मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर: 13 मार्च 2023

Author: योगिता पलोड | Updated Thu, 09 Mar 2023 13:07 PM IST

मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर, 13 मार्च, 2023 ला 5 वाजून 47 मिनिटांनी गोचर होईल. मंगळ ग्रहाचा शाब्दिक अर्थ ‘शुभ’ असतो आणि त्यांना ‘भूमा’ म्हणजे पृथ्वीच्या पुत्राच्या रूपात ही जाणले जाते. मंगळ ग्रहाला भारतातील विभिन्न हिश्यात वेगवेगळ्या देवतांनी जोडून पाहिले जाते. उदाहरणार्थ, मंगळ देव दक्षिण भारतात कार्तिकेय (मुरुगन), उत्तर भारतात हनुमान जी आणि महाराष्ट्रात भगवान गणेशाने जोडलेले आहे.

मंगळ अग्नी तत्वाच्या अंतर्गत येणारा ग्रह आहे. याला लाल ग्रहाच्या नावाने ही जाणले जाते. सूर्य आणि मंगळ देव आपल्या शरीराच्या अग्नी तत्वाला नियंत्रित करते जसे की, शारीरिक ताकद, दृढता, प्रेरणा, इच्छाशक्ती आणि कुठल्या ही कार्याला पूर्ण करण्याची ऊर्जा. ज्या जातकांच्या कुंडली मध्ये मंगळ देव मजबूत स्थितीमध्ये असतो असे लोक साहसी, स्पष्टवादी आणि आवेगी असतात.

हे गोचर आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर: ज्योतिषीय महत्व

13 मार्च, 2023 ला मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर होईल. सामान्यतः, पूर्ण राशी चक्राची यात्रा करण्यासाठी मंगळ महाराजाला 22 महिन्याचा काळ लागतो. याच्या आधी मंगळ देव 16 ऑक्टोबर 2022 पासून 13 नवंबर 2022 पर्यंत मिथुन राशीमध्ये होते. हा अवधी बराच कमी होता म्हणून, जातकांना यामुळे अधिक लाभ मिळाले नव्हते तथापि, या वेळी सर्व 12 राशींना मंगळ देवाच्या गोचर चे प्रभाव पहायला मिळतील.

मंगळ देवाचे मिथुन मध्ये गोचर वेळी लोकांचे संचार कौशल्य बरेच उत्तम असेल. लोक स्वस्थ, उर्जावान आणि साहसी बनतील. या वेळी लोक आपल्या कौशल्याला वाढवण्यासाठी मेहनत करतील तथापि, जातकांच्या कुंडली मध्ये मंगळ देवाची दशा आणि स्थिती अनुसार सटीक प्रभावांच्या बाबतीत जाणले जाऊ शकते.

हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि

मेष

मेष राशीतील जातकांसाठी मंगळ महाराज लग्न आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि आता हे तुमच्या तिसऱ्या भावात गोचर करतील. तिसरा भाव भाऊ बहीण, शौक, लहान दूरची यात्रा आणि संचार कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. सामान्यतः तिसरा भाव मंगळ देवासाठी आरामदायक स्थिती आहे. या वेळी तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि पूर्ण साहस सोबत आपल्या कार्यांना पूर्ण कराल सोबतच, बऱ्याच काळापासून थांबलेले काम ही या काळात पूर्ण होतील.

तिसऱ्या भावातून मंगळ महाराज तुमच्या कुंडलीच्या सहाव्या, नवव्या आणि दहाव्या भावावर दृष्टी टाकत आहे अश्यात, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे गोचर फळदायी सिद्ध होईल. या काळात तुमचे विरोधी तुम्हाला कुठल्या ही प्रकारचे नुकसान पोहचवण्यात अयशस्वी होतील. जातकांना आपल्या पिता आणि गुरूंची भरपूर साथ मिळेल तथापि, तुम्हाला आपल्या वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

मंगळ देवाची अष्टम दृष्टी तुमच्या दहाव्या भावावर पडत आहे, जे की पेशा भाव असतो. मंगळ देवाची उच्च राशी मकर आहे. परिणामस्वरूप, तुम्हाला नोकरी मध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आपल्या करिअर ची सुरवात करणार आहे तर ही वेळ अनुकूल सिद्ध होऊ शकते आणि तुम्हाला नोकरी मध्ये उत्तम संधी प्राप्त होऊ शकते.

उपाय- मंगळ देवाचा आशीर्वाद प्राप्त कारण्यासाठी उजव्या हाताच्या अनामिका बोटात मुंगा धारण करा.

मेष पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

वृषभ

वृषभ राशीतील जातकांच्या कुंडली च्या सातव्या आणि बाराव्या भावावर मंगळ देवाचे शासन आहे आणि आता हे तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात गोचर करत आहे. हा भाव कौटुंबिक, पैश्याची बचत आणि वाणी ला दर्शवते. मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर, वृषभ राशीतील जातकांना संचाराच्या दृष्टीने थोडे कठोर आणि प्रभावशाली बनू शकते.

मंगळ देव दुसऱ्या भावातून तुमच्या कुंडलीच्या पाचव्या, आठव्या आणि नवव्या भावावर दृष्टी टाकत आहे. याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपली मुले, आपले शिक्षण आणि प्रेम जीवनाला घेऊन खूप पझेसिव्ह राहाल. तथापि, तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की, तुमच्या या व्यवहाराने कुणाला ही समस्या होणार नाही.

इंजिनिअरिंग आणि इतर टेक्निकल विषयाचे शिक्षण घेत असलेल्या जातकांना मंगळ देवाचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त होईल आणि ते उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी होतील. आठव्या भावात मंगळ महाराजांची दृष्टी पडत आहे, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या पार्टनर सोबत मिळून संयुक्त संपत्तीला वाढवण्यात यशस्वी होऊ शकतात तथापि, याचा नकारात्मक प्रभाव ही आपल्या नात्यावर पडण्याची शक्यता आहे म्हणून, आपल्या पार्टनर ला घेऊन सचेत राहा. या व्यतिरिक्त, तुम्हाला वाहन चालवतांना सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.

उपाय- देवी दुर्गेची पूजा करा आणि त्यांना लाल फुल चढवा.

वृषभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मिथुन

मंगळ देव तुमच्या कुंडलीच्या सहाव्या आणि अकराव्या भावावर शासन करते आणि आता हे तुमच्या लग्न भावात गोचर करत आहे. याच्या परिणामस्वरूप, तुम्ही ऊर्जेने भरलेले राहाल आणि तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. तसेच, तुमचा व्यवहार दुसऱ्यांच्या प्रति उग्र होण्याची शक्यता आहे. लग्न भावातून मंगळ देव चौथ्या, सातव्या आणि आठव्या भावावर दृष्टी टाकत आहे. याच्या प्रभावाने तुम्हाला आपल्या माता चे पूर्ण समर्थन मिळेल.

मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर काळात, तुम्हाला प्रॉपर्टी च्या माध्यमाने आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही जमीन खरेदी किंवा विकण्याच्या विचारात आहे तर, ही वेळ अनुकूल सिद्ध होईल. सातव्या भावावर मंगळ देवाची दृष्टी पडत आहे ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला व्यवसाय भागीदारीमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला आपल्या साथी चे भरपूर समर्थन प्राप्त होईल तथापि, उग्र व्यवहाराच्या कारणाने तुम्हा दोघांच्या मध्ये वाद होण्याची शक्यता ही आहे म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या वाणीवर संतुलन कायम ठेवा.

उपाय- मंगळ देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मंगळ बीज मंत्राचा जप करा.

मिथुन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कर्क

कर्क राशीतील जातकांसाठी मंगळ योगकारक ग्रह आहे आणि हे तुमच्या कुंडली च्या केंद्र आणि त्रिकोण भाव म्हणजे पाचव्या आणि दहाव्या भावावर शासन करते. मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या बाराव्या भावात होईल. जे की, विदेशी जमीन, हॉस्पिटल आणि विदेशी कंपनींना दर्शवते. योगकारक ग्रहाचे बाराव्या भावात असणे कर्क राशीतील जातकांसाठी अनुकूल स्थिती नाही. या काळात तुमच्या प्रोफेशनल लाइफ मध्ये काही बदल होऊ शकतात जसे की, तुमची बदली होऊ शकते.

या गोचर वेळी तुम्ही आपल्या ऊर्जा, रोग प्रतिकारक क्षमता आणि साहस मध्ये कमी वाटू शकते. बाराव्या भावातून मंगळ महाराज तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या, सहाव्या आणि सातव्या भावावर दृष्टी टाकत आहे. याच्या प्रभावाने तुमच्या खर्चात वृद्धी होऊ शकते. तुम्हाला लहान दूरच्या यात्रेसाठी किंवा आपल्या आरोग्यसाठी अधिक धन खर्च करावे लागू शकते.

उपाय- नियमित 7 वेळा हनुमान चालीसाचा जप करा.

कर्क पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा

सिंह

मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या अकराव्या भावात होईल आणि हे तुमच्या कुंडलीच्या चौथ्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे. तुमच्यासाठी हा योगकारक ग्रह ही आहे. या गोचर च्या प्रभावाने तुमच्या इच्छेमध्ये वृद्धी होऊ शकते. या काळात काही जुन्या गुंतवणुकीने तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे.

मंगळ देव अकराव्या भावातून दुसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या भावावर दृष्टी टाकत आहे. याच्या परिणामस्वरूप तुम्हाला अधिक धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सॅलरी मध्ये वृद्धी होऊ शकते आणि तुम्ही पैसे वाचवण्यात ही यशस्वी व्हाल तथापि, या काळात तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनाला घेऊन बरेच पझेसिव्ह होऊ शकतात.

मंगळ देवाची दृष्टी पाचव्या आणि सहाव्या भावात पडत आहे. जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल सिद्ध होईल.

उपाय- मंगळवारी हनुमानाची पूजा करा आणि मिठाई दान करा.

सिंह पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कन्या

मंगळ तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. तिसरा भाव भाऊ-बहीण आणि आठवा भाव अनिश्चितता आणि गोपनीयता दर्शवते. मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या दहाव्या भावात होईल जे की, प्रोफेशनलचे प्रतिनिधित्व करते. या गोचर च्या परिणामस्वरूप तुम्हाला पेशावर जीवनात लाभ मिळेल.

जर तुम्ही आपला व्यवसाय करत आहे तर, तुमच्यासाठी हे गोचर अनुकूल परिणाम घेऊन येईल. तुम्ही लागोपाठ मेहनत कराल आणि आपला लाभ वाढवण्यात यशस्वी व्हाल. दहाव्या भावात मंगळ देव तुमच्या कुंडलीच्या लग्न, पाचव्या आणि सातव्या भावावर दृष्टी टाकत आहे. याचा अर्थ आहे की, या काळात तुम्ही उर्जावान असाल आणि आपल्या आत्मविश्वासात ही वृद्धी होईल. तुम्ही अधिक व्यस्त असल्याच्या कारणाने तुम्ही तुमच्या कुटुंबियांना अधिक वेळ देऊ शकणार नाही.

चौथ्या भावावर मंगळाची दृष्टी असल्याने तुम्हाला आपल्या आईचे समर्थन मिळेल परंतु, तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल.

उपाय- मंगळवारी मंगळ यंत्र पूजा आणि ध्यान करा.

कन्या पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

तुळ

मंगळ देव तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या आणि सातव्या भावावर शासन करते आणि आता हे पिता, गुरु आणि भाग्य भावाच्या नवव्या भावात गोचर करत आहे. सातव्या भावाच्या स्वामीच्या रूपात नवव्या भावात मंगळ महाराजांचे गोचर, तुमच्या प्रेम संबंधासाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचा विवाह नक्की होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही आपल्या प्रेमी किंवा प्रेमिका ला आपल्या घरच्या व्यक्तींसोबत भेट घालवू शकतात.

नवव्या भावात मंगळ देवाचे गोचर दर्शवते की, तुम्हाला आपला पिता आणि गुरूंचे भरपूर समर्थन प्राप्त होईल परंतु, अहंकाराच्या कारणाने तुम्ही आपल्या पिता किंवा गुरूंसोबत संबंध बिघडवू शकतात. नवव्या भावातून मंगळ महाराज तुमच्या कुंडलीच्या बाराव्या, तिसऱ्या आणि चौथ्या भावावर दृष्टी टाकत आहे. याच्या परिणामस्वरूप हॉस्पिटल किंवा फिरण्याच्या कारणाने तुमच्या खर्चात वृद्धी होऊ शकते. तिसऱ्या भावात मंगळ महाराजांची दृष्टी च्या परिणामस्वरूप तुमची भाषा आक्रमक होण्याची शक्यता आहे म्हणून, लोकांसोबत बोलण्यात सावधानी ठेवा.

उपाय- नियमित हनुमान मंदिरात जाणून पूजा अर्चना करा.

तुळ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

वृश्चिक

मंगळ तुमच्या कुंडलीच्या लग्न आणि सहाव्या भावावर शासन करत आहे. मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या आठव्या भावात होईल जे की, अनिश्चित घटना आणि गोपनीयता भाव असतो. हे गोचर तुमच्यासाठी अधिक फलदायी सिद्ध न होण्याची शक्यता आहे.

मंगळ देव तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि आठव्या भावात याचे गोचरने विपरीत राजयोग निर्माण होत आहे. हे असे दर्शवते की, तुमचे दुश्मन तुम्हाला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करतील परंतु, ते यशस्वी होऊ शकणार नाही. मंगळ महाराज आठव्या भावातून अकराव्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या भावावर दृष्टी टाकत आहे. आर्थिक रूपात ही वेळ तुमच्यासाठी लाभकारी सिद्ध होईल.

दुसऱ्या भावावर मंगळ महाराजांची दृष्टी सांगते की, तुम्ही आपल्या गोष्टींना घेऊन आपल्या जवळच्यांचे मन दुखावू शकतात म्हणून, लोकांसोबत बोलण्याच्या वेळी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तिसऱ्या भावावर मंगळ देवाच्या दृष्टीच्या प्रभाव स्वरूप तुम्ही आपल्या लहान भाऊ-बहिणींसोबत वादात पडू शकतात.

उपाय- उजव्या हातात तांब्याचा कडा घाला.

वृश्चिक पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

धनु

तुमच्या कुंडलीच्या पाचव्या आणि बाराव्या भावावर मंगळ देवाचे शासन आहे आणि मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या सातव्या भावात होईल. हा भाव जीवनसाथी आणि व्यवसाय पार्टनरशिप ला दर्शवते. पाचव्या भावाच्या स्वामीच्या रूपात सातव्या भावात मंगळ देवाचे गोचर, प्रेमी जोडप्यांसाठी उत्तम सिद्ध होईल परंतु, विवाहित जातकांसाठी हा काळ अधिक अनुकूल न राहण्याची शक्यता आहे.

धनु राशीतील जातकांना आपल्या जीवनसाथी च्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मंगळ महाराज सातव्या भावातून तुमच्या कुंडलीच्या लग्न, दुसऱ्या आणि दहाव्या भावावर दृष्टी टाकत आहे. दहाव्या भावावर मंगळ देवाच्या दृष्टीच्या प्रभावाने तुम्ही आपल्या नोकरी ला घेऊन थोडे असुरक्षित असाल परंतु, खरे तर तुमच्या समोर काही समस्या येणार नाही. लग्न भावावर मंगळ देवाची दृष्टी असल्या कारणाने तुम्ही थोडे आक्रमक आणि उग्र स्वभावाचे असू शकतात.

उपाय- मंदिरात गूळ आणि शेंगदाण्याची मिठाई वाटा.

धनु पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मकर

तुमच्या कुंडलीच्या चौथ्या आणि अकराव्या भावात मंगळ देवाचे स्वामित्व आहे आणि हे आता तुमच्या सहाव्या भाव म्हणजे शत्रू, रोग, प्रतिस्पर्धा आणि मामा भावात गोचर करत आहे. मंगळाचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या सहाव्या भावात होणे एक अनुकूल स्थिती आहे. या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्ही कुठल्या ही प्रतिस्पर्धेत उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमच्या शत्रूला हानी पोहचवण्यात अपयशी राहाल.

सहाव्या भावातून मंगळ देव नवव्या, बाराव्या आणि लग्न भावावर दृष्टी टाकत आहे अश्यात, तुम्हाला आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असेल. पेशावर रूपात पाहिल्यास तुम्हाला काही कामानिमित्त विदेश जावे लागू शकते. मकर राशीतील जातकांच्या खर्चात वृद्धी ही होऊ शकते आणि याच्या कारणाने तुमच्या स्वभावात थोडे चिडचिडेपणा येऊ शकतो. अश्यात लोक तुम्हाला चुकीचे समजू शकतात म्हणून सावध राहा.

उपाय- नियमित गुळाचे सेवन करा.

मकर पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कुंभ

तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या आणि दहाव्या भावावर मंगळ देवाचे शासन आहे आणि आता हे तुमच्या पाचव्या भावात म्हणजे संतान, शिक्षण आणि प्रेम संबंधाच्या भावात गोचर करत आहे. पाचव्या भावात मंगळाचे गोचर होण्याने तुमच्या मुलांनी जोडलेल्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात मुलांची तब्बेत बिघडू शकते. त्यांच्या व्यवहारात बदल होऊ शकतो म्हणून, त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रेमी युगुलांना या काळात आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जास्त मालकी असण्याने तुमचे नाते बिघडू शकते. मात्र, हे गोचर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात मुले उर्जेने परिपूर्ण होतील आणि ते त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतील. विशेषत: अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरेल. पाचव्या भावातून, मंगळ तुमच्या कुंडलीतील आठव्या, अकराव्या आणि बाराव्या भावांना पाहत आहे. त्याच्या प्रभावामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात.

उपाय- गरजू मुलांना लाल रंगाचे कपडे दान करा.

कुंभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मीन

मंगळ देव तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या आणि नवव्या भावावर शासन करतात आणि आता ते चौथ्या भावात गोचर करत आहे. हा भाव माता, घरगुती जीवन, प्रॉपर्टी आणि वाहनाचे प्रतिनिधित्व करते. मंगळ देव आणि देव गुरु बृहस्पती मित्र ग्रह मानले जाते. तिसरा भाव मंगळ महाराजांसाठी शुभ मानला जातो. या काळात जातकांना आपल्या कुटुंबाची भरपूर साथ आणि प्रेम मिळेल. तुम्हाला आपली पैतृक संपत्ती ही मिळू शकते आणि नवीन गाडी किंवा घर खरेदी करण्याचे ही योग बनू शकतात.

मंगल देव स्वभावाने उग्र मानले जातात, त्यामुळे तुमच्या घरगुती जीवनात काही वाद होण्याची शक्यता आहे. उद्धटपणामुळे तुमचा आईशी वाद होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. चौथ्या भावातून मंगळ देव तुमच्या कुंडलीच्या सातव्या, दहाव्या आणि अकराव्या भावाला पाहत आहेत. तुम्ही तुमचा व्यवसाय करत असाल तर, हा काळ तुमच्यासाठी अनुकूल परिणाम घेऊन येणार आहे. तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात पूर्ण मेहनत घेऊन पुढे जात राहाल. यासोबतच या भागीदारीतून व्यावसायिकांना ही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

उपाय- आपल्या आईला गुळाची मिठाई भेट द्या.

मीन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer