सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर

Author: योगिता पलोड | Updated Fri, 10 Feb 2023 12:14 PM IST

सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर 13 फेब्रुवारी 2023 ला प्रातःकाळी 9:21 ला होईल. तिथे युतीच्या आधीच विराजमान शनी देवाने होईल आणि सोबतच शुक्र ही या राशीमध्ये उपस्थित असतील परंतु, शुक्र ग्रह अंतिम अंशात असतील तेव्हा सूर्य आणि शनी जवळच्या अंशात असण्याने सूर्य आणि शनीच्या युतीचा प्रमुख फळ प्राप्त होईल जे सर्व राशीतील लोकांना प्रभावित करेल. सूर्य देव कुंभ राशीमध्ये 15 मार्च 2023 च्या सकाळी 6:13 पर्यंत राहील आणि त्या नंतर मीन राशीमध्ये जातील. हे एक महत्वपूर्ण गोचर मानले जाते कारण, हे प्रतिवर्ष फेब्रुवारी च्या महिन्यात असते आणि सूर्याचे गोचर शनीच्या अधिपत्याची कुंभ राशीमध्ये होणे खूप महत्वपूर्ण असते. सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर सर्व 12 राशींवर वेगवेगळे प्रभाव टाकते. हे तुमच्या राशीसाठी कसे राहील, हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Suryache Kumbh Rashimadhe Gochar

सूर्याला नवग्रह मंडलचा राजा म्हटला जातो. आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्य आपल्या जीवनाला प्रकाश आणि ऊर्जा देतो. ही जीवन ऊर्जा आपल्या शरीरात चालते. यामुळेच जीवन चालते, म्हणूनच केवळ सूर्यदेवालाच जगाची काळजी घेणारा प्रत्यक्ष देव मानला जातो.

सूर्याचे संक्रमण आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

सूर्याला जगाचा आत्मा म्हटले गेले आहे. हे व्यक्ती विशेष कुंडली मध्ये पिता आणि आरोग्याचा कारक मानले जाते आणि राज्य सत्ता तसेच प्रभुतेचे प्रतीक असतात. हे व्यक्तीला उत्तम राजकीय गुणांनी सुशोभित करतात आणि त्याच्या मध्ये कुशल नेतृत्व क्षमता ठेवतात. सूर्य एक अग्नी प्रदान ग्रह आहे तर, कुंभ राशी एक वायू तत्वाची राशी आहे. सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर होणे नवीन कामांना सुरु करर्ण्यासाठी उत्तम मानले जाते. हे जीवनात यश मिळण्याकडे ही इशारा करते. जर तुम्ही भविष्यात उत्तम यश मिळवण्याची इच्छा ठेवतात तर, त्याची निव ठेवणासाठी योग्य वेळ हीच आहे. जर तुम्ही आपल्या बुद्धीचा वापर योग्य दिशेत केला तर, सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर तुम्हाला उत्तम स्थिती मध्ये घेऊन जाईल आणि तुमच्या व्यक्तित्वाचा समेकित विकास होईल आणि तुमच्या दृष्टिकोनाला योग्य दिशेत जाणून तुम्हाला समृद्धी प्रदान करेल.

सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर आणि सूर्य-शनीची युती

सूर्य देवाला शनी देवाचा पिता मानले गेले आहे जे की, गरम प्रकृतीचे ग्रह आहे आणि शनी थंड हवेचे कारक आहे. या प्रकारे या दोघांचे मिलन कुंभ राशीमध्ये होणे खूप चांगले तर मानले जात नाही. सूर्य आत्मविश्वासाचा कारक ही आहे तर, शनी व्यक्तीला अनुशासन मध्ये ठेवणे शिकवते. याचा सरळ अर्थ हा आहे की जर तुम्ही आपल्या जीवनात अहंकाराने दूर राहाल आणि अनुशासित होऊन कार्य कराल तर सूर्य आणि शनीची युती तुम्हाला उत्तम यश प्रदान करेल.

सूर्य आणि शनीची युती तुमच्या राशीच्या ज्या भावात बनत आहेत त्याच्या संबंधित कार्यकत्त्वांमध्ये तुमची परीक्षा घेईल म्हणून, तुम्हाला आपल्याकडून तयार राहून एक योग्य दिशेत मेहनत करून अनुशासित रूपात आचरण करण्याने तुम्हाला लाभ मिळेल तथापि, येथे शनी आपल्या राशीमध्ये असण्याने अधिक अशुभ प्रभाव देणार नाही आणि सूर्य पिता असण्याच्या कारणाने पुत्राची राशी मध्ये खराब परिणाम देणार नाही. या कारणाने या युतीचे अत्याधिक क्रूर परिणाम येण्याची शक्यता नाही म्हणून, तुम्हाला अधिक घाबरण्याची आवश्यकता नाही. यावेळी, भूतकाळात केलेल्या कोणत्या ही चुकीबद्दल तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो नंतर, तुम्ही त्याबद्दल पश्चात्ताप केला पाहिजे आणि स्वत: ची निंदेची भावना भरून काढण्याची शक्यता आहे, ज्यातून तुम्हाला स्वत: ला मार्ग शोधावा लागेल.

हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि

मेष राशि

मेष राशीच्या जातकांसाठी सूर्य पंचम भावाचा स्वामी आहे आणि सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर होण्याने हे तुमच्या एकादश भावात प्रवेश करतील. एकादश भावात सूर्याचे गोचर करणे तुमच्या इच्छेच्या पूर्तीची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या व्यवस्था येतील आणि तुमच्या आत दडलेली प्रतिभा लोकांसमोर येईल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रमोशन मिळू शकते आणि तुमच्या कामाचे कौतुक ही होईल पण शनीच्या राशीच्या योगामुळे तुम्ही अतिआत्मविश्वासाचे बळी होण्याचे टाळले पाहिजे जर तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल आणि अहंकाराप्रमाणे पुढे गेलात तर, तुमची प्रगती होईल. समस्यांना सामोरे जावे लागेल आणि तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध देखील बिघडू शकतात, ज्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल आणि आर्थिक आव्हाने देखील समोर येऊ शकतात. तथापि, सध्याच्या गोचर मुळे तुम्हाला आर्थिक बळ मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमच्या नव्या उदयाची हीच वेळ असेल. तुम्हाला शेअर बाजारातून नफा मिळण्याची ही अधिक शक्यता आहे. प्रवास किंवा तीर्थयात्रेला गेल्याने तुम्हाला मनःशांतीसोबतच आनंद ही वाटेल. आरोग्याला घेऊन तुम्हाला सावधान राहावे लागेल कारण, आरोग्य कमजोर होऊ शकते. तुमचे सामाजिक वर्तुळ आणि काही लोकांसोबत मिळण्याची संधी मिळेल. तुम्ही कुठल्या संस्थेने ही जोडले जाऊ शकतात. सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर मुख्यतः तुमच्यासाठी लाभदायक राहील.

उपाय: तुम्हाला प्रत्येक रविवारी बैलाला गूळ खाऊ घातले पाहिजे आणि सूर्य देवतेला तांब्याच्या लोट्याने अर्घ्य दिले पाहिजे.

मेष पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

वृषभ राशि

तुमच्यासाठी सूर्य चतुर्थ भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान वेळात सूर्य कुंभ राशीमध्ये गोचर करून सूर्य तुमच्या दशम भावात प्रवेश करेल. सूर्याचे दशम भावात गोचर करणे तुमच्या कार्यासाठी खूप महत्वपूर्ण असते कारण, दशम भावात जाऊन सूर्य खूप मजबूत होईल आणि हे तुमच्या जीवनात मजबुत स्थिती प्रदान करते. या काळात तुम्हाला आपल्या करिअर मध्ये नाव कमावण्याची संधी मिळेल. तुमच्या मान आणि सन्मानात वाढ होईल. तुम्ही आपल्या करिअर मध्ये उत्तम बनाल. या काळात तुमची पद उन्नती होण्याचे ही उत्तम योग बनतील आणि कार्य क्षेत्रात तुमच्या अधिकार क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुठल्या ही टीम चे नेतृत्व करण्याची ही संधी मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना अधिक उत्तम स्थिती प्राप्त होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला जाईल आणि तुमची आर्थिक स्थिती वाढेल. उत्पन्नाच्या विविध संधी तुमच्या समोर येतील. या काळात तुम्ही वेळेत तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक संधींचा लाभ घेतल्यास भविष्यात ही तुम्हाला चांगले उत्पन्न मिळत राहील. या काळात, आपण कोणत्या ही प्रकारच्या अहंकाराने वेड लावून घेणे टाळले पाहिजे कारण, आपण असे केल्यास, आपण स्वतःच आपल्या समस्यांचे कारण बनू शकतात. कौटुंबिक जीवनासाठी हे गोचर सामान्य असेल. तथापि, घरगुती खर्चाची शक्यता असेल. दशम भावात सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे तुम्ही तुमचे काम बारकाईने तपासाल आणि त्यात कोणती ही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्याल. यामुळे तुम्हाला अधिक चांगले काम करण्याची संधी मिळेल. वडिलांसोबत तुमचे नाते बिघडू शकते पण, त्यांना काही अडचण येऊ नका. त्यांची काळजी घ्या आणि वादात पडू नका. त्यांची प्रकृती खराब असेल तर या काळात त्यांना विशेष उपचार द्या.

उपाय: तुम्हाला आपल्या पिता किंवा पिता समान लोकांचा सन्मान केला पाहिजे आणि सरकार बद्दल वाईट बोलणे टाळले पाहिजे.

वृषभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मिथुन राशि

मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर तुमच्या राशीच्या नवम भावात होईल. हे तुमच्या तिसऱ्या भावाचा स्वामी आहे. कठोर परिश्रमाने नशीब घडवण्याची ही वेळ आहे म्हणजेच, या काळात तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. समाजात तुमचे स्थान मजबूत होईल. तुम्हाला खूप सन्मान मिळेल. तुम्हाला धर्म आणि अध्यात्माशी संबंधित कामांमध्ये रस असेल. तीर्थयात्रा ही करू शकतात. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. भावंड, मित्र आणि नातेवाईकांसोबत प्रवासात व्यस्त असाल. वडिलांची तब्येत बिघडू शकते आणि त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात. करिअरसाठी हा काळ मध्यम राहील. तुमची कुठेतरी बदली होऊ शकते. मात्र, या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळावे. या काळात तुम्हाला चांगला शिक्षक मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने, हा काळ चांगला जाणार आहे. तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल परंतु, रवि-शनीच्या युतीमुळे तुमचे उत्पन्न वाढेल पण मानसिक तणाव ही वाढू शकतो आणि तुमच्या भावंडांना काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नशीब तुमची साथ देईल पण नशिबावर विसंबून राहू नका तर, तुमच्या वतीने मेहनत करत राहा तरच, तुम्ही सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल आणि चांगले परिणाम मिळवाल.

उपाय: या गोचर दरम्यान रविवारी रुद्राभिषेक करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासोबतच शिवलिंगावर गहू अर्पण करा.

मिथुन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कर्क राशि

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य दुसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान गोचर मध्ये हे तुमच्या अष्टम भावात प्रवेश करेल. या गोचर च्या परिणामस्वरूप तुम्हाला आपल्या सामान आणि विशेष वस्तूंकडे लक्ष दिले पाहिजे कारण, या काळात त्याची चोरी होणे किंवा हरवण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ मध्यम राहील. तथापि, या काळात तुम्ही कोणत्या ही प्रकारची गुंतवणूक टाळावी कारण, तुमच्या आठव्या भावात सूर्य आणि शनीची युती होईल, त्यामुळे तुम्ही अधिक गुंतवणुकीसाठी घाई केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. काही लोकांना वारसा किंवा वडिलोपार्जित मालमत्ता मिळत राहण्याची किंवा त्यात काही अडथळे येण्याची शक्यता आहे. जरी ते थोड्या काळासाठी असेल, नंतर तुम्हाला यश मिळू शकते परंतु, या क्षणी तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. तुमचा मानसिक ताण वाढेल. आरोग्याबाबत थोडे लक्ष द्यावे लागेल. सासरच्या मंडळींसोबतच्या नात्यात चढ-उताराची परिस्थिती ही येऊ शकते. या दरम्यान कोणाशी ही वाद टाळण्याचा प्रयत्न करा आणि गोड बोलण्याचा प्रयत्न करा. या गोचर कालावधीत निरर्थक प्रवास होऊ शकतो, त्यामुळे शक्यतोवर असा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कोणत्या ही प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही. जर तुम्ही कोणत्या ही संशोधन किंवा संशोधनाशी संबंधित कामात सहभागी असाल तर तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील आणि तुमचे नाव होईल. जर तुम्हाला फेलोशिप करायची असेल किंवा त्यासाठी परदेशात जायचे असेल तर या मार्गक्रमणात यश मिळण्याची शक्यता आहे.

उपाय: सूर्यदेवाला रोज अर्घ्य द्यावे आणि सूर्याष्टकाचे पठण करावे.

कर्क पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा

सिंह राशि

सिंह राशीमध्ये जन्म घेणाऱ्या लोकांचा प्रथम भावाचा स्वामी सूर्य देव आहे आणि सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर होण्याने हे तुमच्या सप्तम भावात प्रवेश करेल. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी असण्याच्या कारणाने हे गोचर तुमच्या दांपत्य जीवनात काहीसा तणाव वाढवू शकतो. तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथी च्या मध्य तणाव वाढणयाव्हे योग बनतील आणि जर तुम्ही या स्थितीला चांगल्या प्रकारे सांभाळले नाही तर, वाद-विवाद वाढू शकतो आणि तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याने किंवा नात्यामध्ये समस्या येण्याचे योग बनू शकतात आणि त्यामुळे कायद्याच्या डावपेचांची स्थिती बनू शकते कारण, सूर्याची शनी सोबत युती सप्तम भावात होत आहे तथापि, तुम्ही इतके समजदार आहे की, तुम्ही परिस्थितींमधून बाहेर कसे यायचे हे जाणतात म्हणून, थोडे सावध राहा. जर तुम्ही काही व्यवसाय करतात तर, ही वेळ एकीकडे व्यापारात वृद्धी देईल तर, दुसरीकडे काही कायद्याचे डावपेच ही दिसेल. तुम्हाला कोणता ही कर न भरल्याबद्दल नोटीस देखील मिळू शकते किंवा कायद्याच्या विरोधात कोणते ही कृत्य केल्यामुळे जबाबदारीची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. तुम्ही तुमच्या व्यवसायातील भागीदार आणि तुमच्या व्यवसायातील ग्राहकांसोबत कोणत्या ही प्रकारचा तणाव टाळावा. भविष्यात तुम्हाला या समस्यांमधून बाहेर पडून तुमचे काम अधिक चांगले करण्याची संधी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा प्रभावित होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या, हा काळ मध्यम राहील. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. या काळात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या मित्रांशी सावधगिरी बाळगा आणि नकळत कोणावर ही पूर्ण विश्वास ठेवू नका कारण, तुमचा एखादा मित्र तुमचा विश्वासघात करू शकतो. या दरम्यान, आपण पाठदुखीची तक्रार करू शकता. सेवेत असलेल्यांना काही संघर्षानंतर चांगले यश मिळेल आणि पदोन्नती मिळू शकेल.

उपाय: नियमित आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा आणि या सोबतच, श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्राचा ही पाठ तुम्हाला लाभदायक राहील.

सिंह पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कन्या राशि

कन्या राशीसाठी सूर्य द्वादश भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान वेळात तुमच्या राशीच्या सहाव्या भावात गोचर करेल. सहाव्या भावात सूर्याचे गोचर अनुकूल परिणाम प्रदान करणारे मानले गेले आहे. या काळात तुम्हाला नोकरीमदजे उत्तम फळ प्राप्ती होण्याचे योग आहेत. तुमचे विरोधी तुम्हाला चिंतीत करतील कारण, सूर्य-शनी सोबत युती करतील तथापि, हे दोन्ही ही ग्रह सहाव्या भावात ‘शत्रू हंता योग’ बनवतात आणि तुमच्या विरोधींना परास्त करतात परंतु, या दोन्हींच्या युती खूप अधिक अनुकूल मानली जात नाही म्हणून, या गोचरच्या सुरवातीच्या दिवसात तुम्हाला विरोधीसोबत अधिक सक्रिय होण्याने समस्या होऊ शकते. तुमच्या खर्चात अधिक वाढ होऊ शकते. तुम्ही थोडे अस्थिर होऊ शकतात. व्यापाराच्या बाबतीत तुमची लांबची यात्रा होऊ शकते. तुम्हाला विदेश गमन ही करावे लागू शकते. प्रेम संबंधात हे गोचर चढ-उतार घेऊन येऊ शकते. या गोचर वेळी विशेष रूपात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गोचर च्या सुरवाती मध्ये आरोग्य समस्या त्रास देऊ शकतात. विशेषतः पोटाच्या संबंधित आणि अथय आतड्याच्या संबंधित समस्या तुमच्या समस्येचे कारण बनू शकते आणि तुम्हाला उजव्या डोळ्यात ही काही समस्या होऊ शकते परंतु, जसे की, गोचरचा मध्य वेळ येईल, या समस्यांनी मुक्ती मिळेल म्हणून, तुम्हाला धैर्य ठेवावे लागेल आणि सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यासाठी आशान्वित राहून तुम्ही प्रयत्न करत राहा. गोचर च्या अंतिम दिवसात तुम्ही आर्थिक रूपात उत्तम परिणाम प्राप्त कराल आणि धन लाभाचे ही योग बनतील. विद्यार्थ्यांना ही गोचर चे फायदे मिळतील.

उपाय: रविवारी सकाळपासून एका निश्चित संख्येत गायत्री मंत्राचा जप करा.

कन्या पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

तुळ राशि

तुळ राशीमध्ये जन्म घेणाऱ्या जातकांसाठी सूर्य अकराव्या भावाचा स्वामी होऊन वर्तमान गोचर काळात तुमच्या राशीच्या पंचम भावात प्रवेश करेल. हे गोचर आपल्याला सुरवाती पासूनच उत्तम आर्थिक स्थिती प्रदान करायला लागेल आणि तुमच्यासाठी धन लाभाचे प्रबळ योग बनतील. तुमच्या कमाईचे स्रोत वाढतील. तुमच्या बुद्धीच्या भावात सूर्य आणि शनीच्या युतीचा प्रभाव तुम्हाला आपल्या मध्ये डोकावण्याची संधी देईल तुम्ही भूतकाळात केलेल्या चुकांमधून बाहेर पडू शकलात की नाही हे पाहण्याचा प्रयत्न कराल आणि नाही तर आता त्यांच्याकडून शिकण्याची आणि त्या लक्षात घेऊन पुढे जाण्याची वेळ आली आहे. प्रेमाच्या नात्यात कोणती ही चूक पुन्हा करू नका तर, तुम्ही ज्यांच्यावर अतूट प्रेम करता त्यांच्यावर प्रेम करा. ही तुमच्या यशस्वी प्रेम जीवनाची कथा बनेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मध्यम परिणाम मिळतील कारण, मानसिक एकाग्रतेमुळे तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतील. या दरम्यान, आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण, यकृताशी संबंधित कोणती ही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. याशिवाय ऍसिडिटी, अपचन आणि पचनसंस्थेशी संबंधित कोणती ही समस्या या काळात तुम्हाला त्रास देऊ शकते. गॅस्ट्रिक (जठर) देखील अस्वस्थता आणू शकते. नोकरीत बदलाची परिस्थिती येऊ शकते. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर, हा कालावधी तुमच्यासाठी पूर्णपणे उपयुक्त ठरेल. साधे आणि चांगले जेवण आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल.

उपाय: तुम्ही योगाभ्यास केला पाहिजे आणि सूर्य नमस्कार ही करा. या सोबतच अधिक मीठ खाऊ नका.

तुळ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

वृश्चिक राशि

जर तुमचा जन्म वृश्चिक राशीमध्ये झालेला आहे तर, सूर्य तुमच्या दशम भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान गोचर काळात तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात प्रवेश करेल. चतुर्थ भावात सूर्याचे हे गोचर जिथे आधीपासून शनी ही विराजमान आहे, अधिक अनुकूल सांगितले जाऊ शकत नाही. या दरम्यान, कौटुंबिक जीवनात मतभेद आणि तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्याचा अभाव असेल आणि यामुळे एकमेकांबद्दल मत्सराची भावना वाढू शकते. कुटुंबातील प्रमुख सदस्यांचे आरोग्य, म्हणजे तुमच्या पालकांना त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत, त्याच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुमच्या घरगुती खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या कौटुंबिक जीवनात भावनात्मक संतुलन बनवण्याची आवश्यकता वाटेल आणि या सोबत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ही वेळ तुम्हाला कौटुंबिक मार्गात घेरून ठेवेल आणि यामुळे तुमच्या कामात चढ-उतार येऊ शकतात म्हणून, तुम्हाला आपल्या निजी आणि पेशावर जीवनात संतुलन स्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या काळात तुम्हाला छातीत जंतुसंसर्ग किंवा सांधेदुखी किंवा डोकेदुखी किंवा शरीरदुखीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. ज्यांना अनियमित रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योगाभ्यास करणे आणि दररोज ध्यान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या आईशी प्रेमाने बोला आणि तिला काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे गोचर मानसिक विचलन देऊ शकते.

उपाय: कुटुंबातील आनंद आणि जीवनात यशासाठी श्वेतार्कचे रोप लावा आणि नियमित त्याला जल द्या.

वृश्चिक पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

धनु राशि

धनु राशीतील जातकांसाठी सूर्य धर्म त्रिकोण म्हणून नवम भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान गोचर काळात हे तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करतील. तिसऱ्या भावात सूर्याचे गोचर अनुकूल परिणाम देणारे मानले जाते आणि सूर्य येथे शनी सोबत युती करतील. शनी ही तिसऱ्या भावात उत्तम परिणाम देणारे ग्रह मानले जाते परंतु, या दोघांचे सम्मिलीत प्रभाव तुमच्या भाऊ-बहिणींना काही शारीरिक समस्या प्रदान करू शकते. तुम्हाला एकीकडे आपल्या कार्य क्षेत्रात आपल्या सहकर्मींचा सहयोग मिळेल परंतु, त्यातील काही लोक तुम्हाला चिडवतांना दिसतील. लहान यात्रा चिंतेचे कारण बनू शकते आणि तुम्हाला स्वास्थ्य समस्या देऊ शकते. नातेवाईकांसोबत संबंध तणावपूर्ण होऊ शकतात परंतु, सरकारी क्षेत्रात लाभाचे योग बनतील. तुमची आर्थिक स्थिती सुधृढ होईल. व्यावसायिक कार्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचा व्यापार तुमच्या मेहनतीच्या बळावर वाढेल. नव-नवीन लोकांसोबत भेट होईल. जे तुमच्या व्यापार साठी फायदेशीर सिद्ध होतील. नोकरीपेशा लोकांना आपल्या सहकर्मींसोबत उत्तम वर्तन केले पाहिजे. त्यांच्या सोबत चांगल्या प्रकारे वागले पाहिजे. ही वेळ आपल्या आरोग्याला घेऊन नवीन दिनचर्या बनवण्यासाठी अनुकूल वेळ असेल आणि तुम्हाला या पथावर पुढे जाण्यात यश मिळेल. प्रेम संबंधात वाढ होईल आणि काही नवीन मित्र बनतील.

उपाय: नियमित श्री रामरक्षा स्तोत्राचा पाठ करणे तुमच्यासाठी हितकारी राहील.

धनु पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मकर राशि

सूर्याचे कुंभ राशीमध्ये गोचर तुमच्या द्वितीय भावात होईल. सूर्य देव तुमच्या राशीसाठी अष्टमेश आहे म्हणजे की हे तुमच्या अष्टम भावाचा स्वामी आहे. तुमच्या दुसऱ्या भावात सूर्याचे हे गोचर आर्थिक रूपात लाभ प्रदान करणारा सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला उत्तम भोजन आणि स्वादिष्ट व्यंजन खाण्याची संधी मिळेल. धन आणि आभूषण मध्ये वृद्धी होईल परंतु सूर्याची शनी युती होण्याच्या कारणाने कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बोलण्यात कटुता आणि कर्कशपणा वाढल्याने परस्पर संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या काळात तुम्ही संयमाने बोला आणि कोणत्या ही प्रकारच्या वाद-विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. चांगले अन्न मिळणे ही चांगली गोष्ट आहे परंतु, जास्त खाणे टाळा अन्यथा, तुम्ही अडचणीत येऊ शकता. या दरम्यान दात दुखण्याची तक्रार असू शकते. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. अचानक गुप्त धन प्राप्ती होऊ शकते किंवा तुम्हाला काही गोष्ट विरासत प्राप्त होण्याचे ही योग बनत आहेत.

हे गोचर जीवनसाथीच्या आरोग्यासाठी फारसे अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही, त्यामुळे त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे पूर्ण लक्ष द्या. व्यवसायात भांडवल गुंतवणुकीसाठी वेळ येईल. या दरम्यान, व्यवसायात पैसे गुंतवताना, हे लक्षात ठेवा की तुम्ही पैसे कुठे गुंतवत आहात, त्याबद्दलची सर्व माहिती तुम्ही ठेवा. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे काही चांगले लाभ मिळू शकतात. नोकरीत फायदा होऊ शकतो आणि तुमच्या वेतनमानात वाढ होऊ शकते. उजव्या डोळ्याशी संबंधित तक्रार असू शकते जसे की, डोळ्यात सतत पाणी येणे.

उपाय: दररोज श्री आदित्य हृदय स्तोत्र किंवा श्री सूर्याष्टक पाठ करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मकर पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कुंभ राशि

कुंभ राशीतील जातकांसाठी सूर्य सप्तम भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान सूर्याचे गोचर कुंभ राशीमध्येच होत आहे म्हणजे तुमच्याच राशीमध्ये सूर्य देवाचे गोचर होत आहे म्हणून, याचा विशेष प्रभाव तुमच्या स्वास्थ्य आणि तुमच्या विचारांवर नक्कीच पडेल. सूर्यासोबत शनीची युती होत असल्याने आरोग्याबाबत चांगली दिनचर्या करण्याचा प्रयत्न करा. उदासीन न राहता शिस्तबद्ध राहून आरोग्याकडे लक्ष दिल्यास आरोग्याशी संबंधित समस्यांपासून वाचाल अन्यथा, हा काळ शारीरिक त्रास देऊ शकतो. डोकेदुखी, अंगदुखी, ताप, चक्कर येणे यासारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. हे गोचर वैवाहिक जीवनात ही चढ-उतार आणू शकते परंतु, जोडीदाराचे समर्पण तुमच्या नात्याचा पाया मजबूत करेल आणि तुमच्या दोघांमधील बंध अधिक घट्ट होतील. व्यावसायिकदृष्ट्या, हा काळ चांगला असेल. तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि जास्तीत जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मानसिक तणाव तर जाणवेलच पण तुम्हाला या समस्यांमधून बाहेर यायचे आहे अशी भावना ही तुमच्या मनात असेल आणि प्रत्येक आव्हान हळूहळू सोपे होईल. अहंकाराने वेड लागल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे या काळात साधेपणा ठेवा. ग्राउंड राहिल्याने तुमचे नाते आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. सामाजिकदृष्ट्या, हा काळ अनुकूल असेल आणि संक्रमणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.

उपाय: गळ्यात सोन्याचा बनवलेला सूर्य धारण करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही ते रविवारी सकाळी 8:00 वाजेपूर्वी घालावे.

कुंभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मीन राशि

मीन राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी सूर्य सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान गोचर कुंभ राशीमध्ये होण्याने सूर्य तुमच्या द्वादश भावात प्रवेश करेल. ही वेळ खर्चात वाढीची आहे. खूप खर्च तुम्हाला चिंतेत टाकतील आणि सुरुवातीला तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा कोणता ही मार्ग सापडणार नाही परंतु, हा काळ तुम्हाला परदेशात ही प्रवास करायला लावू शकतो. परदेशात जाण्याचे बेत सफल होतील आणि परदेश प्रवास यशस्वी होऊ शकतो. तुम्ही तुमच्या अनियंत्रित आणि अनियोजित खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे कारण, त्याचा बोजा तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. व्यावसायिकदृष्ट्या, चांगला काळ जाईल. तुम्हाला परदेशी संपर्काचा लाभ देखील मिळेल ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला बळ मिळेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही प्रवास करावा लागेल आणि तुमची घाई वाढेल. तुम्ही अधिक व्यस्त असाल. अनावश्यक काळजींमुळे मानसिक तणाव निर्माण होईल आणि या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना ही सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान, आपल्या विरोधकांपासून सावध रहा आणि नियमितपणे ध्यान करा. याचा फायदा तुम्हाला मिळेल. तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल आणि त्यामुळे तुमचे शारीरिक स्वास्थ्य ही मजबूत होईल. व्यर्थ चिंतेतून बाहेर पडून भगवंताच्या शरणात गेल्याने तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला यश मिळेल.

उपाय: शनिवारी रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून डोक्याजवळ ठेवा आणि ते पाणी रविवारी सकाळी लाल फुलांच्या रोपाला अर्पण करा, तुम्हाला फायदा होईल.

मीन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer