शनीचे कुंभ राशीमध्ये उदय (6 मार्च 2023)

Author: योगिता पलोड | Updated Mon, 27 Feb 2023 01:07 PM IST

शनीचे कुंभ राशीमध्ये उदय 06 मार्च 2023 च्या रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी होईल. शनी देव आपल्या अस्त अवस्थेतून निघून कुंभ राशीमध्ये उदय करत आहे. यामुळे लोकांच्या जीवनात बरेच बदल पहायला मिळतील. काही राशींसाठी शनीचे उदय होणे सकारात्मक सिद्ध होईल तर, काही राशींसाठी हे नकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकते. कुंभ राशी शनी ग्रहाच्या स्वामित्वाची दुसरी राशी होण्यासोबतच मूल त्रिकोण राशी ही आहे. या राशीमध्ये शनी आरामदायक स्थितीमध्ये असतात आणि जातकांना उत्तम व शुभ फळ प्रदान करतात. शनी जेव्हा अस्त होतो तेव्हा हे आपल्या समस्त शक्ती हरवून देतात आणि याच्या प्रभावस्वरूप जातकांना आपल्या कार्यात सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यात बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

शनी ग्रहाला मकर आणि कुंभ राशीचे स्वामित्व प्राप्त आहे. हा सर्वात हळू गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनी एका राशीमध्ये अडीच वर्षापर्यंत राहतो तथापि, सामान्यतः शनीला एक क्रूर ग्रह मानले जाते कारण, हे अव्यवहारिकता, वास्तविकता, तर्क, अनुशासन, कायदा, धैर्य, उशीर, कठीण मेहनत, श्रम आणि दृढ संकल्पाचे प्रतीक आहे. या सोबतच, शनी "कर्म कारक" ग्रह ही आहे. वास्तवात लोकांना या सर्व गोष्टी आवडत नाही कारण, हे व्यक्तीला स्वप्नांच्या जगातून बाहेर घेऊन येते आणि वास्तविकतेचे दर्शन होते. हेच शनी देवाचे काम आहे म्हणून, यांच्या प्रभावांचा स्वीकार करणे जातकांसाठी कठीण होते. चला जाणून घेऊया शनीचे कुंभ राशीमध्ये उदय सर्व राशींवर कसा प्रभाव सिद्ध होईल.

हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. याच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी ज्योतिषींसोबत फोनवर किंवा चॅट ने जोडा.

मेष राशि

मेष राशीच्या जातकांसाठी शनी दहाव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि हे आपल्या अकराव्या भावात म्हणजे आय, धन लाभ आणि इच्छा भावात उदय होत आहे. शनीचे कुंभ राशीमध्ये उदय होण्याने मेष राशीतील जातकांना पेशावर जीवनात लपलेल्या शत्रूंना किंवा अनिश्चिततेच्या कारणाने ज्या समस्या येत होत्या त्या आता संपतील सोबतच, आर्थिक स्थितीमध्ये सुधार होण्याची शक्यता आहे आणि प्रमोशन किंवा वेतन वृद्धी होण्याचे योग बनतील. जे लोक फ्रेशर आहे त्यांना या काळात उत्तम संधी मिळेल तसेच, नोकरीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ उत्तम सिद्ध होईल.

उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा आणि प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाला बुंदीचा प्रसाद चढवा.

मेष मासिक राशिभविष्य

वृषभ राशि

वृषभ राशीसाठी शनी नवव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि हा एक योगकारक ग्रह आहे जे आता दहाव्या भावात उदय होत आहे. हा भाव पेशा आणि सामाजिक प्रतिमेचा भाव असतो. शनीचे कुंभ राशीमध्ये उदय होण्याने तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. निजी जीवन आणि पेशावर जीवनात चाललेल्या समस्या संपतील. कार्य क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही आपली एक वेगळी ओळख बनवाल. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्या व्यापारात उन्नतीचे योग बनतील आणि सोबतच मान सन्मानात वृद्धी होईल. जर तुम्ही कंपनी बदलणे किंवा स्थान परिवर्तनाच्या बाबतीत विचार करत आहेत तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल.

उपाय: शनिवारी गरिबांना भोजन द्या.

वृषभ मासिक राशिभविष्य

मिथुन राशि

मिथुन राशीसाठी शनी आठव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि हे आता नवव्या भावात उदय होत आहे, जे की धर्म, पिता, दूर यात्रा, तीर्थ यात्रा आणि भाग्याचा भाव आहे. जे लोक फायनान्स, बँकिंग, सीए, शिक्षक, मेंटॉर इत्यादी क्षेत्राने जोडलेले आहे आणि शनीच्या अस्त होण्याच्या वेळी आपल्या कार्यात बाधांचा सामना करत आहेत त्यांच्यासाठी शनीचे कुंभ राशीमध्ये उदय होणे यशदायी सिद्ध होईल. त्यांना या काळात सर्व समस्यांपासून सुटका मिळेल. पिता सोबत चालत आलेले वाद संपतील आणि तुम्हाला त्यांचा सहयोग मिळेल सोबतच, त्यांच्या आरोग्यात ही सुधार पहायला मिळेल. शनी देवाचे उदय होण्याने परिणामस्वरूप तुमचे भाग्य ही तुमची साथ देईल.

उपाय: शनिवारी मंदिराच्या बाहेर गरिबांना भोजन द्या.

मिथुन मासिक राशिभविष्य

तुमच्या कुंडलीमध्ये आहे काही दोष? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अ‍ॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली

कर्क राशि

शनी कर्क राशीच्या सातव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि आता हे तुमच्या आठव्या भावात म्हणजे दीघायू, अचानक मिळणारा आनंद आणि गोपनीयता भावात उदय होत आहे. जर तुम्ही वैवाहिक जीवन आणि स्वास्थ्य संबंधित समस्यांमधून जात आहेत तर, या काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम पहायला मिळतील तथापि, शनी कर्क राशीसाठी शुभ ग्रह मानला जातो अश्यात, शनीचे कुंभ राशीमध्ये उदय होणे तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतो. जर कुंडली मध्ये शनीची स्थिती आणि दशा अनुकूल नसेल तर, तुम्हाला या काळात सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.

उपाय: सोमवार आणि शनिवार च्या दिवशी भगवान शिवाला काळे तीळ अर्पित करा.

कर्क मासिक राशिभविष्य

सिंह राशि

सिंह राशीतील जातकांसाठी शनी सहाव्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे, जे आता तुमच्या सातव्या भावात म्हणजे जीवनसाथी आणि पार्टनरशिप भावात उदय होत आहे. अश्यात, जर तुम्ही विवाह करण्याची योजना बनवत असाल तर, एप्रिल महिन्या नंतर तुमच्यासाठी विवाहाचे योग बनतांना दिसेल. जर तुम्ही वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करत आहेत तर, या काळात सर्व समस्यांपासून निजात मिळेल आणि तुम्हाला आपल्या दांपत्य जीवनात सुधारणा पहायला मिळेल. नकारात्मक पक्षाची गोष्ट केली असता शनी तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि लग्न भावावर दृष्टी टाकत आहे ज्याच्या परिणामस्वरुप, तुमच्या शत्रूला हानी पोहचवू शकतो आणि तुमची प्रतिष्ठा ही खराब करू शकतो म्हणून, या काळात सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

उपाय: आपल्या कर्मींची मदत करा आणि त्यांच्यावरील कामाचा बोझा कमी करा.

सिंह मासिक राशिभविष्य

कन्या राशि

शनी देव तुमच्या पाचव्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि शनीचे कुंभ राशीमध्ये उदय तुमच्या सहाव्या भावात होईल जे की, शत्रू, रोग, प्रतिस्पर्धा आणि काका चा भाव आहे. अश्यात, जे लोक मुलांच्या खराब स्वास्थ्य, शिक्षणात समस्या, कायद्याच्या विवादात, कार्यस्थळी लपलेल्या शत्रूच्या कारणाने संघर्ष करत होते त्यांना या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे किंवा उच्च अध्ययनाने विदेशात जाण्याची इच्छा ठेवतात त्यांना या संधर्भात शुभ परिणाम मिळतील. या काळात काका आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत तुमचे संबंध मधुर होतील. जर तुम्ही आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करत आहे तर, ही वेळ आपल्या आरोग्य आणि फिटनेस काकडे लक्ष देण्यासाठी उत्तम सिद्ध होईल.

उपाय: आपल्या जीवनातील समस्यांना दूर करण्यासाठी व्यवस्थित राहा कारण शनी देवाला अव्यवस्था आवडत नाही.

कन्या मासिक राशिभविष्य

तुळ राशि

तुळ राशीच्या जातकांसाठी शनी एक योगकारक ग्रह आहे. हे तुमच्या चौथ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या पाचव्या भावात उदय करत आहे, जे की शिक्षण, प्रेम संबंध आणि संतान इत्यादी भावाचा आहे. याला पूर्व पुण्य भाव ही मानले जाते. शनीचे कुंभ राशीमध्ये उदय होणे तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल. तुम्ही आपल्या कुटुंब आणि मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवाल जे तुम्हाला आनंद देईल. जर तुम्ही कुटुंब वाढवण्याचा विचार करत आहे तर, हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. शिक्षणाच्या दृष्टीने पाहिल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल यामुळे तुम्ही शिक्षणाच्या प्रति अधिक लक्ष केंद्रित करू शकाल.

उपाय: दृष्टिहीन लोकांना मदत करा आणि नेत्रहीन विद्यालयात सेवा द्या.

तुळ मासिक राशिभविष्य

वृश्चिक राशि

वृश्चिक राशीसाठी शनी चौथ्या आणि तिसऱ्या भावाचा स्वामी आहे. जे आता चौथ्या भावात उदय होत आहे. या भावाला माता, घरगुती जीवन, घर, वाहन आणि संपत्तीचा भाव मानले गेले आहे. या काळात कौटुंबिक आणि पेशावर जीवनात येणाऱ्या समस्यांचे ही समाधान होईल. जर तुम्ही संपत्ती खरेदी करण्याची योजना बनवत आहेत तर, ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. जर तुमचे तुमच्या लहान भाऊ बहिणींसोबत संपत्तीला घेऊन काही वाद आहे तर, प्रबळ शक्यता आहे की या काळात ती संपेल.

उपाय: नियमित हनुमानाची पूजा करा कारण, हनुमानाच्या पूजेने शनी देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.

वृश्चिक मासिक राशिभविष्य

धनु राशि

धनु राशीतील जातकांसाठी शनी महाराज दुसऱ्या आणि तिसऱ्या भावाचे स्वामी आहे आणि आता हे तुमच्या तिसऱ्या भावात उदय होणार आहे ज्यामुळे भाऊ-बहीण, रुची, लघु यात्रा आणि बोलण्याच्या भाव मानले गेले आहे. शनी चे कुंभ राशीमध्ये उदय होणे तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल. या काळात तुम्ही प्रत्येकासोबत उत्तम बोलण्यात सक्षम असाल सोबतच, आर्थिक तंगीतून बाहेर निघण्यात यशस्वी राहाल आणि बचत करण्यात ही यशस्वी व्हाल यामुळे तुमची वित्तीय/आर्थिक स्थितीमध्ये सुधार होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, या काळात तुमचे तुमच्या भाऊ बहिणींसोबत उत्तम संबंध होतील.

उपाय: श्रमदान करा आणि शक्य असल्यास शारीरिक दृष्ट्या लोकांची मदत करा.

धनु मासिक राशिभविष्य

मकर राशि

शनी देव तुमच्या लग्न आणि दुसऱ्या भावाचा स्वामी आहे, जे आता कुटुंब, बचत, वाणीच्या दुसऱ्या भावात उदय होईल. शनीचे कुंभ राशीमध्ये उदय काळाच्या वेळी तुम्हाला आपल्या आरोग्यात सकारात्मकत बदल पहायला मिळेल. जर तुम्ही कुठल्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे तर, या काळात तुमच्या आरोग्यात सुधार होण्याची शक्यता अधिक आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमचा काही वाद चालू होता तर, शक्यता आहे तो सुरळीत होऊन जाईल. या काळात तुमच्या बचतीच्या वाढ होईल आणि आर्थिक तंगीपासून सुटका मिळेल. पेशावर रूपात पाहले असता ही वेळ तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल. उच्च पद प्राप्त होण्याचे प्रबळ योग बनतील. आरोग्याला घेऊन तुम्हाला सल्ला दिला जातो की, दिनचर्येत योग शामिल करा, स्वस्थ आहार घ्या आणि दारू आणि इतर नशील्या पदार्थांपासून दूर राहा.

उपाय: शनी मंत्र "ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः" चा जप करा.

मकर मासिक राशिभविष्य

कुंभ राशि

शनी महाराज तुमच्या लग्न आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या लग्न भावात उदय होत आहे. या काळात तुमच्यासाठी आपल्या शरीर आणि व्यक्तित्वावर लक्ष देणे उत्तम राहील. तुम्हाला सल्ला दिला जातो की, आळस करू नका आणि आपल्या दिनचर्येत मेडिटेशन, व्यायाम, जुंबा डान्स शामिल करा. जे तुमचे मन आणि शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी मदतगार सिद्ध होईल. निजी आणि पेशावर जीवनात तुम्ही अहंकाराच्या कारणाने ज्या समस्यांचा सामना करत होते या काळात त्याचा अंत होईल. या व्यतिरिक्त, शनी देवाच्या लग्न भावात उदय होण्याने तुम्हाला जीवनातील प्रत्येक पैलूंमध्ये उत्तम परिणाम प्राप्त होतील. फक्त तुम्हाला आपल्या प्रयत्नात निरंतरता कायम ठेवावी लागेल.

उपाय: शनिवारी भगवान शनी समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

कुंभ मासिक राशिभविष्य

मीन राशि

शनी तुमच्या अकराव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि हे बाराव्या भावात उदय होईल. शनीचे कुंभ राशीमध्ये उदय होणे तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल. खर्चात वृद्धी होण्याच्या कारणाने तुम्ही आतापर्यंत ज्या समस्यांचा सामना करत होते त्यांच्यापासून निजात मिळण्याचे योग बनतील. तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पैसा खर्च होण्याच्या आधी विचार करा. जर तुम्ही कुठल्या आर्थिक स्थळी किंवा विदेश यात्रेवर जाण्याची योजना बनावत असाल तर, ही वेळ अनुकूल सिद्ध होईल तथापि, या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असू शकते म्हणून, सल्ला दिला जातो की, नियमित ध्यान, योग करा.

उपाय: छाया दान करा. यासाठी एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्या तेलात आपली छाया पाहून ते तेल शनी मंदिरात दान करा.

मीन मासिक राशि भविष्य

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer