अंक ज्योतिष - Numerology In Marathi (24 एप्रिल - 30 एप्रिल, 2022)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (24 एप्रिल ते 30 एप्रिल, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुमची रचनात्मकता वाढेल आणि तुम्ही नवीन कल्पनांनी परिपूर्ण असाल. त्यामुळे मंचावरील कलाकार, कलावंत आणि संवादकांसाठी हा आठवडा अनुकूल ठरणार आहे. हा काळ वैयक्तिक विकासासाठी देखील मजबूत आहे.
प्रेम संबंध- प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल असल्याचे संकेत आहेत परंतु, तुम्हाला अनावश्यक वाद आणि अहंकार टाळावे लागतील कारण, अनावश्यक अहंकार तुमच्या जोडीदार सोबतच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतो.
शिक्षण- जे विद्यार्थी डिझायनिंग, कला, क्रिएटिविटी किंवा कविता इत्यादी क्षेत्रात आहेत त्यांना सकारात्मक परिणाम दिसून येतील कारण, ते या आठवड्यात अधिक रचनात्मक आणि नवीन कल्पनांनी परिपूर्ण असतील. त्यामुळे त्यांची कामगिरी चांगली होईल.
पेशेवर जीवन- लग्झरी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ प्राप्त होईल परंतु, या आठवड्यात कोणती ही नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे कारण, नवीन व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला लक्झरी व्यवसायात प्रवास करण्याची संधी मिळू शकते.
स्वास्थ्य- तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या प्रति सावध राहण्याचा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. तसेच जास्त स्निग्ध आणि गोड पदार्थ खाणे टाळावे. याशिवाय तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा प्रयत्न करा.
उपाय: देवी लक्ष्मीची पूजा करून तिला लाल रंगाची 5 फुले अर्पण करा.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्ही आतून खूप भावूक असाल. अशा परिस्थितीत, आपल्या प्रियजनांशी खोल संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे चांगले असेल. दुसरीकडे, या काळात तुम्ही तुमच्या घराच्या सुशोभीकरणावर धन खर्च करू शकतात.
प्रेम संबंध- या आठवड्यात तुमच्या वैवाहिक आणि प्रेम जीवनात कमालीची सुधारणा होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला आणि रोमँटिक वेळ घालवाल. जर तुम्ही आत्ता पर्यंत तुमच्या प्रेमी सोबत विवाहाची गाठ बांधण्याची योजना बनवत असाल तर, ही वेळ चांगली आहे.
शिक्षण- विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील कारण, या आठवड्यात तुमचे मन विचलित होऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.
पेशेवर जीवन- या आठवड्यात परदेशातून लाभ मिळण्याचे योग बनत आहे. स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्या आणि भागीदारीत व्यवसाय चालवणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल ठरेल. जर तुम्ही डोमेस्टिक किंवा कृषी मालमत्तेत किंवा पुरातन वस्तूंमध्ये गुंतवणूक केली असेल तर, तुम्हाला भरपूर लाभ प्राप्त होईल.
स्वास्थ्य- आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल आहे. कोणता ही मोठा त्रास होणार नाही. पण जास्त भावनिक झाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि तुमच्या आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: रोज संध्याकाळी घरामध्ये कापूरचा दिवा लावा.
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्ही अध्यात्मिक असणे आणि थोडे भौतिकवादी असणे यात संभ्रमावस्थेत असाल परंतु, तुम्हाला एका गोष्टीत शांती मिळवणे कठीण होईल म्हणून, तुम्हाला जीवनाच्या दोन्ही पैलूंमध्ये संतुलन राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रेम संबंध- जे अविवाहित जीवन जगत आहेत, त्यांना या आठवड्यात त्यांचा जोडीदार मिळू शकतो, त्यामुळे जर तुम्हाला कोणी आवडत असेल किंवा तुम्ही एकतर्फी प्रेमात असाल तर, ही वेळ तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल आहे. दुसरीकडे, जे लोक प्रेम संबंधात आहेत, त्यांच्यासाठी हा आठवडा रोमँटिक असेल आणि ते आपल्या प्रेमीला लग्नाचा प्रस्ताव देऊन आपल्या नात्यात एक पाऊल पुढे टाकू शकतात.
शिक्षण- उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, त्यामुळे तुम्ही पीएचडी किंवा परदेशी विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी निकालाची वाट पाहत असाल तर निकाल तुमच्या बाजूने येण्याची दाट शक्यता आहे.
पेशेवर जीवन- व्यावसायिकदृष्ट्या, हा आठवडा शिक्षक, मार्गदर्शक, धार्मिक नेते, मोटिवेशनल स्पीकर्स आणि इन्वेस्टमेंट बँकर इत्यादींसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर सिद्ध होईल.
स्वास्थ्य- आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा फारसा अनुकूल नसण्याची शक्यता आहे. तुम्ही काही आरोग्य समस्यांनी ग्रासले जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि कोणता ही निष्काळजीपणा करू नका. तसेच स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि योगासने, व्यायाम इ. करा. दुसरीकडे, मूलांक 3 असलेल्या महिलांना हार्मोनल असंतुलन होण्याची शक्यता असते म्हणून, आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करा आणि कोणती ही समस्या उद्भवल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्या.
उपाय: लहान मुलींना मिठाई खायला द्या.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्याल. काही मूल्यांकन लोक तुमच्या सोशल नेटवर्कवर जोडले जातील. तुमच्या आजूबाजूला काही प्रभावशाली लोक असतील. या सोबतच तुम्ही सेल्फ ग्रुमिंगकडे ही लक्ष देताना दिसाल.
प्रेम संबंध- सेल्फ-ऑब्सेशनमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करू शकता किंवा त्यांचा अनादर करू शकता, ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतात. म्हणून, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नात्याला समान प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शिक्षण- मूलांक 4 असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा कठीण असू शकतो कारण, त्यांना त्यांचे शिक्षण किंवा क्रिएटिव कल्पना इतरांना सिद्ध करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला इतरांकडे दुर्लक्ष करून तुमच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो.
पेशेवर जीवन- नोकरीपेशा जातकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण सौहार्दपूर्ण आणि आरामदायक असेल. अधीनस्थ आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. जे प्रोफेशनल सर्विस मध्ये आहेत, त्यांना ही हा आठवडा अनुकूल असेल कारण, ते अधिक ग्राहकांना आकर्षित करू शकतील आणि या काळात चांगल्या डीलिंग्स मिळवण्यात यशस्वी होतील.
स्वास्थ्य- आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला जाणार आहे. कोणती ही मोठी आरोग्य समस्या उद्भवणार नाही परंतु, तुम्हाला या आठवड्यात जास्त पार्टी वगैरे न करण्याचा सल्ला दिला जातो कारण, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
उपाय: तुमच्या झोपण्याच्या रूम मध्ये गुलाबी रंगाचा स्फटिक ठेवा.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
आरोग्य सुधारण्यासाठी आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी हा आठवडा अतिशय अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही तुमचे इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन गॅझेट बदलण्यासाठी किंवा अपग्रेड करण्यासाठी पैसे खर्च करू शकतात.
प्रेम संबंध- प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल आहे. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. यामुळे तुमच्यातील प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल.
शिक्षण- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्हाला तुमच्या परीक्षेत चांगले गुण मिळतील. पत्रकारिता, लेखन आणि इतर भाषा अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतील.
पेशेवर जीवन- करिअरच्या दृष्टीने, हा आठवडा अनुकूल राहील. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही चांगल्या संधी किंवा ऑफर मिळतील. ज्या लोकांचे करियर अभिनय, गायन, कला किंवा सोशल मीडिया मॅनेजर इत्यादी क्षेत्रात आहे त्यांच्या करिअर मध्ये प्रगती दिसेल.
स्वास्थ्य- या आठवड्यात तुम्हाला अपचन किंवा सूज अश्या तक्रार येऊ शकतात, त्यामुळे तुमच्या आहाराबाबत सावधगिरी बाळगा आणि योगासने, व्यायाम इत्यादींना तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा.
आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सकारात्मकता पाहायला मिळेल. या सोबतच तुमचे व्यक्तिमत्त्व ही सुधारेल, ज्यामुळे तुम्ही लोकांसमोर प्रभावीपणे सादर कराल. या शिवाय तुम्ही स्वतःचे लाड करण्यात ही धन खर्च कराल.
प्रेम संबंध- ज्या जातक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी वेळ अनुकूल आहे, ते त्यांचे प्रेम व्यक्त करू शकतात. तर जे आधीपासून प्रेमसंबंधात आहेत ते त्यांच्या प्रेयसी सोबत उत्तम वेळ घालवतील. यामुळे त्यांच्यातील प्रेम आणि स्नेह वाढेल.
शिक्षण- जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याची किंवा परदेशात शिक्षण घेण्याची संधी शोधत आहेत, त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. दुसरीकडे, जे विद्यार्थी फॅशन, थिएटर अभिनय, इंटिरियर डिझायनिंग किंवा इतर डिझायनिंग क्षेत्रात शिकत आहेत त्यांच्या कामगिरीत सुधारणा दिसून येईल.
पेशेवर जीवन- जे लोक चैनीच्या वस्तू, सौंदर्य उत्पादने किंवा महिला वस्तूंचा व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल म्हणजेच त्यांना त्यांच्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल.
स्वास्थ्य- आरोग्याच्या दृष्टीने, हा आठवडा अनुकूल राहील. तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी असाल परंतु, तरी ही योग, व्यायाम इत्यादी करा आणि संतुलित आहार घ्या.
उपाय: शुक्र होरा वेळी नियमित शुक्र मंत्राचा जप करा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्ही थोडे गोंधळलेले आणि निर्णयक्षम असाल म्हणजेच, कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला गोंधळ वाटेल आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर शंका व्यक्त करू शकतात.
प्रेम संबंध- जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांना या आठवड्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते कारण, तुमचा जोडीदार या आठवड्यात तुमचे रोमँटिक विचार आणि योजनांकडे दुर्लक्ष करू शकतो आणि कोणता ही प्रतिसाद देऊ शकत नाही. दुसरीकडे, वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या नात्यात तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या जोडीदाराच्या असभ्य वर्तनामुळे तुम्हाला भावनिक दुखापत होऊ शकते.
शिक्षण- डिझायनिंग, कला, सर्जनशीलता आणि कविता इत्यादी क्षेत्रात शिकणारे विद्यार्थी या आठवड्यात सर्जनशील कल्पनांनी परिपूर्ण असतील परंतु, त्यांना त्यांच्या सर्जनशील कल्पना वितरित करण्यात काही अडचणी येऊ शकतात म्हणून, आपल्या शिक्षकांची मदत घेणे उचित आहे. निराश होऊ नका.
पेशेवर जीवन- या आठवड्यात तुम्ही 'वर्क फ्रॉम होम' सुरू करण्याची दाट शक्यता आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू शकाल. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसह 'बिझनेस फ्रॉम होम' सुरू करू शकतात.
स्वास्थ्य- या आठवड्यात पोट आणि डोळ्यांशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे म्हणून, तुम्ही तुमच्या आहारा बाबत सावधगिरी बाळगा आणि डोळ्यांची तपासणी करा. दुसरीकडे, स्त्रियांना हार्मोन्स किंवा रजोनिवृत्तीशी संबंधित काही समस्या असू शकतात.
उपाय: तुमच्या घरात पांढरी फुले लावा आणि त्यांची काळजी घ्या.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमच्या जीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रात आनंद घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळत असल्याचे दिसेल.
प्रेम संबंध- जे लोक अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती येऊ शकतो म्हणजेच ते प्रेमात पडू शकतात.
शिक्षण- विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे कारण, विचलित होणे आणि निष्काळजी वृत्तीमुळे काही चुका होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या मेहनतीवर आणि ग्रेडवर परिणाम होईल.
पेशेवर जीवन- नोकरदारांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. परिणामी तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये प्रगती दिसेल. तसेच वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील.
स्वास्थ्य- या आठवड्यात तुम्हाला पचनाच्या समस्या आणि काही किरकोळ आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहाराबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, व्यायाम इत्यादींचा समावेश करा.
उपाय: दही ने स्नान करावे.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात तुम्ही खूप महत्त्वाकांक्षी असाल म्हणजेच तुम्हाला काही ही साध्य करण्याची तीव्र इच्छा असेल, त्यामुळे तुम्हाला तुमचे जीवन सुधारण्यासाठी या शक्तीचा योग्य वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
प्रेम संबंध- या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण किंवा वाद होण्याची शक्यता आहे, पण तुमच्या नात्यात सुधारणा करण्यासाठी हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण, या सर्व गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवू शकता आणि त्यांचा जोडीदार चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. परिणामी, तुमच्या नात्यात जवळीक वाढेल आणि परस्पर समंजसपणा ही वाढेल.
शिक्षण- विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे अधिक दडपण असू शकते. तसेच त्यांची एकाग्रता बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला अभ्यासाचा दबाव न वाटता तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात येतो.
पेशेवर जीवन- व्यावसायिकदृष्ट्या, हा आठवडा अनुकूल राहील. तुम्ही तुमचे सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर, या काळात तुम्हाला नोकरीच्या काही चांगल्या संधी किंवा ऑफर मिळतील. तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेतल्यास त्यात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. दुसरीकडे, जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत तर, त्यांना या आठवड्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
स्वास्थ्य- या आठवड्यात पोटाशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तिखट-मसालेदार पदार्थ न खाणे, घरचेच अन्न खाणे चांगले असेल.
उपाय: दररोज अत्तर वापरा. विशेषत: चंदनाच्या सुगंधाने, तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!