पूर्वाषाढा नक्षत्राची भविष्यवाणी
तुमचे वागणे विनयशील आणि दैवी आहे. तुम्ही तर्काधारित विचार करता आणि आपल्या तत्वांवर ठाम रहाता. तुमच्यामध्ये लेखनाचे गुणही लपलेले आहेत; तुम्हाला कदाचित कविता लिहीणं आणि ऐकणं आवडत असेल. पण तुमच्यामध्ये एक दोष आहे, तुम्ही निर्णय घाईने घेता, ज्यामुळे गैरसमजदेखील होतात. तुमचा एक खास गुणही आहे की तुम्ही एकदा ठरवले की ते करता, मग तो निर्णय चुकीचा असो वा बरोबर. तुमच्यामध्ये त्वरीत ठरवण्याची क्षमता आहे आणि बोलण्यात तुम्हाला कोणीही जिंकू शकत नाही. तुमच्या या क्षमतेमुळे लोक तुमच्यावर खुश होतात. तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि तुम्ही काहीही सोडून देणा-यातले नाही. अगदी कठीण प्रसंगीही, तुम्ही खूप धीराने वागता. तुम्ही ध्येयवादी आहात आणि धोका पत्करायला नेहमी तयार असता. तुमचा धीर आणि निष्ठा यामुळे तुम्ही योग्य वेळेची वाट पाहता. तुम्ही अड्चणींनी डगमगत नाही. तुमचे शिक्षण चांगले असेल आणि तुम्हाला औषध क्षेत्रात खूपच यश मिळेल. तसेच तुम्हाला योग किंवा धार्मिक गोष्टींमध्ये खूपच रस असेल. तुम्ही व्यवसायात चांगले यश मिळवाल, पण त्यासाठी अट ही की तुमचे कर्मचारी प्रामाणिक आणि विश्वासू असायला हवेत. तुमच्या मनात प्रत्येकासाठी प्रेम आणि जिव्हाळा असतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वामधल्या या गुणामुळे तुम्हाला समाजात पुरेसा मान सन्मान मिळतो. तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करता. निसर्गत: तुम्ही नम्र असून विविध कला तसेच अभिनयाची तुम्हाला आवड आहे. तसेच साहित्याचीही तुम्हाला आवड आहे ज्याचा अर्थ त्याचीही तुम्हाला चांगली माहिती आहे. तुम्ही प्रामाणिकपणे वागता आणि शुध्द मनाचे आहात. तुम्हाला आदर्श मित्र म्हणता येते कारण तुम्ही मैत्री आयुष्यभर जपता. तुम्ही तुमच्या शब्दाचे पक्के असता. तुमचे शिक्षण चांगले असते आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक तीव्र आकर्षण असते. तुम्ही उत्साही आणि उत्स्फूर्त असता. वाईट परिस्थितीत, तुम्ही मागे हटत नाही. तुम्हाला खोट्याची तीव्र चीड असते कारण तुमचा सचोटीवर विश्वास असतो आणि सगळे स्पष्ट सांगता. आरोग्याबाबत, तुम्ही स्वत:ची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि श्वाससंबंधित तक्रारी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत
शिक्षण आणि उत्पन्न
तुमच्यासाठी चांगली क्षेत्रं, नेव्ही ऑफिसर, नेव्ही संबंधित कामे, बायोलॉजिस्ट, एक्वाकल्चर व्यवसाय, नर्तक, स्टेज कलाकार, गायक, मानसोपचारतज्ञ, तत्वज्ञानी, कवी, लॆखक,कलाकार, चित्रकार, फॅशन डिझायनर, हॉटेल संबंधी कामे इत्यादी.
कौटुंबिक आयुष्य
तुम्ही तुमच्या जन्मठिकाणापासून दूर आयुष्य घालवाल. तुमच्या पालकांकडून खूप लाभप्राप्ती होणार नाही. वैवाहिक आयुष्य चांगले असेल, पण उशीरा विवाह संभवतो. तुमचा जोडीदार आणि त्याचे/तिचे कुटुंब यांच्याकडे तुमचा कल असेल. तुम्हाला दोन मुले असतील आणि ती आज्ञाधारक तसंच नशीबवान असतील.