राम नवमी 2022 - Ram Navami 2022 In Marathi

Author: योगिता पलोड |Updated Fri, 08 Apr 2022 09:15 AM IST

चैत्र नवमी हा सनातन धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, ज्याला राम नवमी असे ही म्हणतात. हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्री राम यांचा जन्मदिवस म्हणून ही साजरा केला जातो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांचा जन्म अयोध्येत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथी ला राजा दशरथ आणि रघुकुल राणी कौशल्या यांच्या घरी झाला होता.


रामनवमी हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या वेळी लोक उपवास करतात. भक्तिगीते गातात आणि भगवान रामासह नऊ कन्यांना हलवा, पुरी, खीर आणि फळ मिठाई इत्यादी अर्पण करतात. नऊ कन्यांना किंवा लहान कन्यांना देवी दुर्गेचे रूप मानले जाते. या दिवशी आपण देवी सिद्धिदात्री ची ही पूजा करतो.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

राम नवमी 2022: मुहूर्त

भारतात दिनांक: रविवार, 10 एप्रिल, 2022

नवमी तिथी सुरु - 10 एप्रिल, 2022 ला दुपारी 01 वाजून 25 मिनिटांपासून

नवमी तिथी समाप्त- 11 एप्रिल, 2022 ला सकाळी 03 वाजून 17 मिनिटांपर्यंत

भगवान राम जन्म मुहूर्त- सकाळी 11:06 वाजेपासून दुपारी 01:39 वाजेपर्यंत

अवधी - 02 तास 33 मिनिटे

राम नवमी 2022: लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

राम नवमी 2022: धार्मिक कथा

रामायणातील धर्मग्रंथानुसार सांगितले जाते की, अयोध्येचा राजा दशरथ त्रेतायुगात कौसल्या, कैकयी आणि सुमित्रा या तीन पत्नींसोबत राहत होता. त्यांच्या शासन काळात अयोध्या अत्यंत समृद्धीच्या काळात पोहोचली होती. तथापि, सर्व समृद्धी असून ही, राजा दशरथाच्या जीवनात एक मोठे दुःख कायम होते. हे दुःख निपुत्रिक असण्याचे होते. राजा दशरथ यांना मूलबाळ नव्हते त्यामुळे रघुकुलात सिंहासनाचा कोणी ही उत्तराधिकारी नव्हता.

एके दिवशी त्यांनी वशिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून पुत्रकामेष्टी यज्ञ केला. हा यज्ञ परमपवित्र संत ऋषी ऋषिशृंग यांनी केला होता. या यज्ञाच्या परिणामी, अग्निदेव राजा दशरथासमोर प्रकट झाले आणि त्यांना दिव्य खीर/पायसमची एक वाटी दिली.

त्यांनी दशरथ राजाला खीर आपल्या तीन बायकांमध्ये वाटायला सांगितली. अशा स्थितीत राजा दशरथाने आदेशाचे पालन केले आणि अर्धी खीर आपली मोठी पत्नी कौशल्या हिला आणि अर्धी खीर दुसरी पत्नी कैकयी ला दिली. या दोन्ही राण्यांनी त्यांच्या खीरचा काही भाग राणी सुमित्रा ला ही दिला.

सांगितले जाते की, या नंतर हिंदू कॅलेंडर च्या चैत्र महिन्यात नवव्या दिवशी म्हणजे नवमी तिथी ला कौशल्याने रामाला, कैकयीने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न का जन्म दिला. तेव्हापासून हा दिवस राम नवमी म्हणून साजरा करण्याची परंपरा जगभर मोठ्या उत्साहात सुरू झाली.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

राम नवमी 2022: काय करावे आणि काय करू नये

राम नवमी 2022 भगवान राम ला राशी अनुसार अर्पण करा प्रसाद

मेष राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला डाळिंब किंवा गुळाची मिठाई चा भोग लावा.

वृषभ राशि- सफेद रंगाचा रसगुल्ला भगवान राम आणि देवी दुर्गा ला अर्पण करा.

मिथुन राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला गोड पान अर्पित करा.

कर्क राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला खीर चा भोग लावा.

सिंह राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला मोती चूर चे लाडू किंवा बेल फळाचा भोग लावा.

कन्या राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला हिरव्या रंगाचे फळ चढवा.

तुळ राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला काजू कतली मिठाई चा भोग लावा.

वृश्चिक राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला हलवा-पूरी चा भोग लावा.

धनु राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला बेसनचा हलवा किंवा मिठाई चा भोग लावा.

मकर राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला सुक्या मेव्याचा भोग लावा.

कुंभ राशि- काळे द्राक्ष आणि चना-हलवा भगवान राम आणि देवी दुर्गा ला अर्पित करा.

मीन राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला बेसनच्या लाडू चा भोग लावा.

चैत्र राम नवमी 2022: नवरात्र 2022 पारणा

चैत्र नवरात्र पारणा तेव्हा केला जातो जेव्हा नवमी तिथी समाप्त होते आणि दशमी तिथी प्रबळ होते. जसे की, आपल्या शास्त्रात उल्लेखित आहे प्रतिपदा पासून नवमी तिथी पर्यंत चैत्र नवरात्रीचा उपवास केला गेला आहे आणि या दिशा निर्देशाचे पालन करण्यासाठी चैत्र नवरात्र उपवास पूर्ण नवमी तिथी पर्यंत केले जाणे अनिवार्य असते.

आता पारणा विषयी बोलायचे झाल्यास, चैत्र नवरात्र पारणा ची वेळ या वर्षी 11 एप्रिल, 2022 सकाळी 6:00 वाजेनंतर राहील.

अ‍ॅस्ट्रोसेज कडून आपणा सर्वांना राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा!

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer