रक्षाबंधन 2022 - Raksha Bandhan 2022 In Marathi
रक्षाबंधन हा हिंदू धर्माचा असाच एक सण आहे, ज्याची सर्व बंधू-भगिनी वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या आपल्या लाडक्या भावा-बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी लोक मैलोन मैल प्रवास करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. प्राचीन परंपरेनुसार, या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर पवित्र धागा बांधतात आणि त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतात. मात्र, काळानुसार रक्षाबंधनाच्या प्रथांमध्ये काही बदल झाले आहेत. आता हा सण फक्त बंधू-भगिनींपुरता मर्यादित नाही तर, तो प्रत्येक व्यक्तीला समर्पित आहे ज्यांच्या सोबत तुम्हाला सुरक्षित वाटते. सध्या अनेक भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला राखी बांधतात तर, काही बहिणी आपल्या बहिणीला राखी बांधतात. हे दृश्य रक्षाबंधनाची पवित्रता आणि सौंदर्य दर्शवते.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
नात्यात नेहमी गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि शुभ फळ मिळण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बंधू-भगिनींनी काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेऊया. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, ज्यामुळे बहिणीला आनंद होईल म्हणूनच, अॅस्ट्रोसेज खास तुमच्यासाठी 12 छान भेटवस्तू कल्पना घेऊन येत आहे, पण त्याआधी रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
रक्षाबंधन 2022: मुहूर्त
मराठी महीना: श्रावण
रक्षाबंधन 2022 तिथी: 11 ऑगस्ट 2022
रक्षाबंधन 2022 प्रदोष मुहूर्त: 20:52:15 पासून 21:13:18
नोट: वर दिलेला मुहूर्त नवी दिल्लीसाठी वैध आहे. तुमच्या शहरानुसार या दिवसाचा मुहूर्त जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
रक्षाबंधनाच्या दिवशी या गोष्टींची घ्या काळजी
- रक्षाबंधन हा प्रेम, आपुलकी आणि आनंदाचा सण आहे, त्यामुळे या दिवशी कोणत्या ही प्रकारचे वाद-विवाद टाळावेत.
- सनातन धर्माच्या प्रत्येक सणाप्रमाणेच रक्षाबंधन हा देखील अतिशय शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी भाऊ आणि बहिणीने पहाटे लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत.
- भावाच्या मनगटावर राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे याची विशेष काळजी घ्यावी. राखी कधी ही दक्षिण दिशेला तोंड करून बांधू नये कारण, असे करणे अशुभ मानले जाते.
- रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाल आणि भद्रा काळात राखी बांधू नये कारण, हा काळ अशुभ मानला जातो. राखी नेहमी शुभ मुहूर्तावरच बांधावी.
- कधी ही तुटलेली राखी किंवा खंडित राखी बांधू नये.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
- रक्षाबंधनासाठी राखी खरेदी करताना लक्षात ठेवा की, ओम, स्वस्तिक, कलश इत्यादी शुभ चिन्हे योग्य असावीत. अशुभ किंवा चुकीची चिन्हे असलेली राखी खरेदी करणे टाळा.
- राखी बांधताना भाऊ आणि बहिणीने आपले डोके रुमालाने किंवा ओढणीने झाकावे.
- बहिणींनी विशेष काळजी घ्यावी की, तुम्ही तुमच्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावरच राखी बांधावी कारण, डाव्या हातात राखी बांधल्याने नकारात्मक परिणाम मिळतात.
- रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताना सर्वप्रथम "प्रथम पूजनीय देव" श्री गणेशाचे तिलक करावे आणि नंतर राखी बांधावी.
- या दिवशी भावांनी आपल्या बहिणींना कोणत्या ही प्रकारची तीक्ष्ण वस्तू देणे टाळावे अन्यथा, त्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
रक्षाबंधनला हे गिफ्ट देण्याने प्रफुल्लित होईल बहिणीचा चेहरा
- ज्वेलरी: कोणत्याही मुलीला भेटवस्तू देण्यासाठी दागिने हा सर्वोत्तम पर्याय आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय बहिणीला ब्रेसलेट, कानातले, पैंजण इत्यादी दागिने देऊ शकतात.
- हेडफोन गॅझेट: जर तुमची बहीण आजच्या युगातील मुलगी असेल, जिला गाणी किंवा गॅजेट्स ऐकण्याची खूप आवड असेल तर, तुम्ही तिला हेडफोन आणि गॅजेट्स गिफ्ट करू शकता.
- घड्याळ: आजच्या काळात, प्रत्येकाला घड्याळ घालणे आवडते, ते तुमचा लूक आकर्षक बनवते तसेच, तुम्हाला वेळेची माहिती देते. तुम्ही तुमच्या बहिणीला एक सामान्य घड्याळ किंवा स्मार्ट वॉच भेट देऊ शकतात. ही भेट तुमच्या बहिणीला वेळोवेळी तुमची आठवण करून देईल.
- स्नीकर्स: आपल्याकडे किती ही स्नीकर्स असले तरी ते क्वचितच सापडतात, त्यामुळे तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाला स्नीकर्स देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो, जो ती कधी ही कुठेही घालू शकते.
- पुस्तके: जर तुमच्या बहिणीला पुस्तके किंवा कादंबऱ्या वाचायला आवडत असतील तर, तुम्ही तिला रक्षाबंधनाला तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक किंवा कादंबरी देऊ शकता, जे तिला खूप आवडेल.
- किंडल: किंडल हे उद्याचे भविष्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाचनाची आवड असलेल्या तुमच्या बहिणीसाठी किंडल ही एक अद्भुत भेट आहे, जिथे तुमच्या बहिणीला एकाच ठिकाणी हजारो पुस्तके मिळतील.
- मनपसंद ठिकाण: जर तुमच्या बहिणीला प्रवास करायला आवडत असेल किंवा रेस्टॉरंट किंवा कॅफे सारखी एखादी जागा तिला खूप आवडत असेल, तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तिला त्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. या दिवसाच्या गोड आठवणी तुम्हा दोघांच्या ही हृदयात सदैव जिवंत राहतील.
- नवीन कपडे: असं म्हणतात की मुलीकडे किती ही कपडे असले तरी तिच्याकडे नेहमी कमीच असतात असे दिसते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बहिणीला नवीन कपडे जसे की ड्रेस किंवा सूट इत्यादी भेट देऊ शकतात.
- शॉपिंग वाउचर: मुलींना खरेदी करायला आवडते म्हणून, जर तुम्ही तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाला शॉपिंग व्हाउचर गिफ्ट केले तर ती तिच्यासाठी सर्वोत्तम भेट असू शकते.
- मेकअप: रक्षाबंधनाच्या खास प्रसंगी आपल्या बहिणीला मेकअपचे सामान देणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. मेकअप मध्ये तुम्ही तुमच्या बहिणीला लिपस्टिक, आय शॅडो, मस्करा, मेकअप ब्रश इत्यादी देऊ शकता किंवा तुमच्या बहिणीला मेकअप हॅम्पर ही देऊ शकता.
- पर्स: आजच्या आयुष्यात पर्स किंवा वॉलेटचा वापर सर्रास झाला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला ही एक छानशी पर्स गिफ्ट करू शकतात.
- मनपसंद डिश: तुम्ही तुमच्या बहिणीला स्वतःच्या हातांनी बनवलेली आवडती डिश बनवून खायला देऊ शकता, ज्याची चव तुमच्या नात्यात गोड बनून नेहमीच टवटवीत राहील.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!