कुंडली कशी बनवावी (भाग-6)
ग्रहांच्या बाबतीत माहिती मिळवली आणि राशी बद्दलही अभ्यास केला. आता जाणून घेऊ कुंडलीच्या बाबतीत. कुंडलीचा रकाना कश्या प्रकारे आहे.
थोड्या वेळ कुंडलीच्या रकान्यात लिहिलेल्या नंबरांना विसरून जाऊ. हा वरचा जो मोठा चौकोनी हिस्सा आहे, याला लग्न घर / भाव म्हणतात. लग्न भावाला पहिला भाव म्हणतात आणि इथूनच भावाची / घराची गणना केली जाते. समजण्यासाठी ग्राफिक्सला पहा त्यात बारा भाव योग्य प्रकारे समजतील. कुंडलीमध्ये प्रत्येक भावची जागा निश्चित आहे मग क्रमांक / नंबर तिथे कुठलाही असो. या कुंडली मध्ये शुक्र आणि राहू पाचव्या घरात बसलेले आहे. घराला भाव किंवा घर ही म्हणतात. चंद्र आणि मंगळ सहाव्या घरात बसलेले आहे, शनी, सुर्य आणि बुध सातव्या भावात बसलेले आहे आणि गुरु आणि केतू अकराव्या भावात बसलेले आहे.
नंबर राशी दर्शवतो आणि राशीने त्या भावाचा स्वामी माहिती होतो. या कुंडलीमध्ये आम्ही सांगू शकतो की लग्न मध्ये अकरावी राशी म्हणजे की कुंभ राशी आहे. याला असेही म्हटले जाते की, या व्यक्तीचा कुंभ लग्न आहे. लक्षात आहे ना कि अकरावी राशी कुंभ राशी आहे.
राशींचे स्वामी निश्चित आहे आणि भावचे स्वामी प्रत्येक कुंडलीच्या हिशोबाने बदलत राहतात.
इतर माहिती पुढील पाठ्यक्रमात पाहूया.