चैत्र अमावस्या: Chaitra Amavasya In Marathi
हिंदू धर्मात अमावस्या तिथी आणि पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे. पौर्णिमा आणि अमावस्या, या दोन्ही तारखा प्रत्येक महिन्यात एकदा येतात. अश्यात, वर्षभरात एकूण 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा तिथी असतात. येथे हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की, ज्या महिन्यात अमावस्या येते त्या महिन्याची अमावस्या म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ, हिंदू चैत्र महिन्यात येणारी अमावस्या चैत्र महिन्यात येणार आहे अमावास्येला चैत्र अमावस्या 2022 (Chaitra Amavasya 2022) म्हणून ओळखली जाते.
साधारणत: अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दानधर्म करणे, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे इत्यादी गोष्टींना फार महत्त्व असते असे सांगितले जाते. चैत्र अमावस्येच्या दिवशी सूर्या सोबत पितरांची पूजा केल्यास आपले पूर्वज आणि पितर प्रसन्न होतात. असे मानले जाते, या वर्षी चैत्र अमावस्या तिथी बद्दल बोलायचे झाल्यास तर, उद्या तिथीनुसार या वर्षी चैत्र अमावस्या 1 एप्रिल रोजी येत आहे.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
चैत्र अमावस्या 2022: तिथी आणि शुभ मुहूर्त
1 एप्रिल, 2022 (शुक्रवार)
मार्च 31, 2022 ला 12:24:45 पासून अमावस्या आरंभ
एप्रिल 1, 2022 ला 11:56:15 ला अमावस्या समाप्त
माहिती: वरती दिले गेलेले मुहूर्त दिल्ली साठी मान्य आहे. जर तुम्ही आपल्या शहराच्या अनुसार या दिवसाचा शुभ मुहूर्त जाणून घेण्याची इच्छा ठेवतात तर, येथे क्लिक करून जाणून घेऊ शकतात.
चैत्र अमावस्याचे महत्व
सनातन धर्मात अमावस्या तिथीचे धार्मिक महत्त्व खूप मानले गेले आहे. या दिवशी पितरांचे पूजन, अर्चना, तर्पण वगैरे केल्यास मोक्षप्राप्ती होते, असे म्हणतात. एवढेच नाही तर अमावस्या तिथीच्या दिवशी काही साधे ज्योतिषीय उपाय केले तर पितृदोष आणि काल सर्प दोष यांसारख्या जटील कुंडलीतील दोषांपासून मुक्त होण्यासही मदत होते.
चैत्र अमावस्याचे धार्मिक महत्व
धार्मिक मान्यतांनुसार, चैत्र अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास त्या व्यक्तीच्या जीवनात भगवान विष्णूची कृपा कायम राहते. या सोबतच अमावास्येच्या दिवशी चंद्राची विधिवत पूजा केल्याने चंद्र देवतेची कृपा ही होते आणि जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
चैत्र अमावस्या ज्योतिषीय महत्व
ज्योतिषशास्त्रीय महत्त्वाबद्दल सांगायचे झाले तर, अमावस्या तिथी ही तारीख किंवा दिवस आहे ज्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, जिथे सूर्य एका बाजूला अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करतो, तिथे चंद्राला शीतलता म्हणजेच, शांततेचे प्रतीक मानले जाते. अशा स्थितीत जेव्हा चंद्र सूर्याच्या प्रभावाखाली येतो तेव्हा चंद्राचा प्रभाव हळूहळू क्षीण होत जातो. त्यामुळे मन एकाग्र करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
अमावस्या हा पवित्र दिवस अध्यात्मिक चिंतनासाठी अत्यंत शुभ आणि सर्वोत्तम आहे असे, धर्म आणि ज्योतिष शास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या शिवाय असे मानले जाते की, ज्यांचा जन्म अमावस्या तिथीला होतो त्यांच्या कुंडलीत चंद्र दोष असतो.
चैत्र अमावास्येच्या दिवशी केले जाणारे अनुष्ठान
- चैत्र अमावस्येला लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे असे सांगितले आहे. मात्र, जर हे शक्य नसेल तर, आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाकून तुम्ही स्वतःच्या घरात स्नान करू शकतात. यातून तुम्हाला तितकेच पुण्य मिळेल.
- स्नान केल्यानंतर पितरांची व सूर्य देवाची पूजा करावी.
- यानंतर आपल्या यथाशक्तीच्या अनुसार, धान्य, कपडे, सफेद मिठाई, पाण्यासाठी मातीचे भांडे इत्यादी गरजूंना दान करावे. असे केल्याने तुमचे पूर्वज ही प्रसन्न होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. या सोबतच व्यक्तीला प्रतिकूल परिणाम ही मिळतात.
चैत्र अमावस्या हिंदू वर्षाचा अंतिम दिवस
चैत्र अमावस्या कोणत्या ही अमावस्येपेक्षा अधिक महत्त्वाची मानली जाते कारण, हा हिंदू वर्षाचा शेवटचा दिवस आहे. चैत्र अमावस्या हा विक्रम संवत वर्षाचा शेवटचा दिवस आहे. चैत्र अमावस्या नंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी येते जी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानली जाते. असे म्हणतात की ,चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस होता ज्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
सुख समृद्धीसाठी चैत्र अमावास्येला नक्कीच करा यापैकी कुठला ही एक उपाय
- चैत्र अमावस्येच्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला कापूस वापरायचा नाही तर लाल रंगाचा धागा वापरावा. यानंतर या दिव्यात थोडे केशर टाकावे. हा दिवा घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मीची कृपा कायम राहील. तसेच, तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आयुष्यभर राहील.
- या दिवशी तुम्ही करू शकता असा आणखी एक उपाय म्हणजे भुकेल्या, गरजू किंवा गरीबांना अन्न देणे. जर एखाद्या व्यक्तीला भूक नसेल तर, तुम्ही कोणत्या ही पशु पक्ष्याला खायला देऊ शकतात किंवा तलावात जाऊन माशांसाठी पिठाच्या गोळ्या टाकू शकतात. हा उपाय केल्याने तुमचे पूर्वज प्रसन्न होतील आणि त्याच बरोबर तुमची प्रत्येक समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.
- चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करणे खूप सोपे आणि योग्य आहे. अशा स्थितीत, या दिवशी गाईचे शेण घेऊन त्यावर शुद्ध तूप आणि गूळ टाकून उदबत्ती लावावी. या सोबतच पितरांच्या आवडीचे शुद्ध अन्न तयार करून पितरांना अर्पण करावे.
- कष्ट करून ही यश मिळत नसेल तर, चैत्र अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घाला. असे केल्याने तुमचे सर्व कार्य पूर्ण होण्यास सुरुवात होईल, तुम्हाला यश मिळू लागेल आणि त्याच वेळी तुमचे सर्व पाप आणि संकटे ही दूर होऊ लागतील.
- चैत्र अमावस्येच्या दिवशी घराच्या छतावर दिवा ठेवा. या उपायाने लक्ष्मीची कृपा आयुष्यभर तुमच्या जीवनात राहील आणि तुम्हाला कधी ही पैशाची कमतरता सहन करावी लागणार नाही.
- नोकरी, व्यवसाय इत्यादींशी संबंधित काही समस्या असल्यास किंवा कुंडलीत पितृ दोष असल्यास अमावास्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
चैत्र महीना या राशींसाठी राहील खूप शुभ मिळेल देवी दुर्गेची असीम कृपा
चैत्र महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाचा पहिला महिना आहे. अशा परिस्थितीत त्याचे धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रीय महत्त्व सांगण्यात आले आहे. चैत्र नवरात्री ही चैत्र महिन्यात येते.
चला तर मग जाणून घेऊया की, कोणत्या राशींसाठी हा चैत्र महिना अतिशय शुभ असणार आहे.
- मेष राशि: मेष राशीच्या लोकांसाठी चैत्र महिना शुभ राहील. या काळात तुम्हाला कार्य क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या सोबतच प्रमोशनची ही जोरदार शक्यता निर्माण झाली आहे.
- मिथुन राशि: मिथुन राशीच्या लोकांसाठी ही चैत्र महिना खूप चांगला महिना असेल. या दरम्यान तुमच्या प्रवासासाठी मजबूत योग तयार होत आहेत आणि तुम्हाला या प्रवासाचा फायदा ही होईल. हा काळ विशेषतः व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे.
- कर्क राशि: तिसरा राशी ज्यासाठी चैत्र महिना शुभ असेल तो म्हणजे कर्क. या काळात अध्यात्मिक विषयात तुमची रुची वाढलेली दिसेल. या काळात तुम्ही धार्मिक प्रवासाला ही जाऊ शकता.
- कन्या राशि: याशिवाय कन्या राशीच्या लोकांसाठी चैत्र महिना ही शुभ राहील. तुम्हाला कार्य क्षेत्रात थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला जात असला तरी व्यावसायिकांना यशाच्या अनेक संधी मिळतील. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकतात.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!