संक्रमण: जाणून घ्या वेळ, तारीख आणि आपले राशि भविष्य
ज्योतिषच्या जगात संक्रमण बरीच महत्वाची भूमिका निभावते. असे यासाठी मानले जाते कारण, सर्व नवग्रह किंवा नऊ ग्रह तुमच्या आमच्या जीवनावर प्रभावित करण्याची क्षमता ठेवतात. चंद्र, सूर्य, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, रऱाहू आणि केतू काही असे प्रमुख ग्रह आहे ज्यांना ज्योतिषाच्या दुनियेत बऱ्याच गंभीरतेने घेतले जाते अश्यात, ही गोष्ट खरी आहे की, या ग्रहांचे संक्रमण आणि या राशी परिवर्तनाने आपल्या जीवनावर प्रभाव नक्कीच पडतो. आपल्या जीवनातील सर्व मुख्य घटना या ग्रहांच्या चालीवर निर्भर करते. ग्रहांची ही चाल आपल्या जीवनात काही मोठे तर, काही लहान बदल घेऊन येणारे सिद्ध होतात . या व्यतिरिक्त, हे सर्व ग्रह आपल्या जीवनात विभिन्न पैलूंना नियंत्रित करण्याची क्षमता ठेवतात.
उदाहरणार्थ, जसे की, चंद्र आपल्या मनाला नियंत्रित करतो. ठीक त्याच प्रमाणे सूर्य ज्याला एक शाही ग्रहाचा दर्जा दिला गेला आहे. तो आपल्या कुंडली मध्ये सरकारी नोकरी आणि सेवांच्या शक्यतांसाठी जबाबदार मानले गेले आहे. ठीक त्याच प्रकारे शुक्र आपल्या जीवनात प्रेम आणि विवाहाचा कारक मानला जातो. या व्यतिरिक्त, बुध ग्रह आपल्या बौद्धिक क्षमतांना दर्शवते. या व्यतिरिक्त, जर बृहस्पती ग्रह विषयी बोलायचे झाले तर, हा ग्रह मुख्य रूपात आपल्या आरोग्याला दर्शवते. या नंतर, शनी ग्रहांची गोष्ट केली असता शनी ग्रह आपल्या कर्म किंवा कार्यांना दर्शवते आणि त्याच अनुसार आपल्याला परिणाम देते. या सर्व कर्णनांमुळे या ग्रहांच्या संक्रमण तिथीचे योग्य ज्ञान आणि संक्रमण वेळेची योग्य माहिती आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण मानली गेली आहे म्हणजे, आपण आपल्या जीवनात होणाऱ्या त्या परिवर्तनांवर नजर ठेऊ शकू जे संक्रमण आपल्या जीवनात आणू शकते.
येथे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे की, सर्व ग्रह एक समान गतीने होत नाही. जिथे काही ग्रह हळू गतीने पुढे जातात तर, काही असे ही ग्रह आहे जे बरेच तेज गतीने चालतात. उदाहरणार्थ, शनी ग्रह खूप हळू चालणारा ग्रह म्हणून जाणला जातो तर, दुसरीकडे बुध ग्रह एक असा ग्रह आहे जो बऱ्याच तेज गतीने चालतो म्हणजे, की कुठल्या ही व्यक्तीसाठी ग्रहांच्या गोष्टींवर नजर ठेवणे अशक्य असते तथापि, याच्या परिवर्तनाने आपल्या जीवनात बरेच बदल येऊ शकतात अश्यात, तुमच्या याच समस्येला समजून आम्ही तुमच्यासाठी सर्व नऊ ग्रहांच्या संक्रमणाची संपूर्ण माहिती तुमच्या जीवनात त्याचे होणारे बदल, संक्रमणाची सटीक वेळ आणि तिथी इत्यादी ची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सर्व नवग्रहांच्या संक्रमणाचे संपूर्ण विवरण जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. सोबतच जाणून घ्या केव्हा होणार आहे पुढील संक्रमण?
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems








