मोक्षदा एकादशी 2021 - Mokshada Ekadashi In Marathi
हिंदू धर्मात एकादशी च्या दिवसाचे विशेष महत्व सांगितले जाते. या दिवशी दान पुण्य केल्याने व्यक्तीला शुभ फळाची प्राप्ती होते. मोक्षदा एकादशी चे बोलायचे झाल्यास तर, हा दिवस व्यक्तीच्या या जन्माच्या सर्व पापां सोबतच मागील जन्माचे सर्व पाप इत्यादी दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे. मोक्षदा एकादशी च्या दिवशी सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ती साठी व्रत केला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची अकरावी तिथीच्या दिवशी मोक्षदा एकादशी चा व्रत केला जाईल. सांगितले जाते की, हा तोच दिवस आहे ज्या दिवशी भगवान कृष्णाने जीवनाला नवीन दिशा देण्यासोबत भागवत गीता चा उपदेश दिला होता.
ज्या कुठल्या व्यक्तीला आपल्या पूर्व जन्मात केलेले पाप आणि अधर्माचा पश्चाताप करायचा असेल तर आणि त्याच्या ग्लानी मधून बाहेर येण्याची इच्छा जी व्यक्ती करते त्यांच्यासाठी मोक्षदायिनी एकादशी चा व्रत करणे सर्वात अधिक लाभकारी मानले जाते.
हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. याच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी ज्योतिषींसोबत फोनवर किंवा चॅट ने जोडा.
वर्ष 2021 मध्ये केव्हा आहे मोक्षदा एकादशी?
या वर्षी मोक्षदा एकादशी 24 डिसेंबर 2021 म्हणजे मंगळवारी येत आहे. एकादशी तिथी 13 डिसेंबर 2021 ला रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी सुरु होईल आणि 14 डिसेंबर ला रात्री 11वाजून 35 मिनिटांनी समाप्त होईल.
मान्यतेच्या अनुसार म्हटले जाते की, मोक्षदा एकादशी आणि भागवत गीता मध्ये एक खूप उत्तम संबंध आहे. ज्या अनुसार सांगितले जाते की, याच दिवशी भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला प्रवचन दिले होते. भारतातील दक्षिण हिश्यात मोक्षदा एकादशी ला वैकुंठ एकादशी च्या नावाने ही जाणले जाते आणि या दिवसाला खूपच शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे.
मोक्षदा एकादशी व्रत आणि पूजा नियम
- या दिवशी उपवासात फक्त भगवान कृष्णाची पूजा करा.
- एकादशी च्या एक दिवस आधी दुपारच्या वेळी दशमी तिथी ला भोजन करा.
- एकादशी तिथी च्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे पालन करा.
- या दिवशी भगवान कृष्णाचे फुलांनी पूजन करा.
- पूजेमध्ये या दिवशी दिवे शामिल करा आणि भगवान कृष्णाला प्रसाद अर्पण करा.
- आपल्या यथा शक्तीच्या अनुसार गरीब आणि गरजू लोकांना भोजन दान करा.
- या दिवशीच्या पूजेत भगवान श्री कृष्णा सोबत तुळशी पूजन नक्की करा. याला खूप शुभ मानले गेले आहे.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपले जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चाळींचा पूर्ण लेखा-जोखा
मोक्षदा एकादशीचे ज्योतिषीय महत्व
या वर्षी मोक्षदा एकादशी 14 डिसेंबर मंगळवारच्या दिवशी आहे जे की, अश्विन नक्षत्रात मेष राशीमध्ये येते. जिथे अश्विनी नक्षत्राच्या शासक बुद्धीचा ग्रह केतू असतो जे व्यक्तीला मोक्ष प्रदान करते आणि आता केतू मंगळ द्वारे शासित वृश्चिक राशीमध्ये स्थित आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की, मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींवर मंगळ ग्रहाचे शासन असते.
मोक्षदा एकादशी च्या दिवशी बनत आहे शुभ योग
भगवान विष्णू बुध ग्रहाचा स्वामी आहे. या वर्षी 14 डिसेंबर 2021 ला बुध मंगळ सोबत वृश्चिक राशीच्या बाराव्या भावात स्थित आहे. येथे बारावा भाव मोक्ष भाव मानले जाते.
राशि अनुसार भगवान विष्णु ला प्रसन्न करण्यासाठी उपाय
मेष राशि
- भगवान नरसिंहाची पूजा करा.
- अपंग लोकांना भोजन दान करा.
- 27 वेळा “ॐ नमो नारायण” मंत्राचा जप करा.
वृषभ राशि
- श्री सुक्तम चा पाठ करा.
- गरीब लोकांना मिठाई किंवा गोड वस्तू दान करा.
- “ॐ ह्रि श्री लक्ष्मीभोय नमः” “Om Shri hrim Lakshmi Bhyo Namaha” मंत्राचा 15 वेळा स्पष्ट उच्चारण पूर्वक जप करा.
मिथुन राशि
- या दिवसाचा उपवास करा आणि मीठ नसलेल्या भोजनाचे सेवन करा.
- श्री भगवतम चा जप करा.
- या दिवशी बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
कर्क राशि
- मोक्षदा एकादशी चा उपवास करणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.
- “ॐ नमो नारायण” मंत्राचा 11 वेळा जप करा.
- आपल्या आईचा आशीर्वाद घ्या.
सिंह राशि
- या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा.
- विष्णु सहस्त्रनामा चा पाठ करा.
- सूर्य देवतेची पूजा करा.
कन्या राशि
- भगवद गीता चा पाठ करा.
- गरीब लोकांना हिरवे चणे दान करा.
- 41 बार "ॐ नमो भगवते वासुदेवाय" का जप करा.
तुळ राशि
- या दिवशी सौंदर्य लहरी पाठ करा.
- मोक्षदा एकादशी च्या दिवशी विकलांग लोकांना दही आणि भात खाऊ घाला.
- भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मी ची पूजा करा.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
वृश्चिक राशि
- भगवान नरसिंह मंदिरात जाऊन या दिवशी पूजा करा.
- श्री मंत्राचा जप करा.
- या दिवशी उपवास नक्की करा.
धनु राशि
- ब्राह्मणांकडून शिर्वाद नक्की घ्या.
- ब्राह्मणांना भोजन दान करा.
- भगवान नरसिंहाची पूजा करा.
मकर राशि
- या दिवशी भगवान विष्णूची पूजा करा.
- 7 वेळा "ॐ केत्वे नमः" “Om Kethave Namaha” चा जप करा.
- या दिवशी गरिबांना तीळ दान करा.
कुंभ राशि
- विष्णु सहस्त्रनाम चा जप करा.
- ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय” “Om Namo Bhagavate Vasudevaya” मंत्राचा जप करा.
- कुठल्या ही आजारी व्यक्तीला भोजन द्या.
मीन राशि
- श्री सूक्तम चा पाठ करा.
- श्री विष्णु सूक्तम चा पाठ करा.
- कुठल्या ही गरिबाला भगवत गीता पुस्तक दान द्या.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!






