होलिका दहन 2022 - Holika Dahan 2022 In Marathi
होळी म्हणजे हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा आणि रंगीन सण. होळी बद्दल अशी श्रद्धा आहे की, या दिवशी लोक आपल्या शत्रूंना रंग लावून त्यांना मिठी मारतात आणि त्यांच्याशी नवीन नाते संबंध सुरू करतात. हा नक्कीच खूप सुंदर आणि रंगतदार सण आहे.
होळीचा सण लवकरच येत आहे. अशा परिस्थितीत आज या ब्लॉग स्पेशल होळीमध्ये आपण होळीच्या दिवशी कोणती कामे केली पाहिजेत आणि चुकून ही कोणती कामे करू नये व का? या विषयी सांगणार आहोत. तसेच, या वर्षी होळी आणि होलिका दहन हा शुभ संयोग आहे की, नाही हे तुम्हाला कळेल. या शिवाय जीवनातील सर्व यश आणि आर्थिक समृद्धीसाठी होळीच्या दिवशी कराव्या लागणाऱ्या उपायांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात आहे.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
होळी 2022 - होलिका दहन 2022
या वेळी होलिका दहन 17 मार्च ला येत आहे आणि होळीचा सण 18 मार्च ला साजरा केला जाईल. येथे या गोष्टीला ही जाणून घेण्याची खूप इच्छा आहे की, होळीच्या 8 दिवस आधी म्हणजे 10 मार्च पासून होलाष्टक लागेल. होलाष्टकाच्या वेळी कुठल्या ही प्रकारचे शुभ काम करण्यास मनाई असते.
17 मार्च ला रात्री 12 वाजून 57 मिनिटांनंतर होलिका दहनाचा योग बनत आहे. या आधी पृथ्वी लोक वर भद्रा आहे. माहितीसाठी सांगतो की, भद्रा मध्ये होलिका दहन होऊ शकत नाही. या वर्षी होलिका दहन आणि धूलिवंदन एकाच तारखेला साजरा केला जाईल. या आधी 2003, वर्ष 2010, 2016 मध्ये ही अश्या संधी आल्या होत्या आणि आता 2022 मध्ये ही या प्रकारचा संयोग बनत आहे.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर
होलिका दहन मुहूर्त
होलिका दहन मुहूर्त: 21:20:55 पासून 22:31:09 पर्यंत
अवधी: 1 तास 10 मिनिटे
भद्रा पुँछा: 21:20:55 पासून 22:31:09 पर्यंत
भद्रा मुखा: 22:31:09 पासून 00:28:13 पर्यंत
होळी 18, मार्च ला
माहिती: येथे दिलेला मुहूर्त नवी दिल्ली साठी मान्य आहे. आपल्या शहराच्या अनुसार शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
होळी ला हनुमान पूजेचे महत्व
होळीच्या या सुंदर सणाबद्दल अशी श्रद्धा आहे की या दिवशी हनुमानाची पूजा करणे विशेष फलदायी ठरते. या दिवशी भगवान बजरंगबली ची पूजा योग्य पद्धतीने व नियमाने केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते.
या विधी ने करा होळीच्या दिवशी हनुमान पूजा
- होलिका दहनाच्या रात्री हनुमानाची पूजा करण्याचा नियम सांगितला आहे. अशा स्थितीत पूजेपूर्वी आंघोळ करून घरातील हनुमानाच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसून त्यांची पूजा करावी आणि मंत्राचा जप करावा.
- पूजेत हनुमानाला सिंदूर, चमेलीचे तेल, फुलांचा हार, प्रसाद आणि बजरंगबलीला चोला अर्पण करा.
- पूजेत हनुमानाच्या समोर तुपाचा दिवा लावा.
- पूजेनंतर हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पाठ करा.
- पूजेच्या शेवटी हनुमानाची पूजा करावी.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
होळीच्या दिवशी काय करावे - काय करू नये
- होळीच्या दिवशी, आपले घर स्वच्छ ठेवा आणि या दिवशी भगवान विष्णूची पूजा करा.
- घरी जे काही पक्वान्न तयार केले जातात ते देवाला अर्पण करावे.
- या दिवशी आपल्या खिश्यात काळ्या कपड्यात बांधून पिवळी सरसो, लवंग, जायफळ आणि काळे तीळ ठेवा. त्या नंतर होलिका दहनाच्या वेळी याला होळी मध्ये टाका.
- होळीच्या दिवशी प्रसन्न मानाने या दिवशी तयारी करा. सर्वांचा सन्मान करा.
- होलिकेची राख आपल्या घरात नक्की आणा आणि याला घरातील चार ही कोपऱ्यात टाका. म्हणतात, हा उपाय केल्याने घरातील वस्तू दोष दूर होतो.
- होलिका दहनाची राख घरात आणून आपल्या तिजोरी मध्ये नक्की ठेवा. म्हणतात की, असे केल्याने जीवनात कधीच धन ची कमी चा सामना करावा लागत नाही.
कोणती कामे या दिवशी चुकून ही करू नये:
- होलिका दहनाच्या दिवशी सफेद वस्तूंपासून दूर राहा. शक्य असल्यास या दिवशी आपल्या डोक्याला झाकून ठेवा.
- सूर्यास्ता नंतर होळी खेळू नये. असे करणे शुभ नसते असे म्हणतात.
- या दिवशी मांस, मदिरा चे सेवन करू नका.
- कोणत्या ही नवविवाहित स्त्री ने होलिका दहन पाहू नये. या शिवाय सासू आणि सून यांनी चुकून ही होलिका दहन एकत्र पाहू नये. होलिका दहन सासू आणि सून एकत्र पाहिल्यास जीवनात अडचणी निर्माण होतात, असे म्हटले जाते.
- होळीच्या दिवशी कुणाला पैसे देऊ नका आणि कुणाकडून पैसे घेऊ नका. नाहीतर, माता लक्ष्मी रागावते.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
होळी च्या दिवशी हे उपाय देतील आर्थिक संपन्नता आणि प्रत्येक कामात यश
- होळीच्या आधी कोणत्याही शनिवारी हठ जोडी खरेदी करा. तंत्र शास्त्रात हठ जोडीला खूप महत्त्व दिले जाते आणि ते धोतरा वृक्षासारखे दिसते. ते विकत घ्या आणि स्वच्छ लाल कपड्यात बांधा आणि जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने संपत्ती वाढते असे म्हणतात.
- होळीच्या आसपास किंवा होळीच्या दिवशी जर तुम्ही श्री यंत्र खरेदी करून ते तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात ठेवले तर, त्यामुळे धन आणि वैभव ही प्राप्त होते. श्री यंत्रा विषयी असे सांगितले जाते की, देवी लक्ष्मी सोबत 33 कोटी दैवी शक्ती वास करते.
- या व्यतिरिक्त, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर, तुम्ही मोती शंख देखील खरेदी करू शकतात. मोत्याचा शंख खरेदी केल्यानंतर तो घरातील स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावा. असे केल्याने आर्थिक समस्या तर दूर होतातच शिवाय आरोग्याशी संबंधित समस्यांपासून ही सुटका मिळते.
- एकाक्षी नारळ, हे नारळ अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. असे म्हणतात की, ज्या घरात एकच नारळाची पूजा केली जाते, तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. असे घर नकारात्मकता दूर करते आणि सोबतच संपत्ती कायम राहते.
- पिवळ्या कौड्या खरेदी करून याला एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून घ्या. या नंतर याला आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. म्हणतात की, हा उपाय जर होळीच्या आसपास किंवा होळीच्या दिवशी केला तर, यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते.
- पांढर्या आकचे मूळ ज्योतिषांच्या मते अतिशय शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरात पैसे ठेवलेल्या ठिकाणी त्याची स्थापना केली तर, ते घराला आशीर्वाद देते आणि घरातील सर्व लोक निरोगी आणि आनंदी जीवन जगतात.
- जर तुम्ही खूप पैसे कमावले पण ते वाचवण्यात अपयशी ठरले तर, गोमती चक्र पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा आणि जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुमच्या आयुष्यात पैसा येईल आणि टिकेल.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!