पूर्वाभाद्रपदा नक्षत्राची भविष्यवाणी

तुम्ही हुशार आणि शांतताप्रिय आहात. तुमचे वागणे निष्पक्षपाती व साधेसे असते. तुमचा देवावर पूर्ण विश्वास असतो आणि धार्मिक गोष्टींची आवड असते. तुमचं मन शुध्द असते त्यामुळे तुम्ही इतरांना मदत करायला नेहमी तयार असता. ऐहिक संपत्तीपेक्षा चांगलं नाव आणि ओळखी यांची मोठी संपत्ती तुमच्याकडे असते. खरे बोलणे आणि खरे राहणं हा तुमचा गुण आहे. प्रामाणिक राहून तुम्ही दुष्कृत्यापासून दूर राहता.कोणत्याही परिस्थितीत तुम्ही निरर्थक ठरत नाही कारण तुम्ही आशावादी आहात. तुमच्या कनवाळू स्वभावामुळे तुम्ही नेहमी इतरांना मदत करायला तयार रहाता. कोणीही अडचणीत असेल तर तुम्ही त्याला मदत करता. तुम्ही सुसंस्कृत आणि मैत्रीपूर्ण आहात, त्यामुळेच लोकांना तुम्ही खूपच प्रेमाने आणि जिव्हाळ्याने भेटता. मैत्रीमध्येही तुम्ही प्रामाणिकपणा आणि योग्य गोष्टीची काळजी घेता. तुम्ही मनाने शुध्द व पवित्र आचरणाचे आहात आणि कोणालाही दुखवत नाही. तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या या वैशिष्ट्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात.शिक्षण आणि विद्वत्तेच्या दृष्टीकोनातून तुम्ही तसे हुशार आहात. तुम्हाला साहित्याचीही आवड आहे. याशिवाय तुम्हाला विज्ञान, खगोलशास्त्र आणि ज्योतिषाचीही आवड आहे, तसेच तुम्ही या विषयातले तज्ञ बनू शकता. तुम्ही निष्पक्षपातीपणे तुमचं मत मांडता. अध्यात्माच्या जोडीने तुम्हाला विविध विषयांची माहिती आहे, तसेच तुम्हाला ज्योतिष चांगले कळते. तुम्ही

आदर्शवादी आहात आणि तुम्ही पैशापेक्षा ज्ञानाला जास्त महत्व देता. उदरनिर्वाहासाठी व्यवसाय आणि नोकरी दोन्ही तुमच्यासाठी योग्य आहेत. जर तुम्ही नोकरीऐवजी व्यवसाय निवडलात तर तुम्हाला नोकरीमध्ये उच्चपद मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय निवडतात तर तो वाढण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. तुम्हाला भागीदारीत व्यवसाय करायला आवडते. जबाबदा-यांच्या बाबतीत तुम्हाला त्याची व्यवस्थित जाणीव असते व तुम्ही कर्तव्य प्रामाणिकपणे निभावता. तुम्ही नकारात्मक भावना त्रासदायक ठरू देत नाही आणि नकारात्मक परिस्थितीतून पुढाकार घेऊन धैर्याने बाहेर पडता. नाव मिळवण्यासाठी तुम्ही घाई करत नाही तर नियोजनासाठी बराच वेळ घेता.

शिक्षण आणि उत्पन्न

तुम्ही जन्मत: हुशार आहात आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता. तुम्ही जर सरकारी नोकरीत असाल तर तुम्ही सरकारकडून लाभ आणि बढतीची अपेक्षा करू शकता. तुम्ही आर्थिक व सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगू शकता. वयाच्या २४ ते ३३ या काळात तुम्ही वृद्धीचा सर्वोत्तम काळ अनुभवू शकता. तुमच्यासाठी योग्य क्षेत्रं सर्जन, साहसी कथालेखक, धर्मगुरू, ज्योतिषी, योग प्रशिक्षक, मानसविश्लेषक, राजकारणी, शस्त्र बनवण्याशी संबंधित कामे, सैनिक, चकमक तज्ञ, वेल्डींग, लोहार आणि सुतारकाम संबंधित कामे, फार्मास्युटीकल कामे इ.

कौटुंबिक आयुष्य

अपेक्षेपेक्षा आईचे प्रेम कमी मिळण्याची शक्यता आहे. आईपासून वेगळे होणे हे एक कारण असू शकेल. पण वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. बायको हुशार आणि कर्तव्यनिष्ठ असेल. मुलांकडून निखळ आनंद लाभेल.

Talk to Astrologer Chat with Astrologer