की, मंगळ ची उच्च राशी आहे आणि याच्या पुढील दिवशी अर्थात 27 फेब्रुवारी ला शुक्र ग्रह सकाळी 9:53 वर मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि जेव्हा त्यांचा प्रवेश मकर राशीतील होईल तेव्हा चंद्रदेव आणि बुध देव ही याच राशीमध्ये आधीपासूनच विराजमान होतील. या प्रकारे सांगितले जाते की, मंगळ आणि शुक्राच्या संक्रमण सोबत फेब्रुवारी मध्ये पाच ग्रहांचे पंचग्रही योग मकर राशीमध्ये बनत आहे. चला आता पाहूया की, या खास संयोगाचे देश आणि जगावर काय प्रभाव पडण्याची शक्यता बनत आहे.

250+ पृष्ठांची बृहत कुंडली मध्ये मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!

काय पडेल देश-जगावर पंचग्रही योगाचा प्रभाव?

मकर राशीमध्ये बनणारा ग्रहांचा हा महासंयोग फेब्रुवारी 2022 मध्ये आपला बराच प्रभाव दाखवेल आणि याचा हा प्रभाव फक्त फेब्रुवारी मध्येच दृष्टी संक्रमण होणार नाही अपितु, येणाऱ्या काळात ही पहायला मिळेल. कालचक्र कुंडली पाहिली असता मकर राशी कर्म भाव अर्थात, दशम भावाची राशी आहे. ही कर्म प्रधानता दर्शवते. अशा स्थितीत शनीच्या स्वामित्वाच्या मकर राशीमध्ये मंगळाचे उच्च होणे आणि सोबतच, शुक्र, बुध आणि चंद्राचे शनी सोबत स्थित होणे, सेना आणि समाजातील मागासलेल्या वर्गाच्या मजबुतीकडे स्पष्ट इशारा करते म्हणजेच, आगामी काळात समाजातील मागास आणि दुर्बल घटक आणि देशाच्या लष्कराबाबत काही ठोस पावले उचलली जातील, त्यामुळे त्यांची स्थिती सुधारताना दिसून येईल,असे म्हणता येईल. देशातील मजुरांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांच्या सुविधांबाबत काही नवीन पावले उचलली जातील. लष्कर सेना बळकट होईल आणि सामरिक क्षेत्रात ही देशाचे सार्वभौमत्व वाढेल.

जर स्वतंत्र भारत वर्षाच्या कुंडलीचे अध्ययन केले तर, ते वृषभ लग्नाची कुंडली आहे ज्याच्या नवम भावात अर्थात भाग्य भावात हे पंच ग्रही योग निर्मित होत आहे आणि जर स्वतंत्र भारताची राशी पाहिली तर, कर्क राशीपासून हे सप्त भावात बनत आहे अश्या, स्थितीमध्ये हे पंच ग्रही योग देशाचा मान सन्मान वाढवणारे सिद्ध होईल आणि जगात भारताची विशेष ओळख बनेल. देशातील युवा आणि देशातील मजूर लोक खूप चांगल्या स्थितीत येतील आणि त्यांच्या कार्याचे लोह मानले जाईल. यामुळे देशवासीयांचे धैर्य आणि पराक्रम ही वाढेल आणि नशीब मजबूत होईल, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत होईल. भारत आपल्या विरोधी देशांवर जोरदार मुसंडी मारताना दिसेल आणि जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्यात आघाडीवर असेल.

निवडणूका आणि राजकारण

अलीकडेच देशातील काही विशिष्ट राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसे पाहिले तर राजकीय दृश्य मानानुसार, मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आणि मागास जातींचे महत्त्व खूप वाढेल आणि सर्व राजकीय पक्षांना त्यांचा फायदा घेऊन सत्ता मिळवायची आहे. या शिवाय सवर्णोचे वर्चस्व वाढण्याची पूर्ण शक्यता आहे म्हणजेच, मागास जाती आणि उच्चवर्णीयांच्या आधारावर या निवडणुका लढवल्या जातील, असे म्हणता येईल. शुक्र आणि चंद्र दोन्ही महिला प्रधान ग्रह आहे म्हणून, या निवडणुकांमध्ये महिलांची प्रतिद्वंदीता आणि सहभागिता विशेष रूपात सराहणीय राहणार आहे. दूर दृष्टीकोनातून पाहिल्यास, भारत राजकीय आघाडीवर आपल्या समकक्षांपेक्षा खूप वर उभा असल्याचे दिसून येईल, त्यामुळे परदेशात भारताचे स्थान मजबूत होईल. मात्र, काही देश भारताची मदत घेताना ही दिसतील.

अर्थव्यवस्था : या विशेष योगायोगाचा देश आणि जगावर परिणाम होणार हे नक्कीच. या पंचग्रही योगाच्या प्रभावाने भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून येईल आणि काही करांसाठी बजेटमध्ये विशेष सूट दिली जाऊ शकते. विशेषत: मध्यमवर्गीय आणि नोकरदार लोकांसाठी काही विशेष पॅकेज किंवा कर सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी अर्थसंकल्प बऱ्यापैकी विस्तारवादी असू शकतो. रेल्वे आणि लष्करावर आणि गरीब लोकांच्या योजनांवर बजेटमध्ये विशेष लक्ष असेल. जगाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास अनेक देश शेजारील देशांनी त्रस्त असतील आणि त्यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण होईल, त्यामुळे अर्थव्यवस्था पाहिली जाईल. भारताचे काही परदेशी देशांशी नवीन करार होऊ शकतात, जे आरोग्याबरोबरच व्यापाराच्या क्षेत्रात ही असू शकतात.

स्वास्थ्य व्यवस्था : सध्या ज्याप्रकारे कोरोनाच्या नव्या संक्रमण ओमीक्रॉन ला घेऊन निराशेचे वातावरण आहे, यावर पंचग्रही योगानंतर काही प्रमाणात विराम लागण्याची शक्यता आहे आणि परिस्थिती स्थिर होण्याच्या दिशेने जाईल परंतु, तरी ही पूर्ण रूपात स्थिती मध्ये सुधार येण्यात वेळ लागेल कारण, हे पंचग्रही योग जिथे एकीकडे या स्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न करेल तर, दुसरीकडे ग्रहांच्या विपरीत स्वभावामुळे याला सुधारण्यात थोडा वेळ ही लागू शकतो.

रोग प्रतिरोधक कॅल्कुलेटर ने जाणून घ्या आपली रोग प्रतिरोधक क्षमता

वातावरण: मकर राशी पृथ्वी तत्व ची राशी आहे. यामध्ये शनी महाराज वात प्रकृतीचे ग्रह आहे तर, मंगळ महाराज अग्नी प्रकृतीचे तर, शुक्र वात-कफ आणि चंद्र देव कफ प्रकृतीचे आहे अश्या स्थिती मध्ये शीत लहराचा प्रकोप अचानक वाढेल आणि नंतर मंगळाच्या प्रभावाने कमी होणे सुरु होईल. अचानक वर्षा चे योग ही बनतील. वातावरणात बराच बदल अनुभवत येईल आणी श्वसन संबंधित रोग वाढतील.

तुमच्या कुंडली मध्ये आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट

कोणत्या राशींना मिळेल सौगात आणि कोणत्या राशीतील लोकांना राहावे लागणार सावधान!

या ग्रह संक्रमणाचा अनेक राशींवर मोठा आणि उत्तम प्रभाव पडेल खासकरून, मेष राशी, वृषभ राशी आणि मीन राशीतील लोकांसाठी हे पंच ग्रही योग खूप लाभदायक राहील. तुम्हाला आर्थिक आणि करिअर संबंधित समस्यांमध्ये कमी येईल तसेच, तुमचे उत्तम प्रगतीचे योग बनतील आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या योजना उत्तम राहतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील यामुळे तुम्ही बरेच आनंदी दिसाल. ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. यांच्या विपरीत धनु, राशी, कुंभ राशी आणि मिथुन राशीतील लोकांसाठी थोडे सांभाळून चालावे लागेल कारण, आरोग्य समस्यांसोबतच आर्थिक हानी होण्याची ही शक्यता कायम आहे आणि काही सर्जरी किंवा दुर्घटना होण्याची ही शक्यता बनत आहे म्हणून, थोडे काळजीपुर्वक राहण्याची आवश्यकता असेल.

काय पडेल मकर राशीतील जातकांच्या जीवनावर प्रभाव?

ज्या जातकाचा जन्म मकर राशीच्या अंतर्गत झालेला आहे त्यांच्यासाठी हा पंच ग्रही योग विशेष रूपात फलदायी राहील कारण, ते त्यांच्याच राशीमध्ये आकार घेत आहे. एकीकडे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये वृद्धी होईल परंतु, दुसरीकडे आरोग्य संबंधित समस्या येण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या भोजन आणि खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागेल अथवा, तुम्ही आजारी होऊ शकतात परंतु, आर्थिक दृष्ट्या हा पंच ग्रही योग तुमच्यासाठी लाभदायक राहील.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer