होलिका दहन 2022 - Holika Dahan 2022 In Marathi
होलिका दहन किंवा होळीच्या सणाचा पहिला दिवस किंवा फक्त छोटी होळी याला अनेक नावांनी ओळखले जाते, हा दिवस होळीच्या 1 दिवस आधी साजरा केला जातो. अशा परिस्थितीत यंदा होलिका दहन 17 मार्च 2022 रोजी साजरा केला जाणार आहे.
अॅस्ट्रोसेज च्या या होळी स्पेशल ब्लॉग मध्ये जाणून घ्या. होलिका दहन का केले जाते? त्याचे महत्त्व काय? या वेळी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कोणता असेल? आणि हे ही कळेल की, होलिका दहनाच्या दिवशी हनुमानाच्या पूजेला इतके महत्त्व का सांगण्यात आले आहे?
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
केव्हा आहे होळी आणि काय आहे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त?
होलिका दहन मुहूर्त
होलिका दहन मुहूर्त : 21:20:55 पासून 22:31:09 पर्यंत
अवधी :1 तास 10 मिनिटे
भद्रा पुँछा : 21:20:55 पासून 22:31:09 पर्यंत
भद्रा मुखा : 22:31:09 पासून 00:28:13 पर्यंत
होळी 18, मार्च ला
अधिक माहिती: येथे दिलेला मुहूर्त नवी दिल्ली साठी मान्य आहे. आपल्या शहराच्या अनुसार शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
पहिल्यांदाच या शुभ योगांमध्ये केले जाईल होलिका दहन
सणांचे खूप वेगळेच महत्व असते परंतु, जेव्हा या विशेष सणांचे विशेष योग मध्ये संयोग बनले तर, ही सुवर्णक्षण असतात. तर, असेच काही या वर्षी ही होत आहे या वर्षी होलिका दहनाला होत आहे. ज्योतिषचे जाणकार मानतात आणि सांगतात की, या वर्षी होलिका दहनावर असे शुभ राजयोग बनत आहेत जे या आधी कधीच बनलेले नव्हते.
काय आहे हा शुभ योग?
- होलिका दहन गुरुवारी होत आहे आणि हा दिवस देवगुरु बृहस्पतीला समर्पित एक अतिशय शुभ दिवस मानला जातो.
- चंद्रावर गुरूचा संबंध असल्यामुळे या दिवशी गजकेसरी योग तयार होत आहे.
- या दिवशी केदार आणि ज्येष्ठ राजयोगाचा योगायोग ही घडत आहे.
- ज्योतिषांच्या मते, होलिका दहनावर हे तीन शुभ राजयोग तयार होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- इतकेच नाही तर होलिका दहनावर मकर राशीतील शुक्र आणि शनि हे अनुकूल ग्रहांचे संयोग ही या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढविण्याचे काम करत आहेत.
या शुभ योगांचा काय पडेल देशावर प्रभाव?
- होलिका दहनावर बनवल्या जाणाऱ्या या तीन राजयोगांमुळे देशात नक्कीच धमाल पाहायला मिळेल.
- या दरम्यान व्यापाऱ्यांना अनेक फायदे आणि चांगल्या संधी मिळतील.
- सरकारी निधी देखील लाभाच्या स्थितीत दिसून येईल.
- विदेशी गुंतवणुकीत वाढ होण्याची दाट शक्यता दिसत आहे.
- कोरोनाचे संकट हळूहळू कमी होईल आणि आपण पुन्हा एकदा सामान्य जीवन जगण्याच्या मार्गावर येऊ.
- महागाईही आटोक्यात येण्याची जोरदार शक्यता आहे.
- एकंदरीत, होलिका दहनावर या तीन राजयोगांची निर्मिती झाल्याने देशभरात चांगली आणि शुभ स्थिती पाहायला मिळणार आहे म्हणजेच, ही होळी प्रत्येक अर्थाने 'हॅपी होळी' असणार आहे.
चला आता पुढे जाऊया आणि होलिका दहनशी संबंधित इतर काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
का साजरी केली जाते होळी?
होलिका दहन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो आणि या उत्सवात साजरा केला जातो. असे म्हणतात की, याच दिवशी राक्षस राजा हिरण्यकश्यपू बहीण होलिकाने प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान विष्णूने प्रल्हादला वाचवले आणि होलिकाने स्वतःला जाळून टाकले. अशा स्थितीत या दिवशी अग्निदेवतेची पूजा करून त्यात धान्य, जव, मिठाई इत्यादी टाकल्या जातात.
हेच कारण आहे की, होलिका दहनाच्या राखीला खूप पवित्र मानले गेले आहे आणि होलिका दहनाच्या नंतर याची राख घरी आणण्याचे आणि याला आपल्या मंदिरात किंवा कुठल्या ही पवित्र स्थानावर ठेवण्याचे विशेष महत्व असते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्येला होलिका दहन केले जाते. होलिका दहन नंतर काही राज्यांमध्ये रंगांची होळी खेळतात महाराष्ट्रात धूलिवंदन म्हणजेच राखेची होळी साजरी केली जाते.
होलिका दहनाचे महत्व
जसे की, आधी सांगितले आहे की, होलिका दहनाचा हा दिवस वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टीचे प्रतीक असते. अश्यात या दिवशी आपल्या घर आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी साठी महिला होलिकेची पूजा करतात. या व्यतिरिक्त, असे म्हणतात की, होलिका दहन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकतेचा वास असतो. होलिका दहनाची तयारी बऱ्याच दिवसांच्या आधीपासून प्रारंभ होते. जिथे लोक लाकडे, काटे, गोवऱ्या, ऊस इत्यादी गोळा करण्यास सुरु करतात आणि त्या नंतर होलिका दहनाच्या दिवशी याला जाळून वाईट गोष्टींचा अंत करण्याची प्रतिज्ञा करतात.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
होलिका दहन पूजा विधी
- होलिका दहनाच्या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि या दिवशी उपवास करा.
- या नंतर होलिका दहन केल्या जाणाऱ्या ठिकाणी त्या जागेला स्वच्छ करा आणि येथे सुक्की लाकडे, गोवऱ्या, काटे ही सर्व सामग्री एकत्र करा.
- होलिका आणि प्रल्हादाची प्रतिमा बनवा.
- होलिका दहनाच्या दिवशी नरसिंहाची पूजा करण्याचे महत्त्व सांगितले आहे. अशा स्थितीत या दिवशी भगवान नरसिंहाची पूजा करून हे सर्व साहित्य त्यांना पूजेत अर्पण करावे.
- संध्याकाळी पुन्हा पूजा करा आणि या वेळी होलिका दहन करा.
- आपल्या संपूर्ण कुटुंबासह होलिकेला तीन प्रदक्षिणा घाला.
- परिक्रमेदरम्यान भगवान नृसिंहाचे नामस्मरण करावे आणि अग्नीत 5 अनाजचे दाणे टाका.
- प्रदक्षिणा करताना होलिकेला अर्घ्य द्या.
- या नंतर गोवऱ्या, गहू, अंदाज, हरभरा या सर्व गोष्टी होळी मध्ये टाका.
- शेवटी होलिका मध्ये गुलाल टाका आणि जल अर्पण करा.
- होलिका अग्नी विझल्यानंतर त्याची राख आपल्या घरात किंवा मंदिरात किंवा कोठेतरी स्वच्छ पवित्र ठिकाणी ठेवा.
होलिका दहनाच्या रात्री भगवान हनुमानाच्या पूजेचे महत्व
होलिका दहनाच्या रात्री हनुमानाच्या पूजेचा नियम अनेक ठिकाणी सांगण्यात आला आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी हनुमानाची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते.
ज्योतिष शास्त्रानुसार त्याचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर, नवीन वर्षात राजा आणि मंत्री दोघे ही मंगळ ग्रह असल्याचे सांगितले जाते. हनुमानजी हे मंगळ ग्रहाचे स्वामी आहेत. अशा स्थितीत होलिका दहनाच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्यास ते खूप शुभ आणि फलदायी मानले जाते.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
होलिका दहनाच्या दिवशी हनुमानाच्या पूजेचा योग्य विधी
- होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून हनुमानाची पूजा करा आणि मनोकामना करा.
- या दिवशीच्या पूजेमध्ये हनुमानाला सिंदूर, चमेलीचे तेल, फुलांच्या माळा, प्रसाद, चोला इत्यादी अर्पण करा.
- हनुमानाच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा.
- या दिवसाच्या पूजेमध्ये हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पाठ करा आणि शेवटी भगवान हनुमानाची आरती करा.
या शिवाय या दिवशी हनुमानाच्या पूजेदरम्यान हनुमान चालीसाचे पठण केल्यास व्यक्तीचे दुःख दूर होते, असा ही विश्वास आहे. या सोबतच, जीवनात नवी ऊर्जा ही संचारते तसेच, या शुभ दिवशी भगवंताला लाल आणि पिवळी फुले अर्पण केल्यास व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक संकटे दूर होतात आणि कोणत्या ही प्रकारचे संकट नष्ट होतात.
होलिका दहनाच्या नंतर अवश्य करा हे काम
- माहिती करांच्या अनुसार, होलिका दहना नंतर जर तुम्ही आपल्या संपूर्ण घरातील लोकांसोबत चंद्राचे दर्शन केले तर, यामुळे अकाल मृत्यू ची भीती दूर होते कारण, या दिवशी चंद्र आपल्या पितातुल्य बुध च्या राशीमध्ये आणि सूर्य आपल्या गुरु बृहस्पती च्या राशीमध्ये स्थित असतात.
- या व्यतिरिक्त, होलिका दहनाच्या आधी होळीच्या सात परिक्रमा करून त्यात मिठाई, इलायची, लवंग, गोवऱ्या, अनाज इत्यादी टाकले तर, यामुळे कुटुंबात सुख समृद्धी वाढते.
या वर्षी 18 आणि 19 ला साजरी केली जाईल होळी? जाणून घ्या कारण!
या वर्षी 17 मार्च ला होलिका दहन केले जाईल आणि 18 ला बऱ्याच राज्यांमध्ये होळी खेळली जाईल आणि आणि बऱ्याच ठिकाणी 19 मार्च ला होळी साजरी केली जाईल. ज्योतिष जाणकारांच्या अनुसार, 17 मार्च ला रात्री 12 वाजून 57 मिनिटांनी होलिका दहनाचा योग बनत आहे. या नंतर, 18 मार्च ला 12 वाजून 53 मिनिटांनी पौर्णिमा स्नान केले जाईल आणि याच्या पुढील दिवशी 18 मार्च ला होळी साजरी केली जाईल. इतर ठिकाणी 19 मार्च ला ही होळी साजरी करतील.
होलिका दहनाच्या दिवशी नक्कीच करा यापैकी कुठला ही एक उपाय, वर्षभर राहील जीवनात सुख समृद्धी
- होळीची राख आपल्या घरी आणा आणि घराच्या आग्नेय दिशेला ठेवा. वास्तु नुसार हे खूप शुभ मानले जाते. अशा वेळी हा उपाय केल्यास घरामध्ये वास्तुदोष असेल तर, तो दूर होतो.
- जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी, होळीच्या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा केली पाहिजे.
- तुमच्या जीवनात आर्थिक समस्या कायम राहिल्यास होळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करा आणि विष्णू सहस्रनामाचा जप करा.
- होलिकेच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चार मुखी दिवा लावा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा. हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
- याशिवाय व्यवसाय वाढीसाठी आणि नोकरीत प्रगतीसाठी 21 गोमती चक्र घेऊन होलिका दहनाच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला व्यवसायात ही फायदा होईल आणि नोकरीत प्रमोशन ही मिळेल.
- जर तुमच्या जीवनात शत्रूंचे भय वाढले असेल तर त्याच्या निराकरणासाठी होलिका दहनाच्या वेळी सात गोमती चक्र घेऊन देवाची प्रार्थना करा. प्रार्थनेनंतर पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने होलिकेत गोमती चक्र टाका.
- होलिका दहनाच्या वेळी होळीच्या सात प्रदक्षिणा करून अक्षय पुण्य प्राप्त होते.
- या सोबतच, आरोग्याच्या लाभासाठी तुम्ही होलिका दहनाच्या अंगारामध्ये हिरव्या गव्याच्या ओंब्या खा. असे केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतील.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!