अंक ज्योतिष - Numerology In Marathi (4 डिसेंबर - 10 डिसेंबर, 2022)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या जातकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक जातक त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या जातकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (4 डिसेंबर ते 10 डिसेंबर, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात मूलांक 1 चे जातक लांबच्या धार्मिक प्रवासाला जाऊ शकतात. यावेळी त्यांची आवड अध्यात्माकडे अधिक असेल, त्यामुळे या लोकांना होरा किंवा सत्यनारायण कथा यांसारखी धार्मिक कामे घरच्या घरी करता येतील परंतु, त्यांना वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण, त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
प्रेम जीवन- प्रेम जीवनाविषयी बोलायचे झाले तर, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत हँग आउट करण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच, जोडीदाराची पालकांशी ओळख करून देण्यासाठी वेळ चांगला आहे. विवाहित जातकांना त्यांच्या नात्यापासून अहंकार दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा, जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.
शिक्षण- या आठवड्यात ग्रुप स्टडी करणे किंवा ग्रुपमध्ये कोणता ही प्रोजेक्ट करणे मूलांक 1 च्या जातकांसाठी फायदेशीर ठरेल आणि यामुळे त्यांची नेतृत्व क्षमता ही सुधारेल. या विद्यार्थ्यांना या आठवड्यात अनेक गोष्टी एकत्र कराव्या लागतील. अशा परिस्थितीत, तुम्हाला सल्ला दिला जातो की दबाव तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका आणि प्राधान्यक्रमानुसार कामे पूर्ण करा.
व्यावसायिक जीवन- या मूलांकाच्या जातकांसाठी जे राजकारणी, नेते किंवा मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असेल. या काळात हे लोक आत्मविश्वास आणि उत्साहाने भरलेले असतील. त्याची मेहनत, प्रयत्न आणि नेतृत्व गुणवत्तेचे बॉसकडून कौतुक होईल. मात्र त्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा अन्यथा, त्यांना बदनामीला सामोरे जावे लागू शकते.
आरोग्य- मूलांक 1 च्या जातकांना आरोग्यासोबत स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. गोड गोष्टींचे सेवन टाळा आणि तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
उपाय- देवी दुर्गेची उपासना करा आणि दुर्गा चालिसाचा पाठ करा. तसेच देवीला पाच लाल फुले अर्पण करा.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या जातकांना या आठवड्यात भावनिक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत तुम्हाला उर्जेची कमतरता दिसू शकते. तुमचा मूड बदलू शकतो. या जातकांना त्यांच्या भावनिक आरोग्याची काळजी घेण्याचा आणि जीवनाशी संबंधित कोणते ही मोठे निर्णय घेणे टाळण्याचा सल्ला दिला जातो तसेच, अशा कार्यांपासून दूर राहा ज्यामुळे व्यसन होऊ शकते आणि भविष्यात तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
प्रेम जीवन- या मूलांकाच्या जातकांना अधिक संवेदनशील होण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देऊ शकता आणि भावूक होऊ शकता, तुमच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द पार्टनरला दुखवू शकतात, ज्यामुळे नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे मन त्यांच्या समोर ठेवा.
शिक्षण- या मूलांकाच्या विद्यार्थ्यांना आठवडाभर एकाग्र राहण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील कारण, ते खूप भावनिक असतील ज्यामुळे तुमचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते.
व्यावसायिक जीवन- व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने, हा आठवडा जातकांसाठी चांगला राहील. तथापि, या काळात त्यांना त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि आठवड्याच्या मध्यभागी या लोकांचे या कठोर परिश्रमासाठी कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तुम्हाला व्यावसायिक प्रगतीसाठी परदेशात काम करायचे असेल किंवा परदेशातून नफा मिळवायचा असेल तर, या दिशेने काम करण्यासाठी हा आठवडा अनुकूल ठरेल.
आरोग्य- आरोग्याच्या बाबतीत, भावनिक चढ-उतारांमुळे तुमच्यासाठी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात म्हणून, या लोकांना शांत राहण्यासाठी ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर टाळा आणि शरीराला आराम मिळण्यासाठी पाण्यात मीठ टाकून आंघोळ करा.
उपाय- चंद्राच्या प्रकाशात दररोज 10 मिनिटे ध्यान करा.
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
शिक्षक, मार्गदर्शक, समुपदेशन आणि वित्त संबंधित जातकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. या काळात तुमचे संवाद कौशल्य उत्कृष्ट असेल आणि तुम्ही इतरांना तुमचा दृष्टिकोन समजून घेण्यास सक्षम व्हाल.
प्रेम जीवन- या मूलांकाच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, हे लोक आपल्या जोडीदारासोबत अनेक अविस्मरणीय क्षण घालवतील. जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. जरी, हे लोक त्यांच्या जोडीदाराला त्यांच्या मनातील सांगायचे की नाही याबद्दल थोडे गोंधळलेले दिसतील परंतु, तुम्हाला या आठवड्यात या कल्पनेवर ठाम राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शिक्षण- मूलांक 3 चे विद्यार्थी ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे किंवा परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, अशा लोकांना काळजीपूर्वक अभ्यास करावा लागेल.
व्यावसायिक जीवन- मूलांक 3 च्या जातकांना या आठवड्यात अनेक उत्तम संधी मिळू शकतात जे तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी चांगले सिद्ध होतील. स्मार्टनेस आणि बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही या संधींचा लाभ घेऊ शकाल. तुम्ही जर नवखे असाल आणि बँकिंग किंवा सीए सारख्या वित्त संबंधित क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर, त्यासाठी हा कालावधी उत्तम आहे.
आरोग्य- मूलांक 3 च्या जातकांसाठी हा आठवडा थोडा कठीण जाण्याची शक्यता आहे. या लोकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी, या जातकांना नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्यावा लागतो. या मूलांकाच्या महिलांना हार्मोनल असंतुलनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
उपाय- भगवान विष्णूची आराधना करून विष्णु सहस्रनामाचा पाठ करा.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
चौथ्या मूलांकाच्या जातकांसाठी हा आठवडा आनंदाचा जाणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्ही आनंदी दिसाल. या जातकांना अचानक काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, ज्यातून तुम्ही यशस्वी व्हाल.
प्रेम जीवन- प्रेम जीवनाविषयी बोलायचे झाल्यास, या आठवड्यात प्रत्येक परिस्थिती तुमच्या अनुकूल होईल. हे जातक जोडीदाराला समजून घेण्यास सक्षम होतील आणि त्यांच्यासाठी मोकळे होतील, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील परस्पर समन्वय आणि समज अधिक चांगली होईल.
शिक्षण- मूलांक 4 च्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल. कोणते ही काम करताना तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न केले तर, त्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे.
व्यावसायिक जीवन- मूलांक 4 च्या जातकांसाठी ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल राहील. या काळात तुम्हाला अनेक फायदे मिळतील तसेच, तुम्ही यावेळी नवीन करारांवर स्वाक्षरी कराल ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळतील. तुम्ही एखादे काम करत असाल तर तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, जे काम पूर्ण होण्यास उपयुक्त ठरेल.
आरोग्य- आरोग्याच्या दृष्टीने, हा आठवडा या मूलांकाच्या जातकांसाठी सामान्य राहील. पण तरी ही तुम्हाला शिस्तबद्ध राहण्याचा सल्ला दिला जातो. अल्कोहोल सोबत स्निग्ध आणि गोड पदार्थांचे सेवन टाळावे. या राशीच्या जातकांना आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागते.
उपाय- शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घाला.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात 5 क्रमांकाच्या जातकांचे संभाषण कौशल्य खूप चांगले असेल आणि अशा परिस्थितीत ते इतरांना त्यांच्या बोलण्याने प्रभावित करतील. यामुळे ते प्रभावशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित करू शकतील. तथापि, आपण बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे कारण, ज्यांची विचार करण्याची क्षमता आपल्या सारखी नाही अशा इतरांना आपले विचार कधी-कधी थोडे विचित्र वाटू शकतात.
प्रेम संबंध- या मूलांकाच्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल आणि अनेक नवीन आठवणी निर्माण कराल. तुमचा जीवनसाथी तुम्हाला समजून घेईल आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल.
शिक्षण- मूलांक 5 चे विद्यार्थी ज्यांना उच्च शिक्षणाची आवड आहे किंवा परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांचे स्वप्न साकार होऊ शकते. जनसंवाद, नाट्य, अभिनय, संगणकशास्त्र इत्यादी विषयांशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल.
व्यावसायिक जीवन- जे जातक मल्टिनॅशनल कंपनीत काम करत आहेत किंवा आयात/निर्यात व्यवसायात गुंतलेले आहेत, ते या आठवड्यात आनंद लुटताना दिसतील आणि या काळात चांगला नफा कमावतील. या जातकांना परदेशी मीडिया किंवा मनोरंजन क्षेत्रातून काही संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला काहीतरी नवीन करण्यास प्रोत्साहन मिळेल.
आरोग्य- मूलांक 5 असलेल्या जातकांचे आरोग्य या आठवड्यात तुमच्या हातात असेल, त्यामुळे या जातकांना नियमित व्यायाम, ध्यान आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच गोड पदार्थांचे सेवन टाळावे.
उपाय- आपल्या बहिणीला किंवा मावशीला काही तरी भेटवस्तू द्या.
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात, 6 मूलांकाचे जातक त्यांच्या वेळेचा पुरेपूर आनंद घेताना दिसतील आणि त्यांचे जीवन मुक्तपणे जगतील. तसेच, या जातकांच्या सामाजिक जीवनाची व्याप्ती देखील वाढेल आणि अशा परिस्थितीत ते प्रभावशाली लोकांसोबत वेळ घालवतील. या दरम्यान, हे लोक त्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी खूप पैसा आणि वेळ खर्च करतील.
प्रेम जीवन- प्रेम जीवनाविषयी बोलायचे झाले तर, या काळात मूलांक 6 च्या जातकांचे आयुष्य प्रेम आणि रोमान्सने भरलेले असेल. यावेळी तुम्ही एन्जॉय करताना दिसतील. विवाहित जातकांचे जीवन आनंदी राहील.
शिक्षण- 6 मूलांकाचे विद्यार्थी या आठवड्यात आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करू शकतील. या जातकांचे सर्व लक्ष अभ्यासावर असेल आणि जे लोक फॅशन, थिएटर अभिनय, इंटीरियर डिझायनिंग किंवा इतर कोणत्या ही डिझायनिंग इत्यादीशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी आठवडा फलदायी राहील.
व्यावसायिक जीवन- नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी चांगले कामाचे वातावरण मिळेल. तसेच, यावेळी वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत करतील. जे व्यावसायिक सेवेशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी वेळ अनुकूल आहे कारण, या काळात तुम्ही नवीन ग्राहक बनवू शकाल आणि नवीन सौदे करू शकाल.
आरोग्य- 6 मूलांकाच्या जातकांना या आठवड्यात आरोग्याच्या कोणत्या ही समस्येचा सामना करावा लागणार नाही. तथापि, पार्ट्यांपासून दूर राहा कारण, अल्कोहोलच्या सेवनाने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
उपाय- नकारात्मकता दूर करण्यासाठी रोज संध्याकाळी घरातील दिव्यात कापूर जाळावा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 चे जातक या आठवड्यात चिंतेत दिसू शकतात आणि छोट्या-छोट्या बाबींवर गोंधळून जाऊ शकतात. हे जातक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेण्यास सक्षम असतील ज्यामुळे ते तणावग्रस्त राहण्याची शक्यता असते. या स्थानिकांना जीवनाच्या सकारात्मक बाजूकडे पाहण्याचा आणि शांत राहण्यासाठी योगासने करण्याचा सल्ला दिला जातो.
प्रेम जीवन- प्रेम जीवनाविषयी बोलायचे झाले तर, मूलांक 7 चे जातक मूड स्विंग किंवा कोणत्या ही समस्येमुळे जोडीदाराकडे दुर्लक्ष करू शकतात किंवा त्याचा अपमान करू शकतात आणि अशा परिस्थितीत तुमच्या दोघांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही तुमच्या नात्याला प्राधान्य द्या.
शिक्षण- सातव्या मूलांकाच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो कारण, त्यांना त्यांचे शिक्षण आणि अभ्यासाच्या सर्जनशील पद्धती इतरांसमोर व्यक्त करण्यात अडचण येऊ शकते म्हणून, त्यांनी इतरांचे न ऐकता अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
व्यावसायिक जीवन- व्यावसायिक जीवनाच्या बाबतीत, नोकरदार जातक मूलांक 7 च्या जातकांना काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो आणि या काळात तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. जर तुम्ही परदेशाशी संबंधित कोणत्या ही व्यवसायात असाल तर, तुम्हाला परदेशी स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात.
आरोग्य- या मूलांकाच्या जातकांना या आठवड्यात आरोग्याशी संबंधित कोणत्या ही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही परंतु, अतिविचार करणे आणि निराश होणे टाळा अन्यथा, त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
उपाय- रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला द्या आणि त्यांना आश्रय द्या.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 चे जातक या आठवड्यात बहुतेक व्यावहारिक असतील आणि लोकांशी उद्धटपणे वागू शकतात. अशा प्रकारचा स्वभाव तुमच्या वैयक्तिक विकासासाठी खूप चांगला आहे असे म्हणता येणार नाही आणि परिणामी तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
प्रेम संबंध- मूलांक 8 च्या जातकांना या आठवड्यात त्यांच्या जोडीदाराशी वाद घालणे किंवा कोणत्या ही गोष्टीसाठी त्यांच्यावर दबाव टाकणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत ते समजून घ्या. जोडीदारावर शंका घेणे टाळा आणि एकमेकांना पूर्ण स्पेस द्या.
शिक्षण- मूलांक 8 चे विद्यार्थी या आठवड्यात अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेले दिसतील. या काळात तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करू शकणार नाही आणि सहकारी विद्यार्थ्यांमुळे तुमचे मन अभ्यासातून भरकटू शकते.
व्यावसायिक जीवन- जर आपण व्यावसायिक जीवनाबद्दल बोललो तर, मूलांक 8 च्या जातकांच्या करिअरसाठी हा आठवडा स्थिर असेल. पण जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर हा विचार तूर्तास टाळणेच हिताचे ठरेल.
आरोग्य- मूलांक 8 च्या जातकांसाठी आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, त्यांना त्वचा आणि ऍलर्जीशी संबंधित समस्यांमुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, स्त्रियांना हार्मोन्स किंवा रजोनिवृत्तीशी संबंधित तक्रारी देखील असू शकतात.
उपाय- अपंगांना दान करा.
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 च्या जातकांना या आठवड्यात उत्साही वाटेल म्हणून, तुम्हाला तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरण्याचा सल्ला दिला जातो. ही ऊर्जा रागात आणि वादात वाया घालवू नका कारण, यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. या ऊर्जेचा उपयोग उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी करणे उत्तम राहील आणि तुमच्या मेहनतीमुळे आणि प्रयत्नांमुळे तुम्हाला ध्येय गाठण्यात यश मिळेल.
प्रेम संबंध- या आठवड्यात हे जातक स्वतःमध्ये हरवून जातील आणि अशा परिस्थितीत हे लोक जोडीदाराकडे दुर्लक्ष करू शकतात किंवा अपमान करू शकतात. याचा परिणाम म्हणून, तुमच्या दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून, तुम्ही नात्याला प्राधान्य द्या असा सल्ला दिला जातो.
शिक्षण- संगणक विज्ञान, यांत्रिक अभियांत्रिकी, रोबोटिक्स अभियांत्रिकी इत्यादींचा अभ्यास करणाऱ्या या मूलांकाच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल तर, तुम्हाला संशोधनाचे चांगले परिणाम मिळतील. यासाठी तुम्हाला शिक्षकांकडून ही दाद मिळेल.
व्यावसायिक जीवन- ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल राहील. या काळात तुम्ही तुमच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यात आणि त्यांच्यासाठी नवीन बाजारपेठ शोधण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही आयटी क्षेत्रात किंवा डेटा सायंटिस्ट क्षेत्रात काम करत असाल तर तुमची कामगिरी यावेळी उत्कृष्ट असेल.
आरोग्य- आरोग्याच्या दृष्टीने, हा काळ अनुकूल असेल कारण तुम्हाला आरोग्याच्या कोणत्या ही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही परंतु, जास्त राग आणि तणावामुळे तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवू शकते त्यामुळे तुम्हाला ध्यान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
उपाय- मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करा आणि हनुमानजींना बुंदीचा प्रसाद द्या.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!