अंक ज्योतिष - Numerology In Marathi (3 एप्रिल - 9 एप्रिल, 2022)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य ( 3 एप्रिल ते 9 एप्रिल, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमच्यासाठी सरासरी फलदायी ठरण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्ट्या पाहता, तुम्ही तुमच्या कामात मागे पडू शकतात, त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. दुसरीकडे, धन प्रवाह आर्थिक दृष्ट्या मध्यम असेल, तसेच तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत बचत करण्याची संधी थोडी कमी होईल. या आठवड्यात कोणती ही मोठी गुंतवणूक टाळणे चांगले राहील अन्यथा, तुमचे नुकसान देखील होऊ शकते.
या आठवड्यात तुमचे मित्र तुम्हाला काही अडथळे किंवा अडचणीत आणू शकतात. त्यामुळे तुमच्या मित्रांसोबत थोडी सावधगिरी बाळगा आणि जे काही काम कराल ते काळजीपूर्वक करा. या आठवड्यात, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या ट्रिप ला किंवा अनौपचारिक ट्रिप वर जाऊ शकतात असे संकेत आहेत.
आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील परंतु, तरी ही तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी योग, व्यायाम आणि ध्यान इत्यादी करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: सकाळी सूर्य देवाला अर्घ्य द्या.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या जातकांसाठी, या आठवड्यात कोणता ही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण, तुम्ही गोंधळून जाऊ शकतात आणि त्यामुळे चुकीचा निर्णय घेऊ शकतात ज्यामुळे तुमची करिअरची प्रगती मंदावू शकते. दुसरीकडे, आर्थिक दृष्ट्या धन प्रवाहात अडथळे येऊ शकतात तसेच, खर्च वाढू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल, जेणेकरून तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नाही.
सकारात्मक बाजूने, या आठवड्यात तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. या शिवाय, तुम्ही अध्यात्मिक कार्यात सक्रिय भाग घ्याल.
वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये वाद होऊ शकतात म्हणून, तुम्हाला शांत राहण्याचा आणि तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: सोमवारी देवी दुर्गेची पूजा करा.
आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील. कार्य क्षेत्रातील वातावरण चांगले आणि आरामदायक असेल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. सहकारी आणि वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील तसेच, तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल.
आर्थिकदृष्ट्या पैशाचा ओघ चांगला राहील. अशा प्रकारे धन बचत देखील शक्य होईल. वैयक्तिकरित्या, अध्यात्माकडे तुमचा कल तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणेल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील.
उपाय: नियमित 21 वेळा 'ॐ गुरुवे नमः' चा जप करा.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला काही समस्यांमधून जावे लागेल. त्यामुळे नंतर पश्चात्ताप होऊ नये म्हणून, खूप जास्त अपेक्षा न ठेवणे चांगले. व्यावसायिक दृष्ट्या पाहता, कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या कृतींची अत्यंत हुशारीने योजना करावी लागेल.
आर्थिकदृष्ट्या, या आठवड्यात धन प्रवाह फारसा चांगला नसण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि तुमच्या खर्चाचे योग्य नियोजन करा. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, उद्धटपणामुळे, जोडीदाराच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून, स्वतःला शांत ठेवणे आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणे चांगले.
उपाय: मंगळवारी दुर्गा यज्ञ करा.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
हा सप्ताह तुमच्या जीवनात समृद्धी आणि प्रगती घेऊन येणार आहे तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक दृष्ट्या पाहिल्यास, तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रगती कराल आणि इतरांसमोर आदर्श निर्माण कराल. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील, जी तुमच्यासाठी आनंदाची बाब असेल. या शिवाय या सप्ताहात परदेशात काम करण्याची संधी मिळण्याचे योग ही बनत आहेत.
आर्थिकदृष्ट्या पैशाचा ओघ खूप चांगला राहील. अशा प्रकारे तुम्ही धन ही वाचवू शकतात. दुसरीकडे, शेअर बाजार, स्टॉक मार्केट इत्यादी सट्टा बाजारांशी संबंधित लोकांना चांगला नफा कमावण्याची उत्तम शक्यता असते.
वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांचे संबंध त्यांच्या जोडीदाराशी सौहार्दपूर्ण राहतील. तुमच्या मध्ये प्रेम आणि स्नेह वाढेल. परस्पर समंजसपणा वाढेल. ज्यामुळे तुमचे जीवन अधिक आनंदी दिसेल.
उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ नमो नारायण' चा जप करा.
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
जर तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या पहात असाल तर, हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. या आठवड्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता आणि योग्यता सिद्ध करू शकाल तसेच, तुम्हाला तुमच्या पूर्वी केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. अशा परिस्थितीत, जर तुम्ही प्रमोशनसाठी पात्र असाल आणि त्याची वाट पाहत असाल तर, तुमची बढती होण्याची शक्यता जास्त आहे.
आर्थिक दृष्ट्या, धन प्रवाह चांगला राहील आणि बचतीला वाव ही अधिक असेल, याचा अर्थ तुम्ही आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हाल आणि भविष्यासाठी काही धन वाचवू शकाल.
जे प्रेम संबंधात आहेत ते कायमस्वरूपी नातेसंबंधात प्रवेश करू शकतात म्हणजेच, या आठवड्यात विवाह करू शकतात. एकूणच, या आठवड्यात तुम्हाला अनुकूल परिणाम दिसतील.
उपाय: नियमित 33 वेळा "ॐ शुक्राय नमः" चा जप करा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुमची अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. यासोबतच तुम्हाला आध्यात्मिक प्रवास करण्याचीही संधी मिळेल. या प्रवासातून तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल आणि मन:शांती मिळून तुम्ही तुमची सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल.
करिअरच्या दृष्टीने, हा आठवडा अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी समाधानकारक वातावरण राहील. नोकरीचा दबाव राहणार नाही. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. यामुळे तुमची प्रगती वेगवान होईल.
आर्थिक दृष्ट्या, बोलायचे झाले तर, धनाचा चांगला प्रवाह तुमचे जीवन समृद्ध करेल. दुसरीकडे, जर तुम्ही वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले असता, तुमचे तुमच्या जोडीदाराशी आणि प्रियजनांशी चांगले संबंध असतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
उपाय: नियमित 16 वेळा 'ॐ गं गणपतये नमः' चा जप करा.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 च्या जातकांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या पाहता, तुमच्यावर कामाचा जास्त दबाव असू शकतो आणि तुमच्या वेळापत्रकापेक्षा जास्त काम करावे लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या कामाचे योग्य नियोजन करावे लागेल आणि तुमच्या कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल.
आर्थिकदृष्ट्या, या आठवड्यात धन प्रवाहात अडथळे येऊ शकतात आणि तुमचा खर्च ही वाढू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला धन कमतरतेतून जावे लागू शकते, त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा.
जर तुम्ही वैवाहिक जीवन जगत असाल तर, या आठवड्यात तुमच्या जोडीदाराच्या संबंधात समस्या उद्भवू शकतात म्हणून, तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत थोडा वेळ घालवण्याचा आणि गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो.
आरोग्याच्या दृष्टीने, या आठवड्यात पाय दुखण्याची समस्या असू शकते. तसेच मानसिक तणावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि ध्यान वगैरे करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: शनिवारी विकलांग लोकांना दान-पुण्य करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
करिअरच्या दृष्टीने, हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामात समर्पित राहाल आणि तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तुमचे प्रयत्न तुम्हाला तुमची व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतील.
आर्थिक दृष्ट्या, हा आठवडा फायदेशीर ठरेल. तसेच धनाचा ओघ ही चांगला राहील. अशा परिस्थितीत, तुमचे भविष्य मजबूत करण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात.
उपाय: नियमित 27 वेळा 'ॐ भौमाय नमः' चा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!