अंक राशि भविष्य 2022 - Numerology 2022 In Marathi
अंक विज्ञानाच्या अनुसार, वर्ष 2022 शुक्र ग्रहाचे वर्ष होणार आहे. या वर्षी जर जोडले असता तर अंक 6 (2+0+2+2=6) येतो आणि अंक 6 शुक्र ग्रहाच्या अंतर्गत येतो.
अंक सहा (6) विलासिता, फॅशन, मनोरंजन, प्रेम, शांती, रचनात्मकता, इत्यादींचे प्रतिनिधित्व करते. या वर्षी नंबर 2 2022 मध्ये तीन वेळा आवृत्ती होते. 2(1)02(2)2(3) ज्याचा अर्थ आहे की, या वर्षात नंबर दोन म्हणजे मंगळ ग्रहाची ही भूमिका राहणार आहे अश्यात, या वर्षी सर्व भौतिकवादी गोष्टींच्या संधर्भात अपेक्षा उच्च राहणार आहे. जे लोक पैश्यासाठी संघर्ष करत होते त्यांच्या जवळ या वर्षी खर्च करण्यासाठी पर्याप्त मात्रेत धन असण्याची आवश्यकता आहे. या सोबतच, नोकरी शोधणारे अधिकतर लोकांजवळ नोकरी असेल.
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
ट्रॅव्हलिंग इंडस्ट्री, बँकिंग सेक्टर, हॉटेल, ब्युटी पार्लर, ब्रँडेड कपडे आणि रेस्टोरंट च्या व्यापारात ही बराच सुधार पहायला मिळेल. लग्झरी गाड्यांच्या विक्री मध्ये ही वृद्धी पाहिली जाईल. शेअर बाजारात नवीन उच्चता मिळेल. बॉलिवूड आणि इंटरटेमेंट क्षेत्राच्या संबंधित लोकांना आपल्या इंडस्ट्री मध्ये एक नवीन उच्चता प्राप्त होईल.
सरळ शब्दात आणि संक्षेप मध्ये सांगायचे झाल्यास बऱ्याच काळापासून ज्या आर्थिक वृद्धीची वाट पाहत होतो ते परत पटरी वर येतील.
व्यक्तिगत वर्ष 1
उदाहरण 7-6-2022 एकूण 19 आहे (1+9=10) आणि एकल अंक 1 आहे.
हे वर्ष तुमच्यासाठी नवीन गतिशीलता घेऊन येईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून काही नवीन गोष्टींना सुरु करण्याची वाट पाहत आहेत तर, हे वर्ष त्या गोष्टींना सुरु करण्यासाठी योग्य वेळ आहे. या वर्षी नवीन सुरवात होईल. नवीन परियोजना किंवा व्यवसाय सुरु केले जातील. आरोग्य उत्तम राहणार आहे या व्यतिरिक्त, आपल्या सामाजिक गोष्टींमध्ये सुधार पहायला मिळेल. या वर्षी तुमचे जीवन स्तर ही सुधारेल. न डगमगता तुम्ही तणाव मुक्त कार्य करण्यात यश प्राप्त कराल. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात नाव आणि यश मिळवण्याची इच्छा ठेवतात अश्यात, तुम्हाला तुमची ही इच्छा ही या वर्षी नक्की पूर्ण होईल. तुमच्या जीवनात या वर्षी नेतृत्व भूमिका निभावण्याची संधी प्राप्त होईल आणि सोबतच, तुम्ही करिअर मध्ये आपली उपस्थित स्थिती मध्ये वृद्धी होतांना पाहू शकाल.
व्यक्तिगत वर्ष 2
उदाहरण: 2-3-2022 एकूण 11 (1+1=2) एकल अंक 2
हे वर्ष तुमच्यासाठी बदलांनी भरलेले असणार आहे. या वर्षी तुम्ही कामात यशस्वी व्हाल परंतु, तरी ही तुम्हाला धीर धरण्याचा सल्ला दिला जातो. या शिवाय तुम्हाला जीवनात काही भावनिक चढ-उतार देखील दिसू शकतात. या वर्षी लहान यात्रेच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या जीवन शैलीत आणि तुमच्या कलात्मक आणि नाविन्यपूर्ण कल्पनांमध्ये सुधारणा दिसेल.
जर तुम्ही कलाकार असाल किंवा कला क्षेत्राशी संबंधित असाल तर 2022 हे वर्ष तुमच्यासाठी खूप छान असेल. या वर्षी तुम्ही तुमच्या विचारात ही बदल पाहू शकतात. तुमच्या आईच्या जवळ राहा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या कारण, असे करणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.
व्यक्तिगत वर्ष 3
उदाहरण: 3-3-2022 एकूण 12 (1+2=3) एकल अंक 3
2022 हे वर्ष तुमच्या गुरूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, अध्यात्माकडे वाटचाल करण्यासाठी आणि उच्च शिक्षण किंवा उच्च ज्ञान मिळविण्यासाठी अनुकूल आहे. या वर्षी तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह सुरळीत राहील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. लांबचा प्रवास संभवतो. जर तुम्हाला कोणते ही नवीन काम सुरू करायचे असेल किंवा दीर्घकालीन नियोजन करायचे असेल, तर त्यासाठी ही हे वर्ष खूप चांगले राहणार आहे. मीडिया, पत्रकारिता, लेखक, ट्रॅव्हल एजंट यांच्या साठी ही हा काळ चांगला आहे. या वर्षी तुमच्या जीवनात भीती कमी असेल आणि तुमचा कल सुधारण्याकडे अधिक असेल. या वर्षात तुमच्या आयुष्यात ही सकारात्मक विचार आणि उत्साह दिसून येईल. एकंदरीत हे वर्ष तुमच्यासाठी खूप सकारात्मक वर्ष असणार आहे.
अॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनातील सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
व्यक्तिगत वर्ष 4
उदाहरण: 6-1-2022 एकूण 13 (1+3=4) एकल अंक 4
या वर्षी अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. या शिवाय या वर्षी तुमच्या जबाबदाऱ्या ही वाढतील. 2022 मध्ये अनेक प्रसंगी, तुम्हाला असे वाटेल की तुमचे जीवन अंधारात जात आहे किंवा सर्व मार्ग बंद झाले आहेत परंतु, तुम्हाला कठोर परिश्रम करत राहण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सोप्या शब्दात सांगायचे तर, हे वर्ष नक्कीच कठीण जाणार आहे, परंतु कठोर परिश्रमाने तुम्हाला यश मिळेल आणि वर्षात तुम्हाला सुधारणा दिसेल. तुम्हाला मित्र आणि तुमच्या सामाजिक वर्तुळात सुधारणा पहायला मिळेल. कोणावर ही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि तुमची गुपिते सर्वांसोबत शेअर करू नका असा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला परदेशात स्थायिक व्हायचे असेल तर, या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. या वर्षी आरोग्याची विशेष काळजी घ्या. या शिवाय तुमच्या खर्चावर ही नियंत्रण ठेवा अन्यथा, तुमचा खर्च खूप वाढण्याची शक्यता आहे.
व्यक्तिगत वर्ष 5
उदाहरण: 4-4-2022 एकूण 14 (1+4=5) एकल अंक 5
तुमच्या शिक्षणात सुधारणा करण्यासाठी आणि नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी हे वर्ष तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. या शिवाय या वर्षी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा पहायला मिळेल. नोकरीत बदल होण्याची दाट शक्यता आहे तसेच, तुम्हाला परदेशात नोकरी प्राप्त होऊ शकते. तुम्हाला प्रवासाची खूप आवड आहे, त्यामुळे या वर्षी तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो आणि तुम्हाला या यात्रांनी फायदे ही मिळतील. भागीदारीसाठी हा काळ चांगला आहे. या शिवाय, जर तुम्हाला नवीन व्यवसाय किंवा नवीन उपक्रम सुरू करायचा असेल, तर त्यासाठी ही हे वर्ष उत्तम ठरेल. पत्रकारिता, मीडिया, कम्युनिकेशन इंडस्ट्री या क्षेत्राशी निगडित व्यक्तींना यंदा हा पुरस्कार मिळू शकतो. अशा परिस्थितीत हे वर्ष तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. तुम्हाला सट्टाबाजार किंवा शेअर बाजारात पुढे जायचे असेल, तर या संदर्भातील ज्ञान मिळवण्यासाठी आणि तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. या वर्षी तुम्ही या बाबतीत एक पाऊल पुढे टाकू शकता.
व्यक्तिगत वर्ष 6
उदाहरण: 5-4-2022 एकूण 15 (1+5=6) एकल अंक 6
प्रेम आणि रोमांस साठी हे वर्ष शुभ सिद्ध होईल. विरुद्ध लिंगाच्या लोकांसोबत तुम्हाला कोणत्या ही प्रकारचा त्रास झाला असेल तर या प्रकरणांवर मात करण्यासाठी किंवा या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर करायच्या असतील किंवा वेगळे व्हायचे असेल तर हे वर्ष ही अनुकूल राहील. हे वर्ष चैनीचे वर्ष आहे, त्यामुळे या वर्षी तुम्हाला तुमच्या घरात अनेक चैनीच्या वस्तू मिळण्याची दाट शक्यता आहे. सुख आणि आराम देणाऱ्या वस्तू, वाहने इत्यादी खरेदी करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. तुम्ही ब्रँडेड कपडे, घड्याळे, एअर कंडिशनर आणि मनोरंजन यावर ही खर्च करू शकता. या व्यतिरिक्त, या काळात तुमच्या पगार/व्यवसायात सुधारणा आणि वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही शाही सहलीला जाऊ शकता अशी दाट शक्यता आहे.
व्यक्तिगत वर्ष 7
उदाहरण: 6-4-2022 एकूण 16 (1+6=7) एकल अंक 7
या वर्षी तुम्हाला तुमच्या नात्यात समस्या आणि गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते. या व्यतिरिक्त, या वर्षी तुम्हाला कोणाला ही पैसे उधार देण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण, अशी दाट शक्यता आहे की, जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत आणि तुमचे नुकसान होऊ शकते तथापि, हे वर्ष अध्यात्मात सामील होण्यासाठी चांगले जाणार आहे आणि आपण त्या संबंधित कोणती ही जबाबदारी देखील आणू शकतात. हे वर्ष जोखमीचे काम करण्यासाठी किंवा कोणते ही धोक्याचे पाऊल उचलण्यासाठी चांगले नाही. जर तुम्ही कुटुंब नियोजन करत असाल तर या वर्षी तुम्हाला या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते.
नवीन वर्षात करिअरची कुठली ही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
व्यक्तिगत वर्ष 8
उदाहरण: 6-5-2022 एकूण 17 (1+7=8) एकल अंक 8
करिअर आणि पैशाच्या बाबतीत या वर्षी तुम्हाला सुधारणा दिसेल. या शिवाय सत्ता आणि अधिकार मिळण्याची ही दाट शक्यता आहे. या वर्षात तुम्हाला राजकारणात यश मिळू शकते आणि कोर्टात केस चालू असेल तर त्यात ही यश मिळू शकते. लोखंड आणि स्टीलच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना या वर्षी नफा कमावता येईल तथापि, आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या वर्षी तुम्ही मोकळेपणाने आणि स्वतंत्र काम कराल आणि आगामी काळात तुमचे नशीब सुधारलेले दिसेल.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
व्यक्तिगत वर्ष 9
उदाहरण: 3-9-2022 एकूण 18 (1+8=9) एकल अंक
जुन्या योजना पूर्ण करण्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. जर तुम्हाला कोणते ही नवीन काम सुरू करायचे असेल तर, तुम्हाला आत्ता थांबण्याचा सल्ला दिला जात आहे कारण, नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अधिक अनुकूल असेल. या वर्षी स्वतःला व्यवस्थित करा आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर लग्न आधीच ठरवले असेल तर या वर्षी लग्न होऊ शकते परंतु, तसे नसल्यास, लग्नाचा विचार पुढील वर्षा पर्यंत पुढे ढकलल्यास ते अधिक शुभ होईल. बांधकामाशी संबंधित गोष्टी, जमीन इत्यादीसाठी आणि नवीन घर खरेदीसाठी या वर्षी तुम्हाला चांगली संधी मिळेल. या शिवाय या काळात तुम्हाला नाव आणि प्रसिद्धी मिळेल. तरी ही मेहनत करत राहा. या वर्षी तुमची ध्येये आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव ऍक्शन मोड मध्ये असणे आवश्यक आहे म्हणजेच, काम करत राहा. वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर, सर्जन इत्यादींसाठी हे वर्ष सकारात्मक आणि चांगले असणार आहे.
आचार्य सिद्धार्थ सेठ सोबत व्यक्तिगत सल्ला प्राप्त करण्यासाठी फोन/चॅट च्या माध्यमाने त्यांच्या सोबत जोडले जाऊ शकतात.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. अॅस्ट्रोसेज सोबत जोडल्याबद्दल खूप आभार!