शनी ला सोडून गुरु सोबत मंगळ ची युती!
वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला जमीन, सेना, पराक्रम, ऊर्जा इत्यादींचा कारक प्राप्त आहे. राशीच्या चक्राच्या समस्त राशींपैकी मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा शासक ग्रह आहे. या शिवाय मकर राशीमध्ये मंगळ उच्च स्थानावर आहे आणि कर्क राशीमध्ये नीच आहे.
आता अलीकडे, मंगळवार, 17 मे, 2022 रोजी लाल ग्रह मंगळ आपले संक्रमण करून कुंभ मधून निघून त्याचा मित्र ग्रह गुरू बृहस्पतीच्या मीन राशीत विराजमान आहे. जी आता सोमवार, 27 जून रोजी पहाटे 5 वाजून 39 मिनिटांपर्यंत राहील. अशा स्थितीत, मंगळ चे मीन मध्ये अन्य ग्रहांसोबत त्यांची खास युती निर्माण करून देश आणि जगावर याचा खास प्रभाव पडेल. चला तर आता मंगळाच्या या स्थितीवर एक नजर टाकूया:
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
शनी चा साथ सोडून गुरु सोबत युती करेल मंगळ
- मीन राशीत मंगळाच्या राशी बदलामुळे तिथे आधीच उपस्थित असलेल्या गुरूशी त्यांची भेट होईल. यामुळे मीन राशीमध्ये मंगळ-गुरू शुभ संयोग निर्माण करतील. ज्योतिष शास्त्रात गुरू आणि मंगळाचा संयोग शुभ योगांच्या श्रेणीत ठेवण्यात आला आहे.
- या शिवाय कुंभ राशीतून बाहेर पडल्यानंतर मीन राशीतील मंगळाचे संक्रमण, कुंभ राशीत शनी आणि मंगळाच्या संयोगामुळे तयार झालेला अशुभ योग ही संपुष्टात येईल.
- मंगळाची जुळवा-जुळव आणि त्याचा प्रभाव जवळ जवळ सर्व राशींवर थेट परिणाम करणार आहे.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
मंगळाच्या संक्रमणाने या राशीचा होईल भाग्योदय
- अॅस्ट्रोसेज च्या वरिष्ठ तज्ञांच्या मते, मीन राशीतील मंगळाचे संक्रमण वृषभ, तुळ, मकर आणि मीन राशीच्या जातकांसाठी सर्वात शुभ असणार आहे.
- या संक्रमणाच्या परिणामस्वरूप, या चार ही राशीच्या जातकांना त्यांच्या कार्य क्षेत्रात (मग ते नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित असो) चांगले प्रदर्शन करून यश मिळविण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळणार आहेत.
- व्यवसायात पदोन्नती किंवा विस्ताराचा विचार करणाऱ्यांना नशिबाची साथ मिळेल.
- घरातील कोणत्या ही सदस्याशी किंवा जवळच्या मित्राशी आणि कुटुंबातील सदस्यासोबत वाद सुरू असेल तर, तो ही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
- आर्थिक बाजूनेही परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे दिसून येईल.
- आरोग्य जीवनात देखील सकारात्मक बदल होतील, ज्यामुळे तुम्ही खुलेपणाने चांगल्या आरोग्याचा आनंद घेताना दिसतील.
या राशींना मिळतील कर्मानुसार फळ
- ज्योतिषांच्या मते, मंगळाचे हे संक्रमण मिथुन, कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीसाठी सरासरी परिणाम देणारे आहे.
- त्यामुळे या चार ही राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे.
- म्हणून, त्यांना इकडे-तिकडे सर्व गोष्टींमध्ये वेळ न घालवता, त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो.
- तथापि, गुरु-मंगळाचा शुभ संयोग आणि दृष्टी काही क्षेत्रांमध्ये नेहमीपेक्षा चांगले परिणाम देण्याची शक्यता देखील निर्माण करेल.
या राशींना राहावे लागेल सावधान
- मीन राशीत मंगळाचे संक्रमण होताच विशेषतः मेष, सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या जातकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
- कारण हे संक्रमण या चार राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणाशी संबंधित काही प्रतिकूल परिणाम देऊ शकते.
- त्यामुळे वाढत्या मानसिक आणि शारीरिक ताणासोबतच या लोकांना अस्वस्थतेचा ही सामना करावा लागणार आहे.
- या कालावधीमुळे त्यांचा इतर कोणाशी ही मोठा वाद होऊ शकतो.
- या सोबतच आर्थिक अडचणींशी संबंधित समस्या ही त्यांच्यासाठी संभवतात.
आता घरी बसल्या करा ग्रह संबंधित शांती पूजा आणि त्या ग्रहाच्या दुष्प्रभावांना करा दूर!
अशुभ प्रभावांपासून बचाव करण्यासाठी कारगर व सरळ उपाय
आता आपण त्या प्रभावी उपायांबद्दल बोलूया ज्याचा अवलंब करून व्यक्ती आपल्या कुंडलीतील मंगळ किंवा मंगळ दोषाचा अशुभ प्रभाव बर्याच अंशी टाळू शकतो:-
- नियमितपणे काही महत्त्वाच्या कामासाठी निघताना मध खाऊन घराबाहेर पडावे.
- कपाळावर लाल चंदनाचा तिलक लावावा.
- दर मंगळवारी हनुमानजींची पूजा करून त्यांना लाल सिंदूर लावा आणि प्रसाद भेट करा.
- श्रद्धेनुसार कोणत्या ही तांब्याच्या भांड्यात धान्य टाकून मंगळवारी कोणत्या ही हनुमान मंदिरात धान्य दान करा.
- घराच्या छतावर मातीच्या भांड्यात पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवा.
- गरीब आणि गरजूंना लाल मसूर आणि बुंदी दान करा.
महागाईला घेऊन अॅस्ट्रोसेज ची भविष्यवाणी
- अॅस्ट्रोसेज वार्ता च्या ज्येष्ठ ज्योतिषींच्या मते, मंगळाच्या या संक्रमणामुळे भारतात तांबे, सोने आणि चांदीच्या किमती वाढू शकतात.
- याशिवाय कापूस, लाकूड, गूळ, कापड, प्लास्टिक आणि रासायनिक वस्तूंच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार आहे.
- शेअर बाजारातील चढ-उतारानंतर मंगळ देव ही वेग वाढवतील.
- जगभरातील यंत्र सामग्री आणि उद्योगांमध्ये ही महागाई दिसून येईल.
- तथापि, मंगळ देवाच्या प्रभावामुळे खाद्यपदार्थांच्या किमती कमी होत असताना भारतातील तसेच इतर काही देशांतील जातकांना काहीसा दिलासा मिळेल.
देश-जग याला घेऊन अॅस्ट्रोसेज ची भविष्यवाणी
- लाल ग्रहामुळे जगभरात हवा, पाणी किंवा शस्त्रास्त्रांशी संबंधित कोणती ही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता जास्त आहे.
- भारतातील काही राज्यांमध्ये जोरदार वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- या काळात भूकंप किंवा इतर कोणती ही मोठी नैसर्गिक आपत्ती ही जगात पाहायला मिळेल.
- देशात सरकार बदल ही शक्य आहेत.
- लष्कर आणि पोलीस विभागाच्या कार्यवाहीशी संबंधित बाबी समोर येतील.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!