अंक ज्योतिष - Numerology In Marathi (13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला कोणते ही काम करण्याआधी त्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू समजून घ्यावी लागेल.
व्यावसायिकदृष्ट्या, तुम्हाला गोष्टी अतिशय काळजीपूर्वक आणि सकारात्मक पद्धतीने व्यवस्थित कराव्या लागतील कारण, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी कोणी तरी तुमच्यावर नाराज होऊ शकते. दुसरीकडे, तुम्हाला चांगल्या करिअरसाठी नवीन नोकरीच्या संधी मिळतील.
जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला या आठवड्यात नवीन व्यवसायात प्रवेश करण्याची संधी मिळेल परंतु, ते तुमच्यासाठी फारसे फायदेशीर ठरणार नाही असे संकेत आहेत. अशा स्थितीत भागीदारीत व्यवसाय करणे ही तुमच्यासाठी चुकीची चाल ठरू शकते.
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, कौटुंबिक समस्यांमुळे तुमचे तुमच्या वडिलांशी मतभेद होऊ शकतात, परंतु लवकरच तुमचे नाते सुधारेल.
आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही मानसिक तणाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत, योग आणि ध्यान इत्यादी करणे आपल्यासाठी चांगले असेल.
उपाय: नियमित 19 वेळा "ॐ भास्कराय नमः" चा जप करा.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिक दृष्ट्या पाहता, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या ट्रिपवर जावे लागेल आणि ही ट्रिप तुमच्या व्यावसायिक जीवनात फायदेशीर परिणाम आणतील.
जर तुम्ही एखाद्या व्यवसायाचे मालक असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि या आठवड्यात तुम्ही काही नवीन व्यावसायिक संपर्क प्रस्थापित कराल, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होण्याची शक्यता आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला आईचे पूर्ण समर्थन आणि आशीर्वाद मिळेल आणि याचे कारण हे असू शकते की तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात यश मिळवत असाल.
आरोग्याच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील पण तरीही स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि आरोग्याबाबत जागरुक राहा.
उपाय: नियमित 11 वेळा "ॐ सोमाय नमः" चा जप करा.
आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी थोडा कठीण आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेले काम आणि मेहनत दुर्लक्षित होण्याची भीती आहे परंतु, तुम्हाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, जे तुमच्यासाठी समाधानकारक असेल.
जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, अशा काही तज्ञांचा सल्ला घेणे आपल्यासाठी योग्य असेल, जे तुम्हाला अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यास सक्षम असतील.
तुमच्या जोडीदाराशी वाद किंवा भांडणे होऊ शकतात, त्यामुळे त्यांच्याशी संतुलन ठेवा. दुसरीकडे, आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या पायात वेदना होऊ शकतात, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.
उपाय: गुरुवारी बृहस्पती यज्ञ करा.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला व्यावसायिकरित्या काही चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. अधिक कामाचा दबाव देखील शक्य आहे म्हणून, आपल्या कार्यांचे योग्य नियोजन करा आणि काळजीपूर्वक कार्य पूर्ण करा.
जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला तुमचा अपेक्षित नफा मिळू शकत नाही पण वारसा आणि सट्टा बाजार जसे की शेअर बाजार, मधून नफा मिळण्याचे संकेत आहेत.
कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांमुळे जोडीदाराशी वाद होऊ शकतो, त्यामुळे स्वतःला शांत ठेवून जोडीदारासोबत थोडा वेळ घालवा आणि गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा.
आरोग्याच्या दृष्टीने, या आठवड्यात तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे आहाराबाबत सावधगिरी बाळगा आणि आरोग्याकडे लक्ष द्या.
उपाय: नियमित 22 वेळा "ॐ राहवे नमः" चा जप करा.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
करिअरच्या बाबतीत, या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील कारण, पदोन्नतीसह उच्च प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही अतिरिक्त काम ही करू शकाल.
जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला व्यवसाय करण्याच्या नवीन संधी मिळतील. तसेच पैशाचा ओघ ही चांगला राहील.
तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि तुम्ही त्यांच्या सोबत काही संस्मरणीय क्षण शेअर करू शकाल. त्याच बरोबर तुमचे आरोग्य ही चांगले राहील.
उपाय: नियमित 11 वेळा "ॐ बुं बुधाय नमः" चा जप करा.
जाणून घ्या आपल्या कुंडली मध्ये आहे राजयोग? राजयोग रिपोर्ट
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
करिअरच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील परंतु, त्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, तर हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल.
जर तुम्ही रचनात्मक गोष्टी किंवा मीडिया इत्यादींशी संबंधित व्यवसाय चालवत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही प्रेम संबंधात असाल किंवा वैवाहिक जीवन जगत असाल तर, हा आठवडा तुमच्यासाठी दोन्ही परिस्थितींमध्ये अनुकूल असेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सौहार्दाचे असतील. त्याच बरोबर आरोग्य ही चांगले दिसते.
उपाय: शुक्रवारी शुक्र ग्रहासाठी यज्ञ करा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिक दृष्ट्या, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामांचे योग्य नियोजन करावे लागेल जेणेकरून तुम्ही तुमची कामे वेळेवर आणि योग्य मार्गाने पूर्ण करू शकाल. या आठवड्यात कामात समर्पित असून ही तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून कौतुक किंवा प्रशंसा होणार नाही असे संकेत आहेत.
तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी कमाई होऊ शकते. अशा परिस्थितीत, अध्यात्मिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी चांगले होईल, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, अहंकारामुळे नाते संबंधात काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे शांतपणे आणि संयमाने काम करून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा.
आरोग्यासाठी काळ अनुकूल आहे, पण स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जेवण वेळेवर घ्या आणि योगासने, व्यायाम इ.
उपाय: नियमित 16 वेळा “ॐ केतवे नमः” चा जप करा.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिक दृष्ट्या पाहता या आठवड्यात तुम्हाला अनुकूल परिणाम दिसून येतील. तुम्ही तुमच्या करिअर मध्ये चांगली प्रगती कराल आणि तुम्ही तुमच्या कामासाठी समर्पित दिसाल. जेणेकरून कामे वेळेत पूर्ण करणे शक्य होईल एकूणच, नोकरीच्या आघाडीवर तुमची कामगिरी चांगली राहील.
तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत, आपण आपल्या विवेक बुद्धीने कार्य करून परिस्थितीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आरोग्याच्या दृष्टीने या सप्ताहात तुम्हाला पायदुखी होऊ शकते, त्यामुळे योगा, व्यायाम इत्यादींचा तुमच्या दिनचर्येत समावेश करा आणि स्वत:ची काळजी घ्या.
उपाय: नियमित 17 वेळा “ॐ मन्दाय नमः” चा जप करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
करिअर बद्दल बोलायचे तर, हा आठवडा छंद आणि आवडीच्या व्यवसायात रुपांतर करण्यासाठी अनुकूल ठरेल. असे केल्याने तुम्ही तुमची क्षमता सिद्ध करण्यात यशस्वी होऊ शकतात.
जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुम्ही तुमचे कौशल्य योग्य दिशेने लावून नफा मिळवू शकाल तसेच, या काळात कामाशी संबंधित काही प्रवास ही संभवतो.
आर्थिक दृष्ट्या पैशाचा ओघ चांगला राहील. अशा प्रकारे पैशांची बचत देखील शक्य होईल. वैयक्तिक आयुष्या विषयी बोलायचे झाल्यास, महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या सोबतच प्रियजनांसोबतचे तुमचे संबंध ही चांगले राहतील.
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील.
उपाय: नियमित 27 वेळा “ॐ भूमि पुत्राय नमः” चा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!