आर्द्रा नक्षत्राची भविष्यवाणी
आर्द्रा नक्षत्रावर जन्मल्यामुळे तुम्ही आपल्या जबाबदाऱ्यांशी प्रामाणिक असाल आणि अत्यंत मेहेनती असाल. तुम्ही जन्मत:च अत्यंत बुद्धिमान आहात कारण तुमच्या नक्षत्राचा स्वामी असलेला राहू एक संशोधक आहे. विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यासाठी तुम्ही नेहमी भुकेले असता. तुमचे व्यक्तिमत्त्व खेळकर आहे आणि सर्वांशी सौजन्याने वागता. तुम्हाला व्यवसायापासून संशोधनापर्यंत सर्व विषयांमधील ज्ञान असल्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल. समोरची व्यक्ती काय विचार करत आहे, याचा तुम्ही अचूक अंदाज बांधू शकता. तुम्ही बऱ्यापैकी अंतर्ज्ञानी आणि एक चांगले मनोविश्लेषक आहात. तुम्हाला जगाची चांगली समज आहे आणि आपले प्रयोगांती आलेले अनुभव इतरांना सांगताना तुम्ही अजिबात अवघडत नाही. प्रत्येक गोष्टीचे सखोल विश्लेषण करण्याची तुमची सवय आहे. तुम्ही बाहेरून शांत वाटता, मात्र तुमच्या आत मात्र नेहमी विचार असतात. रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्या हिताचे ठरेल. परिस्थिती नेहमीच तुमची कसोटी घेते पण स्वत:ला सांभाळण्यात तुम्ही नेहमीच यशस्वी होता. बहुधा त्यामुळेच तुम्ही इतके अनुभवी आणि जाणते आहात. तुमचा अजून एक गुण म्हणजे तुम्ही तुमच्या समस्या स्वत:पर्यंतच ठेवता. कधी कधी तुम्ही भविष्यातील समस्यांची काहीच जाणीव नसलेल्या एखाद्या निरागस बाळासारखे वागता. तुमचा स्वभाव काहीसा गुढ आहे आणि तुम्ही एखाद्या जाणत्या माणसाप्रमाणे समस्या सोडवता. समस्यांखाली दबला गेलात तरी अखेर त्यांच्यावर तुम्ही मात करता. तुम्ही पराक्रमी आणि तुमचा बांधा धावपटूसारखा असेल. तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करू शकता, हा तुमचा आणखी एक गुण आहे. तुम्हाला आध्यात्मातही चांगलाच रस आहे. न सुटलेल्या समस्यांसाठी ‘का आणि कसे’च्या नियमांचा उपयोग करता आणि समस्या सोडवता. तुमच्या उपजीविकेसाठी तुम्हाला घरापासून दूर राहावे लागेल. म्हणजेच तुम्ही कामाच्या निमित्ताने परदेशी जाऊ शकता. वयाच ३२ ते ४२ हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.
शिक्षण आणि उत्पन्न
अभियांत्रिकी, ज्योतिष शास्त्र किंवा मानससाशास्त्र या विषयांचे शिक्षण तुम्ही घ्याल. उपजीविकेसाठी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, संगणकाशी संबंधित कामे, इंग्लिश भाषांतर, छायाचित्रण, गणित किंवा भौतिक शास्त्र शिकविणे, संशोधन आणि संबंधित काम, तत्त्वज्ञान, कांदबरी लेखन, विषांवर काम करणारे डॉक्टर, औषधविक्रेते, डोळे आणि मेंदूच्या विकारांचे निदान करणे, दळणवळण, संपर्क विभाग, मानसशास्त्र विभाग, गुप्हहेर संस्था किंवा रहस्य उकलण्याशी संबंधित काम, फास्ट फूड आणि अल्कोहोलयुक्त पेय या क्षेत्रांना प्राधान्य असेल.
कौटुंबिक आयुष्य
तुमचा विवाह कदाचित थोडा उशीरा होईल. वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही वादविवाद टाळा. तुम्ही कामाच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहाल. तुमचा जोडीदार तुमची चांगली काळजी घेईल आणि घरातील कांमांमध्ये तो चांगलाच पटाईत असेल.