माघ पौर्णिमा 2022 - Magh Purnima 2022 (16 फेब्रुवारी, 2022)
माघ चा महिना हिंदू कॅलेंडर चा एक खूप पावन आणि शुभ फळदायी महिना म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णू ला खूप प्रिय असतो. या महिन्यात बरेच व्रत आणि सण इत्यादी ही केले जातात. माघ महिन्यात पडणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथी ला ही खूप खास स्थान दिले आहे. लवकरच माघ पौर्णिमा 2022 ही येणार आहे.
तुमच्या या खास ब्लॉग मध्ये जाणून घ्या, काय आहे माघ पौर्णिमेचे महत्त्व? हिंदू धर्मात वर्षभर साजऱ्या होणार्या सर्व पौर्णिमेच्या तारखा अतिशय खास आणि महत्त्वाच्या मानल्या जातात. या दिवशी केलेले स्नान, दान आणि जप पुण्यकारक आहे. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, माघ पौर्णिमेच्या दिवशी माघ स्नान केले जाते, याला ही विशेष महत्त्व दिले जाते. माघ महिन्यातील स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि माघ पौर्णिमेपर्यंत चालते.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
भगवान विष्णूचा आशीर्वाद आणि त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी सदैव राहावी या साठी अनेक जण या दिवशी व्रत ठेवतात. पौर्णिमा तिथी हिंदू महिन्याची समाप्ती दर्शवते आणि या दिवशी महत्त्वाचे सण, विधी किंवा शुभ प्रसंग साजरे केले जातात.
2022 मध्ये माघ पौर्णिमेची तिथी आणि शुभ मुहूर्त
तिथी: 16 फेब्रुवारी, 2022 (बुधवार)
शुभ मुहूर्त:
फेब्रुवारी 15, 2022 ला 21:45:34 पासून पौर्णिमा आरंभ
फेब्रुवारी 16, 2022 ला 22:28:46 ला पौर्णिमा समाप्त
नोट: वरती दिले गेलेले मुहूर्त नवीन दिल्ली साठी मान्य आहे. आपल्या शहराच्या अनुसार, शुभ मुहूर्त जाणून घ्यायचे असेल तर, येथे क्लिक करा.
पुढे पाहूया आणि जाणून घेऊया या वर्षी माघ पौर्णिमा तुमच्या जीवनाला कशी उत्तम करेल?
माघ पोर्णिमेवर विशेष संयोग
यंदा माघ पौर्णिमा 16 फेब्रुवारीला येत असून या सोबतच माघ महिना संपणार आहे. या शिवाय यंदाची माघ पौर्णिमा ही अनेक अर्थांनी शुभ ठरणार आहे कारण, या काळात व्यवसायात वाढ होण्याचे तसेच लोकांच्या मनातील भीती दूर होण्याचे योग प्रकर्षाने तयार होताना दिसत आहेत. माघ पौर्णिमेला चंद्र सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात असेल. विवाहासाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो.
या शिवाय ब्रह्मवैवर्त पुराणानुसार भगवान विष्णू या वेळी गंगेच्या पाण्यात वास करतात असे मानले जाते.
या वेळी माघ पौर्णिमा बुधवारी येत आहे. या दरम्यान चंद्र मघा नक्षत्रात असेल आणि सूर्य कुंभ राशीत धनिष्टा नक्षत्रात असेल. या शिवाय चंद्रावर सूर्य आणि गुरूची पूर्ण दृष्टी असेल. सूर्य धनिष्ठा नक्षत्रात असेल आणि चंद्रावर पूर्ण नजर ठेवेल, अशा स्थितीत ग्रह-नक्षत्रांच्या या स्थितीमुळे अतिशय शुभ संयोग निर्माण होत आहे. परिणामी,
- व्यवसायात वृद्धी पहायला मिळेल.
- लोकांमध्ये भीती आणि तणाव कमी होईल.
माघ पौर्णिमा 2022 (Magh Purnima 2022)
हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिना हा अकरावा महिना आहे. दरवर्षी 12 पौर्णिमा तिथी असतात म्हणजेच, एका महिन्यात एक पौर्णिमा तिथी. मात्र, सनातन धर्मात माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. माघ महिन्यात येत असल्याने तिला 'माघी पौर्णिमा' असे नाव पडले आहे. माघ महिन्याला पूर्वी माघ महिना म्हणत. आम्ही तुम्हाला सांगतो की मध हा शब्द माधव, भगवान श्री कृष्णाच्या रूपाशी संबंधित आहे असे मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान, दान, पूजा यांना विशेष महत्त्व दिले जाते.
या दिवशी चंद्र देवतेची पूजा करण्याचा नियम ही सांगितला आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, हा महिना आपल्या जीवनात सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी दान करण्यासाठी सर्वात शुभ आणि फलदायी आहे. या दिवशी बरेच लोक पूजा करतात आणि बरेच लोक उपवास देखील करतात. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचा नियम सांगितला आहे.
अनेक ठिकाणी महिनाभर चालणाऱ्या माघ महिन्यात कुंभमेळ्याचे ही आयोजन केले जाते. पौर्णिमेच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
असे मानले जाते की, माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीला देवता स्वतः पृथ्वीवर अवतरतात आणि पवित्र गंगा नदीत स्नान करतात. त्यामुळे या दिवशी प्रयागराजमध्ये गंगा नदीत स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमतात. या दिवसांत नदीत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो.
हिंदू पौराणिक कथेनुसार माघ पौर्णिमा हा विविध आध्यात्मिक आणि धार्मिक कार्ये आणि संस्कार करण्यासाठी पवित्र दिवस मानला जातो. या वेळी, लोकप्रिय 'माघ मेळा' आणि 'कुंभमेळा' आयोजित केला जातो ज्यात देशभरातून लाखो भाविक सहभागी होतात. या शिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी तामिळनाडूच्या अनेक भागात फ्लोट फेस्टिव्हलचे आयोजन ही केले जाते.
माघ पौर्णिमेचे महत्व
माघ पौर्णिमेचे नाव ‘माघ नक्षत्र' या वरून पडले आहे. या पवित्र दिवशी हिंदू देवी-देवता पृथ्वीवर अवतरतात आणि मानव रूपात स्नान, दान आणि पूजा, पठण इत्यादी करतात, असे म्हणतात. त्या मुळेच या दिवशी गंगेत स्नानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने मनुष्याला या जन्मी तसेच मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी पौष नक्षत्र असेल तर, शास्त्रानुसार या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते.
माघ पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ आहे. या दिवशी दान धर्म केल्याने वर्तमान आणि भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि हनुमान यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की जो व्यक्ती या दिवसाची नि:स्वार्थ भावनेने आणि भक्ती भावाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात.
माघ पौर्णिमा ही 'महा माघी' आणि 'माघी पौर्णिमा' म्हणून ही ओळखली जाते आणि ती देशभरात साजरी केली जाते.
माघ पौर्णिमा योग्य पूजन विधी
माघ पौर्णिमेचा दिवस तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. चला तर, मग जाणून घेऊया या दिवसाची योग्य उपासना पद्धत कोणती आहे, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनावर या दिवसाच्या फळांचा प्रभाव वाढवू शकता.
- या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. मात्र, सध्या तरी कोरोनाची सावली कायम असल्याने, अशा परिस्थितीत आपण नदीत स्नान करण्याच्या विषयाला चालना देत नाही. या दरम्यान आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळून त्यात स्नान करावे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- स्नान केल्यानंतर 'ओम नमो नारायण' या मंत्राचा जप करून सूर्य देवाला अर्घ्य द्यावे. या विशेष दिवशी सूर्याला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ घालावे.
- भगवान नारायणाची पूजा करा.
- या दिवसाच्या पूजेमध्ये चरणामृत, पान, तीळ, मोळी, रोळी, कुंकू, फळे, फुले, पंचगव्य, सुपारी, दुर्वा आणि इतर वस्तूंचा समावेश करावा. या दिवसाची पूजा आरती करून पूर्ण करा.
- जर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल तर, या दिवशी फळे खाऊन उपवास करा.
- या दिवशी आरती केल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार गरजू आणि ब्राह्मणांना दान द्या.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
माघ पौर्णिमा 2022: या दिवशी केले जाणारे महत्वाचे अनुष्ठान
- माघ पौर्णिमेशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या विधी नुसार या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे असे सांगितले जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे.
- या दिवशी पवित्र स्नान केल्यानंतर, आपण भगवान विष्णू, भगवान हनुमान आणि आपल्या इष्ट देवतेचे पूजन केले पाहिजे.
- या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि भगवान सत्यनारायणाच्या नावाने उपवास केला जातो. या दिवशी उपवास करणार्यांनी सत्यनारायण कथा अवश्य ऐकावी. या दिवशी देवाला विविध प्रकारचे भोग अर्पण करावेत. या दिवसाच्या पूजेमध्ये विष्णूला फळे, सुपारी, केळीची पाने, रोळी, मोळी, अगरबत्ती, चंदनाचे तिलक अर्पण करावे. या शिवाय देशातील विविध सत्यनारायण मंदिरांमध्ये ही या दिवशी भव्य कार्यक्रम केले जातात.
- संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा देखील या दिवसातील एक महत्त्वाचा विधी आहे.
- या दिवशी भगवद्गीता आणि रामायण पठण करणे देखील खूप शुभ मानले जाते.
- माघ पौर्णिमेच्या दिवशी लोक आपापल्या यथा शक्तीनुसार, गरजू लोकांसाठी दान-पुण्य करतात, त्यांना अन्नदान करतात, कपडे दान करतात, गरजूंना पैसे देतात आणि इतर गरजा पुरवतात. माघ महिन्यात तीळ दान करणे अत्यंत फळदायी मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी ही तिळाचे दान करावे.
माघ महिन्यात कल्पवासाचे महत्व
दरवर्षी माघ महिन्यात तीर्थराज प्रयाग येथे माघ मेळा आयोजित केला जातो ज्याला कल्पवास असे ही म्हणतात. त्यात देश-विदेशातील भाविक सहभागी होतात. प्रयाग मध्ये केलेल्या या कल्पवासाची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून कल्पवासाची सांगता केली जाते, असे म्हणतात.
माघ महिन्यातील कल्पवासाचे महत्त्व सांगितले आहे. माघ महिन्यात प्रयाग येथे संगमाच्या तीरावर राहणाऱ्या यात्रेला ‘कल्पवास’ म्हणतात. या शब्दाचा अर्थ शोधायला गेलो तर, संगमाच्या तीरावर राहून वेद-ग्रंथांचे अध्ययन व मनन करणे असा होतो. अशा परिस्थितीत कल्पवासात अहिंसा, संयम आणि भक्तीचा संकल्प केला जातो.
माघ महिन्यात भगवान विष्णूची पूजा करणे विशेष शुभ आहे. या महिन्यात कल्पवास संपला आहे. महा-भारताच्या संघर्षात वीरगती प्राप्त झालेल्या आपल्या कुटुंबाला मोक्ष मिळावा म्हणून, युधिष्ठिराने माघ महिन्यात कल्पवास केला होता. 16 फेब्रुवारी 2022 रोजी माघ महिना संपेल.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
कल्पवासाने जोडलेले काही महत्वपूर्ण नियम
- कल्पवासात लोक दिवसातून एकाच वेळी भोजन करतात. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती कल्पवासाचे वचन घेतो आणि त्याचे नियमित पालन करतो, त्याला पुढील जन्मात राजा जन्म मिळतो असे मानले जाते. सध्याचा काळ बघितला तर, उच्च पदाची प्राप्ती ही दिसून येते.
- कल्पवासात माणसाला संगमाच्या काठावर झोपडी बांधून राहावे लागते आणि या काळात कुटुंबापासून दूर राहावे लागते.
- कल्पवासात दिवसातून तीन वेळा गंगेचे स्नान आणि पूजा करण्याचा नियम सांगितला आहे.
- या दरम्यान फक्त सात्विक भोजन केले जाते आणि जमिनीवर झोपले जाते.
- कल्पवासात आपल्या सर्व वाईट सवयी सोडणे फार महत्वाचे आहे. या काळात धूम्रपान, मद्यपान, तंबाखूचे सेवन करण्यास मनाई आहे तसेच, या काळात खोटे आणि अपशब्द बोलू नयेत.
- कल्पवासात अनेक लोक आपल्या झोपडीत तुळशीचे रोप लावतात आणि त्याची नियमित पूजा करतात.
- कल्पवासाच्या शेवटी भगवान सत्यनारायण यांची पूजा केली जाते आणि पूजेनंतर आपल्या क्षमतेनुसार दान केल्यावरच कल्प पूर्ण होतात.
माघ पौर्णिमेला राशी अनुसार हे उपाय वर्षभर चमकावेल भाग्य
- मेष राशि: आपल्या जीवनात आर्थिक समृद्धी आणि सुख-शांतीसाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराच्या मंगलनाथ रूपाचे दर्शन घ्या आणि शक्य असल्यास त्यांचा अभिषेक करा. या शिवाय या दिवशी शिवलिंगाला मसूरची दाळ अर्पण करा.
- वृषभ राशि: वृषभ राशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. या शिवाय पिंपळाच्या झाडाला गोड दूध अर्पण करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पाच दिवे लावा.
- मिथुन राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी मिथुन राशीचे जातक अंघोळीच्या पाण्यात दुर्वा टाकून स्नान करतात तसेच, भगवान लक्ष्मी नारायणाला खीर अर्पण करतात. पूजेनंतर हा प्रसाद ७ मुलींमध्ये वाटून घ्या. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील.
- कर्क राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी कच्च्या दुधात मध टाकून भगवान शंकराच्या चंद्रशेखर रूपाचे ध्यान करून अभिषेक केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी गरिबांना फळांचे दान करा.
- सिंह राशि: सिंह राशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी पाण्यात लाल फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. या शिवाय या दिवशी गरिबांना दान करा आणि त्यांना भोजन द्या.
- कन्या राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी मखाण्याची खीर करून 7 मुलींना प्रसाद म्हणून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतील आणि तुमचे नशीब उजळेल. या शिवाय श्री गणेशाच्या मंत्रांचा उच्चार करताना हवन करावे.
- तुळ राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी तुळ राशीच्या जातकांनी पांढर्या कपड्यात दीड किलो तांदूळ बांधून एखाद्या गरीबाला दीड पाव तूप अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जाल.
- वृश्चिक राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमान मंदिरात मसूर, लाल चंदन आणि गूळ दान केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. शक्य असल्यास तांबड्या रंगाच्या बैलाला या दिवशी चारा द्यावा.
- धनु राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी श्रीमद भागवत गीता ग्रंथाच्या 11 किंवा 21 प्रतींचे वाटप करावे. या सोबत, भगवान विष्णूला पिवळ्या फुलांनी सजवा आणि त्यांना पिवळी मिठाई अर्पण करा.
- मकर राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी मोहरी किंवा तिळाचे तेल दान केले तर ते तुमच्यासाठी उत्तम राहील. या शिवाय गरीब आणि गरजू लोकांना या दिवशी अन्नदान केले पाहिजे.
- कुंभ राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी हनुमान मंदिरात मंदिराच्या शिखरावर लाल कापडाचा ध्वज लावला तर, तुम्हाला प्रत्येक कामात विजय मिळेल. यामुळे तुमच्या प्रत्येक कामात विजय मिळेल आणि तुमच्या शत्रूचा नाश होईल आणि तुमची आर्थिक संकटातून सुटका होईल.
- मीन राशि: माघ पौर्णिमेच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी गरीब लोकांना पिवळे फळ दान करावे. या शिवाय केळीच्या झाडाची पूजा करावी. असे केल्याने सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!