राहू ग्रह शांती, मंत्र आणि उपाय
वैदिक ज्योतिषाच्या अनुसार राहु ग्रह एक क्रूर ग्रह आहे. कुंडली मध्ये राहू दोष असण्याने मानसिक तणाव, आर्थिक नुकसान, ताळमेळ मध्ये कमी होते. कुठल्या विशेष वेळी प्रत्येक ग्रह अशुभ प्रभाव द्यायला लागतो. अश्या स्थितीमध्ये ग्रह शांतीसाठी उपाय केले जातात. राहू ग्रह शांतीसाठी बरेच उपाय सांगितले गेले आहे. यामध्ये राहू संबंधित वस्तूंचे दान, रत्न, राहू यंत्र, राहू मंत्र आणि मूळ धारण करणे प्रमुख उपाय आहे. अशी मान्यता आहे की, राहूच्या शुभ प्रभावाने व्यक्ती रातोरात रंक पासून राजा बनून जातो तसेच, अशुभ फळ मिलाळाल्याने राजा पासून रंक ही बनतो. जर तुमच्या कुंडली मध्ये राहू कमजोर आहे तर, राहू ग्रह शांतीसाठी या उपायांना नक्कीच करा कारण, या कार्यांच्या प्रभावाने राहू शुभ फळ प्रदान करेल आणि तुमचे कष्ट कमी होतील.
वेश-भूषा आणि जीवन शैलीने जोडलेले राहू ग्रह शांतीचे उपाय
निळ्या रंगाचे कपडे परिधान करा.
आपले सासरे, नाना-नानी आणि आजारी लोकांचा सम्मान करा.
दारू आणि मांस सेवन करू नका.
कुत्र्यांची काळजी घ्या.
विशेषतः सकाळी केले जाणारे राहू ग्रहाचे उपाय
माँ दुर्गा ची पूजा करा.
वराह देवाची आराधना करा.
भैरव देवाची पूजा करा.
दुर्गा चालिसा चे पाठ करा.
राहु ग्रह शांतीसाठी दान करा
राहूच्या अशुभ दशेपासून बचाव करण्यासाठी राहू ग्रह संबंधित वस्तूंचे बुधवारी राहूच्या नक्षत्र (आर्द्र, स्वाति, शतभिषा) मध्ये संध्याकाळी किंवा रात्री दान करा.
दान करणाऱ्या वस्तू - जौ, सरसो, सिक्का, सात प्रकारचे धान्य (जौ, तीळ, तांदूळ , साबूत मूंग, कंगुनी, चना, गहू ), गोमेद रत्न, निळे अथवा भूरें रंगाचे कपड़े, काचेच्या वस्तू इत्यादी.
राहु साठी रत्न
राहु साठी गोमेद रत्न आहे. या रत्नाला धारण केल्याने जातकांना राहू दोषापासून मुक्ती मिळते तसेच जातकांना खूप चांगले परिणाम प्राप्त होतात.
राहु यंत्र
जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव, वैभव वृद्धी, अचानक येणाऱ्या बाधा आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी राहु यंत्र चे पूजन करा. राहु यंत्राला बुधवारी राहूच्या नक्षत्रात धारण करा.
राहु ग्रहासाठी मूळ/ जडी
राहु ग्रहाच्या दुष्प्रभावा पासून बचाव करण्यासाठी बुधवारी नागरमोथाच्या मुळाला राहूच्या नक्षत्राच्या वेळी धारण करा. करें।
राहु ग्रहासाठी रुद्राक्ष
राहु दोष निवारणासाठी 8 मुखी रुद्राक्ष धारण करणे लाभदायक असते.
आठ मुखी रुद्राक्ष धारण करण्याच्या हेतु मंत्र:
ॐ हूं नमः।
ॐ ह्रां ग्रीं लुं श्री।।
राहु मंत्र
राहु महादशा निवारण करण्यासाठी राहु बीज मंत्राचे उच्चारण केले पाहिजे. मंत्र - ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः!
राहु मंत्राचे 18000 वेळा जप करा तर, देश-काल-पात्र पद्धतीच्या अनुसार कलियुगात या मंत्राला अधिकतम 72000 वेळा जपले पाहिजे.
तुम्ही या मंत्राचे ही जप करू शकतात - ॐ रां राहवे नमः!
राहू ग्रह शांतीचे उपाय करण्याने जातकांना राहू दोष मुक्ती मिळते. राहू एक छाया ग्रह आहे, ज्याचे काही भौतिक रूप नाही. हिंदू शास्त्राच्या अनुसार राहू ग्रह भगवान भैरव देवाचे प्रतिनिधित्व करते. तसेच ज्योतिष शास्त्राच्या अनुसार, राहूला एक पापी ग्रह मानले गेले आहे. याच्या प्रभावाने जातकांना बऱ्याच प्रकारच्या बाधाचा सामना करावा लागू शकतो तथापि, हे जातकांना शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम देतो परंतु, याच्या अशुभ परिणामांपासून बचाव करण्यासाठी राहू मंत्राच्या विधी अनुसार जप केला पाहिजे.
ज्योतिष शास्त्राच्या अनुसार राहू आणि केतूच्या कारणाने कुंडली मध्ये काळ सर्प दोष उत्पन्न होतो. या दोषापासून बचाव करण्यासाठी राहू शांतीचे उपाय कारगर आहे. राहू यंत्राची स्थापना तसेचज त्याची आराधना केल्याने जातकांना शिक्षण, व्यवसाय, करिअर मध्ये येणाऱ्या समस्या दूर होतील. राहू दोषाचे उपाय लपलेल्या शत्रू, गुप्त रूपात येणाऱ्या बाधांना छल-कपट, गुप्त रोग, सामाजिक सन्मान आणि भेदभावा पासून बचाव करतो.
अपेक्षा आहे की, राहू ग्रह शांतीच्या संबंधित हा लेख तुमच्यासाठी लाभदायक आणि ज्ञानवर्धक सिद्ध होईल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems








