मंगळचे सिंह राशीमध्ये संक्रमण आणि प्रभाव (20 जुलै, 2021)
मंगळ ग्रह, गतिशीलता आणि जीवन शक्तीचा कारक ग्रह मानला जातो आणि सर्व ग्रहांपैकी याला एक योद्धा आणि सेनेचा नायकाचा दर्जा प्राप्त आहे. कुंडली मध्ये याची उत्तम स्थिती व्यक्तीला युवा उर्जने भरते आणि सोबतच उत्तम शक्ती ही प्रदान करते खासकरून जेव्हा हे लग्न मध्ये असेल.
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
मंगळ ला भावुक प्रेमी मानले जाते जे प्रेम आणि रोमांस आणि आकर्षण आणते. अग्नी आणि भूमी चे कारक ग्रह मंगळ, संपत्तीचा कारक भाव होण्याने संपत्ती आणि भूमी प्रदान करते. याचा संबंध हाडे आणि रक्ताने मानले जाते म्हणून, ज्या लोकांच्या कुंडली मध्ये ही उत्तम स्थिती असते त्यांना उत्तम सर्जन बनण्याला प्रेरित करते. शनी च्या स्वामित्वाच्या राशीमध्ये मकर राशीमध्ये हा उच्च असतो आणि चंक्र देवाच्या स्वामित्वाच्या कर्क राशीमध्ये नीच असतो. हे संक्रमण मंगळ ग्रहाला परत ऊर्जेने भरेल कारण, हे भावनांचे संकेत कर्क राशीमधून निघून सूर्याच्या गर्मी मध्ये प्रवेश करेल. सिंह राशीमध्ये मंगळ 20 जुलै 2021 ला 17.21 वर प्रवेश करेल. मंगळ 6 सप्टेंबर 2021 पर्यंत सिंह राशीमध्ये राहील आणि 6 सप्टेंबरला सकाळी 3.21 वाजता कन्या राशीमध्ये प्रवेश करेल.
चला पाहूया की, सर्व राशींसाठी मंगळ चे हे संक्रमण कसे राहील.
हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. याच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी ज्योतिषींसोबत फोनवर किंवा चॅट ने जोडा.
मेष
मेष राशीतील जातकांसाठी मंगळ त्यांच्या आत्मा आणि शरीराच्या प्रथम आणि अनिश्चिततेच्या आठव्या घराचा स्वामी आहे कारण, हे तुमच्या लग्न चा स्वामी आहे म्हणून, हे मेष राशीतील जातकांसाठी महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. हे मेष राशीतील जातकांच्या मूड आणि दिन प्रतिदिन जीवनाला प्रभावित करतो. वर्तमानात मंगळचे संक्रमण तुमच्या अध्ययन, प्रेम आणि मुलांच्या पाचव्या घरात होत आहे. या भावात मंगळ असण्याने पोट संबंधीत समस्या जसे, जळजळ आणि ऍसिडिटी तुम्हाला होऊ शकते. तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि खूप गरम आणि मसाल्याचे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो अथवा तुमचे आरोग्य खराब होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला या काळात वाहन चालवतांना सावधान राहावे लागेल कारण, मंगळची चतुर्थ दृष्टी तुमच्या आठव्या भावावर असेल यामुळे तुम्हाला दुर्घटनेचा खतरा होईल. जे लोक रोमँटिक नात्यामध्ये आहे त्यांनी सावध राहा कारण, तुमची तीव्र भावना आणि काही कार्य तुमच्या प्रिय ला चिंतीत करू शकतात आणि तुमच्या प्रेम जीवनात समस्या येऊ शकतात. तुमचे आर्थिक जीवन उत्तम राहील आणि तुमच्या अकराव्या भावात मंगळाची दृष्टी होण्याच्या कारणाने अप्रत्यक्षित किंवा अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.
उपाय- मंगलवारी उपवास ठेवा.
वृषभ
वृषभ राशीतील लोकांसाठी मंगळ ग्रह हानी आणि विदेश यात्रेच्या द्वादश भावाचा स्वामी आहे या सोबतच, हे तुमच्या विवाहाच्या सप्तम भावाचा स्वामी ही आहे. वर्तमान संक्रमणाच्या वेळी हे कुटुंब आणि सुखाच्या तुमच्या चौथ्या भावात असेल. ही मंगळाची स्थिती तुमच्या आईच्या आरोग्यासाठी चांगली सांगितली जाऊ शकत नाही. त्यांचे आरोग्य बिघडू शकते, तुम्ही त्यांचे नियमित चेकअप केले पाहिजे आणि हे सुनिश्चित केले पाहिजे की, ह्या वेळी चांगल्या प्रकारे घ्या. जर कुठल्या संपत्ती मध्ये गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे तर, ही वेळ अनुकूल आहे, तुम्ही कुठला ही उत्तम सौदा करण्यात या वेळी यशस्वी राहाल सोबतच, हा काळ संपत्ती विकण्यासाठी ही अनुकूल आहे कारण, तुम्हाला संभावित ग्राहक भेटतील यामुळे तुम्ही उत्तम सौदे करू शकतात. या राशीतील विवाहित जातकांच्या जीवनात काही समस्या येऊ शकतात तथापि, वाद विवादा पासून बचाव करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या जीवनसाथीच्या रुची ला समजून अनुकूल व्यवहार केला पाहिजे. जे लोक सैन्य सेवा, पोलीस सेवा, इंजिनिअरिंग, डॉक्टर, सर्जन आहे ते आपल्या पेशात उत्तम करू शकतात आणि उन्नती पथावर पुढे जाऊ शकतात. नोकरी पेशा लोकांना जीवनात ही संतुलन राहील.
उपाय- रोज हनुमान चालीसाचे पाठ करा.
मिथुन
मिथुन राशीतील जातकांसाठी मंगळ प्रतिस्पर्धा, ऋण आणि आजाराच्या सहाव्या घराचा स्वामी आहे आणि या सोबतच, कमाई, लाभ आणि मोठ्या भाऊ बहिणींच्या अकराव्या भावाचा स्वामी ही आहे. मंगळाचे संक्रमण तुमच्या साहस-पराक्रम आणि लहान भाऊ बहिणींच्या तृतीय भावात असेल. या घरात मंगळाची स्थिती तुमच्यासाठी लाभदायक आहे कारण, हे तुम्हाला प्रत्येक कार्याला पूर्ण करण्यासाठी साहस आणि शक्ती प्रदान करेल. या संक्रमणाने नोकरीचा शोध करणाऱ्या फ्रेशर्स लाभान्वित होतील कारण, या काळात तुम्हाला उत्तम संधी आणि नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतील. जे लोक नोकरी मध्ये बदल चा विचार करत आहेत त्यांना ही काही उत्तम नोकरी मिळू शकते. या काळात तुमचे कार्य कौशल्य आणि गतिशीलता उच्च असेल जे तुम्हाला इंटरव्यू ला पास करण्यात मदत करेल. जे लोक स्थानांतरणाची वाट पाहत होते त्यांना या काळात आनंदाची बातमी मिळू शकते कारण, ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमचे लहान भाऊ बहिणींसोबत तुमचे नाते खूप उत्तम राहणार नाही आणि तुम्ही त्यांच्या सोबत वाद विवाद करू शकतात. तुमचा कल या काळात मैत्रीचा राहील आणि तुम्ही नवीन मित्र बनवू शकतात. तुम्ही आपल्या मित्र आणि ओळखीच्या लोकांसोबत यात्रेवर जाऊ शकतात.
उपाय- मंगळवारी भगवान हनुमानाला सिंदूर आणि लाल कपडा अर्पण करा.
कर्क
कर्क राशीतील जातकांसाठी मंगळ एक योगकारक ग्रह आहे. हा कर्क राशीच्या जातकांच्या पंचम आणि दशम भावाचा स्वामी ग्रह आहे. मंगळ तुमच्या संचित धन, कुटूंब आणि वाणी च्या दुसऱ्या घरात संक्रमण करेल. तुम्हाला या काळात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण, ह्या काळात तुमच्या वाणी मध्ये आक्रमकता पाहिली जाईल आणि तुमचा राग घरात वाद आणू शकतो आणि तुमच्या आई सोबत तुमचे नाते खराब करू शकतो. हा काळ सामान्य रूपात विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असेल. तुम्हाला आपल्या विषयांच्या प्रति कल असेल आणि पूर्ण जोश आणि समर्पणाने अध्ययन कराल. या राशीतील नोकरी पेशा लोकांसाठी ही वेळ शुभ असेल. या राशीतील काही जातक आपल्या आवडीला आपल्या पेशात बदलू शकतात. ही वेळ तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन येईल. यात आपले कार्य कौशल्य पाहून तुम्ही आपले धन कमावू शकतात. जे लोक कौटुंबिक व्यवसायात आहे त्यांची ही उत्तम कमाई होण्याची शक्यता आहे कारण, तुमच्या व्यवसायाला घेऊन उत्तम समाज असेल आणि तुम्ही लाभदायक सौदे करण्यात यशस्वी असाल.
उपाय- रविवारी मंदिरात नारंगी चण्याची दाळ दान करा.
सिंह
या संक्रमणाच्या वेळी मंगळ ग्रह तुमच्या प्रथम भावात होईल. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल. तुम्हाला फक्त हे सुनिश्चित करायचे आहे की, हे अति-आत्मविश्वास आणि अहंकार मध्ये परिवर्तित नको व्हायला. तुमच्या जवळ एक दृढ इच्छा शक्ती मूळे सार्वजनिक व्यवहारात तुमच्यासाठी नवीन गोष्टी सहज होतील. तुम्ही या वेळी एक शाही जीवन शाली जगणे पसंत कराल. जे जातक प्रेम संबंधात आहे त्यांना या काळात अतिरिक्त बोल्ड होऊ शकते, तुम्हाला फक्त हे सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे की, तुम्ही आपल्या संगी च्या गोष्टी ऐकाल आणि त्यांना असे दाखवाल की, त्यांचे तुमच्या जीवनात काही महत्व नाही. विवाहित जातकांच्या दांपत्य जीवनात काही गैरसजाचा सामना करावा लागू शकतो. विवाहित जातकांना दांपत्य जीवनात काही गैरसमजांचा सामना करावा लागू शकतो. दांपत्य जीवनातील गोष्टींना सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही आपल्या जीवनसाथी वर विश्वास ठेवला पाहिजे आणि अत्याधिक हक्क गाजवणे टाळले पाहिजे. तुम्ही या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण, तुम्ही तणावाच्या कारणाने डोकेदुखीची समस्या होऊ शकते सोबतच, काही जातकांना ऍसिडिटी होण्याची शक्यता आहे.
उपाय- प्रतिदिन सूर्याला अर्घ्य द्या.
कन्या
कन्या राशीतील जातकांसाठी मंगळाचे संक्रमण त्याच्या द्वादश भावात होईल. या संक्रमणाच्या वेळी तुम्हाला मिश्रित फळांची प्राप्ती होईल. या राशीतील व्यावसायिक आणि नोकरी पेशा लोक या संक्रमण वेळी आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकतात आणि बऱ्याच स्रोतांनी धन प्राप्त करू शकतात. ही वेळ तुमच्यासाठी प्रसिद्धी घेऊन येईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवेल तथापि, या काळात तुम्ही अति तणाव ग्रस्त होऊ शकतात आणि तुमची रात्रीची झोप कमी होऊ शकते. तुम्ही काही अप्रत्यक्षित खर्च करू शकतात जे तुम्हाला वित्तीय रूपात अस्थिर बनवू शकतात म्हणून,तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि योग्य बजेट प्लॅन बनवा. जर तुम्ही गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे तर, ही वेळ तुमच्यासाठी भाग्यशाली मानली जाऊ शकत नाही. याच्या व्यतिरिक्त, जर तुम्ही आधीपासून विदेशात काम करत आहे तर, तुम्ही काही संघर्ष करू शकतात. अशी दुर्घटना किंवा शारीरिक दुखापत पासून बचाव करण्यासाठी अधिक सतर्कता ठेवा. विवाहित जातकांसाठी, या काळात तुम्ही जीवनसाथी सोबत तर्क-वितर्क करू शकतात म्हणून, शांत राहण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय- मंगळवारी तांब्याची भांडी दान करा.
तुळ
मंगळ आपल्या वर्तमान संक्रमणिय अवस्थेत तुमच्या एकादश भावात स्थित असेल. या भावात मंगळ ची स्थिती तुम्हाला मजबूत इच्छाशक्ती प्रदान करेल. या काळात तुम्ही आव्हानात्मक कार्याला सहज पूर्ण करू शकाल. यश मिळवण्यासाठी तुम्ही कठीण मेहनत ही कराल. तुम्ही धन संचय करण्यात ही यशःस्वी व्हाल. या काळात तुम्हाला आपल्या कुटुंब आणि मित्रांची साथ मिळेल. जर तुम्ही एक ऍथलेटिक आहे तर, तुम्ही या काळात उच्चता गाठाल. तुम्ही या वेळी घरगुती गोष्टींवर आणि कुटुंबातील आरामदायी गोष्टींवर ही खर्च करू शकतात. या राशीतील जे लोक प्रेम संबंधात आहेत ते आपल्या प्रिय सोबत या काळात वाद करू शकतात. तुम्हाला प्रिय सोबत काही गोष्टींना घेऊन वाद करणे टाळले पाहिजे आणि नात्याला उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येक स्थितीला शांततेने सोडवले पाहिजे. प्रेम संबंध असण्याच्या नात्याने जर तुम्ही आपल्या साथी ला विवाहासाठी प्रपोज करण्याची इच्छा ठेवली तर, ही एक उत्तम वेळ असू शकते. अकराव्या घरात बसलेल्या मंगळाची दृष्टी तुमच्या वाणी च्या द्वितीय भावात होईल म्हणून, या काळात तुम्हाला बोलण्याच्या वेळी शब्दांचा योग्य वापर केला पाहिजे. तुमच्या वाणी मध्ये या काळात कठोरता येऊ शकते आणि यामुळे कुणाच्या मनाला वाईट वाटू शकते.
उपाय- आपल्या भाऊ बहिणींना भेटवस्तू आणि मिठाई भेट देणे तुम्हाला शुभ फळ प्रदान होईल.
वृश्चिक
वर्तमान संक्रमणाच्या वेळी मंगळ ग्रह तुमच्या दशम भावात विराजमान असेल. ही वेळ त्या जातकांसाठी यश देणारे असेल जे सरकारी नोकरी मध्ये कार्यरत आहेत. तुम्हाला सल्ला दिला जातो की, ही वेळ तुम्ही जे काही ही कराल ते नियम आणि कायद्याच्या अनुसार व्हायला हवे. जर तुम्ही कायद्याच्या हिशोबाने चालाल तर, समाजात तुम्हाला सन्मान ही प्राप्त होईल. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल आणि तुमचे व्यक्तित्व मजबूत होईल. कामावर तुमची प्रबंधन क्षमतांना सर्व लोकांकडून कौतुक होईल. तुमच्या वाणी मध्ये दृढता राहील आणि लोक तुमची गोष्ट मानतील आणि त्यांचा सन्मान करतील तथापि, तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही कार्यालयीन राजकारणात अडकू नका कारण हे तुमच्या कामाच्या प्रगतीमध्ये बाधा आणण्याचे काम करू शकते. हे संक्रमण तुमच्या आईसाठी खूप चांगले सांगितले जात नाही. या काळात तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गरज पडल्यास तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल आणि कुठल्या चांगल्या डॉक्टरांकडून चेकअप करावे लागेल. तुमच्या कुटुंबात सर्वांमध्ये सामंजस्य राहील आणि विवाहित जातकांचा आपल्या साथी सोबत उत्तम वेळ जाईल. तुम्ही आपल्या कुटुंबात जबाबदारीने काम कराल आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेल.
उपाय- प्रतिदिन मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्या.
धनु
धनु राशीतील जातकांसाठी मंगळ विदेश आणि हानीच्या द्वादश आणि मनोरंजन, शिक्षण इत्यादींच्या पंचम भावाचा स्वामी आहे. वर्तमान संक्रमणिय अवस्थेत मंगळ तुमच्या नवव्या भावात असेल. तुम्ही या संक्रमण वेळी यात्रा करू शकतात. तुम्ही धार्मिक स्थानांवर जाऊ शकतात किंवा कुठल्या तीर्थ यात्रेवर ही जाऊ शकतात. विद्वान आणि शिक्षकांसाठी अनुकूल काळ असेल. तुम्ही आपल्या ज्ञानाला या काळात बढावा देऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त, जे लोक उच्च शिक्षण प्राप्त करण्याची योजना बनवत आहे त्यांना या काळात योग्य वापर केला पाहिजे कारण, भाग्य तुमची साथ देईल आणि तुम्ही आपल्या स्वप्नांना पूर्ण करू शकतात. या काळात तुम्ही उत्तम कॉलेज मध्ये दाखला घेऊ शकतात. तुम्ही या काळात आपल्या वडील आणि गुरूंच्या सोबत आपल्या संबंधात काहीशी जटिलतेचा सामना करू शकतात. तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही त्यांच्या सोबत काही प्रकारची चुकीची चर्चा करू नका. या संक्रमण काळात तुम्हाला शास्त्र आणि पौराणिक विषय वाचण्यात रुची असू शकते. कॉलेज किंवा कार्यस्थळी तुम्ही आपल्या परियोजनांना पूर्ण करून तुम्हाला आपल्या लहान भाऊ बहिणींकडून मदत मिळेल.
उपाय- कुठल्या ही महत्वपूर्ण कार्यासाठी निघण्याच्या आधी आपले गुरु, वडील आणि मोठ्याचा आशीर्वाद घ्या.
मकर
मकर राशीमध्ये मंगळ ग्रह उच्च चा असतो. ज्याचे तात्पर्य आहे की, याचे संक्रमण मकर राशीतील जातकांच्या जीवनात काही महत्वपूर्ण बदल आणू शकतात. मंगळ तुमच्या घरगुती सुख-सुविधेच्या चौथ्या घर आणि लाभाच्या एकदश घराचा स्वामी आहे. मंगळाचे हे संक्रमण तुमच्या अष्टम भावात होईल. मंगळाचे हे संक्रमण मकर राशीतील जातकांच्या आरोग्यासाठी खूप शुभ नाही. तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि रस्त्यावर ड्राइविंग करताना सतर्क राहा कारण, तुम्ही दुर्घटनेचे शिकार होऊ शकतात. जर कुठले वाहन खरेदी करायची योजना बनवत असाल तर, काही ववेळेसाठी थांबून जा कारण, ही वेळ तुमच्यासाठी खूप अनुकूल नाही. तुम्हाला आपल्या कौटुंबिक जीवनात काही संकटांचा सामना करावा लागू शकतो किंवा सदस्यांमध्ये काही गैरसमज होऊ शकतात. तुम्हाला कुटुंब किंवा बाहेरील लोकांसोबत काही प्रकारचे वाद होण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा, वाद हिंसेमध्ये बदलू शकतो. या काळात तुमच्या कमाई मध्ये अचानक वृद्धी होण्याने तुम्हाला लाभ होऊ शकतो. आपल्या व्यावसायिक योजना आणि सौद्याच्या बाबतीत कुणाला ही या काळात सांगू नका कारण, प्रतिद्वंदीची तुमच्यावर नजर असेल आणि ते तुमचे विचार चोरू शकतात.
उपाय- मंगळवारी हनुमानाला बेसन ची मिठाई चढवा.
कुंभ
मंगळ तुमच्या आहेस आणि पराक्रमणाच्या तिसऱ्या आणि करिअर च्या दशम भावाचा स्वामी आहे. हे तुमच्या भागीदारी, व्यवसाय आणि दांपत्य जीवनाच्या सातव्या घरात संक्रमण करेल. या काळात व्यावसायिकांचा उद्योग पसरेल. तुम्ही आपल्या संबंधित उद्योगात प्रतिष्ठा प्राप्त कराल आणि ग्राहकांचे मन जिंकण्यात सक्षम असाल. या प्रकारे, प्रत्येक प्रकारच्या संसाधनांचा विस्तार होईल आणि व्यापार वाढेल. जे लोक भागीदारी मध्ये व्यवसाय करतात त्यांना ही मन लावून काम करून आणि उत्तम डील प्राप्त करण्यात सक्षम असाल. तुम्ही या काळात आपल्या मित्र किंवा परिचिताची मदत ही घेऊ शकतात. यामुळे तुम्हाला अधिक बल मिळेल. तुम्ही कामाच्या बाबतीत यात्रा करू शकतात. ही यात्रा तुमच्या भविष्यात उत्पादकाचे परिणाम आणेल. विवाहित जातकांना सल्ला दिला जातो की, तुम्ही सतर्क राहा कारण, तुम्ही आपल्या विवाहित जीवनात समस्यांचा सामना करू शकतात. तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही शांत रहा आणि क्रोध करणे टाळा अथवा, तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वाद करून मुद्दा अधिक वाढवू शकतात एकूणच, या काळात ऊर्जा आणि गतिशीलतेसोबत पुढे जाल आणि कमी वेळात तुम्ही खूप कार्यांना पूर्ण कराल.
उपाय- मंगळवारी आणि शनिवारी "बजरंगबाण" चे पाठ करा.
मीन
मंगळ ग्रहाचे संक्रमण मीन राशीतील जातकांच्या सहाव्या भावात होईल. ही वेळ तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल. तुम्ही यश प्राप्त करू शकाल परंतु, संघर्ष आणि कठीण मेहनतीनंतर. जर तुम्ही शिक्षक, इंजिनिअर, मेकॅनिक किंवा काही प्रकारची नोकरी करतात तर, यश मिळवणे तुमच्यासाठी सहज होईल. तुम्हाला कधी-कधी हे ही वाटू शकते की, तुम्हाला आपल्या सहयोगींचे समर्थन मिळत नाहीये असे यासाठी होत आहे कारण, तुम्ही लोकांच्या स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करतात. तुम्हाला हा सल्ला दिला जातो की, तुम्ही यथासंभव मानवीय रूपाने काम करा आणि कुठल्या ही अश्या गोष्टीची कामना करू नका जे वास्तविक होणे शक्य नाही. या वेळी तुम्ही आपल्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात कारण, तुमच्या व्यवहारात या वेळी मजबुती दिसेल. तुम्हाला काही अप्रत्यक्षित खर्च करावे लागू शकतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती असंतुलीत होऊ शकते. यामुळे या वेळी आपल्या आरोग्याच्या प्रति सावध राहावे लागेल कारण, हाडे, त्वचा किंवा डोळ्यांच्या संबंधित काही आजारांनी तुम्ही ग्रस्त होऊ शकतात.
उपाय- मंगळ स्तोत्राचे पाठ करण्याने तुम्हाला शुभ फळ प्राप्त होतील.




