अंक ज्योतिष - Numerology In Marathi (17 जुलै- 23 जुलै, 2022)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (17 जुलै ते 23 जुलै, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात काही गोंधळामुळे तुमचा स्वभाव चिडचिड होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुमचे सहकारी आणि वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी कोणत्या ही प्रकारचे वाद-विवाद किंवा वाद घालण्याचा प्रयत्न करू नका.
प्रेम संबंध: प्रेम आणि वैवाहिक जीवनाविषयी बोलताना या आठवड्यात तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी अधिक जुळवून घ्यावे लागेल. यासाठी तुमच्या जोडीदाराचा दृष्टिकोन चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि फक्त बोलूनच सर्व काही सोडवा.
शिक्षण: जर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या अभ्यासात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. प्रतिकूल परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा, असे सुचवले जाते.
पेशेवर जीवन: व्यावसायिकदृष्ट्या पाहता या आठवड्यात तुम्हाला काही तणावपूर्ण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. तसेच तुमच्यावर कामाचा ताण जास्त असू शकतो. त्यामुळे तुमच्याकडूनही काही चुका होणार हे उघड आहे. म्हणून, तुम्ही परिश्रमपूर्वक काम करा आणि प्रत्येक काम अत्यंत काळजीपूर्वक करा. जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना या आठवड्यात अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळू शकतो.
स्वास्थ्य: या आठवड्यात तुम्हाला पाय दुखणे आणि सुस्तीचा त्रास होऊ शकतो. या सोबतच मानसिक तणाव आणि निद्रानाशाची ही तक्रार होण्याची शक्यता असते. योगासने आणि ध्यान नियमितपणे करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: या आठवड्यात सूर्य देवाला जल अर्पण करा.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे तुम्ही मूड बदलण्याची तक्रार असू शकते. अशा प्रकारे, काही महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही गोंधळून जाऊ शकता म्हणूनच, तुम्हाला जास्त तणाव घेण्याचा सल्ला दिला जातो. अति विचार टाळा आणि स्वतःला शक्य तितके व्यस्त ठेवा.
प्रेम संबंध: मानसिक तणावामुळे जोडीदाराशी वाद होऊ शकतो म्हणूनच, तुम्हाला असे सुचवले जाते की, जीवनसाथी सोबत बोलतांना काहीही असो, स्पष्टपणे सांगा.
शिक्षण: विद्यार्थ्यांना या आठवड्यात अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला टाइम टेबल बनवून त्यानुसार अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.
पेशेवर जीवन: जे नोकरदार लोक त्यांच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना या आठवड्यात थोडा विलंब होऊ शकतो. दुसरीकडे, जे स्वत:चा व्यवसाय करत आहेत, त्यांचे सौदे होण्यास थोडा विलंब होऊ शकतो, ज्यामुळे त्यांची कमाई कमी होऊ शकते.
स्वास्थ्य: या आठवड्यात तुम्हाला मानसिक तणाव आणि अस्वस्थता या सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला नियमितपणे ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो आणि शक्य तितका तणाव टाळण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: दिवसातून 11 वेळा "ॐ सोमाय नमः" मंत्राचा जप करा.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील.
प्रेम संबंध: तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध आनंददायी आणि सौहार्दपूर्ण असतील. तुम्ही त्यांच्या सोबत चांगला वेळ घालवाल. यामुळे तुमच्यातील गोडवा वाढेल आणि परस्पर समंजसपणा वाढेल.
शिक्षण: हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ठरेल कारण, या काळात ते काहीतरी नवीन शिकतील आणि नवीन कौशल्ये विकसित करण्यास सक्षम असतील.
पेशेवर जीवन: तुम्ही तुमच्या करिअर मध्ये प्रगती पहाल कारण, या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे समर्पित असाल आणि प्रभावीपणे काम करताना दिसतील.
स्वास्थ्य: साधारणपणे तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु, काही वेळा तुम्हाला थोडा सुस्तपणा जाणवू शकतो, जो योग आणि व्यायाम करून दुरुस्त केला जाऊ शकतो.
उपाय: रोज माता सरस्वतीची पूजा करा.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमच्यासाठी सरासरी फलदायी ठरेल. तुम्हाला मानसिकदृष्ट्या चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.
प्रेम संबंध: या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या नात्यात वाद ही होऊ शकतात म्हणून, तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि संवादाद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो.
शिक्षण: या आठवड्यात विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होऊ शकते, परिणामी त्यांची कामगिरी खराब होईल आणि ते त्यांच्या परीक्षेत चांगले गुण मिळवू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही आधी तुमचे वेळापत्रक बनवा आणि त्याचे पालन करा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
पेशेवर जीवन: व्यावसायिकदृष्ट्या, हा आठवडा खूप स्पर्धात्मक असेल. अशा परिस्थितीत नोकरदारांनी कामाच्या दरम्यान कोणत्या ही प्रकारची चूक करणे टाळावे लागेल. त्याच वेळी, स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असेल.
स्वास्थ्य: या आठवड्यात अपचन सारख्या पोटाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
उपाय: राहूमुळे येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी गणेशाची आराधना करा.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल. या काळात तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल.
प्रेम संबंध: या आठवड्यात तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. तुम्ही त्यांच्या सोबत लहान सहलीचे नियोजन करू शकता. यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आणि परस्पर समज वाढेल.
शिक्षण: या दरम्यान, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती मजबूत होईल, ज्यामुळे त्यांना त्यांचे विषय लवकर आणि चांगले समजू शकतील. विशेषतः वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील.
पेशेवर जीवन: नोकरदार जातकांच्या कामाचे वातावरण सुखकर राहील. सहकारी आणि वरिष्ठांशी ही संबंध चांगले राहतील. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुमच्या नेटवर्किंगच्या बळावर तुम्हाला या आठवड्यात चांगला नफा मिळवता येईल.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने ही हा आठवडा अनुकूल राहणार आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही निरोगी वाटाल.
उपाय: नियमित गाईंना हिरवा चारा खाऊ घाला.
आपकी कुंडली में भी है राजयोग? जानिए अपनी राजयोग रिपोर्ट
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमची सर्जनशील कौशल्ये सुधारेल आणि कला आणि मनोरंजनात तुमची रुची वाढवेल. या काळात तुम्हाला कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवायला आवडेल आणि त्यांच्याशी जोडून राहायला आवडेल.
प्रेम संबंध: या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डेट किंवा चित्रपटाची योजना करू शकता. या आठवड्यात तुम्हाला आणखी आनंद वाटेल.
शिक्षण: या आठवड्यात विद्यार्थी त्यांचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील, ज्यामुळे त्यांची कामगिरी चांगली होईल. अशा परिस्थितीत, तुम्हाला कठोर परिश्रम करण्याऐवजी स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो.
पेशेवर जीवन: नोकरदार जाटकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील कारण, कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे त्यांची लोकप्रियता ही वाढणार आहे. तुम्ही सल्लामसलत करण्याच्या व्यवसायात असाल तर, या आठवड्यात तुमची कामगिरी चांगली होईल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, ते या काळात काही चांगले आणि फायदेशीर सौदे करू शकतील.
स्वास्थ्य: आरोग्याच्या बाबतीत, या आठवड्यात तुम्ही निरोगी आणि उर्जेने परिपूर्ण असाल. पण तुमची उर्जा योग्य दिशेने वळवण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: नियमित 108 वेळा "ॐ शुक्राय नमः" मंत्राचा जप करा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण, तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार होण्याची शक्यता आहे आणि यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
प्रेम संबंध: जोडीदारासोबतच्या नात्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला त्यांच्यापेक्षा थोडे वेगळे अनुभवू शकता. तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शिक्षण: विद्यार्थ्यांना या आठवड्यात त्यांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन करण्याचा आणि अभ्यास करण्यापूर्वी ध्यान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण तुम्हाला तुमच्या अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात.
पेशेवर जीवन: या आठवड्यात तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि खूप प्रयत्न करावे लागतील असे संकेत आहेत. अशा स्थितीत तुमच्यासाठी चांगले होईल की, तुम्ही जे काही काम कराल, ते जरूर तपासा जेणेकरून चूक होण्यास जागा राहणार नाही.
स्वास्थ्य: या आठवड्यात तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते म्हणून, मद्य आणि मांसाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: घरात एखादा प्राणी पाळा किंवा कुत्र्याची काळजी घ्या.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला या आठवड्यात नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या करिअरला चालना मिळेल. तसेच तुमचा परफॉर्मन्स चांगला राहील. मात्र यश मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो.
प्रेम संबंध: जीवनसाथी सोबतच्या नात्यात गोडवा राहील. यामुळे तुमचे बंध अधिक दृढ होतील आणि परस्पर समंजसपणा ही वाढेल.
शिक्षण: विद्यार्थी या आठवड्यात त्यांच्या दिनचर्येनुसार शिस्तबद्ध राहतील आणि मनापासून अभ्यास करतील, यामुळे त्यांच्या कामगिरीत चांगली सुधारणा होईल.
पेशेवर जीवन: तुम्ही तुमच्या करिअर मध्ये उंची गाठाल. तसेच तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांना या आठवड्यात चांगला नफा होईल आणि ते बाजारात एक वेगळी ओळख निर्माण करतील.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, हा आठवडा अनुकूल आहे. तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त शरीराचा अनुभव येईल.
उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला तुमची उर्जा योग्य दिशेने चालवावी लागेल. तसेच घाईत कोणता ही निर्णय घेणे टाळा.
प्रेम संबंध: आक्रमक वृत्तीमुळे जोडीदाराशी वाद-वाद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही स्वतःला शांत ठेवून गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करा.
शिक्षण: विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात. अशा स्थितीत त्यांना चांगले गुण मिळवणे थोडे कठीण जाईल. अनावश्यक गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.
पेशेवर जीवन: कामाच्या ठिकाणी काही मतभेदांमुळे तुमचे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. दुसरीकडे, जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना या आठवड्यात अपेक्षेपेक्षा थोडा कमी नफा होऊ शकतो.
स्वास्थ्य: आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्त वाटू शकते. त्यामुळे योगासने, व्यायाम आणि ध्यान नियमितपणे करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: नियमित 108 वेळा "ॐ भौमाय नमः" चा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!