बुधाचे मेष राशीमध्ये गोचर (31 मार्च 2023)

Author: योगिता पलोड | Updated Wed, 22 Mar 2023 01:07 PM IST

बुधाचे मेष राशीमध्ये गोचर 31 मार्च 2023 ला दुपारी 02 वाजून 44 मिनिटांनी होईल. बुध सूर्याच्या सर्वात निकट स्थित ग्रह आहे. ज्याला ज्योतिष मध्ये राजकुमाराची उपाधी दिली गेली आहे. ही बुद्धी, उत्तम तर्क क्षमता आणि उत्तम संचार कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. चंद्रमा नंतर बुध सर्वात लहान आणि सर्वात तेज गतीने चालणारा ग्रह आहे आणि चंद्रासारखा खूप संवेदनशील आहे. हे जातकाची बुद्धी, शिकण्याची क्षमता, सजगता, भाषण आणि भाषा इत्यादीला प्रभावित करतात. वाणीचा कारक बुधाच्या शुभ प्रभावाच्या परिणामस्वरूप व्यक्ती कॉमर्स, बँकिंग, शिक्षण, संचार, लेखन, हास्य आणि मीडिया क्षेत्रात उन्नती प्राप्त करते. बुधाचे सर्व 12 राशींमध्ये मिथुन आणि कन्या राशीवर अधिपत्य आहे.

बुध गोचरचा परिणाम आपल्या जीवनावर काय असेल हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

मेष राशीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास राशी चक्राची पहिली राशी मेष आहे. याचे स्वामित्व मंगळ ग्रहाला प्राप्त आहे. ही प्रकृतीने पुरुष आणि एक उग्र राशी आहे. या राशीतील जातक उर्जावान,साहसी आणि बहादूर असतात.

बुधाचे मेष राशीमध्ये गोचर सर्व 12 राशींसाठी कसे सिद्ध होईल हे जाणून घेण्यासाठी कुंडली मध्ये बुधाची स्थिती आणि जातकाच्या दशेचे विश्लेषण करणे गरजेचे असते. चला आता विस्ताराने जाणून घेऊया की, बुधाच्या या राशीच्या परिवर्तनाचे सर्व राशीतील जातकांवर काय प्रभाव होऊ शकतो आणि याच्या अशुभ प्रभावांपासून बचाव करण्यासाठी काय उपाय आहे.

हे राशि भविष्य तुमच्या चंद्र राशी वर आधारित आहे.

मेष राशि

मेष राशीतील जातकांसाठी बुध तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या लग्न भावात गोचर करतील. हे गोचर तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम घेऊन येणार आहे. सामान्यतः लग्न भावात बुद्धाचे गोचर फलदायी असते कारण, हे लाभकारी ग्रह आहे. या काळात तुम्ही आपल्या व्यक्तित्व आणि रंग रुपाला उत्तम बनवण्याचा प्रयत्न कराल, जे तुम्हाला अधिक आकर्षक आणि आनंदी बनवेल. याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपल्यामध्ये आत्मविश्वास आणि साहस वृद्धी वाढलेली पाहू शकतात कारण, तिसऱ्या भावाचा स्वामी तुमच्या लग्न भावात गोचर करत आहे तथापि, सहाव्या भावाचा स्वामी होण्याच्या कारणाने आरोग्याच्या दृष्टीने सचेत राहण्याची आवश्यकता असेल कारण, पचन तसेच त्वचा संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

बुधाचे मेष राशीमध्ये गोचर काळात तुमचे विरोधी व शत्रू तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न ही करू शकतात परंतु, तुम्ही चिंता करू नका त्यापासून तुम्ही बचाव करण्यात सक्षम आहेत. मीडिया, बँकिंग, डेटा सायंस किंवा एमएनसी कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ नवीन संधी घेऊन येईल. बुध तुमच्या सातव्या भावात दृष्टी टाकत आहे ज्याच्या परिणामस्वरूप तुमचे व्यक्तिगत आणि व्यासायिक भागीदारी मध्ये सुधार व तुमच्या पार्टनरचे तुम्ही सहयोग प्राप्त करू शकाल.

उपाय: नियमित बुध बीज मंत्राचा जप करा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - मेष

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा.

वृषभ राशि

वृषभ राशीतील लोकांसाठी बुध दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या बाराव्या भावात म्हणजे विदेशी भूमी, पृथकरण, हॉस्पिटल आणि एमएनसी भावात गोचर करेल. हा काळ तुमच्यासाठी सामान्यपेक्ष अधिक अनुकूल सिद्ध होईल. विशेषतः जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याची इच्छा ठेवतात किंवा विदेशात नोकरी करण्याची इच्छा ठेवतात त्यांना यश मिळू शकते. या व्यतिरिक्त, जे लोक आपल्या कुटुंबासोबत इंटरनेशनल ट्रिप वर जाण्याची योजना बनवत आहेत त्यांना ही या काळात उत्तम फळ मिळण्याची शक्यता आहे तथापि, आर्थिक रूपात हा काळ कमी अनुकूल प्रतीत होत आहे कारण, या काळात तुमच्या खर्चात वृद्धी होऊ शकते यामुळे तुमचे बजेट प्रभावित होऊ शकते.

आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास, या काळात तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याच्या प्रति सावधान राहण्याची आवश्यकता आहे कारण, चिंता, विकार या कारणाने तंत्रिका संबंधित समस्या वाढू शकतात यामुळे औषधांवर धन खर्च करावा लागू शकतो.

उपाय: भगवान गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण करा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - वृषभ

मिथुन राशि

मिथुन राशीसाठी बुध लग्न आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे आणि आता हे तुमच्या अकराव्या भावात गोचर करेल. हा भाव आर्थिक लाभ, इच्छा,मोठे भाऊ-बहीण आणि काका ला दर्शवते. बुधाचे मेष राशीमध्ये गोचर होण्याने तुमच्याद्वारे केलेली मेहनत तुम्हाला मोठ्या लाभ प्राप्तीची संधी प्रदान करेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील सोबतच, तुमची आर्थिक स्थिती ही सुधारायला लागेल. या काळात तुम्ही कुठल्या ही प्रकारची संपत्ती खरेदी करू शकतात.

या गोचरच्या प्रभावाने तुम्ही आपल्या सामाजिक वर्तुळात वृद्धी करतांना दिसाल आणि मित्रांसोबत वेळ घालवाल. बुध अकराव्या भावातून शिक्षणाच्या पाचव्या भावात दृष्टी टाकत आहे याच्या परिणामस्वरूप विद्यार्थ्यांसाठी ही वेळ उत्तम राहील.

उपाय: बुधवारी 5-6 कॅरेटचा पन्ना चांदी किंवा सोन्याच्या अंगठीमध्ये धारण करणे मिथुन राशीतील जातकांसाठी शुभ फलदायी राहील.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - मिथुन

काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा

कर्क राशि

कर्क राशीसाठी बुध बाराव्या आणि तिसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर वेळी हे तुमच्या दहाव्या भावात विराजमान आहे. ही वेळ नोकरीपेशा जातकांसाठी लाभकारी सिद्ध होईल. करिअर मध्ये नवीन संधी प्राप्त होऊ शकते. ही शक्यता आहे की, तुम्ही आपल्या लहान भाऊ बहीण किंवा काकाच्या भावासोबत व्यवसाय सुरु कराल.

ही वेळ त्या लोकांसाठी उत्तम राहणार आहे जे एमएनसी कंपनीत काम करत आहे किंवा विदेशात काम करायची इच्छा आहे. बुधाचे मेष राशीमध्ये गोचर काळात लांब दूरच्या यात्रेवर जावे लागू शकते. बुध दहाव्या भावातून चौथ्या भावात म्हणजे माता भावावर दृष्टी टाकत आहे ज्याच्या परिणांवरूप, तुम्हाला आपल्या माता चे पूर्ण सहयोग मिळेल आणि तुमचे कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले राहणार आहे.

उपाय: घर आणि कार्यस्थळी बुध यंत्र स्थापित करा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - कर्क

सिंह राशि

बुध सिंह राशीतील जातकांसाठी दुसऱ्या आणि अकराव्या भावाचे स्वामी असतात आणि आता आपल्या या गोचर वेळी हे तुमच्या राशीच्या नवम भावात म्हणजे धर्म, पिता, लांबची यात्रा, तीर्थ यात्रा आणि भाग्य भावात प्रवेश करेल. अश्यात, प्रत्येक पाऊलावर भाग्य तुमची साथ देईल ज्याच्या परिणामस्वरूप तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार पहायला मिळेल आणि तुम्ही आपले धन संचय करण्यात यशस्वी राहाल सोबतच, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. बुधाचे मेष राशीमध्ये गोचर तुमचा कल धार्मिक गोष्टींकडे अधिक वाढेल. तुम्ही दान-पुण्यच्या कार्यात शामिल व्हाल सोबतच, तीर्थ स्थळी यात्रेसाठी धन खर्च करू शकतात.

जे लोक दार्शनिक, सल्लागार, गुरु गाईड किंवा शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूपच उत्तम राहणार आहे. ह्या वेळी तुम्ही आपल्या बोलण्याच्या पद्धतींनी लोकांना प्रभावित कराल. जे विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्तीची योजना बनवत आहे त्यांना या गोचर काळात पुढे जाण्याची संधी मिळेल अर्थात, तुम्हाला आपल्या योजनांमध्ये सकारात्मक परिणाम प्राप्त होतील.

उपाय: आपल्या वडिलांना हिरव्या रंगाची कुठली ही वस्तू भेट करा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - सिंह

कन्या राशि

कन्या राशीतील जातकांसाठी बुध लग्न तसेच दहाव्या भावाचे स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या आठव्या भावात म्हणजे दीर्घायु, आकस्मिक घटना आणि गोपनीयतेच्या भावात प्रवेश करतील. लग्न भावाच्या स्वामींचे आठव्या भावात गोचर तुमच्यासाठी बरीच आव्हाने घेऊन येऊ शकते. हे तुमच्या आरोग्याच्या प्रति प्रभावित करू शकतात. तुम्ही त्वचा किंवा गळ्याच्या संबंधित समस्यांनी ग्रस्त असू शकतात आणि अचानक होणाऱ्या समस्या तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकतात.

बुधाचे मेष राशीमध्ये गोचर तुमच्या स्वभावात काही आक्रमकता घेऊन येईल ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला पेशावर जीवनात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो अश्यात, तुम्हाला आपल्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आठव्या भावातून बुध तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावावर दृष्टी टाकत आहे याच्या परिणामस्वरूप, तुमच्या बचतीत वृद्धी होईल परंतु, अप्रत्यक्षित खर्च ही वाढू शकतात.

उपाय: ट्रांसजेंडर्स चा सम्मान करा आणि शक्य असेल तर त्यांना हिरव्या रंगाचे कपडे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - कन्या

तुळ राशि

तुळ राशीसाठी बुध बाराव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या सातव्या भाव म्हणजे जीवनसाथी आणि पार्नरशीप भावात गोचर करेल परिणामस्वरूप, जे लोक सिंगल आहेत आणि आपल्यासाठी एक पार्टनरच्या शोधात आहेत त्यांचा शोध संपू शकतो तसेच, विवाहित लोकांसाठी ही वेळ एकमेकांसोबत घालवणे, फिरणे आणि आपल्या नात्याला मजबूत बनवण्यासाठी अनुकूल आहे तथापि, बुधाचे मेष राशीमध्ये गोचर तुमच्या पार्टनर च्या आरोग्य संबंधित समस्यांचे कारण बनू शकते.

जर तुम्ही व्यापाराच्या क्षेत्रात पार्टनरशिप करण्याचा विचार करत आहेत तर, एमएनसी कंपनी किंवा दूर राहणाऱ्या लोकांसोबत भागीदारी करणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. बुध तुमच्या बाराव्या भावाचा स्वामी आहे म्हणून, कुठल्या ही प्रकारची कागदी कारवाही च्या वेळी सतर्क राहण्याची आवश्यकता असेल. सप्तम भावातून बुध महाराजाची दृष्टी तुमच्या लग्न भावावर असण्याच्या प्रभावस्वरूप तुम्हाला आपल्या आरोग्य आणि फिटनेस वर लक्ष देण्याची आवश्यकता असेल. स्वस्थ आहार घेण्यासोबतच नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

उपाय: आपल्या शयनकक्षात (बेडरूम) इंडोर झाडे लावा आणि त्यांची काळजी घ्या.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - तुळ

वृश्चिक राशि

बुध तुमच्या राशीच्या अकराव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि आता हे तुमच्या शत्रू, रोग, प्रतिस्पर्धा च्या सहाव्या भावात गोचर करतील. बुधाचे मेष राशीमध्ये गोचर काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल कारण, तुम्हाला फेटी लिव्हर, अपेंडिक्सचा त्रास, त्वचा संबंधित समस्या किंवा इतर समस्यांनी त्रास होऊ शकतो. या काळात तुमचे मित्र तुमचे शत्रू बनू शकतात, त्यामुळे कोणावर ही सहजासहजी विश्वास ठेवू नका आणि पैसे परत न होण्याची शक्यता असल्याने कोणाला ही कर्ज देऊ नका. या बुध गोचर काळात आर्थिकदृष्ट्या कोणता ही मोठा निर्णय घेणे टाळा.

वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत, असा सल्ला दिला जातो की आपण आपल्या चारित्र्याचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे अन्यथा, समस्या येऊ शकते. याशिवाय बुध तुमच्या सहाव्या ते बाराव्या भावात आहे, त्यामुळे तुमचा खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतो.

उपाय: नियमित गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - वृश्चिक

धनु राशि

धनु राशीसाठी बुध सातव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि हे आता तुमच्या पाचव्या भावात म्हणजे शिक्षण, प्रेम संबंध आणि संतान भावात गोचर करतील. पाचव्या भावाला पूर्व पुण्य भाव ही म्हटले जाते. बुधाचे मेष राशीमध्ये गोचर विद्यार्थ्यांसाठी उत्तम सिद्ध होईल विशेषतः जे विद्यार्थी जनसंचार, रिसर्च, लेखन किंवा कुठल्या ही भाषेच्या पाठ्यक्रमाच्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे. या व्यतिरिक्त, जे लोक फ्रेशर आहे त्यांना उत्तम संधी मिळतील.

निजी जीवनात तुमच्या प्रेम संबंधात प्रगाढता येईल. जे लोक आपल्या नात्याला पुढे नेण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी ही वेळ खूप अनुकूल राहील. पेशावर जीवनात काही बदल करण्यासाठी किंवा बिजनेस पार्टनरशिप करण्यासाठी ही वेळ प्रबळ आहे. अकराव्या भावात बुधाची दृष्टी तुम्हाला सामाजिक रूपात लोकप्रिय बनेल. नोकरीपेशा जातक काही प्रभावशाली लोकांच्या संपर्कात स्थापित करण्यात सक्षम असतील.

उपाय: गरजू मुलांना आणि विद्यार्थ्यांना पुस्तके दान करा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - धनु

मकर राशि

मकर राशीसाठी बुध सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि आता हे चौथ्या भावात म्हणजे माता, घरगुती जीवन, घर, वाहन आणि संपत्ती भावात गोचर करेल. बुधाच्या चौथ्या भावात गोचर परिणामस्वरूप तुमच्या कौटुंबिक जीवन आणि घरगुती वातावरण सुखद आणि सौहार्दपूर्ण राहील आणि तुम्ही घरात हवन किंवा सत्यनारायण कथा सारख्या धार्मिक कार्यांचे आयोजन करू शकतात. तुम्ही तुमच्या काकांना भेटू शकता आणि त्यांच्या सोबत आनंददायी वेळ घालवू शकता. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, नीट, कॅट किंवा इतर कोणत्या ही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे.

बुधाचे मेष राशीमध्ये गोचर तुम्हाला वडील आणि गुरूंचे सहकार्य आणि आशीर्वाद देईल. लांबच्या प्रवासासाठी आणि तीर्थयात्रेला जाण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. बुध तुमच्या दहाव्या भावात देखील आहे परिणामी, हा काळ रिअल इस्टेट विकासक आणि एजंटसाठी खूप अनुकूल असणार आहे. तुम्हाला तुमच्या टीम सदस्यांचे आणि अधीनस्थांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण करू शकाल.

उपाय : रोज तेलाचा दिवा लावा आणि तुळशीच्या रोपाची पूजा करा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - मकर

कुंभ राशि

बुध कुंभ राशीतील लोकांसाठी पाचव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि आपल्या या गोचर वेळी हे तुमच्या राशीच्या तिसऱ्या म्हणजे भाऊ-बहीण, शौक, कमी दूरची यात्रा तसेच संचार कौशल्य भावात विराजमान असेल. बुधाचे मेष राशीमध्ये गोचर

बुध का मेष राशि में गोचर कालावधीत, तुम्ही कमी अंतराच्या प्रवासाला किंवा तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकता किंवा दर्जेदार वेळ घालवण्यासाठी आणि नाते दृढ करण्यासाठी तुम्ही तुमच्या भावंडांसोबत आणि जवळच्या मित्रांसोबत सहलीची योजना देखील करू शकतात.

लेखक, मीडिया व्यक्तिमत्व, अभिनेते, दिग्दर्शक, अँकर आणि सल्लागार नोकरीत काम करणाऱ्या जातकांसाठी हा कालावधी खूप फलदायी ठरेल कारण, तुम्ही तुमचे संवाद कौशल्य आणि उत्कृष्ट कल्पनांच्या मदतीने तुमची मते आणि सूचना अधिक प्रभावीपणे इतरांसमोर मांडू शकाल. या गोचर काळात बुध महाराज तुमच्या नवव्या भावाकडे पाहून वडिलांशी तुमचे नाते सुधारतील. या सोबतच तुम्हाला तुमच्या वडिलांकडून चांगल्या कामाची प्रशंसा ही मिळेल.

उपाय: तुमच्या लहान भावंडांना किंवा चुलत भावांना भेटवस्तू द्या.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - कुंभ

मीन राशि

तुमच्या राशीसाठी बुध चौथ्या आणि सातव्या भावाचे स्वामी आहे तसेच, या गोचर काळात हे तुमच्या दुसऱ्या भाव म्हणजे कुटुंब, बचत आणि वाणी भावात प्रवेश करेल. या गोचर काळात तुमच्या वाणी आणि तुमचे संचार कौशल्य प्रभावशाली होईल. जे लोक प्रेम संबंधात आहे आणि विवाह करण्याची योजना बनवत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ आपल्या माता पिता ला भेटण्यासाठी अनुकूल आहे.

बुधाच्या या गोचर दरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह काही धार्मिक कार्यात सहभागी होताना दिसतील. यामुळे बंधुभाव वाढण्यास आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये घट्ट नाते निर्माण होण्यास मदत होईल. दुसरीकडे, आठव्या भावात बुधाच्या राशीमुळे तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींचे सहकार्य मिळेल. याशिवाय, तुमच्या जोडीदारासोबत मिळून तुम्ही दोघांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यासारखी मालमत्ता वाढवू शकता. आरोग्याच्या दृष्टीने, तुम्हाला या काळात स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा, कोणत्या ही प्रकारची ऍलर्जीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

उपाय: तुळशीच्या रोपाला रोज पाणी द्या आणि त्याचे एक पान खा.

पुढील महिन्याचे राशि भविष्य - मीन

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer