शनी ग्रहाचे विभिन्न भावात फळ लाल किताब अनुसार
वाचा लाल किताब अनुसार शनी ग्रहाच्या संबंधित प्रभाव आणि उपाय. ज्योतिष शास्त्रात शनीला क्रूर व पापी ग्रह मानले गेले आहे. लाल किताब जी की, पूर्णतः उपाय आधारित ज्योतिष पद्धती आहे. यामध्ये शनी ग्रहाच्या विभिन्न भावामध्ये फळ आणि त्यांचे प्रभाव या बाबतीत विस्तारात व्याख्या केली गेली आहे.
लाल किताब मध्ये शनि ग्रह
लाल किताब मध्ये शनी ग्रहाला पापी ग्रहांचा सरताज म्हटले जाते. राहू आणि केतू दोन्ही यांचे सेवक आहे. जर हे तिन्ही ग्रह मिळाले तर एक खतरनाक स्थिती बनते. शनी शुक्राचा प्रेमी आणि शुक्र याची प्रेमिका आहे. बुध आपल्या सवयीनुसार या पापी ग्रहांसोबत मिळून त्यांच्या सारखाच बनून जातो म्हणून जर राहू, केतू शनीचे सेवक आहे तर, बुध, शुक्र, शनीचे मित्र आहे. अर्थात शनी, राहू, केतू, बुध आणि शुक्र प्रत्येक खोडी आणि दंग्याचे मूळ असू शकते.
लाल किताब मध्ये शनि ग्रहाचे महत्व
ज्योतिष शास्त्रात शनी देवाला कलियुगाचा न्यायधीश म्हटले जाते. ते परम दंडाधिकारी आहे आणि मनुष्याला त्याच्या पाप आणि वाईट कार्यांच्या अनुसार दंडित करतात. पौराणिक मान्यतेनुसार शनी देवाच्या कारणानेच भगवान गणेशाचे मस्तक कापले होते. भगवान रामालाला शनी देवाच्या कारणाने वनवास जावे लागले. महाभारत काळात पांडवांना जंगलात भटकावे लागले. उज्जैनचे राजा विक्रमादित्यला समस्यांचा सामना करावा लागला. राजा हरिश्चंद्र दार - दार भटकले आणि राजा नल आणि राणी दमयंतीला जीवनात दुःखाचा सामना करावा लागला होता. शनीला सुर्य पुत्र म्हटले जाते. वैदिक ज्योतिषात शनीला क्रूर व पापी ग्रह सांगितले गेले आहे परंतु हे सर्वात शुभ फळदायी ग्रह ही आहे. लाल किताब अनुसार दशम आणि एकादश भाव शनीचा भाव आहे. शनीला मकर आणि कुंभ दोन राशींचा स्वामित्व प्राप्त आहे. कुंडलीच्या प्रथम भावावर मेष राशीचे अधिपत्य आहे आणि या राशीमध्ये शनी नीचचा असतो. शुभ योग होण्याने या भावाचा शनी व्यक्तीला मालामाल करून देतो तर, अशुभ योग असण्यास बर्बाद करून ठेवतो. सप्तम भावात राहू व केतूचे असण्याने शनी अधिक अशुभ फळदायी होऊन जातो. जर दशम किंवा एकादश भावात सूर्य असेल तर, मंगळ व शुक्र ही अशुभ फळ द्यायला लागतात.
लाल किताब अनुसार शनि ग्रहाचे कारकत्व
शनीला कर्म भावाचा स्वामी सांगितले जाते. ही सेवा आणि नोकरीचे कारक असते. काळा रंग, काळे धन, लोखंड, लोहार, मिस्त्री, मशीन, कारखाना, कारागीर, मजूर, लोखंडाची अवजारे व सामान, जल्लाद, डाकू, ऑपरेशन करणारा डॉक्टर, चलाख, दूर दृष्टी, काका, मासा, म्हैस, मगर, साप, जादू, मात्र, जीव हत्या, खजूर, अलताशचे वृक्ष, लाकूड, छाल, विट, सिमेंट, दगड, सुती, गोमेद, नाशिले पदार्थ, मांस, केस, खाल, तेल, पेट्रोल, स्पिरिट, दारू, चणा, उडद, बदाम, नारळ, बूट, जुराब, हातसा, जखम हे सर्व शनी संबंधित आहे.
शनि ग्रहाचे संबंध
शनी भैरव महाराजांचे प्रतीक आहे आणि पापी ग्रहांच्या गिरोहाचा सरदार ग्रह आहे. काळे धन, लोखंड, तेल, दारू, मांस आणि घर इत्यादी शनी संबंधित वस्तू आहे. तसेच म्हैस, साप, मासा, मजूर इत्यादी शनीच्या संबंधित जीव आहे. शनी ज्यावर प्रसन्न होईल त्याला निहाल करून देईल आणि जर क्रोधी झाला तर त्याला बर्बाद करून देईल.
शनि ग्रहाचे अशुभ होण्याचे लक्षण
- शनीच्या अशुभ प्रभावाने विवादांमुळे भवन विकून जाते.
- घर किंवा भावनांचा हिस्सा पडून जातो किंवा क्षतिग्रस्त होऊन जातो.
- अंगावरचे केस लवकर झडतात.
- घरात किंवा दुकानात अचानक आग लागू शकते.
- कुठल्याही प्रकारे धन व संपत्तीचा नाश व्हायला लागतो.
- मनुष्य परक्या स्त्री सोबत संबंध ठेऊन बर्बाद होऊन जातो.
- जुगार - सट्टाचा नाद लागल्याने व्यक्ती कंगाल होऊन जातो.
- कायदा किंवा अपराधाचा गोष्टींमध्ये जेल होते.
- दारूच्या अत्याधिक सेवनाने व्यक्तीचे आरोग्य खराब होऊन जाते.
- कुठल्या अपघातात व्यक्ती अपंग होऊ शकतो.
लाल किताब मध्ये शनि ग्रहाने जोडलेले उपाय व तोडगा
- शनीची वक्र दृष्टी ने वाचण्यासाठी हनुमानजी ची सेवा आणि नियमित हनुमान चालीसाचे पाठ केले पाहिजे.
- शनीच्या शांतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप ही करू शकतात.
- तीळ, उडद, लोखंड, म्हैस, तेल, काळे कपडे, काळी गाय आणि बूट ही दान दिले पाहिजे.
- मागणाऱ्यांना लोखंडाचा चिमटा, तवा, अंगठी दान मध्ये दिले पाहिजे.
- जातक मस्तकावर तेलाच्या ऐवजी दूध किंवा दह्याचा टिळा लावल्यास अधिक लाभदायक असेल.
- काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे, पाळणे आणि त्याची सेवा केल्याने लाभ होईल.
- घराच्या शेवटी अंधार कोठी शुभ असेल.
- मास्यांना दाणा किंवा तांदूळ टाकणे लाभदायक असते.
- तांदूळ किंवा बदाम वाहत्या पाण्यात टाकल्याने लाभ होईल.
- दारू, मांस आणि अंडे खाणे अत्यंत सक्तीने टाळा.
- मशिनरी आणि शनी संबंधित अन्य वस्तुंनी लाभ होईल.
- प्रतिदिन कावळ्याला पोळी खाऊ घाला.
- दात, नाक आणि कान नेहमी साफ ठेवा.
- आंधळ्या, दिव्यांग, सेवक आणि सफाई कामगारांसोबत चांगला व्यवहार करा.
- छाया पात्र दान करा म्हणजे एक वाटी किंवा अन्य पात्रात सरसोचे तेल घेऊन आपला चेहरा पाहून शनी मंदिरात आपल्या पापांची क्षमा माघून ठेऊन या.
- भुऱ्या रंगाची म्हैस ठेवणे लाभकारी असेल.
- मजुर, म्हैस आणि माश्यांच्या सेवेने लाभ होईल.
शनी प्रत्येक राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष पर्यंत राहते म्हणून, जेव्हा शनी मंदा होईल किंवा जातक आपल्या कर्मांद्वारे त्याला मंदा करून घेतले तर, शनी 3 राशींना पार करण्याच्या वेळेत व्यक्तीला खूप दुःख आणि समस्या पोहचवतो. यालाच साडेसात वर्षाची साडेसाती म्हटले गेले आहे कारण, शनी एका राशीमध्ये अडीच वर्षापर्यंत राहतो म्हणून तीन राशींमध्ये हे एकूण साडे सात वर्षाचा काळ घालवतो. जेव्हा शनी चंद्र पासून प्रथम राशीमध्ये येतो तेव्हा साडे साती प्रारंभ होते आणि जेव्हा चंद्राच्या पुढील राशीमधून निघाल्या नंतर शनीची साडे साती संपून जाते.
आम्ही अशा करतो की, शनी ग्रहावर आधारित लाल किताबाच्या संबंधित ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी सिद्ध होईल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems



