बुधाचे मकर राशीमध्ये गोचर (Budhache Makar Rashimadhe Gochar)

Author: योगिता पलोड | Updated Tue, 31 Jan 2023 01:17 PM IST

बुधाचे मकर राशीमध्ये गोचर: बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे आणि त्याचा वेग सर्वात वेगवान आहे. ज्योतिषशास्त्रात, बुध हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच बुध कन्या आणि मिथुन राशीवर शासन करतो. दुसरीकडे बोलायचे झाले तर, बुधची उच्च राशी देखील कन्या आहे आणि मीन ही त्याची नीच राशी आहे. बुध हा सूर्य देवाच्या सर्वात जवळ आहे म्हणून, त्याला ग्रहांचा राजकुमार असे ही म्हणतात. सूर्यापासून बुधाच्या इतक्या कमी अंतरामुळे, जातकाच्या जन्मकुंडली मध्ये सूर्य आणि बुध एकाच भावात उपस्थित असतात किंवा ते एकमेकांपासून एका भावाच्या अंतरावर असतात.


भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

बुध संवाद कौशल्ये वाढवतो, एखाद्या व्यक्तीमध्ये चतुराईने आणि तर्काने बोलण्याची क्षमता वाढवतो. ज्या जातकांच्या कुंडलीत बुध मजबूत स्थितीत असतो, ते आपले विचार इतरांसमोर चांगल्या पद्धतीने मांडू शकतात. यासोबतच असे लोक आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यात ही यशस्वी होतात. याशिवाय आश्लेषा, ज्येष्ठ आणि रेवती नक्षत्र चे स्वामित्व प्राप्त आहे आणि आठवड्याचा दिवस बुधवार त्यांना समर्पित आहे. ज्योतिषाच्या सल्ल्याने पन्ना धारण करून बुधा महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतात.

येथे वाचा: राशि भविष्य 2023

अ‍ॅस्ट्रोसेज च्या या विशेष ब्लॉगमध्ये, तुम्हाला बुधाचे मकर राशीमध्ये गोचर संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळेल. उदाहरणार्थ, गोचर ची तिथी, वेळ आणि राशीनुसार, त्याचे महत्त्वाचे परिणाम आणि त्यासाठी उपाय.

बुधाचे मकर राशीमध्ये गोचर: तिथी आणि वेळ

बुध 7 फेब्रुवारी, 2023, मंगळवारी सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी मकर राशीमध्ये गोचर करेल. चला आता हे जाणून घेऊया की, आपल्या जीवनात ग्रह बुधाच्या या गोचरचा काय प्रभाव पडेल.

बुधाचे मकर राशीमध्ये गोचर: काय असेल याचे महत्व

मकर राशीमध्ये सर्वात लहान बुध गोचर व्यावहारिकता आणि उत्तम संचार दर्शवते. तथापि, मकर राशीमध्ये बुधावर शनीचा ही प्रभाव पडणे निश्चित आहे. हे गोचर या गोष्टीची पुष्टी करते की, जर तुम्ही काही कामात आपले पूर्ण लक्ष लावतात तर, तुम्ही त्यात आपले यश नक्कीच मिळवू शकतात.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

मेष

मेष राशीतील जातकांसाठी बुधाचे मकर राशीमध्ये गोचर बरेच फायदेशीर सिद्ध होईल. तुमच्या करिअर मध्ये प्रगती होईल, नोकरीच्या नवीन संधी मिळतील. याच्या मदतीने तुम्ही कोणते ही काम सुरू कराल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल तर, व्यावसायिकांना ही या काळात चांगले पैसे मिळू शकतील. मेष राशीच्या तिसर्‍या भावाचा स्वामी बुध तुमच्या कुंडलीच्या दहाव्या भावात म्हणजेच करिअरचे भाव आहे. त्यामुळे हा काळ व्यावसायिक जीवनात आणि करिअरच्या पातळीवर सकारात्मक बदल घडवून आणेल. तुम्ही तुमचे म्हणणे इतरांसमोर उघडपणे आणि स्पष्टपणे मांडू शकाल. दुसरीकडे, जर आपण विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्यासाठी देखील हा काळ चांगला आहे आणि आपण शिक्षणात चांगली कामगिरी करू शकाल.

वृषभ

बुध तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि आता ते नवव्या भावात गोचर करत आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी हे गोचर खूप शुभ राहील, बुध नवव्या भावातून तिसर्‍या भावात आपली नजर टाकेल. त्याच्या प्रभावाने, तुमचे संवाद कौशल्य सुधारेल आणि तुम्ही तुमचे शब्द इतरांसमोर व्यावसायिक पद्धतीने मांडू शकाल. दुसरीकडे, जर आपण अभ्यासाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ चांगला असेल, तुम्ही तुमच्या मेहनतीने उच्च शिक्षणात चांगली कामगिरी करू शकाल.

मिथुन

मकर राशीच्या आठव्या भावात बुधाची उपस्थिती मिथुन राशीच्या जातकांमध्ये भिन्न कल्पना आणि पारंपारिक विश्वास निर्माण करेल. या व्यतिरिक्त, या काळात तुम्ही तुमचा वेळ कायदा आणि न्यायाचे ज्ञान मिळवण्यात घालवू शकता. या सोबतच तुम्ही आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील नियोजनात अधिक रस घ्याल. या सोबतच, गोचरच्या प्रभावामुळे तुम्ही परिपक्व व्हाल.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

कर्क

तुमच्या कुंडलीच्या सातव्या भावात बुधचे गोचर होईल, कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते फायदेशीर ठरू शकते. या व्यतिरिक्त, जर तुम्ही मीडियामध्ये काम करत असाल किंवा त्याचा अभ्यास करत असाल तर, या काळात तुमच्यासाठी अनेक नवीन संधी येण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम असाल आणि अधिक मेहनत घेऊन काम करण्याचा प्रयत्न कराल.

सिंह

सिंह राशीतील जातकांसाठी बुध सहाव्या भावात गोचर करत आहे, जातकांसाठी हे गोचर अनुकूल सिद्ध होईल. विशेषत: जे जातक आयटी क्षेत्रात किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर असेल. तुम्ही गोष्टींचे अधिक चांगले विश्लेषण करू शकाल आणि तुमचे काम अधिक मेहनतीने करू शकाल. तथापि, या गोचर च्या प्रभावामुळे, तुमच्यामध्ये काही तणावाचे संकेत आहेत, त्यामुळे थोडी काळजी घ्या.

कन्या

कन्या राशीतील जातकांसाठी बुध पाचव्या भावात गोचर करत आहे. जे जातक कौन्सलिंग करतात किंवा सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करतात त्यांच्यासाठी हा कालावधी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या क्षमतेचा उत्तम वापर करू शकाल आणि व्यावसायिक जीवनात तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. यासोबतच तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी कोणत्या ही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

तुळ

बुध, तुळ राशीच्या जातकांच्या कुंडलीच्या चौथ्या भावात गोचर करत आहे. तुमचे घर, कौटुंबिक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही योजना तुम्ही करत असाल तर, या काळात या कामाला पूर्ण गती मिळेल. उद्याचे सर्व नियोजन तुम्ही आधीच करायला सुरुवात कराल. दुसरीकडे, स्टँड-अप कॉमेडी आणि स्टेज प्रेझेंटरमध्ये काम करणाऱ्या जातकांसाठी हा कालावधी फायदेशीर असेल.

वृश्चिक

बुधाचे मकर राशीमध्ये गोचर वृश्चिक राशीतील जातकांना बरेच मेहनती बनवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी संवाद साधताना तुम्ही खूप सावध राहाल. या व्यतिरिक्त, जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, शहाणपणाने निर्णय घ्या आणि तुमच्या आयुष्यातील सर्व ऊर्जा गोळा करा आणि तुमच्या ध्येयाचा पाठलाग सुरू करा.

धनु

धनु राशीतील जातकांसाठी बुध दुसऱ्या भावात गोचर करत आहे म्हणून, तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा समुपदेशक असाल तर, हे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या उत्कृष्ट संवाद कौशल्याने लोकांवर चांगली छाप पाडू शकाल.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

मकर

मकर राशीतील जातकांसाठी बुध पहिल्या भावात गोचर करेल. सरकारी कर्मचार्‍यांसाठी हे गोचर खूप चांगले सिद्ध होईल, या काळात तुम्ही समाजात सन्मान आणि कीर्ती मिळवू शकाल. याशिवाय तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही चांगले पैसे ही कमवू शकाल. तुम्हाला या ट्रांझिटचा पुरेपूर लाभ घेण्याचा आणि तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो.

कुंभ

कुंभ राशीच्या जातकांसाठी बुध बाराव्या भावात गोचर करेल. जर तुम्ही परदेशात प्रॉपर्टीचे काम करत असाल, कायद्याच्या क्षेत्रात असाल किंवा मल्टीनेशनल कंपनीमध्ये काम करत असाल तर, हे गोचर तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या संवाद कौशल्याच्या आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर तुम्ही परदेशातील लोकांशी ही संपर्क साधू शकाल. बुध बाराव्या भावातून सहाव्या भावात आहे, याचा अर्थ कायदेशीर दृष्ट्या तुम्ही विजयी होऊ शकतात. याशिवाय कामानिमित्त परदेश दौऱ्यावर ही जाऊ शकतात.

मीन

मीन राशीचे जातक या गोचर दरम्यान त्यांचे व्यावसायिक ज्ञान आणि विश्लेषणात्मक कौशल्याच्या मदतीने समाजात चांगले संबंध निर्माण करण्यास सक्षम असतील. याशिवाय, तुम्हाला एक नवीन व्यवसाय भागीदार देखील मिळू शकतो, ज्याच्या सोबत तुम्ही भागीदारीत व्यवसाय सुरू करू शकतात.

कुंडली मध्ये बुध ग्रहाला मजबूत करण्यासाठी उपाय

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer