होलिका दहन 2022 - Holika Dahan 2022 In Marathi
होळी हिंदू धर्माच्या महापर्वा पैकी एक आहे. या महा पर्वाला लोक रंग, गुलाल आणि बऱ्याच उत्तम पक्वान्न सोबतच, खूप उत्साहाने साजरे करतात. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावतात. काही वाद असतील, नाराजी असेल ती दूर करतात आणि जीवनात नेहमी रंग आणि आनंद भरलेला असो अशी कामना करतात. हा दोन दिवसाचा सण वर्ष 2022 मध्ये 17 मार्च, 2022 ला होलिका दहनाने सुरु होईल. या नंतर 18 मार्च, 2022 ला विविध रंगांसोबत होळी किंवा धूलिवंदन खेळले जाईल.
अॅस्ट्रोसेज च्या या लेख मध्ये तुम्हाला होळीच्या महापर्वाने जोडलेली प्रत्येक माहिती प्राप्त होईल जसे की, होलिकेची स्थापना, होलिका दहनाचा मुहूर्त, पूजा विधी, कोणत्या राशीतील जातकांना किती परिक्रमा केल्या पाहिजे, विभिन्न दोषांपासून सुटका मिळवण्यासाठी काय उपाय केले जाऊ शकतात आणि पौराणिक कथा इत्यादी.
हिंदू पंचांगाच्या अनुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीच्या एक दिवसानंतर होळी खेळली जाते अर्थात, पौर्णिमा तिथी च्या दिवशी होलिका दहन केले जाते. मान्यतेच्या अनुसार, होळी भूमीची उर्वरता तसेच उत्तम यशाचा सण आहे. याचा अर्थ हा आहे की, या खास पर्वात उत्तम पीक येण्याच्या आधीच नवीन पीक येण्याचे स्वागत केले जाते.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर
पौराणिक कथा
धार्मिक मान्यतेच्या अनुसार, भक्त प्रल्हाद एक राक्षस कुटुंबात जन्म घेतला होता परंतु, भगवान विष्णूचे खरे भक्त होते. प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपूला त्यांच्या भक्तीने घृणा होती म्हणून, हिरण्यकश्यपूने त्यांना अनेक कष्ट दिले तसेच, बऱ्याच वेळा त्यांना मारण्याचा ही प्रयत्न केला परंतु, प्रत्येक वेळा हिरण्यकश्यपूला अपयश प्राप्त झाले. नंतर हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकेला भक्त प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी दिली कारण, होलिकेला वरदान मध्ये असे वस्त्र भेटले होते, ज्यावर अग्नीचा काही ही प्रभाव होत नव्हता.
आपल्या भावाच्या आज्ञेचे पालन करून होलिका ते वस्त्र परिधान करून भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन आगीत बसली. त्या नंतर होलिका जळाली परंतु, भक्त प्रल्हादाला काही ही झाले नाही आणि हे त्यांच्या विष्णू भक्तीचा परिणाम होता. याच प्रथेमुळे लोक दर वर्षी होलिका दहन करतात.
होळी ने जोडलेली एक अजून पौराणिक कथा आहे. जे ब्रज जवळच्या क्षेत्रांमध्ये विशेष महत्व ठेवते. या क्षेत्रात होळीला रंगपंचमी च्या नावाने जाणले जाते तसेच, या दिवशी राधा-कृष्णाच्या दिव्य प्रेमाच्या उत्साहाच्या रूपात साजरे केले जाते.
होळीच्या संदर्भात भगवान कृष्णाशी संबंधित आणखी एक आख्यायिका आहे, त्यानुसार, राक्षसी पुतना, एका सुंदर स्त्रीचे रूप धारण करून, बाळ कृष्णाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बाळ कृष्णाने दूध पीत असताना तिला मारले ही होते. विषयुक्त स्तनपानानंतर भगवान श्री कृष्णाचा रंग गडद झाला होता. त्यामुळे लोक चेहऱ्यावर वेगवेगळे रंग लावतात. होळीच्या दिवशी, ब्रज प्रदेशातील लोक लाठमार होळी साजरी करतात, ज्यामध्ये घरातील स्त्रिया आपल्या पतींना त्यांच्या खोडकर वागणुकीसाठी बेदम मारहाण करतात.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
होळी आणि ज्योतिषीय महत्व
वैदिक ज्योतिषाच्या अनुसार, असे मानले जाते की होळी च्या दिवशी व्यक्ती हनुमान जी ची पूजा करून नकारात्मक ऊर्जेपासून नेहमीसाठी सुटका मिळवू शकतात. नाकारात्मकतेला दूर करण्यासाठी व्यक्तीला हनुमान मंदिरात जाऊन गूळ आणि काळा धागा चढवला पाहिजे. या नंतर, "ॐ हनुमते नमः" मंत्राचा जप करून त्या काळ्या धाग्याला धारण केले पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते. तुम्हाला जर वाटले तर तुम्ही त्या काळ्या धाग्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर ही लावू शकतात यामुळे तुमच्या आस-पासच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल.
जसे की, आपण जाणतात की, प्रत्येक राशीची आपली-आपली विशेषतः असते आणि याच विशेषतेच्या आधारावर आम्ही तुम्हाला तुमच्या राशी नुसार, सांगू की, तुम्ही होळी कश्या प्रकारे साजरी केली पाहिजे. कश्या प्रकारे पूजन केले पाहिजे. किती परिक्रमा केल्या पाहिजे तसेच, काय-काय उपाय केले पाहिजे.
होलिका दहन
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळी ची एक रात्र आधी होलिका दहन केले जाते. या दिवशी लोक लाकडांचा एक अलाव बनवतात, जे त्या चिता ला दर्शवते ज्यावर भक्त प्रल्हाद होलिकेच्या माडीवर बसलेले होते आणि विष्णू भक्तीच्या कारणाने काही ही नुकसान न होता वाचले होते. या चितेवर लोक शेणाने बनलेल्या काही खेळणी ठेवतात तसेच, चिताचे शीर्ष (सर्वात वरती) भक्त प्रल्हाद आणि होलिका सारख्या काही लहान लहान आकृती ठेवतात.
चिते मध्ये आग लागल्यानंतर लोक पौराणिक कथेला अनुसरून भक्त प्रल्हादाच्या आकृतीला बाहेर काढतात. मान्यतच्या अनुसार, होलिका दहन वाईट गोष्टींवर चांगल्यांचा विजय चे प्रतीक आहे आणि यामुळे लोकांना देवावर खरा विश्वास ठेवण्याच्या शक्यताच खरा अर्थ समजतो.
त्या चितेमध्ये लोक अशी सामग्री फेकतात, ज्यामध्ये स्वच्छता आणि अँटिबायोटिक गुण असतात. जे पर्यावरणाला शुद्ध ठेवण्यात बरीच मदत करतात.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
होलिका दहन अनुष्ठान विधी
होलिका स्थापना
होलिका स्थापित करण्याच्या स्थानावर पवित्र जल किंवा गंगा जलाने स्वच्छ करा.
मध्यभागी एक लाकडी खांब ठेवून त्याच्या आजूबाजूला लाकडे, गोवऱ्या, हरकड्याच्या माळा ठेवाव्यात.
या ढिगावर गाईच्या शेणाने बनलेली भक्त प्रल्हादाची आणि होलिकेची मूर्ती ठेवा.
या नंतर याला फुलांनी सजवा.
होलिका पूजन विधी
- पूजेचे साहित्य ताटात ठेवावे. त्या ताटात शुद्ध पाण्याचा तांब्या ठेवा. जेव्हा तुम्ही पूजेच्या ठिकाणी असाल तेव्हा तुम्ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. या नंतर, पूजेचे ताट आणि पवित्र पाणी स्वतःवर शिंपडा.
- हिंदू धर्मानुसार, कोणत्या ही पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते म्हणून, सर्व प्रथम श्री गणेशाची पूजा करावी. या नंतर देवी अंबिका आणि नंतर भगवान नरसिंहाची पूजा करा. या तिन्ही भक्तांनी पूजा केल्यानंतर प्रल्हादाचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
- शेवटी, हात जोडून होलिकाची पूजा करा आणि आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी तिचा आशीर्वाद घ्या.
- होलिकावर सुगंध, तांदूळ, दाळ, फुले, हळद आणि नारळ अर्पण करा. या नंतर होलिके भोवती कच्चा धागा बांधून प्रदक्षिणा घालावी. या नंतर होलिकाला जल अर्पण करावे.
- आता होलिका दहन करा तसेच या मध्ये नवीन धान्याच्या ओंब्या आणि इतर सामग्री चढवा किंवा भाजून घ्या.
- शेवटी भाजलेल्या ओंब्या किंवा खोबरे होलिकेचा प्रसाद म्हणून लोकांमध्ये वाटा.
होलिका दहनात कोणत्या राशीच्या व्यक्तींना किती परिक्रमा केल्या पाहिजे
- मेष: 9
- वृषभ: 11
- मिथुन: 7
- कर्क: 28
- सिंह: 29
- कन्या: 7
- तुळ: 21
- वृश्चिक: 28
- धनु: 23
- मकर: 15
- कुंभ: 25
- मीन: 9
राशी अनुसार होलिका दहनाच्या दिवशी केले जाणारे उपाय
होलिका दहन में आहुति देने का बहुत बड़ा महत्व है। यहां हम आपको आपकी राशि के अनुसार होलिका दहन के दौरान किए जाने वाले ज्योतिषीय उपाय बताएंगे, जिससे आपको सुख-समृद्धि की प्राप्ति होगी।
मेष
उपाय: होलिका दहनात गुळाची आहुती द्या.
वृषभ
उपाय: होलिका दहनात खाडी साखरेची आहुती द्या.
मिथुन
उपाय: होलिका दहनात गव्हांच्या ओंब्यांची आहुती द्या.
कर्क
उपाय: होलिका दहन वेळी तांदूळ किंवा सफेद तिळाची आहुती द्या.
सिंह
उपाय: होलिका दहनात कापूरा ची की आहुती द्या.
कन्या
उपाय: होलिका दहनात पान आणि हिरवी इलायची ची आहुती द्या.
तुळ
उपाय: होलिका दहनात कापूराची आहुती द्या.
वृश्चिक
उपाय: होलिका दहनात गुळाची आहुती द्या.
धनु
उपाय: होलिका दहनात चण्याच्या दाळीची आहुती द्या.
मकर
उपाय: होलिका दहनात काळ्या तिळीची आहुती द्या.
कुंभ
उपाय: होलिका दहनात काळ्या सरसोची आहुती द्या.
मीन
उपाय: होलिका दहनात पिवळ्या सरसोची आहुती द्या.
होळी च्या दिवशी या अचूक उपायांना करून करा बऱ्याच दोषांना दूर
- डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी एक नारळ घ्या. ते सात वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवा आणि होलिका दहनात जाळावे. असे केल्याने केवळ दृष्टीदोष तर दूर होईलच पण तुमच्या कामातील सर्व अडथळे ही दूर होतील.
- ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळत नाहीत, त्यांनी होलिका दहनाची भस्म घेऊन त्याचे लॉकेट बनवून ते गळ्यात घालावे. यामुळे त्यांना सकारात्मक परिणाम मिळू लागतील.
- होलिका दहनाचा भस्म कपाळाला लावा. हे समृद्धी आणते आणि तुम्हाला अधिक आकर्षक बनवते. या शिवाय तीच राख एका पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा आणि जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
- आपल्या हातात 7 गोमती चक्रे घ्या आणि आपल्या इष्ट देवतेच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. नंतर ते होलिकेत पुरेसे जाळून टाका. ज्या विवाहित लोकांमध्ये वारंवार भांडणे किंवा वाद होतात त्यांनी हे गोमती चक्र भगवान शिव आणि माता पार्वतीला एकत्र अर्पण करावे. त्यामुळे नात्यात सुधारणा होऊन जवळीक वाढू लागते.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!