माघ पौर्णिमा 2022 - Magh Purnima 2022 (16 फेब्रुवारी, 2022)

Author: योगिता पलोड | Updated Tue, 15 Feb 2022 12:40 PM IST

माघ चा महिना हिंदू कॅलेंडर चा एक खूप पावन आणि शुभ फळदायी महिना म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णू ला खूप प्रिय असतो. या महिन्यात बरेच व्रत आणि सण इत्यादी ही केले जातात. माघ महिन्यात पडणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथी ला ही खूप खास स्थान दिले आहे. लवकरच माघ पौर्णिमा 2022 ही येणार आहे.


तुमच्या या खास ब्लॉग मध्ये जाणून घ्या, काय आहे माघ पौर्णिमेचे महत्त्व? हिंदू धर्मात वर्षभर साजऱ्या होणार्‍या सर्व पौर्णिमेच्या तारखा अतिशय खास आणि महत्त्वाच्या मानल्या जातात. या दिवशी केलेले स्नान, दान आणि जप पुण्यकारक आहे. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, माघ पौर्णिमेच्या दिवशी माघ स्नान केले जाते, याला ही विशेष महत्त्व दिले जाते. माघ महिन्यातील स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि माघ पौर्णिमेपर्यंत चालते.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

भगवान विष्णूचा आशीर्वाद आणि त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी सदैव राहावी या साठी अनेक जण या दिवशी व्रत ठेवतात. पौर्णिमा तिथी हिंदू महिन्याची समाप्ती दर्शवते आणि या दिवशी महत्त्वाचे सण, विधी किंवा शुभ प्रसंग साजरे केले जातात.

2022 मध्ये माघ पौर्णिमेची तिथी आणि शुभ मुहूर्त

तिथी: 16 फेब्रुवारी, 2022 (बुधवार)

शुभ मुहूर्त:

फेब्रुवारी 15, 2022 ला 21:45:34 पासून पौर्णिमा आरंभ

फेब्रुवारी 16, 2022 ला 22:28:46 ला पौर्णिमा समाप्त

नोट: वरती दिले गेलेले मुहूर्त नवीन दिल्ली साठी मान्य आहे. आपल्या शहराच्या अनुसार, शुभ मुहूर्त जाणून घ्यायचे असेल तर, येथे क्लिक करा.

पुढे पाहूया आणि जाणून घेऊया या वर्षी माघ पौर्णिमा तुमच्या जीवनाला कशी उत्तम करेल?

माघ पोर्णिमेवर विशेष संयोग

यंदा माघ पौर्णिमा 16 फेब्रुवारीला येत असून या सोबतच माघ महिना संपणार आहे. या शिवाय यंदाची माघ पौर्णिमा ही अनेक अर्थांनी शुभ ठरणार आहे कारण, या काळात व्यवसायात वाढ होण्याचे तसेच लोकांच्या मनातील भीती दूर होण्याचे योग प्रकर्षाने तयार होताना दिसत आहेत. माघ पौर्णिमेला चंद्र सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात असेल. विवाहासाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो.

या शिवाय ब्रह्मवैवर्त पुराणानुसार भगवान विष्णू या वेळी गंगेच्या पाण्यात वास करतात असे मानले जाते.

या वेळी माघ पौर्णिमा बुधवारी येत आहे. या दरम्यान चंद्र मघा नक्षत्रात असेल आणि सूर्य कुंभ राशीत धनिष्टा नक्षत्रात असेल. या शिवाय चंद्रावर सूर्य आणि गुरूची पूर्ण दृष्टी असेल. सूर्य धनिष्ठा नक्षत्रात असेल आणि चंद्रावर पूर्ण नजर ठेवेल, अशा स्थितीत ग्रह-नक्षत्रांच्या या स्थितीमुळे अतिशय शुभ संयोग निर्माण होत आहे. परिणामी,

माघ पौर्णिमा 2022 (Magh Purnima 2022)

हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिना हा अकरावा महिना आहे. दरवर्षी 12 पौर्णिमा तिथी असतात म्हणजेच, एका महिन्यात एक पौर्णिमा तिथी. मात्र, सनातन धर्मात माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. माघ महिन्यात येत असल्याने तिला 'माघी पौर्णिमा' असे नाव पडले आहे. माघ महिन्याला पूर्वी माघ महिना म्हणत. आम्ही तुम्हाला सांगतो की मध हा शब्द माधव, भगवान श्री कृष्णाच्या रूपाशी संबंधित आहे असे मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान, दान, पूजा यांना विशेष महत्त्व दिले जाते.

या दिवशी चंद्र देवतेची पूजा करण्याचा नियम ही सांगितला आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, हा महिना आपल्या जीवनात सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी दान करण्यासाठी सर्वात शुभ आणि फलदायी आहे. या दिवशी बरेच लोक पूजा करतात आणि बरेच लोक उपवास देखील करतात. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचा नियम सांगितला आहे.

अनेक ठिकाणी महिनाभर चालणाऱ्या माघ महिन्यात कुंभमेळ्याचे ही आयोजन केले जाते. पौर्णिमेच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

असे मानले जाते की, माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीला देवता स्वतः पृथ्वीवर अवतरतात आणि पवित्र गंगा नदीत स्नान करतात. त्यामुळे या दिवशी प्रयागराजमध्ये गंगा नदीत स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमतात. या दिवसांत नदीत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

हिंदू पौराणिक कथेनुसार माघ पौर्णिमा हा विविध आध्यात्मिक आणि धार्मिक कार्ये आणि संस्कार करण्यासाठी पवित्र दिवस मानला जातो. या वेळी, लोकप्रिय 'माघ मेळा' आणि 'कुंभमेळा' आयोजित केला जातो ज्यात देशभरातून लाखो भाविक सहभागी होतात. या शिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी तामिळनाडूच्या अनेक भागात फ्लोट फेस्टिव्हलचे आयोजन ही केले जाते.

माघ पौर्णिमेचे महत्व

माघ पौर्णिमेचे नाव ‘माघ नक्षत्र' या वरून पडले आहे. या पवित्र दिवशी हिंदू देवी-देवता पृथ्वीवर अवतरतात आणि मानव रूपात स्नान, दान आणि पूजा, पठण इत्यादी करतात, असे म्हणतात. त्या मुळेच या दिवशी गंगेत स्नानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने मनुष्याला या जन्मी तसेच मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी पौष नक्षत्र असेल तर, शास्त्रानुसार या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते.

माघ पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ आहे. या दिवशी दान धर्म केल्याने वर्तमान आणि भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि हनुमान यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की जो व्यक्ती या दिवसाची नि:स्वार्थ भावनेने आणि भक्ती भावाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात.

माघ पौर्णिमा ही 'महा माघी' आणि 'माघी पौर्णिमा' म्हणून ही ओळखली जाते आणि ती देशभरात साजरी केली जाते.

माघ पौर्णिमा योग्य पूजन विधी

माघ पौर्णिमेचा दिवस तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. चला तर, मग जाणून घेऊया या दिवसाची योग्य उपासना पद्धत कोणती आहे, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनावर या दिवसाच्या फळांचा प्रभाव वाढवू शकता.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

माघ पौर्णिमा 2022: या दिवशी केले जाणारे महत्वाचे अनुष्ठान

माघ महिन्यात कल्पवासाचे महत्व

दरवर्षी माघ महिन्यात तीर्थराज प्रयाग येथे माघ मेळा आयोजित केला जातो ज्याला कल्पवास असे ही म्हणतात. त्यात देश-विदेशातील भाविक सहभागी होतात. प्रयाग मध्ये केलेल्या या कल्पवासाची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून कल्पवासाची सांगता केली जाते, असे म्हणतात.

माघ महिन्यातील कल्पवासाचे महत्त्व सांगितले आहे. माघ महिन्यात प्रयाग येथे संगमाच्या तीरावर राहणाऱ्या यात्रेला ‘कल्पवास’ म्हणतात. या शब्दाचा अर्थ शोधायला गेलो तर, संगमाच्या तीरावर राहून वेद-ग्रंथांचे अध्ययन व मनन करणे असा होतो. अशा परिस्थितीत कल्पवासात अहिंसा, संयम आणि भक्तीचा संकल्प केला जातो.

माघ महिन्यात भगवान विष्णूची पूजा करणे विशेष शुभ आहे. या महिन्यात कल्पवास संपला आहे. महा-भारताच्या संघर्षात वीरगती प्राप्त झालेल्या आपल्या कुटुंबाला मोक्ष मिळावा म्हणून, युधिष्ठिराने माघ महिन्यात कल्पवास केला होता. 16 फेब्रुवारी 2022 रोजी माघ महिना संपेल.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

कल्पवासाने जोडलेले काही महत्वपूर्ण नियम

माघ पौर्णिमेला राशी अनुसार हे उपाय वर्षभर चमकावेल भाग्य

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer