चैत्र नवरात्र 2022 - Chaitra Navratri 2022 In Marathi
9 दिवसांपर्यंत चालणारा नवरात्रीचा हा पावन सण 1 वर्षात 4 वेळा साजरा केला जातो. वर्षात दोन वेळा गुप्त नवरात्र च्या रूपात आणि दोन वेळा पूर्ण उत्साह आणि उत्साहाने मार्च आणि एप्रिल च्या महिन्यात चैत्र नवरात्र च्या रूपात आणि दुसरी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये शारदीय नवरात्र च्या रूपात साजरी करतात.
महिषासुर या राक्षसाचा युद्धात पराभव केल्याबद्दल दुर्गा देवीचा आदर आणि उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. महिषासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून कठोर तपश्चर्येद्वारे अमरत्व प्राप्त केले होते आणि केवळ एकच स्त्री त्याचा पराभव करू शकते. त्याला या गोष्टीचा अभिमान होता की कोणती ही स्त्री त्याला कधी ही मारू शकत नाही. अशा स्थितीत, त्यांने तिन्ही लोकांमध्ये (पृथ्वी, स्वर्ग आणि नरक) तांडव करायला सुरवात केली.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव आणि इतर सर्व देवतांनी महिषासुराचा तांडव थांबवण्यासाठी आणि तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी देवी दुर्गा तयार करण्यासाठी त्यांच्या शक्ती एकत्र केल्या. मग देवी दुर्गेने धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि महिषासुराचा अंत करण्यासाठी दैत्य महिषासुराशी भयंकर युद्ध केले आणि शेवटी विजय मिळवला.
नवरात्री या शब्दाच्या अर्थाबद्दल बोलायचे झाले तर नवरात्रीचा शब्दशः अर्थ नऊ-रात्र असा होतो. अशा परिस्थितीत नवरात्र हा नऊ दिवस चालणारा भारतीय सण असून या काळात नऊ देवतांच्या (माता दुर्गेची नऊ रूपे) पूजेचा नियम सांगितला आहे.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
या वर्षी कधी आहे चैत्र नवरात्र
या वर्षी चैत्र नवरात्र 2 एप्रिल पासून प्रारंभ होईल आणि 10 एप्रिल पर्यंत चालेल.
या काळात वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या मान्यता आणि अनुष्ठान विधी केले जातात. बरेच लोक चैत्र नवरात्री मध्ये अखंड ज्योत पेटवतात, तोरण किंवा बंदरबन ठेऊन पूजा करतात, संपूर्ण 9 दिवस उपवास करतात आणि या दिवशी कलश स्थापना करून पूजा सुरू करतात.
कोणत्या दिवशी केली जाईल कोणत्या देवीची पूजा
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजेची सुरुवात देवी पार्वतीचा अवतार आणि पर्वताची कन्या शैलपुत्रीच्या पूजेने होते. या दिवशी भगवान शिवाची पत्नी म्हणून दुर्गा देवीची पूजा केली जाते. देवी शैलपुत्री नंदी बैलावर स्वार होते, तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे.
द्वितीयेला (दुसऱ्या दिवशी) पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते. या रुपात माता पार्वती योगिनी रुपात दिसते. म्हणजेच हे त्या मातेचे अविवाहित रूप आहे ज्यामध्ये ती भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत होती. ब्रह्मचारिणी देवीची उपासना केल्याने मुक्ती, मोक्ष आणि सुख, शांती, समृद्धी मिळते असे मानले जाते.
तृतीयेला (तिसऱ्या दिवशी) आपण चंद्रघंटाची पूजा करतो. ती सौंदर्याचे प्रतीक आहे तसेच, शौर्याचे प्रतीक आहे.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
चतुर्थीला (चौथ्या दिवशी) कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा देवी पृथ्वीवरील वनस्पतींच्या भांडाराशी संबंधित असल्याचे मानले जाते.
पंचमीला (पाचव्या दिवशी) स्कंदमातेची पूजा केली जाते, जी भगवान कार्तिकेयची आई आहे. देवी स्कंदमाता सफेद रंगाचे प्रतिनिधित्व करते आणि सफेद रंग आईच्या परिवर्तनीय शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिच्या मुलाला धोका असतो. आई स्कंदमाता सिंहावर स्वार होते, तिला चार हात आहेत आणि आईने आपल्या मुलाला हातात धरले आहे.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. अविवाहित मुलींना हवा तो नवरा मिळावा म्हणून, कात्यायनी देवीची पूजा करतात असे मानले जाते; तसेच देवी सीतेने ही चांगल्या पतीसाठी देवी कात्यायनीची पूजा केली होती असे मानले जाते.
कालरात्री देवी हे देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाते, देवी कालरात्रीची पूजा नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला केली जाते.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफतजन्म कुंडली प्राप्त करा
आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते, ती बुद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा ती गरम झाली आणि तिचा काळा झाला.
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. असे मानले जाते की माँ दुर्गेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. हा दिवस राम नवमी म्हणून ही ओळखला जातो कारण, हा भगवान रामाचा जन्मदिवस आहे.
नवरात्रीच्या वेळी काय करावे आणि काय करू नये
- नवरात्रीच्या सर्व दिवसांमध्ये सूर्योदयापूर्वी उठून गंगा नदीत स्नान करावे. जर असे करणे शक्य नसेल तर, तुम्ही आंघोळीच्या पाण्यातच गंगा जलाचे काही थेंब टाकून स्नान करू शकता. असे केल्याने मागील जन्मातील सर्व पापे धुतली जातात असे म्हणतात.
- दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करा. असे केल्याने तुमच्या आरोग्यावर फायदेशीर परिणाम प्राप्त होतात आणि मानसिक शांती देखील प्राप्त होते.
- पूजेच्या ठिकाणी अखंड ज्योती लावा. असे केल्याने तुमचे भाग्य उजळते.
- रात्री नवदुर्गा जागरणाचे आयोजन करा.
- मातेला लाल ओढणी किंवा कपडे, फळे, फुले, श्रृंगार इत्यादी वस्तू अर्पण करा. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते.
- घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने लावा.
- या काळात क्रोध आणि क्रूरतेपासून शक्य तितके दूर राहा.
- मद्य किंवा कोणत्या ही प्रकारचे तामसिक अन्न सेवन करू नये.
- घरात शांततापूर्ण वातावरण ठेवा.
- या काळात ब्रह्मचर्य पाळणे अत्यंत शुभ मानले जाते.
चैत्र नवरात्री मध्ये राशी अनुसार करा हे उपाय मिळेल देवीचा आशीर्वाद आणि समृद्धीचे वरदान
- मेष राशि: देवी दुर्गाला लाल रंगाची फुले आणि ओढणी अर्पण करा.
- वृषभ राशि: दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा.
- मिथुन राशि: महिलांना हिरवी फळे आणि भेटवस्तू दान करा.
- कर्क राशि: देवी दुर्गेचे चौकी आणि कलश घरात ठेवा आणि त्याची पूजा करा.
- सिंह राशि: तुमच्या कामाच्या ठिकाणी दुर्गा देवीची मूर्ती स्थापित करा आणि तिची पूजा करा.
- कन्या राशि: ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडये विच्चे’ मंत्र कमीत कमी 108 वेळा जप करा.
- तुळ राशि: पूरे 9 दिनों तक मां दुर्गा को सफेद रंग की मिठाई अर्पित करें।
- वृश्चिक राशि: 108 बार ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्छे’ मंत्राचा जप करून हवन सामग्री ला आहुती द्या.
- धनु राशि: 9 दिवसांपर्यंत नियमित महिषासुरमर्दिनि चा पाठ करा.
- मकर राशि: गरीब लोकांना सुक्या मेव्याचा प्रसाद दान करा.
- कुंभ राशि: तुमच्या मंदिराच्या अग्नी कोण मध्ये अखंड दिवा लावा. (लक्षात ठेवा की, हा अखंड दिवा संपूर्ण चैत्र नवरात्री साठी लावावा.)
- मीन राशि: नियमित महिलांना फळे दान करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!