बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त: 28 फेब्रुवारी, 2023

Author: योगिता पलोड | Updated Thu, 23 Feb 2023 01:07 PM IST

बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त 28 फेब्रुवारी 2023 ला होत आहे. बुध ग्रह 28 फेब्रुवारी च्या रात्री 8:03 वाजता कुंभ राशीमध्ये अस्त होतील आणि या नंतर 31 मार्च 2023 च्या दुपारी 14:44 वाजता उदय होईल. बुध ग्रह आपल्या या अस्त अवस्थेत मीन राशीमध्ये जातील आणि त्या नंतर मेष राशी मध्ये जातील. मेष राशीमध्ये बुधाचा उदय 31 मार्च 2023 ला होईल. अश्या प्रकारे बुध ग्रहाचे हे अस्त होणे अनेक प्रकारच्या समस्यांना घेऊन ही येऊ शकते कारण, बुध ग्रह अत्यंत महत्वपूर्ण ग्रह आहे. हे व्यवसायाला घेऊन तुम्हाला कम्युनिकेशन पर्यंत प्रभावित करतात. बुध ग्रहाचे कमजोर होणे त्याच्या संबंधित सर्व कार्यांत चढ-उतार स्थिती येऊ शकते परंतु, जसे ही परत उदय होईल होईल परिस्थितीमध्ये पुन्हा बदल होईल आणि तुम्ही नंतर परत आपल्या जीवनात बदल वाटेल. असे बऱ्याच वेळा पहायला मिळते की, जेव्हा कुठला ग्रह सूर्याच्या जवळ येण्याच्या कारणाने अस्त अवस्थेत येतो परंतु, बुध एक खूप महत्वाचा ग्रह आहे. हे आमच्या जीवनाच्या अनेक महत्वाच्या परिस्थितींवर अधिपत्य ठेवते म्हणून, बुध ग्रहाचा अस्त होणे विभिन्न लोकांच्या जीवनात मोठे-मोठे बदल आणू शकतो. चला तर मग जाणून घेऊया की, तुमच्या राशीसाठी बुध ग्रहाच्या कुंभ राशीमध्ये अस्त होण्याचा काय प्रभाव राहील.

बुध अस्त आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त: वैदिक ज्योतिषात बुध ग्रह

वैदिक ज्योतिष अंतर्गत बुध ग्रहाला अत्यंत महत्वपूर्ण ग्रह मानले गेले आहे. हे आपल्या बुद्धीसोबत आपली संवाद शैली, बोलचालीची पद्धत, आपल्या वाणीला प्रभावित करते. शरीराच्या तिन्ही महत्वपूर्ण तत्व वात, पित्त आणि कफ ला हे ग्रह प्रभावित करतात. हे संदेश वाहकाच्या रूपात कम्युनिकेशन चा कारक बनतो. बुधाला वाणिज्याचे कारक मानले गेले आहे.

हे आपल्याला सांख्यिकी आणि तार्किक योग्यता प्रदान करते. हे बुद्धीचे कारक असल्याने आपल्याला बुद्धी प्रदान करतात. जे विभिन्न कार्यात आपल्या कामाला येते आणि आपल्या जीवनाला सक्षम बनवते. जीवनात बुध ग्रहाला चांगल्या स्थितीत असणे आवश्यक असते कारण, हे जीवनाच्या विभिन्न क्षेत्राला मजबूत बनवते. याच्या कमजोर होण्याने समस्या जन्म घेते. व्यक्ती विश्लेषण क्षमता कमजोर होते. त्यांच्या वाणी मध्ये समस्या राहते आणि ते आपल्या गोष्टींना लोकांपर्यंत पोहचवू शकत नाही.

हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. चंद्र राशी कॅल्क्युलेटर ने जाणून घ्या आपली चंद्र राशी!

मेष राशि

मेष राशीसाठी बुध तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या एकादश भावात अस्त होईल. बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होऊन तुमच्या पेशावर जीवनात उत्तम योग बनवतील. कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. तुम्ही नोकरी करत असाल तर, तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते, पण बुध ग्रहाच्या अस्त स्थितीत तुम्हाला अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता कमी होईल. तुमच्या अपेक्षेपेक्षा ते कमी असल्याचे तुम्हाला दिसून येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल परंतु, तुम्हाला स्वतःवर कामाचा ताण जाणवेल आणि तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा कमी साध्य करत आहात असे तुम्हाला वाटेल. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्या जाणवतील. मोठे निर्णय घेण्यास वेळ लागेल. बुधाचे अस्त व्यावसायिकांसाठी वेळोवेळी काही समस्या निर्माण करेल. तुमच्यासाठी बुधाच्या अनुकूल स्थितीमुळे समस्या हळूहळू कमी होत जातील परंतु, तुम्हाला तुमच्या इच्छित इच्छा पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्ही पैसे वाचवू शकाल. मात्र, तुम्ही जेवढे पैसे कमावता तरी, तुम्हाला ते वापरता येणार नाही. तुम्ही बँक बॅलन्स जरी वाढवला तरी तुम्ही तुमच्या वैयक्तिक वापरासाठी ते तुम्ही कमी वापरू घेऊ शकाल आणि कौटुंबिक खर्च कराल. तुमच्या सभोवतालचे वातावरण असे असेल की, तुम्हाला थोडेसे काळजी वाटेल आणि कोणता ही मोठा निर्णय घेणे तुम्हाला कठीण जाईल परंतु, तुम्ही एक कार्यक्षम नेता म्हणून स्वतःला पुढे कराल आणि तुमच्या आरोग्याकडे ही लक्ष द्याल.

उपाय: तुम्ही बुधवारी श्री विष्णु चालीसाचा पाठ केला पाहिजे.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - मेष

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

वृषभ राशि

बुध तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या दशम भावात अस्त होईल. बुध कुंभ राशीमध्ये अस्त होऊन तुम्हाला कार्यक्षेत्रात जुझारू बनवण्यासाठी प्रेरित करतील कारण, तुमच्यावर कामाचा दबाव अधिक राहील म्हणून, तुम्हाला वेळोवेळी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता कामावर ही लक्ष द्यावे लागेल कारण, केव्हा ही काही ही समस्या येऊ शकते. तुमच्या सोबत काम करणारे सहकारी ही तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. सर्व बाजूंनी डोळे आणि कान उघडे ठेवून काम करावे लागेल. अनावश्‍यक प्रवासामुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि तुम्हाला महागात पडू शकते. परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालावधी चांगला राहील. तुम्‍ही कोणता ही व्‍यवसाय करत असल्‍यास, तुम्‍हाला अपेक्षित नफा मिळवण्‍यासाठी प्रतीक्षा करावी लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागतील. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते बिघडू नये, यासाठी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल आणि परस्पर समंजसपणा दाखवून परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या, हा काळ ठीक राहील. जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये काम केले तर, तुम्हाला नफा मिळू शकतो, पण जास्त नाही. या दरम्यान कोणत्या ही प्रकारची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता ही निर्माण होऊ शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर, तुम्हाला बोनस किंवा काही विशेष लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो. तुम्ही तुमचा मुद्दा कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगू शकणार नाही, त्यामुळे कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुमचा फारसा उपयोग होणार नाही. यासाठी तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची मदत घ्यावी लागेल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या काळात अत्यंत शारीरिक थकवा, अशक्तपणा किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती द्या आणि चांगले जीवन जगा.

उपाय: भगवान श्री हरी विष्णूच्या मंदिरात जाऊन त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - वृषभ

मिथुन राशि

मिथुन राशीच्या जातकांची राशी स्वामी बुध आहे म्हणजे हे तुमच्या पहिल्या आणि चौथ्या भावाचे स्वामी आहे आणि या काळात हे तुमच्या नवम भावात अस्त होईल. बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होऊन तुमच्यासाठी काही समस्या उभी करू शकतात. तुमच्या कामात यश मिळविण्यासाठी तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त संघर्ष करावा लागू शकतो. तुम्ही नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी आव्हाने येऊ शकतात. तुमची बदली अशा ठिकाणी होऊ शकते जिथे तुम्हाला जायला आवडत नाही आणि तुमच्यावर कामाचा दबाव असेल. सहकाऱ्यांशी वाद होण्याची किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला काही त्रास होण्याची ही शक्यता आहे. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की, या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ मध्यम राहील. तुम्ही सामान्य लाभ मिळवण्याच्या स्थितीत असाल. परदेशाशी संबंधित काम केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो परंतु, चांगले लाभ मिळण्यासाठी तुम्हाला बराच काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. जर तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर, त्यासाठी तुम्ही आता थांबले पाहिजे. ही योग्य वेळ नाही, काही काळानंतर हे करायला हरकत नाही. नशिबावर अवलंबून न राहता मेहनत करण्यावर भर द्यावा. यामुळे तुमच्या यशाचा मार्ग खुला होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले निकाल मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. पती-पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर वाद होण्याची किंवा तणाव वाढण्याची शक्यता देखील असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला स्वतःला शांत ठेवावे लागेल आणि या सर्वांमधील परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आर्थिकदृष्ट्या, हा काळ मध्यम राहील. तुमचे खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतील आणि ते व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला खूप लक्ष द्यावे लागेल. हा कालावधी आरोग्याच्या दृष्टीकोनातून लक्ष देणे योग्य आहे कारण, मानसिक तणाव अत्यंत असू शकतो आणि अनावश्यक चिंता असू शकतात ज्यामुळे आरोग्य बिघडेल म्हणून, स्वत: ला वेळ द्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या.

उपाय: दररोज ठराविक वेळा ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप करावा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - मिथुन

काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा

कर्क राशि

कर्क राशीसाठी बुध तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि या काळात हे तुमच्या आठव्या भावात अस्त होईल. ही वेळ तुम्हाला अचानक धन लाभ करवू शकते. जर तुम्ही शेअर मार्केट, लॉटरी इत्यादींशी संबंधित काम करत असाल तर, तुम्हाला या काळात अचानक आर्थिक लाभ मिळू शकेल. तुम्हाला काही वारसा ही मिळू शकतो. तथापि, हे तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या कुंडलीत असे मोठे योग तयार होत असतील, ज्यामुळे तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकेल. काही जातकांना अचानक परदेश प्रवासाचे योग येतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला कामाच्या संदर्भात इतर राज्यात आणि इतर देशात जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला चांगले प्रमोशन देखील मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरेल. काही नवीन संधी ही मिळतील. जर तुम्ही असा कोणता ही व्यवसाय करत असाल, जो भागीदारीत असेल, तर तुमचे भागीदाराशी चांगले संबंध असतील आणि तो या व्यवसायाला जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला असेल, पण तुम्हाला पैसे वाचवण्याकडेही लक्ष द्यावे लागेल अन्यथा, मिळालेले पैसे खर्च होतील आणि तुम्ही हात झटकत राहाल. या काळात अध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष कमी होईल आणि तुम्ही तार्किक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. यावर मात करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पोटाच्या समस्या किंवा पचनसंस्थेचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उपाय: बुधवारी श्री दुर्गा चालीसा चा पाठ केला पाहिजे.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - कर्क

सिंह राशि

सिंह राशीच्या जातकांसाठी बुध दुसऱ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि या काळात हे तुमच्या सप्तम भावात अस्त होईल. बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होण्याने पेशावर जीवनात चढ उतार स्थिती दिसेल. भागीदारी व्यवसायात चढ-उतार असेल. तुम्ही आणि तुमचे व्यावसायिक संबंध संघर्षाच्या परिस्थितीचे साक्षीदार व्हाल. जर तुम्ही कोणाशी भागीदारी करून व्यवसाय करत असाल तर, त्यात काही समस्या निर्माण होतील. तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी वाद होऊ शकतात परंतु, तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुलनेने चांगली कामगिरी करू शकाल. तुम्ही नोकरी करत असाल तर परदेशी कंपनीत काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल परंतु, तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्‍यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या हळूहळू लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नफा मिळेल, पण हळूहळू बचत करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करावे लागेल अन्यथा, येणाऱ्या काळात समस्या मोठ्या होऊ शकतात आणि तुम्हाला पैशासाठी त्रास सहन करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर, जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव निर्माण होईल. तुम्ही त्यांच्याशी बसून बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा अथवा तुमच्यातील अंतर वाढतच जाईल. आरोग्याच्या दृष्टीने, हा काळ चांगला राहील. तुमची तब्येत सुधारेल, पण तुमच्या प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि रोज योगासने करत राहा.

उपाय: ॐ नमो नारायण मंत्राचा जप कमीत कमी 21 वेळा करणे तुमच्यासाठी लाभदायक राहील.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - सिंह

कन्या राशि

जर तुमचा जन्म कन्या राशीमध्ये झालेला आहे तर, बुध तुमचा राशी स्वामी आहे म्हणजे हे तुमच्या पहिल्या आणि दशम भावाचा स्वामी आहे तसेच, या काळात हे तुमच्या सहाव्या भावात अस्त होईल. या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत काही अचानक बदलांना सामोरे जावे लागू शकते. असे होऊ शकते की, तुम्ही कार्यालयात गेलात आणि तुम्हाला कळेल की तुमच्या विभागात बदल झाला आहे किंवा तुमची बदली होऊ शकते. तुमच्यावर कामाच्या जास्त दबावामुळे तुम्ही खूप व्यस्त असाल. कामात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्ही कोणत्या ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर, तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. तुम्ही कोणत्या ही व्यवसायात असाल तर बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त काही समस्या निर्माण करू शकते. तुम्हाला अपेक्षित नफा मिळण्यात अडचणी येऊ शकतात, एकतर नफा मिळण्यास विलंब होईल किंवा व्यवसाय तुमच्या आजूबाजूच्या बाजारपेठेवर तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रभाव पाडू शकणार नाही. यासाठी तुम्हाला बाह्य मदतीची आवश्यकता असेल. दुसऱ्या कंपनीला भेटून चांगले मार्केटिंग करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तथापि, या काळात काही नवीन लोक तुम्हाला भेटू शकतात आणि तुमच्या व्यवसायात तुम्हाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचे खर्च खूप जलद होतील आणि खर्च तुमच्या हाताबाहेर जाऊ शकतात. त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असेल अन्यथा, तुमची आव्हाने वाढू लागतील कारण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. व्यक्तिशः तुम्हाला चांगले आयुष्य लाभेल. जोडीदारासोबत वागणूक ही चांगली राहील. कधी-कधी तुम्हाला त्यांच्या एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटू शकते, ज्यामुळे वाद होऊ शकतो परंतु, कोणती ही मोठी समस्या उद्भवणार नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, तुम्हाला पोटदुखी, पाय दुखणे, मानसिक ताण आणि स्नायू दुखणे असू शकते.

उपाय: बुधवारी श्री राधा अष्टक चा पाठ करा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - कन्या

तुळ राशि

तुळ राशीतील जातकांसाठी बुध पंचम भावात अस्त होईल. हे तुमच्या नवम आणि द्वादश भावाचा स्वामी आहे. बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त च्या परिणामस्वरूप, तुमच्या कमाई मध्ये वाढ पहायला मिळू शकते. बुधाची ही स्थिती तुमच्या जीवनातील अध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल दर्शवते. तुमचे मन उपासना आणि इतर अध्यात्मिक कार्यात अधिक गुंतले जाईल आणि तुमचा देवावर अधिक विश्वास वाटू लागेल. या काळात तुम्हाला नोकरीच्या संदर्भात प्रवास करावा लागेल परंतु, नोकरीत बदल होऊ शकतो. थोडे लक्ष द्या अन्यथा, नोकरी बदलण्याची परिस्थिती येऊ शकते. तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. जर तुमचा व्यवसाय परदेशी संपर्कांच्या आधारे चालत असेल किंवा परदेशात चालत असेल तर, अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या, हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. बचतीच्या रूपात ही पैसे जमा होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. वैयक्तिक जीवनात चांगला काळ येईल. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. तुमच्या प्रेम जीवनातील चढ-उतारांदरम्यान, प्रेमळ क्षण ही येतील. एकमेकांसोबत रोमान्स करण्याची ही संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक एकाग्रतेची आवश्यकता असेल आणि तुम्हाला तुमची दिनचर्या योग्य दिशेने वळवावी लागेल तरच, तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल. आरोग्य ठीक राहील, पण पोटाच्या आजारांपासून सावध राहावे लागेल.

उपाय: श्री कृष्ण मंदिरात बासरी भेट द्या.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - तुळ

वृश्चिक राशि

बुध वृश्चिक राशीच्या चतुर्थ भावात अस्त होईल. हे तुमच्या अष्टम आणि एकादश भावाचा स्वामी आहे. बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होऊन तुमच्या कार्य क्षेत्रात चढ-उतार घेऊन येऊ शकते. तुमचे मन तुमच्या कामात गुंतून राहणार नाही आणि तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही तर तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध बिघडू शकतात, जे तुम्हाला हाताळणे कठीण होईल. तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल तर, या काळात तुम्हाला चांगल्या व्यावसायिक संबंधांचा लाभ मिळेल आणि व्यवसायात प्रगती होईल. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यात ही तुम्हाला यश मिळू शकते. परंतु, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ फारसा चांगला नाही. जर तुमच्या व्यवसायाच्या योजनांमध्ये व्यवसायाचा विस्तार करणे आवश्यक आहे तर, या काळात तुम्ही पुढे न जाता आणि थोडा वेळ थांबू नका अन्यथा, तुमचे नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या, हा काळ मध्यम राहील. जर तुम्हाला एका बाजूने चांगले उत्पन्न मिळाले तर दुसऱ्या बाजूने खर्च ही त्याच प्रमाणात सुरू होईल, म्हणजेच तुमचे खर्च आणि उत्पन्न सातत्याने वर-खाली होत जाईल. जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष दिले तर तुम्ही तुमच्या जीवनातील सुखसोयींच्या वाढीकडे लक्ष द्याल. कौटुंबिक वाद वाढू शकतात आणि परस्पर संबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात. तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तिच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, मज्जासंस्था किंवा त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत, स्वतःची काळजी घ्या आणि कोणती ही समस्या वाढू देऊ नका.

उपाय: नियमित श्री हनुमान चालीसा चा पाठ करा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - वृश्चिक

धनु राशि

जर तुम्ही धनु राशीमध्ये जन्म घेतलेले जातक आहे तर, बुध तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात अस्त होईल. हे तुमच्यासाठी सप्तम आणि दशम भावाचा स्वामी आहे. बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होण्याने कुंभ राशीमध्ये बुध अस्तामुळे तुमच्या करिअरसाठी हा काळ चांगला असेल, पण तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित संवाद अतिशय विचारपूर्वक केला पाहिजे कारण, चुकीच्या संवादामुळे नुकसान होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. तुमच्या नोकरीत छोटे प्रवास होतील, पण ते तुमचे काम चांगले करतील. नोकरीत चांगले पद मिळेल. तुमचे सहकारी तुम्हाला मदत करताना दिसतील. भावंडांसोबतचे नाते चढ-उतारांनी भरलेले असू शकते. तुमचे सहकारी ही तुम्हाला मदत करताना दिसतील. नोकरीची नवीन संधी ही तुमच्या समोर येऊ शकते. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, हा कालावधी तुम्हाला चांगला नफा देईल आणि तुमच्या कोणत्या ही मित्रांमार्फत तुम्हाला चांगला व्यवहार मिळू शकेल. व्यावसायिक सहलीसाठी ही हा काळ चांगला राहील. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि तुमचा खर्च यात समतोल साधण्याचा प्रयत्न करावा लागेल. या काळात, अशी संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळेल परंतु, तुम्हाला पैशाचे योग्य व्यवस्थापन करायला शिकावे लागेल अन्यथा, आर्थिक धोका वाढेल. जीवनसाथी सोबतचे संबंध मधुर होतील. जर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर तुम्हाला खांदे दुखणे किंवा घसा खवखवणे असू शकते परंतु, यावेळी काळजी करण्यासारखे काही नाही.

उपाय: तुम्ही श्री गणपती अथर्वशीर्ष चा पाठ केला पाहिजे.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - धनु

मकर राशि

बुध तुमच्या राशीतून द्वितीय भावात अस्त होतील. हे तुमच्या सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे. तुमच्या भाग्य भावाचा स्वामी बुध तुमच्या दुसऱ्या भावात अस्त होणे तुमच्या जीवनात नवीन सुरवात घेऊन येईल. जीवनात नवीन संधी मिळतील. तुमच्या वडिलांसोबत तुमचे नाते मधुर होईल आणि तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबात तुमची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर, या काळात तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते आणि ती तुमच्यासाठी चांगली असेल. तुम्ही खूप मेहनत करता आणि काही वेळा तुमची मेहनत लोकांना दिसत नाही पण, या काळात ते लोकांसमोर येईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तुम्ही एकट्याने व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला चांगले यश मिळेल. व्यवसायातील भागीदारासोबत भागीदारी करून व्यवसाय करत असाल तर काही तणाव निर्माण होऊ शकतो आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे काही सावधगिरीने काम करा. आर्थिकदृष्ट्या, हा काळ चांगला राहील. तुमचे पैसे बचतीच्या रूपात ही जमा होतील, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि दुसरीकडे तुमच्यासाठी आर्थिक फायदा होण्याची शक्यता ही निर्माण होईल. वैयक्तिकरित्या सांगायचे तर, आरोग्याच्या समस्या तुमच्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात परंतु, त्यांचे वागणे प्रेमळ असेल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून, यावेळी कोणती ही मोठी समस्या दिसत नाही. फक्त उत्तम भोजन घ्या.

उपाय: तुम्ही श्री यंत्राची स्थापना करून त्याची विधिवत पूजा-अर्चना केली पाहिजे.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - मकर

कुंभ राशि

बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होणे म्हणजे तुमच्या प्रथम भावात अस्त होतील. हे तुमच्या पाचव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे तुमच्या राशीमध्ये अस्त होणे तुमच्यासाठी माध्यम रूपात फळदायी सिद्ध होईल. एकीकडे, तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या परिस्थितीमुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकते, तर दुसरीकडे तुम्ही स्वतःच्या काही चुकीचे बळी होऊ शकता. लोकांशी बोलताना संयम ठेवा आणि कोणता ही संवाद विचारपूर्वक करा अन्यथा, समस्या उद्भवू शकतात आणि तुम्हाला नोकरीत ही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल तर, हा कालावधी चांगला असेल आणि तुमच्या व्यवसायात चढ-उतार असले तरी तुम्ही हळूहळू यशस्वी व्हाल परंतु, व्यावसायिक संभाषणात, कोणाशी ही काळजीपूर्वक बोला आणि कोणते ही वचन देऊ नका जे तुम्ही पूर्ण करू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या, हा काळ चांगला राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दिसतील, ज्यामुळे चांगले उत्पन्न देखील मिळेल. ही तुमची चमकण्याची वेळ असेल. तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकाल आणि त्या तुमच्या आयुष्यात लागू करताना, त्यांचा चांगला फायदा घेताना दिसतील. जर आपण तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्या जोडीदारासोबतचे नाते मधुर असेल, पण तरी ही तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, त्यांना दुखावले जाईल असे काही ही बोलू नका. बाकी सर्व ठीक असेल. तुमचे आरोग्य चांगले राहील.

उपाय: तुम्ही श्री राधा-कृष्ण जी चा श्रृंगार केला पाहिजे.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - कुंभ

मीन राशि

जर तुम्ही मीन राशीमध्ये जन्म घेतलेला आहे तर, बुध तुमच्या राशीच्या द्वादश भावात अस्त होईल. हे तुमच्या राशीसाठी चौथ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होऊन तुमच्या जीवनात काही चढ उतार येऊ शकतात. नोकरी केली असाल तर, कामाच्या ठिकाणी धावपळीचे वातावरण राहील. तुम्ही खूप व्यस्त असाल कारण एका जागी बसणे त्रासदायक ठरू शकते. तुमचा विभाग अचानक बदलू शकतो. तुमच्यावर कामाचा भार पडेल आणि इच्छित परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर ही जर तुम्हाला पूर्ण यश मिळाले नाही तर, तुम्ही थोडे निराश होऊ शकता. कठोर परिश्रम थांबवू नका आणि आपल्या वतीने प्रयत्न करत रहा. तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल तर त्यासाठी वेळ उत्तम राहील. विशेषत: परदेशी व्यवसाय तुम्हाला चांगले यश मिळवून देऊ शकतो आणि त्यातून चांगले पैसे कमावले जातील. आर्थिकदृष्ट्या, हा काळ तुम्हाला नफा मिळविण्याची संधी देईल. तुमचे खर्च राहतील आणि वाढतील पण पैसे ही येत राहतील. वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला कौटुंबिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परस्पर समस्या वाढू शकतात. एकमेकांबद्दल सामंजस्याचा अभाव असेल आणि एकमेकांना पटवणे कठीण होईल. जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतार ही असतील, जे कालांतराने हळू हळू जातील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाठदुखी किंवा डोळ्यांत जळजळ होण्याची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. रोज स्वच्छ पाण्याने डोळे धुवा आणि स्वच्छ पाणी प्या.

उपाय: तुम्ही नियमित आपल्या मस्तकावर हळदीचा तिलक लावा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - मीन

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer