माझी राशी काय आहे? : What is my Rashi in Marathi

Author: योगिता पलोड | Updated Wed, 06 Apr 2022 02:07 PM IST

माझी राशी काय आहे? हा प्रश्न नेहमी लोकांच्या मनात येत असतो कारण, अधिकतर लोक आपल्या राशीला घेऊन संशय मध्ये असतात. नावाच्या अनुसार, राशी बऱ्याच वेळा वेगवेगळी असते आणि चंद्र राशी अनुसार, वेगळा असतो तर, पश्चिमी ज्योतिष मध्ये सूर्य राशीला महत्व दिले जाते अश्यात, कोणती राशी अधिकतर प्रभावकारी आहे याला घेऊन संशय दूर होणे गरजेचे आहे. आज आपल्या या लेखात आपण आपल्या या संशयाला दूर करू.

माझी राशी काय आहे?

भारतीय ज्योतिष मध्ये चंद्र राशीला महत्वाचे मानले जाते कारण, चंद्र मनाचा कारक ग्रह आहे तर, पश्चिमी ज्योतिष मध्ये सूर्य राशीला अहम मानले जाते कारण, सूर्य आत्मविश्वास आणि आत्मा चा कारक आहे. परंतु, वैदिक ज्योतिष मध्ये चंद्र राशी ही अहम आहे आणि यामुळे व्यक्तीच्या गुणांच्या बाबतीत सटीकतेने माहिती होते. चंद्र राशी व्यक्तीच्या भावनांना दर्शवते आणि म्हणूनच चंद्र राशीने व्यक्तीच्या व्यक्तीच्या बाबतीत अधिक चांगले माहिती होऊ शकते. उदाहरणार्थ, जर चंद्र कुणाच्या कुंडली मध्ये तुळ राशीमध्ये आहे तर, व्यक्ती कला प्रेमी, सौंदर्य प्रेमी असतो. ही वायू तत्वाची राशी आहे म्हणून, बऱ्याच वेळा मनात चंचलता ही होऊ शकते. असे लोक क्रीडा क्षेत्रात चांगले असू शकतात.

माझी राशी काय आहे? या प्रश्नाचे सटीक उत्तर

जर तुमच्या मनात ही हा प्रश्न आहे की, माझी राशी काय आहे? तर, यासाठी तुम्हाला आपली जन्म वेळ, दिनांक, वर्ष आणि स्थान याची माहिती असायला हवी. ही माहिती तुम्ही कुठल्या ही कुंडली सॉफ्टवेअर मध्ये टाकून आपली कुंडली पाहू शकतात. तुमची कुंडली तयार झाल्यानंतर तुम्हाला चंद्र ज्या राशीमध्ये दिसतो ती तुमची चंद्र राशी म्हटली जाते. भारतीय ज्योतिष मध्ये यालाच महत्वाचे मानले जाते आणि याची गणना सूर्य राशीपेक्षा अधिक सटीक पाहिली गेली आहे. जर तुम्हाला आपली सूर्य राशी जाणून घ्यायची आहे तर, त्यासाठी तुम्हाला हे पाहावे लागेल की, कुंडली मध्ये सूर्य कोणत्या राशीमध्ये विराजमान आहे.

नावाच्या अनुसार माझी राशी काय आहे?

बरेच लोक आपल्या नाव राहीलच आपली राशी मानतात तथापि, नाव राशीने व्यक्तीच्या बाबतीत अधिक चांगल्या प्रकारे माहिती होत नाही. तरी ही काही बाबतींमध्ये हे सटीक भविष्यवाणी करू शकतात. नावाच्या अनुसार तुमची राशी काय आहे हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या तालिकेला पहा.

राशि राशि च्या अनुसार नावाचे पहिले अक्षर
मेष Aries अ,च, चू, चे, ला, ली, लू, ले
वृषभ Taurus उ, ए, ई, औ, द, दी, वो
मिथुन Gemini के, को, क, घ, छ, ह, ड
कर्क Cancer ह, हे, हो, डा, ही, डो
सिंह Leo म, मे, मी, टे, टा, टी
कन्या Virgo प, ष, ण, पे, पो, प
तुळ Libra रे, रो, रा, ता, ते, तू
वृश्चिक Scorpio लो, ने, नी, नू, या, यी
धनु Sagittarius धा, ये, यो, भी, भू, फा, ढा
मकर Capricorn जा, जी, खो, खू, ग, गी, भो
कुंभ Aquarius गे, गो, सा, सू, से, सो, द
मीन Pisces दी, चा, ची, झ, दो, दू

या प्रकारे जाणून घ्या जन्मतिथीने राशी

जो जातक जन्मतिथीच्या अनुसार आपली राशी जाणून घ्यायची इच्छा ठेवतो. तो खाली दिलेल्या सारणीने या बाबतीत जाणून घेऊ शकतो. ज्योतिष च्या अनुसार, प्रत्येक राशीची वेळ जवळपास एक महिन्याची आहे. पश्चिमी ज्योतिष मध्ये सूर्याला मुख्य ग्रह मानले जाते, आणि म्हणून सूर्य संक्रमणाच्या अनुसारच राशीचे निर्धारण केले जाते.

राशि जन्माची वेळ
मेष 21 मार्च पासून 20 एप्रिल पर्यंत
वृषभ 21 एप्रिल पासून 21 मे पर्यंत
मिथुन 22 मे पासून 21 जून पर्यंत
कर्क 22 जून पासून 22 जुलै पर्यंत
सिंह 23 जुलै पासून 21 ऑगस्ट पर्यंत
कन्या 22 ऑगस्ट पासून 23 सप्टेंबर पर्यंत
तुळ 24 सप्टेंबर पासून 23 ऑक्टोबर पर्यंत
वृश्चिक 24 ऑक्टोबर पासून 22 नोव्हेंबर पर्यंत
धनु 23 नोव्हेंबर पासून 22 डिसेंबर पर्यंत
मकर 23 डिसेंबर पासून 20 जानेवारी पर्यंत
कुंभ 21 जानेवारी पासून 19 फेब्रुवारी पर्यंत
मीन 20 फेब्रुवारी पासून 20 मार्च पर्यंत

काय राशीच्या अनुसार व्यक्तित्व मध्ये परिवर्तन येते?

हा प्रश्न नेहमी विचारला जातो की, राशी अनुसार लोकांमध्ये काय परिवर्तन पाहिले जाते? चंद्र राशी वेगवेगळी असण्याने एकच मातेचे दोन पुत्र वेगवेगळ्या स्वभाव आणि व्यक्तित्वाचे असू शकतात. जर कोणाच्या दोन संतान मध्ये एकाची राशी मेष आहे आणि दुसऱ्याची कर्क आहे तर, दोघांमध्ये बऱ्याच प्रकारची भिन्नता पाहिली जाऊ शकते. मेष राशीसाठी लोक बरेच अधिक उर्जावान आणि सक्रिय असतात तर, कर्क राशीतील लोक अत्याधिक भावुक आणि संवेदनशील असतात.

सूर्य आणि चंद्र राशि चा प्रभाव

माझी राशी काय आहे आई सूर्य आणि चंद्र राशी पैकी कोणत्या राशीचा प्रभाव माझ्यावर अधिक आहे? या प्रश्नाचे उत्तर ज्योतिषीय दृष्टीने शोधल्यास तर, सूर्य आणि चंद्र दोन्ही राशींना व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकतो. सूर्य राशी व्यक्तित्वाचा बाबतीत सांगते तर, चंद्र राशीने भावनेच्या बाबतीत माहिती होते. चंद्र राशीला यासाठी अहम मानले जाते कारण, तुमच्या भावनाच तुमचे व्यक्तित्व निर्माण करते. अशी शक्यता आहे की, सूर्य तुमच्या कुंडली मध्ये उच्च राशी मेष मध्ये विराजमान असून तुमच्या व्यक्तित्वला उर्जावान बनवण्याचा संदेश देत आहे परंतु, कर्क राशीमध्ये बसलेला चंद्र तुम्हाला संवेदनशील बनवून तुम्हाला अत्याधिक भावुक बनवू शकतो अश्यात, तुमच्या मध्ये दोन्ही राशींचे गुण पाहिले जाऊ शकतात तथापि, चंद्र राशीचा प्रभाव तुमच्यावर अधिक होईल.

माझी राशी काय आहे आणि माझ्या कोणत्या पक्षाला ही दर्शवते?

तुमच्या चंद्र आणि सूर्य राशीने तुमच्या व्यक्तित्वाचा बाबतीत जवळपास 50 टक्के पर्यंत ज्ञात केले जाऊ शकते. तसेच, कुंडली मध्ये अन्य ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव ही पाहणे गरजेचे असते. वैदिक ज्योतिष मध्ये चंद्र राशीलाच व्यक्तीची राशी मानली जाते. यामुळे तुमच्या भावनांना, आपल्या क्षमतांना, जीवन जगण्याच्या तुमच्या पद्धतींना, तुमचा स्वभाव, समाजात तुमचा प्रभाव, तुमचे विचार आणि जीवनासाठी अन्य पक्षांच्या बाबतीत ही माहीती प्राप्त होते.

कोणत्या राशीतील लोकांसोबत बनेल उत्तम जोडी

वैदिक ज्योतिष मध्ये राशींना तत्वांच्या अनुसार वाटलेले आहे. हे तत्व आहे- पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू. अधिकतर हे पाहिले गेले आहे की, एकाच तत्वाच्या दोन राशींमध्ये उत्तम सुसंगतता असते तथापि, दोन भिन्न प्रकारचे तत्व ही परस्पर चांगली जोडी बनवू शकतात.

तत्व अनुसार राशी

तत्व राशि
अग्नि मेष, सिंह, धनु
जल कर्क, वृश्चिक, मीन
पृथ्वी वृषभ, कन्या, मकर
वायु मिथुन, तुळ, कुंभ

वैदिक ज्योतिष मध्ये चंद्र ग्रह आणि राशि स्वामी

चंद्र देव ज्या ही राशीमध्ये बसतो ती व्यक्तीची चंद्र राशी असते. प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो आणि स्वामी ग्रह व्यक्तीच्या व्यक्तित्वावर प्रभाव पडतो. राशीचा स्वामी ग्रह तो असतो ज्यामध्ये चंद्र ग्रह विराजमान असतात.

सूर्य- जर चंद्रमा सिंह राशीमध्ये विराजमान आहे तर, राशी स्वामी सूर्य असते. सूर्याला आत्मा चा कारक मानले जाते आणि हे पिता, ऊर्जा, सरकारी पद इत्यादींचे कारक ग्रह ही आहे.

चंद्रमा- चंद्रमा जर कर्क राशीमध्ये आहे तर, राशी स्वामी ही चंद्र ग्रह असते. हे मनाचे कारक ग्रह आहे आणि माता, भावना इत्यादींचे प्रतिनिधित्व करते.

बुध- चंद्रमा जर मिथुन किंवा कन्या राशीमध्ये असेल तर, राशी स्वामी बुध असते. हे तर्क क्षमता, गणितीय योग्यता, बुद्धिमत्ता चा कारक ग्रह मानला गेला आहे.

मंगळ- चंद्रमा जर मेष आणि वृश्चिक राशीमध्ये विराजमान असेल तर, राशी स्वामी मंगळ असते. हा ग्रह नेतृत्व क्षमता, आक्रमकता, सेना इत्यादींचे कारक ग्रह आहे.

शुक्र- जर चंद्रमा वृषभ आणि तुळ राशीमध्ये असेल तर, राशी स्वामी शुक्र असते. याला कला, सौंदर्य, रोमांस इत्यादींचे कारक मानले गेले आहे.

बृहस्पती- जेव्हा चंद्रमा धनु किंवा मीन राशीमध्ये असतो तेव्हा राशि स्वामी गुरु असते. याला ज्ञान, वैराग्य, शुभ कार्य, अध्यात्म इत्यादींचे कारक ग्रह मानले गेले आहे.

शनी- चंद्र देव जेव्हा मकर आणि कुंभ राशीमध्ये विराजमान असतात तेव्हा राशि स्वामी शनी असतो. याला न्याय, कर्मफल दाता ग्रह मानले जाते.

वैदिक ज्योतिष मध्ये राशीचे महत्व

ज्योतिष शास्त्र मध्ये राशीचे मोठे महत्व आहे. हे तुमच्या स्वभावाच्या बाबतीत बरीचशी माहिती देतात. राशी न फक्त तुमच्या व्यक्तित्व तर, तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतींच्या बाबतीत ही माहिती देते. राशींचे तत्व ही असतात आणि तत्वांच्या अनुसार प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असू शकतो. मुख्यतः राशींना चार तत्व- अग्नी, वायू, जल, पृथ्वी मध्ये वाटलेले आहे. आमच्या या लेखात आता तुम्ही जाणून घेऊ शकतात की, राशीचे तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडतात. आता आपली कुंडली बनवून तुम्ही सहजरित्या आपल्या राशीच्या बाबतीत जाणून घेऊ शकतात.

Talk to Astrologer Chat with Astrologer