व्हेलेंटाईन डे शुभ योग - Valentine's Day Shubh Yoga’s Marathi
यंदाचा व्हॅलेंटाईन डे खूप खास असणार आहे. यावेळी 14 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला ग्रहांचे काही खास संयोग बनवले जात आहेत, ज्याचा तुमच्या प्रेम जीवनावर अनेक प्रकारे परिणाम होईल. प्रेमळ जोडपे किंवा प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तींसाठी व्हॅलेंटाइन डेला प्रत्येक बाबतीत विशेष महत्त्व आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला कोणते ही शुभ कार्य सुरू करायचे असेल तर, 14 फेब्रुवारीला सुरुवात करणे तुमच्यासाठी शुभ राहील. आमच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऑफरमध्ये, या ग्रहांच्या संयोगांचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या.
सर्वार्थ सिद्धि योग
या वेळी व्हॅलेंटाईन डे वर, सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, जो ज्योतिष शास्त्रात विशेष फलदायी आणि इच्छा पूर्ण करणारा मानला जातो. या वेळी हा योग 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:53 वाजता सुरू होईल आणि 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. ठराविक नक्षत्रात विशिष्ट वाराच्या योगा-योगाने सर्वार्थ सिद्धी योग तयार होतो.
असे मानले जाते की, कोणते ही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी जातकांना शुक्र ग्रह, पंचक किंवा भद्रा इत्यादी पाहण्याची गरज नाही. या योगात सुरू केलेली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होऊन व्यक्तीला अपेक्षित परिणाम मिळतात. त्यामुळे सुरुवात करायची असल्यास कोणते ही नवीन काम किंवा तुमच्या प्रियसी सोबत तुम्हाला तुमच्या मनातले बोलायचे असेल तर, 14 फेब्रुवारीचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
रवि योग
ज्योतिष शास्त्रामध्ये सर्वार्थ सिद्धी व्यतिरिक्त रवि योगाचे देखील विशेष महत्व आहे आणि या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हे दोन्ही योग जातकांना शुभ फळ देतील. या वेळी हा योग 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:53 वाजता सुरू होईल आणि 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. असे मानले जाते की, रवि योग अनेक अशुभ योगांमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतो. रवि योगावर सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करणे शुभ, परिणामकारक आणि जातकांच्या मनोकामना पूर्ण करते.
एवढेच नाही तर, तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा राजा सूर्य जर कुपीत असेल किंवा दुर्बल स्थितीत बसला असेल तर, या योगात सूर्याला दिलेला अर्घ्य तुमच्या जीवनातील अशुभ प्रभाव कमी करतो. कोणत्या ही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी रवि योग खूप चांगला मानला जातो. जर तुम्हाला कार किंवा घरामध्ये गुंतवणूक करायची असेल तर, 14 फेब्रुवारीचा दिवस तुम्हाला रवि योगात सूर्य देवाची विशेष कृपा देईल. एखाद्याला प्रपोज करून नव्या आयुष्याची सुरुवात करायची असेल तर, या व्हॅलेंटाइनला न डगमगता पुढे जायला हवे.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
बुध चा उदय
4 फेब्रुवारी रोजी मकर राशीत बुध वाढला आहे. त्यामुळे कुठल्या तरी गैरसमजामुळे किंवा संवादाच्या अभावामुळे तणावाच्या स्थितीत असलेल्या रसिकांसाठी उदित बुध सर्व समस्यांवर उपाय घेऊन येतो. तणाव ग्रस्त प्रेमळ जोडपे एकमेकांशी मनमोकळे पणाने बोलू शकतील आणि ते त्यांच्या प्रेम संबंधात ताजेपणा, उत्साह टिकवून ठेवण्यास सक्षम असतील. ज्या लोकांचे प्रेम जीवन चांगले चालले नाही किंवा तुमचा प्रियकर/प्रियासी तुमच्यावर रागावला असेल, तर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला आनंद देईल आणि संवाद पुन्हा सुरू होईल.
बुध ग्रहाच्या उदयामुळे जातकांच्या प्रेम जीवनातील अडचणी दूर होतील. कन्या आणि मिथुन राशीच्या ज्या लोकांना प्रेम व्यक्त करण्यात संकोच वाटत असेल त्यांना बुध ग्रहाचे उदय होणे आत्मविश्वास प्रदान करेल.
शुक्र आणि मंगळाची अनोखी युती
14 फेब्रुवारी 2022 रोजी, शुक्र धनु राशीमध्ये मंगळा सोबत अतिशय विशेष संयोग करत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये प्रेमाची उत्कटता आणि महत्त्व वाढेल. या प्रकारचा संयोग तेव्हा होतो जेव्हा संक्रमण करणारे दोन ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ असतात. जर आपण कालपु रुष कुंडली बद्दल बोललो तर, नवव्या घरात शुक्र आणि मंगळाचा हा अनोखा संयोग प्रेम विवाहासाठी खूप चांगला योग आहे, त्यामुळे जे लोक आपल्या प्रियजनां सोबत लग्न करण्याचा बराच काळ प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
करा हे अचूक महा उपाय, प्रेम जीवनात राहील आनंदमय!
- शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि देवीला लाल फुले अर्पण करा, यामुळे तुमच्या प्रेम जीवनातील सर्व अडथळे दूर होतील.
- मनापासून प्रेमाला परिभाषित करणाऱ्या राधा-कृष्णाची पूजा करा.
- रोज क्वार्ट्ज पासून बनवलेल्या लव्ह बर्ड्सची जोडी तुमच्या बेडरूममध्ये ठेवल्यास तुमच्या आयुष्यात नेहमीच प्रेम राहील.
- तसेच, जीवनात प्रेम वाढवण्यासाठी तुम्ही गुलाब क्वार्ट्ज, स्टोन रिंग, ब्रेसलेट किंवा पेंडंट घालू शकतात.
- शुक्र बीज मंत्र "ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः" चा प्रतिदिन 108 वेळा जप करा.
पार्टनर ला चुकून ही देऊ नका हे गिफ्ट
या संपूर्ण आठवड्यात प्रेमी जोडप्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असेल. असे म्हटले जाते की, या आठवड्यात काही लोक खुल्या मनाने आपले प्रेम व्यक्त करतात तर, काही लोक या आठवड्यात नात्यातील अंतर दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. हा संपूर्ण आठवडा प्रेमी जोडप्यांसाठी आनंदाचा सण आहे आणि म्हणूनच हे दिवस प्रत्येक प्रकारे एकमेकांसाठी खास बनवायचे आहेत. अशा परिस्थितीत भेट वस्तू देऊन एकमेकांना खास वाटणे हे देखील प्रेमींना खूप प्रिय आहे. पण कधी कधी एखादी भेटवस्तू आनंदाच्या भेटीभेटीपेक्षा हानिकारक ठरते. काळे कपडे, धारदार वस्तू, रुमाल इत्यादी प्रियकर/ प्रियसी चुकून ही भेट देऊ नका.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!