मनोज बाजपेयी यांच्या बायोग्राफी ने खोलले त्यांच्या ज्योतिष संबंधीत राज
काय तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसेल की, अभिनेता मनोज बाजपेयी चा जन्म झाला तेव्हाच त्यांच्या वडिलांना माहिती होते की, ते मोठे होऊन काय बनतील? मनोज बाजपेयी यांच्या जीवनावर पत्रकार पियुष पांडे यांनी लिहिलेल्या बायोग्राफी मध्ये उघड झाले आहे की, मनोज बाजपेयी च्या जन्माच्या वेळीच त्यांच्या गावातील ज्योतिषी पंचानंद मिश्रा यांनी भविष्यवाणी केली होती की, मनोज मोठे होऊन नेता किंवा अभिनेता बनतील. बायोग्राफी मध्ये मनोज चे पिता राधाकांत बाजपेयी यांच्या सांगण्यानुसार पियुष यांनी लिहिलेले आहे “बेतिया मध्ये पंचानंद मिश्रा नावाचे एक ज्योतिषी होते. त्यांनी मनोज यांची कुंडली पाहिल्यानंतर सांगितले होते की, हा मुलगा खूप नाव कमवेल. त्यांनी त्याच वेळी सांगितले होते की, हा मुलगा एकतर नेता किंवा अभिनेता बनेल. दोघांपैकी हा ज्या ही कुठल्या क्षेत्रात जाईल, हा तिथे नाव करेल.” मनोज बाजपेयी यांच्याकडे आत्ता ही पंचानंद मिश्रा यांनी बनवलेली ती जुनी जन्म पत्रिका आहे.
या बायोग्राफी मध्ये खुलासा झाला आहे की, मनोज बाजपेयी स्वतः ही ज्योतिष चे विद्यार्थी होते. त्यांना न फक्त ज्योतिष विषयी प्रेम आहे तर, ज्योतिषाचे ज्ञान ही आहे. उत्साहाची गोष्ट ही आहे की, जेव्हा पियुष पांडे यांनी त्यांना अॅस्ट्रोसेजडॉटकॉम निर्मित मोबाइल कुंडली अॅप्लिकेशन च्या बाबतीत सांगितले तर, ते अॅप आधीपासून त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोडेड होते.
मनोज बाजपेयी यांच्या काही ज्योतिषीय अनुभवांना ही पुस्तकात जागा भेटलेली आहे. ‘मनोज बाजपेयी : कुछ पाने की ज़िद’ नावाच्या या बायोग्राफी मध्ये एक जागा मनोज यांचा एक आवडता किस्सा आहे. पुस्तकात मनोज म्हणतात, “मी एक फिल्म प्रोजेक्ट साठी जैसलमेर गेलो होतो. तेथे प्रचलित अभिनेता श्रीवल्लभ व्यास च्या वडिलांना भेटलो, जे नामांकित ज्योतिष होते. ते बरेच म्हातारे होते आणि मोठ्या कठिनतेने बोलू शकत होते. मी त्यांना विचारले की, कृपया, मला सांगा या आंतराष्ट्रीय फिल्म प्रोजेक्ट चे काय होईल? ते बोलले, काही होणार नाही. मी परत विचारले, अंकल, कृपया पुन्हा पहा, काहीतरी तर नक्कीच होईल. ते परत बोलले, नाही, मला काही दिसत नाहीये. मी परत आलो. माझ्या मनातील एक हिस्सा म्हणत होता की, हे खरे आहे, तर एक हिस्सा म्हणत होता की, हे खरे नाही. आम्ही सर्व शूट संपवून परत आलो आणि खरंच काही झाले नाही.”
या ज्योतिषीय भविष्यवाणीमुळे ही संभवत: मनोज बाजपेयी यांचा ज्योतिष मध्ये विश्वास वाढवला असेल.
‘मनोज बाजपेयी : कुछ पाने की ज़िद’ नावाने प्रकाशित या बायोग्राफी ला पेंगुइन इंडियाने प्रकाशित केले आहे. या बायोग्राफी मध्ये मनोज बाजपेयी यांच्या जीवनाने जोडलेल्या बऱ्याच रंजक गोष्टी आहेत. मनोज बाजपेयी च्या आधी राजकारण कुणाला मिळाले होते, आणि कोणत्या अभिनेत्याच्या रोल ची संधी न घेतल्याने मनोज यांना वीरेंद्र प्रताप चा अविस्मरणीय रोल भेटला? शेवट का मनोज बाजपेयी यांचे राम गोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप सोबत जबरदस्त वाद झाले? का मनोज बाजपेयी एकवेळी जीव देण्याच्या विषयावर विचार करायला लागले होते? तथापि, फिक्शन च्या अंदाजात लिहिलेल्या या बायोग्राफी मध्ये मनोज बाजपेयी च्या संघर्ष आणि जीवनयात्रेला खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केले आहे आणि ज्योतिष चा त्यांच्या कनेक्शन बद्दल प्रत्येक तो किस्सा सांगितला आहे की, जीवनात बरेच काही निर्धारित आहे.