व्हॅलेंटाईन डे 2022 - Valentine Day Special: Numerology in Marathi
वसंत ऋतू चालू आहे आणि हा ऋतू फुलांच्या सुगंधाने आणि वातावरणाच्या सौंदर्याचा ओळखला जातो. हा तो काळ असतो जेव्हा प्रत्येक बाजूला प्रेमाचा सुगंध आणि आनंद असतो. फेब्रुवारी महिना प्रेमाला समर्पित आहे. या महिन्याची सुरुवात फुलांच्या सुगंधाने किंवा रोझ डे 2022 ने होते आणि त्या नंतर हा संपूर्ण आठवडा प्रेमाच्या सुंदर रंगात बुडून वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
काही जण गुलाब पुष्प देऊन प्रेम व्यक्त करतात तर, काही जण या दिवशी चॉकलेटचा गोडवा देऊन प्रियकराला खुश करतात. तर कधी कधी लोक आपल्या प्रिय व्यक्तींना सुंदर भेटवस्तू देऊन आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि मग येतो व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस, जो आजच्या काळात जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
व्हॅलेंटाईन डे च्या या प्रेमळ दिवसाचा अधिक संबंध त्याला लाल रंगाशी जोडतांना दिसतो. अशा स्थितीत या दिवशी जिकडे पाहावे तिकडे लाल रंगाची सजावट, लाल रंगाचे फुगे, लाल कपडे घातलेले लोक ही दिसतात. या दिवशी लोक प्रत्येक प्रकारे प्रेमात बुडून जातात आणि आपले प्रेम आपल्या प्रियकर, जोडीदार समोर व्यक्त करतात.
चला तर, मग आपल्या व्यस्त शेड्युल पासून काही वेळ काढून आपण या प्रेमाच्या सागरात फिरून आणि जाणून घेऊया की, आपला मूलांक या व्हेलेंटाईन डे च्या बाबतीत काय म्हणतो.
मूलांक 1
मूलांक 1 च्या लोकांसाठी, हा व्हॅलेंटाईन डे त्यांच्यासाठी सर्वोत्तम व्हॅलेंटाईन डे असेल असे सिद्ध होणार नाही. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल, त्यामुळे तुमच्या हृदयात आणि मनात थोडी चिडचिड आणि दडपण असेल. यामुळे तुम्ही तुमच्या खास दिवसाचे नियोजन करू शकणार नाही. या व्यतिरिक्त, हे शक्य आहे की, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून योग्य सहकार्य आणि समर्थन मिळू शकत नाही. यामुळे तुमच्या नात्यात काही भांडण आणि वाद होण्याची शक्यता आहे. तथापि, दिवस संपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही तरी खास करण्याचा प्रयत्न कराल.
विशेष रंग: कोणत्या ही प्रकारचे वाद-विवाद टाळण्यासाठी या दिवशी शांततेचा रंग म्हणजे पांढरा रंग परिधान करावा.
विशेष गिफ्ट: तुमच्या जोडीदाराचा आनंदी करण्यासाठी, ताज्या गुलाबांचा पुष्प गुच्छ तुमच्यासाठी एक अद्भुत भेट ठरू शकतो.
मूलांक 2
मूलांक 2 चे जातक या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्यांच्या नात्यात काही ताजेपणा आणण्याची अपेक्षा करू शकतात. जर तुम्ही कोणत्या ही प्रकारच्या तणावातून किंवा त्रासदायक परिस्थितीतून जात असाल तर, थांबून जा कारण, या काळात तुमचा पार्टनर तुमच्या सोबत हा दिवस घालवण्यासाठी काही खास योजना करू शकतो. या व्हॅलेंटाईन डे दरम्यान तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जर तुमचे नाते सामान्यपणे चालत असेल तर, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक सुंदर संध्याकाळ घालवणार असल्याने तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि जवळीकता दिसून येईल.
विशेष रंग: गुलाबी रंग धारण केल्याने तुमच्या सभोवतालच्या प्रेमाचे सौंदर्य अनेक पटींनी वाढेल.
विशेष गिफ्ट: या व्हॅलेंटाईन डे, तुम्ही तुमच्या जोडीदाराला कस्टमाइझ कप भेट देऊ शकतात.
मूलांक 3
मूलांक 3 च्या जातकांसाठी आजचा दिवस गोंधळात टाकणारा ठरेल. या दिवशी, आपल्या प्रिय व्यक्तीच्या शब्दांकडे पूर्ण लक्ष देऊन, आपण त्यांचा विश्वास आणि समज मिळविण्याचा प्रयत्न कराल. तथापि, कोणत्या ही फंक्शनला किंवा सणाला जाण्याचे नियोजन करताना तुमचे तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. पण या वर्षी प्रेमाच्या या सुंदर दिवसाचा पुरेपूर आनंद लुटण्यासाठी, तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या इच्छा आणि शब्दांपुढे नतमस्तक व्हावे लागेल म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांच्या योजनांचे डोळसपणे पालन करा.
विशेष रंग: या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने तुमचे प्रेम दृढ होईल.
विशेष गिफ्ट: या वर्षी चांदीची एखादी वस्तू तुमच्यासाठी उत्तम भेटवस्तू ठरू शकते.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
मूलांक 4
मूलांक 4 च्या जातकांसाठी हा दिवस खूप छान असणार आहे. या दिवशी तुमचा पार्टनर तुमच्यावर भेट वस्तूंचा वर्षाव करणार आहे. या दिवसभर तुमच्यावर प्रेम आणि रोमान्सचा वर्षाव होत राहील. तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्यासाठी तुम्ही एखाद्या खास ठिकाणी जाण्याचा विचार करू शकतात. या काळात तुमच्या नात्यातील रोमांस आणि आत्मीयता चांगली असणार आहे एकूणच, या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही स्वत:ला सातव्या असमान वर स्वतःला अनुभवाल.
विशेष रंग: हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही बेज आणि तपकिरी रंगाचा पर्याय निवडू शकता. हे रंग तुमच्यासाठी शुभ ठरतील.
विशेष गिफ्ट: या दिवशी, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादी वस्तू भेट दिली जी तुमच्यासाठी खूप खास असेल तर, ती तुमच्या जोडीदारासाठी सर्वोत्तम भेट ठरेल.
मूलांक 5
मूलांक 5 च्या जातकांसाठी हा दिवस अतिशय संतुलित असणार आहे. तुमची कामाची बांधिलकी असून ही, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत हा खास दिवस घालवू शकाल. तुमचा दिवस तुमच्या जोडीदारासोबत चांगला घालवण्याची योजना कराल. तुम्ही तुमच्या मित्र आणि प्रियजनांसोबत या दिवसाचा आनंद घेऊ शकता. या शिवाय, जर तुम्ही अजून तुमच्या जोडीदाराला तुमच्या मित्रांसोबत भेटवले नसेल तर, या व्हॅलेंटाइन डे ला तुम्ही पुढाकार घेऊ शकतात.
विशेष रंग: हिरवा रंग तुमच्या उर्जेशी सुसंगत असेल आणि तुमच्या प्रेमात सुसंवाद आणेल.
विशेष गिफ्ट: या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला फोन, अलेक्सा इत्यादी सारखे कोणते ही इलेक्ट्रॉनिक उपकरण/गॅझेट भेट देऊ शकतात.
मूलांक 6
मूलांक 6 च्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आणि सुंदर असणार आहे. या दिवशी सकाळ पासून दिवस अखेर पर्यंत तुम्हाला भरपूर सरप्राईज मिळतील. तुम्हाला वाटेल की, तुमच्यासाठीचा हा प्रेमाचा दिवस कधीच संपणार नाही कारण, या दिवशी तुम्ही खूप उत्साही होणार आहात. हा व्हॅलेंटाईन डे मूलांक 6 च्या अविवाहित लोकांसाठी अधिक शुभ असू शकतो कारण, तुम्ही नाते संबंधात येऊ शकता. जे आधीच रिलेशनशिप मध्ये आहेत ते त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याची योजना करू शकतात. या दिवशी तुमचे प्रेम आणि उत्साह शिगेला असेल आणि तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत उबदार क्षण शेअर कराल.
विशेष रंग: या दिवशी तुमच्या उर्जेशी जुळणारा रंग लाल असू शकतो. हे तुमच्या मध्ये रोमांस आणि उर्जा वाढवेल.
विशेष गिफ्ट: तुम्ही तुमच्या जोडीदाराला कपल पिच्चर किंवा तुमच्या फोटो चा कोलाज भेट देऊ शकतात.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
मूलांक 7
मूलांक 7 च्या जातकांसाठी हा दिवस सरासरीचा असणार आहे. या दिवशी तुम्ही रिफ्लेक्शन मोड मध्ये असाल आणि तुमच्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवणार नाही. या दिवशी तुम्ही आरामदायक स्थितीत असाल आणि संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत कॅज्युअल डिनर डेट वर जाऊ शकता. हे शक्य आहे की, या काळात तुम्हाला तुमच्या नात्यात रोमांस आणि घनिष्ठतेची कमतरता जाणवेल. तुम्हाला या दिवसासाठी स्वतःला तयार करण्याचा आणि तुमच्या जोडीदाराच्या व्हॅलेंटाईन डे प्लॅन मध्ये जास्तीत जास्त भाग घेण्याचा सल्ला देण्यात येतो. अन्यथा, तो तुमच्या सैल वृत्तीमुळे नाखूष आणि नाराज होऊ शकतो.
विशेष रंग:या दिवशी केशरी रंग धारण केल्याने तुमचा उत्साह वाढेल.
विशेष गिफ्ट: या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकराला लाल रंगाचे कपडे भेट देऊ शकता. यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम वाढेल.
मूलांक 8
मूलांक 8 च्या जातकांसाठी हा दिवस आनंदाचा असणार आहे. दिवसाच्या सुरुवाती पासूनच गोष्टी तुमच्या बाजूने दिसतील. या दिवशी तुमचा पार्टनर तुमच्यासाठी अशी काही सरप्राईज प्लॅन करेल जे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल. या मूलांकाचे अविवाहित लोक देखील या व्हॅलेंटाईन डे ला त्यांच्या क्रश सोबत डेट वर जाऊ शकतात कारण, तुमचे संयम पाहून तुमच्या क्रशवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या गोष्टींना अधिक मोकळेपणाने प्रतिसाद देण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने या दिवसाचे महत्त्व वाढेल आणि तुमच्या नात्यात प्रेम वाढेल.
विशेष रंग: या दिवशी पेस्टल रंगाचे कपडे परिधान केल्याने तुमचे व्यक्तिमत्व वाढेल आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंद मिळेल.
विशेष गिफ्ट: या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक सुंदर घड्याळ भेट देऊ शकता. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल.
मूलांक 9
मूलांक 9 च्या जातकांसाठी हा दिवस भावनिक असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या सोबत अविस्मरणीय क्षण शेअर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कराल. आपण या दिवशी आपल्या प्रियकरासाठी एक मोठे सरप्राईझ आयोजित करू शकता, ज्यामुळे त्याला खूप आनंद होईल. या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत मोकळेपणाने पार्टी कराल आणि तुम्ही छोट्या ट्रिप ला ही जाऊ शकतात एकूणच, या काळात तुमच्या नात्यातील जवळीक आणि रोमांस वाढणार आहे.
विशेष रंग: या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी योग्य संतुलन सिद्ध होईल.
विशेष गिफ्ट: या दिवशी तुम्ही तुमचा रूम सजवून तुमच्या जोडीदाराला खुश करू शकता किंवा चॉकलेट किंवा कोणती ही छोटी भेटवस्तू देऊन तुमच्या जोडीदाराला देऊन सरप्राईझ करू शकतात.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!