अंक ज्योतिष - Numerology In Marathi (24 जुलै- 30 जुलै, 2022)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (24 जुलै ते 30 जुलै, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
शक्यता आहे की, मूलांक 1 च्या जातकांना या आठवड्यात थोडे कमी उत्साही वाटू शकते. तसेच, तुम्हाला वयक्तिकदृष्ट्या, अधिक लक्ष द्यावे लागेल म्हणून, पाहिले तर हा आठवडा थोडा आव्हानात्मक असणार आहे. तथापि, तुम्हाला अधिक सकारात्मक राहण्याचा आणि तुमची ऊर्जा आणि इच्छा शक्ती मजबूत ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
प्रेम संबंध: या आठवड्यात तुमचे प्रेम जीवन ठीक-ठाक असेल आणि तुमचा जोडीदार तुम्हाला भविष्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची अपेक्षा करू शकतो. तसेच तुमचा पार्टनर तुमच्याकडून वचन बद्धतेची अपेक्षा करू शकतो. या राशीचे विवाहित जातक आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याची योजना आखतील.
शिक्षण: कला, कविता, मनोरंजन, डिझायनिंग या क्षेत्राशी संबंधित या मूलांकाच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. या काळात तुम्हाला तुमच्या सर्जनशील कल्पनांमध्ये वाढ दिसून येईल आणि तुम्ही या आठवड्यात चांगली कामगिरी करू शकाल.
पेशेवर जीवन: जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या कौशल्यात या आठवड्यात सुधारणा दिसून येईल आणि तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन संधी देखील मिळतील. या क्रमांकाच्या व्यावसायिक जातकांच्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या विक्रीशी संबंधित काही चांगली बातमी येण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या जातकांचा फायदा होईल ज्यांचा ऐशोआरामाशी संबंध आहे.
स्वास्थ्य: या आठवड्यात योग्य आहार आणि नियमित व्यायामाचा सल्ला दिला जातो. असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होईल.
उपाय: नियमित देवी लक्ष्मीची पूजा करा.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या जातकांना या आठवड्यात त्यांच्या व्यावसायिक जीवनात थोडा विलंब होऊ शकतो आणि तुमचा कोणता ही प्रकल्प अंतिम मुदतीत पूर्ण करण्यात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमच्या जीवनात भावनिक गडबड ही होईल. अशा परिस्थितीत, स्वत: ला शक्य तितकी विश्रांती देण्याचा सल्ला दिला जातो आणि या आठवड्यात जास्त अपेक्षा करू नका.
प्रेम संबंध: या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून आश्चर्याची अपेक्षा करू शकता कारण, तो तुमच्यासाठी काही खास योजना आखत आहे. ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांच्यातील नाते छान असेल. तसेच, तुमचे घर अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही दोघे ही काही पैसे खर्च करू शकता.
शिक्षण: मूलांक 2 च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि या वेळी थोडे कठोर परिश्रम करावे लागतील. या काळात तुमच्या अवती-भवती घडणाऱ्या सामाजिक उपक्रमांमुळे तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे.
पेशेवर जीवन: आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीने, हा आठवडा खूप चांगला जाईल आणि या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या वचनबद्धतेला चिकटून राहाल. या मूलांकाचे जातक जे व्यवसायाच्या क्षेत्रात आहेत त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण, या काळात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून काही दबाव जाणवू शकतो.
स्वास्थ्य: हवामानातील बदलामुळे, तुम्हाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो आणि त्याच वेळी तुम्हाला तुमच्या जीवनात उर्जेची कमतरता देखील जाणवू शकते म्हणूनच, तुम्हाला अगोदर योग आणि ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: कोणत्या ही प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी घरात दिवा लावा.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात मूलांक 3 चे जातक कोणता ही निर्णय अत्यंत हुशारीने घेतील. तसेच, तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात आणि वयक्तिक जीवनात अत्यंत सावध राहाल. या व्यतिरिक्त, तुम्हाला यावेळी अध्यात्मिक असणे आणि थोडे भौतिकवादी असणे यात अडकलेले वाटू शकते आणि यामुळे तुमच्या जीवनात शांतता कमी होऊ शकते.
प्रेम संबंध: या राशीच्या अविवाहितांना या आठवड्यात रिलेशनशिपमध्ये येण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर, हा काळ त्याच्या सोबत तुमचे मन शेअर करण्यासाठी योग्य आहे. दुसरीकडे, विवाहित जातकांमधील संवादातील अंतर मोठ्या अडचणीचे कारण बनू शकते कारण, तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त असाल आणि तुमच्या जोडीदाराच्या गरजा आणि मागण्यांकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही.
शिक्षण: या कालावधीत, मूलांक 3 च्या विद्यार्थ्यांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल. अशा परिस्थितीत, या काळात तुम्ही तुमचा वेळ इतर सर्जनशील गोष्टींसाठी वापरू शकतात. ज्यामुळे तुमचे कौशल्य वाढेल.
पेशेवर जीवन: या राशीच्या जातकांना जे शिक्षण, गुरू, अध्यात्मिक, बँकिंग या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांना या आठवड्यात नक्कीच फायदा होईल. या शिवाय मार्केटिंग आणि सेल्सशी संबंधित असलेल्यांसाठी ही हा आठवडा चांगला असणार आहे कारण, तुम्ही चांगले ग्राहक आणू शकाल. व्यवसाय करणाऱ्या या जातकांसाठी या कालावधीत त्यांच्या विक्रीत काही वाढ अपेक्षित आहे.
स्वास्थ्य: आरोग्याशी संबंधित कोणती ही समस्या या आठवड्यात तुम्हाला त्रास देऊ शकते आणि म्हणून कोणत्या ही परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर योग्य वैद्यकीय मदत घ्या. तसेच चांगल्या व्यायामाचे पालन करा. तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकाल.
उपाय: मंदिरात दान करणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध राहील.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 च्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ठीक असणार आहे. तथापि, या काळात तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात अधिकाधिक वेळ त्यांच्या सोबत वेळ घालवायला आवडेल. या सोबतच या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
प्रेम जीवन: मूलांक 4 चे काही जातक या आठवड्यात कोणत्या ही नात्यात अडकू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर, त्यांच्या समोर तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ खूप छान असणार आहे. या शिवाय प्रेमी आपले नाते पुढच्या टप्प्यावर घेऊन जाऊ शकतात आणि आपल्या जोडीदाराला लग्नासाठी प्रपोज करू शकतात.
शिक्षण: मूलांक 4 च्या जातकांसाठी हा काळ उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आहे, त्यामुळे जर तुम्ही पीएचडी किंवा मास्टर सारख्या उच्च शिक्षणात चांगल्या आणि नामांकित महाविद्यालयातून निकालाची वाट पाहत असाल तर, तुमच्या पक्षात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
पेशेवर जीवन: जे लोक अध्यापनाच्या व्यवसायात आहेत म्हणजे, अध्यापन, गुरु आणि प्रेरक वक्ता आणि गुरूशी संबंधित उद्योगाशी संबंधित आहेत, त्यांच्या जीवनात या काळात शुभ परिणाम आणि वृद्धी होईल.
स्वास्थ्य: आरोग्याच्या बाबतीत, या आठवड्यात समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. अशा परिस्थितीत, कोणत्या ही परिस्थितीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेत योग्य वैद्यकीय मदत घ्या. या आठवड्यात महिलांना काही हार्मोनल समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
उपाय: श्री गणेशाला मिठाई अर्पण करा.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
मूलांक 5 च्या जातकांसाठी हा आठवडा त्यांच्या जीवनात चांगले आरोग्य आणि जीवनाचा दर्जा राखण्यासाठी उत्कृष्ट असेल. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहणार आहात कारण, या काळात व्यावसायिक जीवन थोडे व्यस्त राहण्याची शक्यता आहे.
प्रेम संबंध: नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी खूप आरामदायक असणार आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हा काळ एन्जॉय करू शकाल. या शिवाय विवाहित लोक ही या सप्ताहाचा मनमुराद आनंद लुटतील.
शिक्षण: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या मूलांकातील विद्यार्थी आपल्या मेहनतीत यशस्वी होतील आणि अभ्यासात पूर्ण लक्ष देतील. मास कम्युनिकेशन, रायटिंग, मार्केटिंग आणि सेल्स आणि एमबीए या क्षेत्राशी संबंधित लोक त्यांच्या आयुष्यात चांगली वाढ पाहू शकतात.
पेशेवर जीवन: मूलांक 5 च्या राशीच्या जातकांच्या करिअर मध्ये चांगली प्रगती होईल आणि या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जे सरकारी सेवेत आहेत त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. या शिवाय सरकारी कर्मचार्यांना त्यांच्या क्षमतेच्या वर चढून कामगिरी द्यावी लागेल तरच, तुम्ही खडतर स्पर्धेच्या शर्यतीत टिकून राहू शकाल.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, सर्व काही ठीक राहील. तुम्हाला फक्त तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणे आणि निरोगी अन्न खाणे आवश्यक आहे.
उपाय: शक्यतो हिरव्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. हे शक्य नसेल तर किमान एक हिरवा रुमाल नेहमी सोबत ठेवा.
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
मूलांक 6 च्या जातकांना या आठवड्यात त्यांच्या आत्मविश्वासात सुधारणा दिसून येईल. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल. या व्यतिरिक्त, या आठवड्यात तुम्ही चैनीच्या वस्तू आणि सुविधांवर पैसे खर्च कराल.
प्रेम संबंध: प्रेम आणि रोमांसच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्ही तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर कराल. या सोबतच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाइम एन्जॉय कराल, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल.
शिक्षण: या राशीचे विद्यार्थी जे उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत किंवा परदेशात शिकत आहेत त्यांची स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकतात. फॅशन, थिएटर, अभिनय या क्षेत्रातील कोणत्या ही किंवा इतर कोणत्या ही डिझायनिंग क्षेत्रात येणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
पेशेवर जीवन: मूलांक 6 च्या जातकांसाठी हा आठवडा शेअर बाजारातील गुंतवणूक, बँकिंग आणि व्यवहारात सावध राहण्याचा काळ आहे. तुमच्या कामाच्या कौशल्यामुळे आणि अनुभवामुळे तुमचे बॉस किंवा कंपनीचे वरिष्ठ लोक तुमचे कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला फायदा ही होऊ शकतो.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, जातकांना थोडे सुस्त वाटू शकते, त्यामुळे आळस दूर करण्यासाठी व्यायाम करा. योग्य आहार घ्या आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या.
उपाय: शुक्रवारी लक्ष्मी नारायण मंदिरात मिठाई दान करा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 च्या जातकांना या आठवड्यात त्यांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये चढ-उतार पाहू शकतात, त्यामुळे तुम्हाला शक्य तितके शांत राहण्याचा आणि तुमच्या व्यावसायिक आणि वयक्तिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागेल.
प्रेम संबंध: मूलांक 7 च्या जातकांसाठी जे आधीच नातेसंबंधात आहेत, हा आठवडा ठीक-ठाक असेल. ही शक्यता आहे की, या काळात तुमचा जोडीदार त्याच्या कामात अधिक व्यस्त असेल किंवा तो अधिक आध्यात्मिक प्रवृत्ती असेल, ज्यामुळे तुम्हाला त्याच्या वागण्यामुळे काही भावनिक अंतर जाणवेल
शिक्षण: मूलांक 7 च्या जातकांसाठी हा आठवडा फारसा अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही कारण, कठोर परिश्रम आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करून ही तुम्हाला तुमचे विषय लक्षात ठेवण्यात काही अडचणी येतील.
पेशेवर जीवन: मूलांक 7 च्या व्यावसायिक जातकांसाठी या काळात नवीन धोरणे, तंत्रे किंवा कार्यबल लागू करण्याची आवश्यकता असेल आणि तरच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील.
स्वास्थ्य: या काळात, या जातकांना पोटाशी संबंधित काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि काही हार्मोनल समस्या या मूलांकाच्या महिलांना अडचणीत आणू शकतात.
उपाय: आंघोळीच्या पाण्यात दही मिसळून आंघोळ करावी.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 च्या जातकांसाठी, हा आठवडा प्रेम आणि आनंदाच्या अनेक भेटवस्तू घेऊन येईल. या काळात तुम्ही तुमचे जीवन परिपूर्णपणे जगू शकाल आणि जे काही काम तुम्हाला पूर्वी विलंबाने किंवा तोंड द्यावे लागले होते ते या आठवड्यात हळूहळू पूर्ण होऊ लागतील.
प्रेम संबंध: जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर, या आठवड्यात तुमच्या नात्यात काही चांगले क्षण येतील. तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम करेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराप्रती पूर्णपणे समर्पित दिसाल. या शिवाय, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत यशाच्या काही संधी साजरी करताना ही दिसाल.
शिक्षण: या मूलांकाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात थोडे विचलित वाटू शकते, ज्यामुळे तुमच्या गुणांवर नकारात्मक परिणाम होईल.
पेशेवर जीवन: मूलांक 8 च्या जातकांना या आठवड्यात अपेक्षित वाढ मिळेल. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या व्यतिरिक्त, या आठवड्यात तुम्ही अधिक महत्वाकांक्षी व्हाल जेणेकरून तुम्ही तुमचे जीवन ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
स्वास्थ्य: तथापि, या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हे शक्य आहे की या काळात तुम्हाला पचनसंस्थेशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे खाण्यापिण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो आणि निरोगी आहारासोबत योगासने आणि ध्यानाचा नित्यक्रमात समावेश करावा.
उपाय: गरजू व्यक्तींना इतर वस्तू किंवा कपडे दान करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 च्या जातकांमध्ये या आठवड्यात ऊर्जा, इच्छाशक्ती आणि काही तरी साध्य करण्याची इच्छा वाढलेली दिसेल. अशा परिस्थितीत, ही इच्छाशक्ती मजबूत ठेवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक विचार पुनर्संचयित करण्याचा सल्ला दिला जातो.
प्रेम संबंध: किरकोळ कारणावरून तुमच्या जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे. या सोबतच या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील.
शिक्षण: या राशीचे विद्यार्थी अभ्यासाच्या दबावाने वेढले जाणार आहेत आणि अभ्यासामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ शकते आणि या आठवड्यात तुम्हाला विचलित वाटू शकते.
पेशेवर जीवन: व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी हळूहळू रुळावर येतील आणि या आठवड्यात तुम्ही तुमची सर्व असाइनमेंट वेळेवर पूर्ण करू शकाल. या आठवड्यात तुम्ही कोणता ही मोठा निर्णय घेतलात तर, त्याचा भविष्यात फायदा होईल.
स्वास्थ्य: या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण, तुम्हाला पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुम्ही बाहेर काय खात आहात याची काळजी घ्या.
उपाय: तुमच्या जीवनातील शुभ परिणामांसाठी हनुमान चालीसाचा नियमित पाठ करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Jupiter Retrograde In Cancer: Impacts & Remedies
- Jupiter Retrograde In Cancer: Rethinking Growth From Inside Out
- Mercury Retrograde In Scorpio: Embrace The Unexpected Benefits
- Weekly Horoscope November 10 to 16, 2025: Predictions & More!
- Tarot Weekly Horoscope From 9 November To 15 November, 2025
- Numerology Weekly Horoscope: 9 November To 15 November, 2025
- Mars Combust In Scorpio: Caution For These Zodiacs!
- Margashirsha Month 2025: Discover Festivals, Predictions & More
- Dev Diwali 2025: Shivvaas Yoga Will Bring Fortune!
- November 2025: A Quick Glance Into November 2025
- बृहस्पति कर्क राशि में वक्री-क्या होगा 12 राशियों का हाल?
- गुरु कर्क राशि में वक्री, इन 4 राशियों की रुक सकती है तरक्की; करनी पड़ेगी मेहनत!
- बुध वृश्चिक राशि में वक्री से इन राशियों को मिलेगा अप्रत्याशित लाभ और सफलता के अवसर!
- इस सप्ताह दो बड़े ग्रह होंगे अस्त, जानें किन राशियों को रखना होगा फूंक-फूंक कर कदम!
- टैरो साप्ताहिक राशिफल (09 से 15 नवंबर, 2025): इन राशि वालों के लिए खुलने वाले हैं किस्मत के दरवाज़े!
- अंक ज्योतिष साप्ताहिक राशिफल: 09 नवंबर से 15 नवंबर, 2025
- मंगल वृश्चिक राशि में अस्त, इन राशियों पर टूट सकता है मुसीबतों का पहाड़, रहें सतर्क!
- मार्गशीर्ष माह में पड़ेंगे कई बड़े व्रत त्योहार, राशि अनुसार उपाय से खुलेंगे सुख-समृद्धि के द्वार!
- देव दिवाली 2025: शिववास योग से खुलेंगे सौभाग्य के द्वार, एक उपाय बदल देगा किस्मत!
- नवंबर 2025 में है देवउठनी एकादशी, देखें और भी बड़े व्रत-त्योहारों की लिस्ट!
- Horoscope 2026
- राशिफल 2026
- Calendar 2026
- Holidays 2026
- Shubh Muhurat 2026
- Saturn Transit 2026
- Ketu Transit 2026
- Jupiter Transit In Cancer
- Education Horoscope 2026
- Rahu Transit 2026
- ராசி பலன் 2026
- राशि भविष्य 2026
- રાશિફળ 2026
- রাশিফল 2026 (Rashifol 2026)
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2026
- రాశిఫలాలు 2026
- രാശിഫലം 2026
- Astrology 2026






