गुढी पाडवा: Gudi Padwa 2022 In Marathi

Author: योगिता पलोड |Updated Thu, 07 Apr 2022 09:15 AM IST

नवरात्रीच्या पवित्र सणाच्या आठव्या दिवसाला अष्टमी म्हणतात. जे लोक नवरात्रीचे व्रत करतात आणि हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात ते या दिवशी देवी महागौरीची पूजा करतात. नवरात्रीचे सर्व 9 दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपांना समर्पित असतात. जसे की, पहिला दिवस शैलपुत्री देवीला, दुसरा ब्रह्मचारिणी देवीला, तिसरा देवी चंद्रघंटाला, चौथा देवी कुष्मांडा, पाचवा स्कंदमाता, सहावा कात्यायनी देवीला, सातवा कालरात्रीला, आठवा महागौरीला, आणि नववा दिवस सिद्धिदात्री देवीला समर्पित मानले गेले आहे.

नवरात्रीत अष्टमी तिथीला खूप महत्वाचे स्थान सांगितले गेले आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅस्ट्रोसेजने तुमच्यासाठी हा खास ब्लॉग आणला आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला नवरात्रीच्या अष्टमी तिथीचे महत्त्व, वेळ, अष्टमीच्या दिवशी कन्यांच्या पूजेची विधी आणि इतर अनेक माहिती देत ​​आहोत. त्यामुळे ही सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

नवरात्र अष्टमी 2022: तिथी

चैत्र नवरात्रीचा हा पवित्र सण प्रतिपदा तिथीपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो आणि चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नववा दिवस हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार चैत्र नवरात्र मार्च-एप्रिल महिन्यात येते. असे मानले जाते की नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी दुर्गेच्या रूपात असलेल्या देवी शक्तीने कालेश्वर या राक्षसाचा वध करण्याची देवांची विनंती ऐकली आणि राक्षसाचा वध केला होता.

या वर्षी नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी शनिवार 9 एप्रिल ला साजरी केली जाईल.

नवरात्र अष्टमी 2022: अनुष्ठान

  1. नवरात्रीच्या अष्टमी तिथीला ही भाविक पहाटे उठून स्नान करतात.
  2. त्यानंतर फुले, फळे, चंदनाची पेस्ट, कुंकू, धूप इत्यादी अर्पण करून देवी दुर्गेची पूजा करा.
  3. या दिवशी भक्त देवी मंत्रांचा उच्चार करतात.
  4. या नंतर स्त्री आणि पुरुष दोघे ही दुर्गा व्रत कथा आणि दुर्गा चालिसाचे पठण करतात.

अनेक लोक या दिवशी कन्या पूजनाचे आयोजन ही करतात. नवरात्री व्रत कारणाऱ्या लोकांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे कारण, हा दिवस पारंपारिकपणे भोग तयार करून आणि लहान मुलीला खीर, पुरी आणि हरभरा खायला देऊन व्रत पूर्ण करतात.

देवी भागवत पुराणानुसार असे मानले जाते की, या दिवशी ज्या लहान मुलींची पूजा केली जाते ते दुर्गा देवीचे रूप असते. त्यामुळेच या दिवशी पूजेत 9 मुलींसोबत एका मुलाचा ही समावेश असतो. त्यांना उत्तम भोजन दिले जाते आणि नंतर त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार भेटवस्तू देऊन पाठवले जाते. ही पूजा कंजक पूजा किंवा कन्या पूजा म्हणून ओळखली जाते.

चला आता पुढे जाऊया आणि कन्या पूजेशी संबंधित महत्त्वाच्या विधींची प्रत्येक छोटी-मोठी माहिती जाणून घेऊया.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

नवरात्र अष्टमी कन्या पूजन मध्ये कुणाची पूजा केली पाहिजे?

ज्या मुली अजून ही कुमारीका आहेत किंवा जेमतेम 9 वर्षांच्या आहेत त्यांची या वेळी पूजा केली जाते. कन्या पूजा किंवा कंजक पूजेसाठी साधारणपणे ५ ते ९ वर्षांच्या मुलींची पूजा करण्याचा नियम सांगितला आहे.

कन्या पूजन महत्व

नवरात्री मध्ये कन्यापूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. मुलीच्या पूजेसाठी प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. जसे काही लोक नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमी तिथीला कन्या पूजा करतात तर, काही लोक नवव्या दिवशी म्हणजे नवमी तिथीला कन्यापूजा करतात. कन्येच्या पूजेसाठी दोन्ही दिवस योग्य मानले जातात. त्याच प्रमाणे लोक वेगवेगळ्या मुलींना त्यांच्या घरी पूजेसाठी बोलावतात. आदर्शपणे 1, 3, 5, 7, 9 मुलींना या विधीसाठी आमंत्रित केले आहे. एवढ्या मुलींना आमंत्रित करण्याचे महत्त्व काय आहे ते आम्ही पुढे तुम्हाला सांगतो.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

कन्या पूजन विधी

कन्यापूजेचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर आता पुढे जाऊया आणि कन्या पूजेची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया. ज्याचे पालन केल्याने तुम्ही ही तुमच्या जीवनात देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळवू शकतात.

कन्या पूजन 2022: गिफ्ट आइडियाज

जसे आपण आधी सांगितले होते की, कन्या पूजेच्या दिवशी घरी आलेल्या कन्यांना अनेकजण विविध भेटवस्तू देऊन निरोप देतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही भेटवस्तू कल्पनांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या घरी आलेल्या कन्यांना देऊ शकतात. कारण असे मानले जाते की, या भेटवस्तूमुळे मुले विशेषतः उत्साहित होतात.

चला तर, मग अ‍ॅस्ट्रोसेजच्या मदतीने जाणून घेऊया या कन्या पूजनमध्ये तुमच्या घरी येणाऱ्या लहान मुलींना तुम्ही कोणते गिफ्ट देऊ शकतात, जे त्यांच्यासाठी हे कन्यापूजन आणखी खास बनवेल.

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला आणि तुमच्या लहान कन्यांना ही भेटवस्तू कल्पना नक्कीच आवडेल. अ‍ॅस्ट्रोसेज कडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer