राहू ग्रहाच्या तिसऱ्या भावातील फळ - लाल किताब मराठीत
तिसऱ्या घरात राहू ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार
हे राहुचे पक्के घर आहे तिसरे घर बुध आणि मंगळने प्रभावित असते. जर इथे राहू शुभ असेल तर, खूप धन दौलत आणि तुम्ही दीर्घायुषी असाल. तुम्ही एक निडर आणि विश्वासु मित्र असतात. तुम्ही स्वप्नाच्या माध्यमातून भविष्य बघु शकतात. तुम्ही कधी ही निःसंतान राहणार नाही. तुम्ही शत्रुवर विजय मिळवणारे असाल. तुम्ही कधीही कर्जदार राहणार नाही. तुम्ही आपल्या मागे संपत्ती सोडून जाल. आपल्या आयुष्याच्या २२ व्या वर्षी प्रगती कराल. जर राहु तिसऱ्या घरात अशुभ असेल तर तुमचे भाऊ तुमचे पैसे बर्बाद करण्याची शक्यता असते. तुम्ही कोणाला पैसे उधार दिले तर ते परत भेटणार नाही. तुमच्या वाणीमध्ये दोष असेल आणि तुम्ही नास्तिक असाल. जर सुर्य आणि बुध राहुसोबत तिसऱ्या घरामध्ये असेल तर, तुमची बहीण तिच्या वयाच्या २२ व्या किंवा ३२ व्या वर्षी विधवा होण्याची शक्यता असते.
उपाय:
(१) घरात कधीच हत्तीचा दात किंवा हस्तिदंत वस्तु ठेऊ नका.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems








