सूर्य ग्रहण 2022 - Surya Grahan 2022 In Marathi

Author: योगिता पलोड |Updated Tue, 18 Oct 2022 10:59 AM IST

2022 सालातील हे शेवटचे सूर्यग्रहण लवकरच जगाच्या विविध भागात दिसणार आहे. म्हणूनच या ग्रहणाशी संबंधित महत्त्वाची माहिती देण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसेज हा खास ब्लॉग घेऊन आले आहे. या ब्लॉगमध्ये आपण ग्रहणाची तारीख, वेळ आणि वेगवेगळ्या राशींवर होणारा परिणाम इत्यादींबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच, सूर्यग्रहणाचे घातक परिणाम कसे टाळता येतील? त्या उपायांची माहिती ही आम्ही तुम्हाला देत राहू. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, हा खास ब्लॉग आमच्या अभ्यासक आणि अनुभवी ज्योतिषी पारुल वर्मा यांनी लिहिला आहे.


वर्ष 2022 च्या अंतिम सूर्य ग्रहणाची तिथी आणि वेळ

सूर्य ग्रहणाची तिथी - 25 ऑक्टोबर 2022

सूर्य ग्रहणाची वेळ - संध्याकाळी 4 वाजून 49 मिनिटांपासून संध्याकाळी 6 वाजून 06 मिनिटांपर्यंत

सूर्य ग्रहणाचा अवधी - 1 तास 17 मिनिटे

सूर्य ग्रहण 2022: पौराणिक कथा

हिंदू पौराणिक कथेनुसार ग्रहण शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की चंद्र आणि सूर्यग्रहणांचा संबंध समुद्रमंथनाशी असतो. समुद्र मंथन झाल्यावर त्यातून अमृत बाहेर पडले, जे असुरांनी चोरले होते. ते अमृत मिळविण्यासाठी भगवान विष्णूंनी असुरांचे लक्ष विचलित करून अमृत मिळावे म्हणून सुंदर अप्सरा मोहिनीचे रूप धारण केले.

राक्षसांकडून अमृत घेतल्यानंतर मोहिनी देवतांकडे गेली जेणेकरून अमृत देवतांमध्ये वाटले जावे आणि सर्व देवता अमर होतील. त्याच वेळी एक राक्षस राहु आला आणि अमृत पिण्याच्या उद्देशाने देवांमध्ये बसला. पण चंद्रदेव आणि सूर्यदेव यांना समजले की राहू जो असुर आहे तो कपटाने देवांमध्ये येऊन बसला आहे. यामुळे संतप्त होऊन भगवान विष्णूने राहूचा शिरच्छेद केला परंतु, राहुने अमृताचे काही थेंब प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही.

राहू सूर्य आणि चंद्र देव यांचा बदला घेण्यासाठी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या रूपात येतो असे मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण शुभ मानले जात नाही.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

सूर्य ग्रहण 2022: घ्या आरोग्याची काळजी, राहा सुरक्षित

सूर्य ग्रहणाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो कारण, आपल्या सर्वांना माहित आहे की, सूर्य हा पृथ्वीवरील जीवन आणि उर्जेचा पहिला स्त्रोत आहे आणि त्याशिवाय जीवन शक्य नाही. सूर्य नैसर्गिकरित्या आत्मकार आहे आणि आत्मा, प्रतिष्ठा, स्वाभिमान, अहंकार, करिअर, समर्पण, तग धरण्याची क्षमता, चैतन्य, इच्छाशक्ती, सामाजिक आदर आणि नेतृत्व या गुणांचे प्रतिनिधित्व करतो. यामुळेच लहान मुले, आजारी लोक आणि गरोदर महिलांनी सूर्यग्रहण काळात अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

जर आपण ग्रहणाबद्दल बोललो तर, 25 ऑक्टोबर 2022 रोजी वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण होईल. हे सूर्यग्रहण आंशिक असेल जे युरोप, उरल, वेस्टर्न सायबेरिया, मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि ईशान्य आफ्रिकेत दिसेल. या आंशिक सूर्यग्रहणाचा कमाल टप्पा रशियाच्या निझनेवार्तोव्हस्क, पश्चिम सायबेरियाजवळ दिसणार आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर येथे सूर्यग्रहण दिसणार नाही परंतु, काही अंतराळवीरांचा दावा आहे की हे सूर्यग्रहण कोलकाता आणि भारताच्या उत्तर-पश्चिम भागात दिसेल.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

2022 सालातील हे शेवटचे सूर्यग्रहण तुळ राशीत होणार आहे. या दरम्यान सूर्य, चंद्र, केतू आणि शुक्र असे एकूण चार ग्रह तूळ राशीत असतील तर, चार ग्रह स्वाती नक्षत्रात असतील. राहू हा स्वाती नक्षत्राचा स्वामी आहे. तसेच ज्या ठिकाणी सूर्यग्रहण होत आहे त्या राशीत गुरु सुद्धा षडाष्टक योग करत आहे. त्यामुळे या शेवटच्या सूर्यग्रहणापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागेल. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पडत आहे आणि अशा स्थितीत सावध राहून सण साजरा करावा लागेल. या दरम्यान गरीब आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे.

सूर्य ग्रहण 2022: 12 राशींच्या समेत जगावर कसा राहील ग्रहणाचा प्रभाव?

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

सूर्य ग्रहण 2022 च्या वेळी ठेवा सावधानी

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer