उत्तराषाढा नक्षत्राची भविष्यवाणी
तुम्ही सुसंस्कृत, मनाने शुध्द आणि हळू बोलणारे आहात. तुमचा निष्पापपणा चेह-यावर दिसून येतो. तुमची सामाजिक स्थिती तशी चांगली असते आणि तुम्हाला खूप झगमगाट आवडत नाही. कपड्यांच्या बाबतीत तुम्हाला साधे राहायला आवडते. तुम्ही धार्मिक असता आणि इतरांचा आदर करता. तुमचा स्वभाव गूढ आहे. त्यामुळे एका भेटीत तुम्हाला जोखणे अवघड असते. तुमच्या डोळ्यात चमक असते आणि चेह-यावर खूण(mole)असू शकते. तुम्ही सर्वकाही प्रामाणिकपणे करता आणि तुमच्या विचारात स्पष्टता असते. तुम्ही कोणालाही फसवत नाही किंवा त्रास देत नाही. मनाने खूपच चांगले असल्याने तुम्ही कधीकधी गंभीर समस्यांमध्ये अडकता. तुम्ही कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही, पण एकदा विश्वास ठेवला की तुम्ही त्यासाठी काहीही करता. तुम्हाला सोपे आयुष्य आवडते आणि घाईने तुम्ही कोणतेही निर्णय घेत नाही. तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवला की त्यांच्याकडून सल्ला घेता. जर तुम्हाला एखाद्याचा राग आला तर विरोधकालाही तुम्ही कठोर शब्दात बोलत नाही किंवा तुमचे असमाधान दाखवत नाही. तुम्हाला अध्यात्माची आवड असते. जप, तप, व्रत इत्यादींमुळे तुम्हाला आयुष्यात यश मिळू शकते. एकदा तुम्ही अध्यात्ममार्गावर मार्गक्रमण सुरू केले की तुम्हाला सर्व पाश आणि ऐहिक जीवन एकसुरी वाटू लागते. कष्टाळू असल्याने तुम्हाला सतत काम करणे आवडते. शिक्षण असो वा काम तुम्ही सर्वांच्या पुढे असता. तुम्हाला लहानपणापासून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागते. पण तरूणपणात तुम्ही खूप धमालही कराल. कोणत्याही बाबतीत तुम्ही सावध राहिले पाहिजे. कोणतीही भागीदारी करताना त्या माणसाला नीट जाणून घ्या नाहीतर काही समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. ३८ वर्षानंतर तुम्हाला सर्वत्र यश मिळेल. तुमचा जीवनसाथी जबाबदार आणि प्रेमळ असेल पण त्याचे/तिचे आरोग्य याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. डोळे, पोट याच्याशी संबंधित तक्रारी त्रास देऊ शकतात,त्यामुळे त्याबाबतीत जागरूक रहा. तुम्ही दिसायला आकर्षक असाल पण स्वभाव जिद्दी असेल. विनाकारण वाद टाळा. तुम्ही सुविद्य असाल आणि शिक्षण क्षेत्रात किंवा बॅंकिंग क्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल.
शिक्षण आणि उत्पन्न
तुमच्यासाठी योग्य क्षेत्रं प्राध्यापक किंवा प्रीचर, धर्मगुरू, निवेदक, ज्योतिषी, वकील, न्यायाधीश, सरकारी सेवक, मानसशास्त्र, सैन्यसंबंधित कामे, पशुसंवर्धन, कुस्तीपटू, बॉक्सर, ज्युडो, कराटे, धावपटू, शिक्षक, सुरक्षा विभाग, अंगरक्षक, अध्यात्मिक हीलर, राजकारणी, व्यवसाय, बॅंकिंग इ.
कौटुंबिक आयुष्य
तुमचे कौटुंबिक आयुष्य चांगले असेल पण जीवन साथीशी संबंधित ताण सतत त्रास देत राहील. जोडीदार चांगल्या स्वभावाचा आणि मिसळणारा असेल.तुमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल पण त्यांच्याशी काही कारणाने दुरावा संभवू शकतो.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Rashifal 2025
- Horoscope 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025