मकर संक्रांत 2022 - Makar sankranti In Marathi (14 जानेवारी, 2022)
चला जाणून घेऊया की, मकर संक्रांतीचा सण काय आहे? या दिवसाचे महत्व काय असते? या दिवसाने जोडलेला विधी विधान काय आहे आणि या दिवशी दान करण्याचे इतके महत्व का सांगितले गेले आहे? सोबतच भोगी सणाचे काय महत्व आहे. या प्रकारची माहिती तसेच, आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्ताची माहिती ही या ब्लॉग मध्ये प्रदान करत आहे.
मकर संक्रांत विशेष हा ब्लॉग आमच्या ज्योतिषींनी योग्य गणना आणि बरेच विश्लेषण केल्या नंतर तयार केले आहे. चला तर सर्व प्रथम जाणून घेऊया मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त या वर्षी काय राहणार आहे आणि ही संक्रांत कोणत्या राशींसाठी जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
भोगी
मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला “भोगी” असे म्हणतात. ह्या दिवशी भोगी ची भाजी (मिश्र भाजी), बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बनवण्याची प्रथा आहे. १५-१६ प्रकारच्या भाज्या मिसळून केलेली भोगीची भाजी आणि मुग-तांदळाची खिचडी करण्याची पद्धत आहे. भोगी हा सण आनंद आणि उपभोगाचा सण मानला जातो.
या दिवशी सकाळी लवकर उठून आपले घर आणि आपल्या सभोवतीच्या परिसर स्वच्छ करतात आणि दारासमोर रांगोळी काढतात. घरातील सुवासिनी अभ्यंगस्नान करतात. सर्व जण नवीन कपडे परिधान करू दागिने घालतात तसेच, कुटुंबातील सर्वजण दुपारी सोबत जेवण करून “भोगी” या सणाचा आनंदोत्सव साजरा करतात.
मकर संक्रांत 2022: तिथि आणि शुभ मुहूर्त14 जानेवारी, 2022 (शुक्रवार)
मकर संक्रांत मुहूर्त
पुण्य काळ मुहूर्त: 14:12:26 पासून 17:45:10 पर्यंत
अवधी: 3 तास 32 मिनिटे
महापुण्य काळ मुहूर्त: 14:12:26 पासून 14:36:26 पर्यंत
अवधी: 0 तास 24 मिनिटे
संक्रांत क्षण: 14:12:26
माहिती: हा मुहूर्त नवी दिल्ली साठी मान्य आहे. आपल्या शहराच्या अनुसार मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मकर संक्रांतीचे महत्व:
मकर संक्रांत म्हणजे, जानेवारी मधील पहिला सण! हिंदू पंचांगा प्रमाणे पौष महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटले जाते तसेच, या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून, याला “मकर संक्रांत” असे म्हणतात.
२१-२२ डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वी वरून पाहिले असता २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. पंचांगानुसार, मकर संक्रांतीचा उत्सव १४ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते.
मकर संक्रातीचा संबंध शेती सोबत देखील आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया एकमेकींना शेतात धान्याचे वाण देतात. या दिवशी स्त्रिया साज-श्रुंगार करून मंदिरात जातात. तसेच हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
मकर संक्रांत सण दरवर्षी सारख्याच तारखेला येतो. हिंदू संस्कृतीतील एकमेव असा हा सण आहे जो एकाच तारखेला येतो. या मागील कारण म्हणजे, हा एकमेव सण आहे जो सूर्याच्या स्थानानुसार साजरा केला जातो. इतर सर्व सण हे चंद्राच्या स्थानावर साजरे केले जातात. त्यामुळे इतर सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना साजरे करण्यात येतात.
रोजच्या धावपळीच्या काळात एकमेकांना भेटणे शक्य नसते. स्त्रियांना रोजच्या कामातून थोडासा निवांतपणा मिळावा त्यामुळे स्त्रिया मंदिरात जावून पांडुरंगाला ओवसतात म्हणजेच वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण करतात. निदान सणासुदीला तरी भेटी होतात. त्यामुळे याला सणाचे महत्व प्राप्त झाले आहे. वैर भाव विसरून सर्वांनी गोडीने राहावे असा एक संदेश देणारा हा सण आहे.
या सणाला काळे कपडे घातले जातात विशेष करून स्त्रिया काळ्या साड्या घालतात. काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीत उष्णतेची गरज असते. लहान मुलांना बोर न्हान केल जात. अशा अनेक गोष्टीमुळे या सणाला महत्व आहे.
हळदी-कुंकू
महाराष्ट्रात संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू चालते. बायका एकमेकींच्या घरी जातात, हळद, कुंकू, अत्तर, तीळाचे लाडू, तीळाची कोंद आणि वाणाची वस्तु देतात. रोजच्या वापरातल्या लहान वस्तु वाणात द्यायची पद्धत आहे. गाळण्या, वाट्या, पीना, चमचे, गोठ, करंडे, कृष्णाचे कपडे, फुलांच्या वेण्या, शोभेच्या वस्तु, इ. महिनाभर उत्साहात हे हळदी कुंकू चालते. या काळात तीळ आणि गूळ मिसळून वेगवेगळे पदार्थ करतात.
पतंगोत्सव
संक्रांत जवळ आली की, सर्व ठिकाणी पतंग उडवण्याची प्रथा आहे याचे शास्त्रीय कारण असे ही आहे की, थंडीचे दिवस संपून उन्हाळ्याचे दिवस चालू होतात म्हणजे सूर्याचे उत्तरायण सुरु होते शरीरात जीवनसत्व ‘ड’ मिळण्यासाठी ही हा उत्सव पूर्वी ठेवला असावा तसेच, वर्षातील पहिला सण असल्याने उत्साहात आणि आनंदात संपूर्ण आकाशात वेगवेगळ्या पतंगाचे उडणे पाहून आनंद ही होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण पतंग उडवतात. महाराष्ट्रात ही येवला या ठिकाणी अतिशय उत्साहात हा सण साजरा केला जातो. सलग तीन दिवस लोक पतंग उडवतात आणि येथील उत्सव हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
या राशींसाठी खूप शुभ असेल मकर संक्रांत
वृषभ राशि: वृषभ राशीतील जातकांसाठी हे पर्व उत्तम राहील. संतान सुख, आवास, वाहन चे उत्तम सुख मिळेल. मान सन्मानात वृद्धी होईल.
तुळ राशि: तुळ राशीसाठी मकर संक्रांत शुभ राहील. या काळात तुमच्या जीवनात धार्मिक कार्य अधिक असतील. तुम्हाला उत्तम भोजन करायला मिळेल सोबतच, या वेळी तुम्हाला धन प्राप्ती ही होईल.
धनु राशि: धनु राशीतील जातकांसाठी ही वेळ उत्तम सिद्ध होईल. या वेळी तुमच्या जीवनात धार्मिक कार्य होतील. तुम्हाला उत्तम आणि स्वादिष्ट व्यंजन खायला मिळेल. या काळात आळस आणि व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो.
मीन राशि: मीन राशीतील जातकांसाठी मकर संक्रांतीची वेळ उत्तम राहील. या वेळी तुम्हाला धन लाभ ही होईल. या सोबतच, वाहन, आवास, स्थायी संपत्ती सुख इत्यादी प्रापर होण्याचे प्रबल योग बनत आहेत.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा.
या राशींना मकर संक्रांती ला राहावे लागणार सावधान!
मेष राशि: मेष राशीतील जातकांसाठी या संक्रांतीचा प्रभाव सामान्य राहील. मानसिक तणाव, वाद विवाद इत्यादी असण्याची शक्यता आहे.
मिथुन राशि: मिथुन राशीतील जातकांसाठी ही संक्रांत शुभ राहणार नाही. या वेळी तुमचा कुणी स्वजन सोबत विरोध, कुठल्या गोष्टीला घेऊन मानसिक तणाव, क्रोध, वाद विवाद आणि चोरीची भीती कायम राहील.
कर्क राशि: कर्क राशीतील जातकांसाठी ही संक्रांत सामान्य राहील. पत्नी पक्षाकडून पीडा होण्याची शक्यता आहे. तणाव, क्रोध, विवाद आणि मानसिक त्रास या काळात तुम्हाला त्चिंता देऊ शकते.
सिंह राशि: सिंह राशीतील जातकांना ही संक्रांत अशुभ प्रभाव देईल. या काळात वाहन चालवण्याच्या वेळी सावध राहा. या व्यतिरिक्त, या काळात तुमचे आरोग्य खराब राहील परंतु, अकस्मात धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे.
कन्या राशि: कन्या राशीतील जातकांसाठी याचे फळ शुभ नसेल. आरोग्य समस्या होण्याची शक्यता आहे. डोळ्या संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशि: वृश्चिक राशीतील जातकांसाठी ही मकर संक्रांत कुणी आपल्या सोबत विश्वास घात करण्याची आशंका बनतांना दिसत आहे. सल्ला दिला जातो की, या काळात घाई-गर्दीत कुठला ही निर्णय घेऊ नका अथवा तुम्हाला या वेळी हानी होऊ शकते.
मकर राशि: मकर राशीतील जातकांसाठी ही वेळ शुभ राहील. या वेळी तुमच्या कार्य क्षेत्रात प्रगतीचे प्रबळ योग आहेत. याच्या व्यतिरिक्त, या वेळी तुमचे आरोग्य उत्तम राहील तथापि, विवाहित पक्ष थोडा नाजूक राहील. या वेळी तुमचा तुमच्या पत्नी सोबत वाद होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशि: ही मकर संक्रांत कुंभ राशीतील जातकांसाठी धन व्यय चे योग बनवतांना दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त, कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली तर, तुमच्या कुटुंबात असहयोग कायम राहील. या काळात कुणी ही व्यक्तीला उधार देऊ नका.
आम्हाला अपेक्षा आहे की, आम्हाला या लेख च्या माध्यमाने महत्वपूर्ण माहिती आणि नेहमी प्रमाणे तुम्हाला स्नेह मिळत राहील. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!