सूर्य-शुक्र युती कन्या राशी - Sun-Venus Conjunction in Virgo In Marathi
सप्टेंबर महिन्यात कन्या राशीत मोठी हालचाल होणार आहे. किंबहुना, या काळात जिथे एकीकडे बुध कन्या राशीत वक्री स्थितीत असेल तर, दुसरीकडे सूर्य आणि शुक्र यांची युती ही या राशीत तयार होणार आहे. अशा स्थितीत सूर्य आणि शुक्र यांच्या युतीने कोणता योग तयार होतो, या संयोगाचा काय परिणाम होतो, हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल.
हे देखील जाणून घ्या की सूर्य, शुक्र आणि वक्री बुध यांची युती कोणत्या राशीच्या जातकांसाठी शुभ राहील आणि या काळात कोणाला काळजी घ्यावी लागेल. सप्टेंबर महिन्यात कन्या राशीत ही युती कधी होणार आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊ.
सूर्य आणि शुक्राच्या संक्रमणाने तुमच्या राशीमध्ये काय खास बदल होणार आहेत आत्ताच आमच्या विशेषज्ञ ज्योतिषांना कॉल करा
कन्या राशीमध्ये वक्री बुध, सूर्य आणि शुक्र
सर्व प्रथम, जर आपण कन्या राशीतील वक्री बुध बद्दल बोललो तर, ही घटना 10 सप्टेंबर 2022 रोजी होईल. या दरम्यान बुद्धिमत्ता आणि वाणीचा ग्रह बुध शनिवारी सकाळी 8:42 वाजता कन्या राशीत वक्री होईल. साधारणपणे असे दिसून येते की, बुध ग्रहाच्या वक्रीमुळे जातकांच्या वाणी आणि बुद्धीवर खूप प्रभाव पडतो.वक्री बुधाचा आपल्या राशीवर विस्तृत प्रभाव जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख वाचा.
यानंतर 17 सप्टेंबर रोजी तेजस्वी ग्रह सूर्य कन्या राशीत संक्रमण करेल. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मा, पिता, सरकारी नोकरी इत्यादींचा कारक मानला जातो. जर आपण या संक्रमणाच्या वेळेबद्दल बोललो तर, शनिवारी, 17 सप्टेंबर 2022 रोजी सूर्यदेव सकाळी 7:11 वाजता कन्या राशीत संक्रमण करतील. सूर्याचा कन्या राशीमध्ये कसा प्रभाव असेल हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख वाचा.
यानंतर अखेरीस म्हणजेच 24 सप्टेंबरला शुक्र ही कन्या राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, विलास, सौंदर्य इत्यादींचा कारक मानले गेले आहे. अशा परिस्थितीत, जर आपण या संक्रमणाच्या कालावधीबद्दल बोललो तर, शुक्राचे हे महत्त्वपूर्ण संक्रमण शनिवार, 24 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 8:51 वाजता होईल. शुक्राचे कन्या राशीमध्ये संक्रमणाने आपल्या राशीवर विस्तृत प्रभाव जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
कन्या मध्ये सूर्य शुक्राची युती
कन्या राशीत निर्माण होणारी ही युती सुद्धा महत्वाचा आहे कारण, ज्योतिष शास्त्रात हा एकच असा संयोग आहे जिथे संयोगात असलेले दोन्ही ग्रह खूप शुभ असतात पण त्याचा परिणाम अशुभ असतो. कारण जेव्हा जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो अस्त होतो आणि त्याचे शुभ परिणाम गमावतो. शुक्राच्या बाबतीत ही असेच काहीसे घडेल, जेव्हा त्याचा सूर्याशी संयोग होईल तेव्हा त्याचे शुभ परिणाम कमी होतील. रवि आणि शुक्राची युती देखील जातकांच्या वैवाहिक जीवनासाठी फारशी अनुकूल मानली जात नाही.
सूर्य आणि शुक्र या दोन ग्रहांच्या संयोगाने तयार होणाऱ्या योगास 'युति योग' म्हणतात. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, हे संयोग वैवाहिक जीवनासाठी विशेषतः अनुकूल मानले जात नाही. अशा स्थितीत ज्या राशीमध्ये सूर्य आणि शुक्र संयोग स्थानी असतात, अशा जातकांना वैवाहिक सुखात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांना लग्नात विलंबाला सामोरे जावे लागते तसेच, अनेक बाबतीत शुक्र ग्रहाशी संबंधित आजारांना ही सामोरे जावे लागते.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
सूर्य शुक्राची युती: जाणून घ्या अर्थ आणि उपाय
शुक्र ग्रह एकीकडे प्रेम, सौंदर्य आणि कलात्मकता प्रदान करण्यासाठी ओळखला जातो तर, सूर्य हा आत्मा, पिता इत्यादींचा करक मानला जातो. अशा स्थितीत जेव्हा हे दोन ग्रह युती मध्ये असतात, तेव्हा व्यक्तीच्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे परिणाम दिसून येतात.
तथापि, ज्यांना त्यांचे व्यक्तिमत्व वाढवायचे आहे त्यांच्यासाठी हे संयोजन आदर्श सिद्ध होऊ शकते. दुसरीकडे, या युतीमुळे जातकांचे नाते मैत्रीपूर्ण आणि गोड ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.
- सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे व्यक्तीमध्ये परस्पर समंजसपणाचा अभाव असू शकतो.
- याशिवाय जीवनाच्या विविध क्षेत्रात चढ-उतार येण्याची शक्यता आहे.
- शुक्र आणि सूर्यापेक्षा या युतीमध्ये सूर्याचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळे नातेसंबंधात अहंकार किंवा इतर समस्या येण्याची दाट शक्यता आहे.
- या सोबतच, एकीकडे तुम्हाला जीवनातील आव्हानांवर मात कशी करायची हे शिकवेल तर, दुसरीकडे तुमचे मित्र आणि कौटुंबिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुमचा अहंकार दूर ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे देखील तुम्हाला समजेल.
आपल्या राशीनुसार जाणून घ्या आपले व्यक्तित्व, स्वभाव आणि स्वास्थ्य
सूर्य शुक्राच्या युतीचे उपाय
- आपल्या वडिलांचा आदर करा.
- गाईंना ताजी भाकरी खायला द्या.
- दररोज सूर्य नमस्कार करा आणि सूर्याला अर्घ्य द्या.
- नियमितपणे देवी दुर्गेची पूजा करा.
- कोणते ही सोन्याचे दागिने घाला.
- या शिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शुद्ध चांदीची अंगठी ही घालू शकता.
- दूध आणि नारळ दान करा.
सूर्य शुक्र युतीचा प्रभाव
सूर्य आणि शुक्राच्या युतीचा सर्व राशींवर काय परिणाम होईल याबद्दल बोलायचे झाले तर,
मेष राशि: या दरम्यान तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ राशि: तुमच्या आयुष्यात काही मोठे दु:ख असू शकते. त्यामुळे काळजी घ्या.
मिथुन राशि: या काळात तुम्हाला सरकारकडून काही फायदा मिळू शकतो आणि हा फायदा खूप अनपेक्षित असेल.
कर्क राशि: या काळात तुमच्या अधिकारात वाढ दिसून येईल.
सिंह राशि: नोकरीच्या दृष्टीने वेळ अनुकूल राहील. या दरम्यान, आपल्या इच्छित ठिकाणी जागा बदलण्याची शक्यता निर्माण केली जात आहे.
कन्या राशि: तुमच्या आयुष्यात एक मोठा आणि अचानक बदल घडू शकतो.
तुळ राशि: व्यावसायिकांसाठी काळ उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती दिसेल.
वृश्चिक राशि: शत्रूवर विजय मिळविण्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे.
धनु राशि: या दरम्यान तुमची कीर्ती वाढण्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या बाजूने आनंदाचे मजबूत योग बनत आहेत.
मकर राशि: सामान्य जीवन अनुकूल राहील तथापि, कौटुंबिक जीवनात काही समस्या, वाद-विवाद दिसून येतील.
कुंभ राशि: तुमची सर्व रखडलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.
मीन राशि: एखाद्या शुभ कामावर पैसे खर्च होऊ शकतात.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!