चंद्र ग्रहण 2021
लवकरच चंद्र ग्रहण शुक्रवारी 19 नोव्हेंबर 2021 ला लागणार आहे. तुम्ही नेहमी ऐकले असेल जेव्हा चंद्र ग्रहण लागते तेव्हा दोन गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते एक तर, या वेळी घरात जितके ही बनवलेले जेवण असते त्यात तुळशी पात्र टाकून ठेवायचे असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्भवती महिलांची काळजी घ्यायची असते.
भोजनासाठी तर्क हा दिला जातो की, ग्रहणाच्या वेळी वातावरणात जी अशुद्धी पसरते ते आपल्या बनवलेल्या भोजनात येते आणि यामुळे आपण एकतर ग्रहांच्या आधी ते भोजन समाप्त करा अथवा त्यात तुळशीचे पान टाकून ठेवा. असे केल्याने ग्रहणाची अशुद्धी भोजनाला प्रभावित करू शकत नाही परंतु, गर्भवती महिलेसाठी विशेष नियम का असतात? शेवटी ग्रहणाचा गर्भवती महिलांवर खास काय प्रभाव पहायला मिळेल?
कुठला ही निर्णय घेण्यात येत आहे समस्या, तर आत्ताच आमच्या ज्योतिषींसोबत फोनवर किंवा चॅट ने जोडा.
चंद्र ग्रहण विशेष अॅस्ट्रोसेज च्या या ब्लॉग मध्ये आज आपण याच विषयावर बोलू आणि सोबतच, जाणून घेऊया ग्रहण आणि गर्भवती महिलांचे काय कनेक्शन असते. जाणून घेऊया की, येणाऱ्या चंद्र ग्रहणाच्या वेळी जर तुमच्या घरात कुणी गर्भवती महिला आहे तर, कश्या प्रकारे तुम्ही त्यांची काळजी घ्यावी आणि या वेळी गर्भवती महिलांना काय काम करण्याची मनाई असते?
वर्षाच्या शेवटच्या चंद्र ग्रहणाचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव आणि उपाय जाणून घेण्यासाठी आत्ताच आचार्या पारुल वर्मा सोबत बोला
2021 चे दुसरे चंद्र ग्रहण: केव्हा?
वर्षाचे दुसरे चंद्र ग्रहण शुक्रवारी, 19 नोव्हेंबर 2021 ला असेल, जे एक आंशिक चंद्र ग्रहण असेल. हिंदू पंचांगाच्या अनुसार, या चंद्र ग्रहणाची वेळ दुपारी 11:32 वाजेपासून, रात्री 17:33 वाजेपर्यंत असेल. याची दृश्यता भारत, अमेरिका, उत्तरी यूरोप, पूर्वी आशिया, ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत महासागर क्षेत्रात असेल.
चंद्रग्रहणाचा समय अवधी: 6 तास 1 मिनिट
वैदिक ज्योतिषाच्या अनुसार चंद्र ग्रहण
सूर्य आणि चंद्र हे दोन्ही मनुष्याला जीवन देण्याचे स्रोत मानले गेले आहे. या दोघांच्या विना पृथ्वीवर जीवनाची कल्पना ही केली जाऊ शकत नाही. वैदिक ज्योतिषाच्या अनुसार ग्रहणाची स्थिती तेव्हा बनते जेव्हा राहू आणि केतू ग्रह सूर्य आणि चंद्राला आपल्यात सामावून घेतात. वैदिक मान्यतेच्या अनुसार ग्रहांची स्थिती विशेष रूपात गर्भवती महिलांसाठी शुभ मानली जात नाही.
चंद्र ग्रहण गर्भवती महिलांसाठी अधिक प्रभावशाली म्हणून ही असते कारण,चंद्राला देवी, पोषण, भोजन, दूध आणि पाण्याचे कारक मानले गेले आहे आणि अश्यात, जर चंद्राचा नकारात्मक प्रभाव आहे तर, त्यासाठी सर्व कारक तत्वांना ही नकारात्मक रूपाने प्रभावित करेल. हीच योग्य वेळ आहे की, चंद्र ग्रहांच्या वेळी गर्भवती महिलांना अधिक सावधान आणि सतर्कता ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या काळात सावधानी ठेऊन गर्भवती महिला आपल्या मुलांना आणि त्यांच्या आरोग्याला उत्तम ठेवणे सुनिश्चित करू शकते.
या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला चंद्र ग्रहण आणि गर्भवती महिलांवर याच्या प्रभावाने जोडलेल्या काही मान्यता आणि अनुष्ठानाची माहिती प्रदान करत आहोत ज्यांचे पालन करणे तुमच्यासाठी मदतगार सिद्ध होऊ शकते. पुढे जाण्याच्या आधी जाणून घेऊया चंद्र ग्रहणाच्या संबंधात काही महत्वाची आणि जाणकार माहिती.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
गर्भवती महिलांवर येणाऱ्या चंद्र ग्रहणाचा प्रभाव: जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारण
कुठली ही गोष्ट जेव्हा विना तर्क किंवा विना आधाराची केली तर त्याला मानून घेणे कठीण होते परंतु, जेव्हा काही गोष्टींचा तर्क जोडला जातो किंवा आधार दाखवला जातो तेव्हा त्या गोष्टीला मानणे गी सहज होते आणि त्याचे पालन ही करणे सहज होते. याच तर्कावर पुढे जाऊया आणि जाणून घेऊया की, शेवटी ग्रहणाने गर्भवती महिलांना भीती का असते? याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे?
खगोलीय रूपात गोष्ट केली असता एक चंद्र ग्रहणाची स्थिती तेव्हा होते जेव्हा चंद्र पृथ्वी च्या ठीक मागे त्याच्या प्रच्छाया मध्ये येतो. असे तेव्हा होऊ शकते जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या क्रमात जवळपास एक सरळ रेषेत असेल. हे फक्त पौर्णिमेच्या रात्रीच शक्य असते.
धार्मिक कारण: धार्मिक मान्यतेच्या आधारावर बोलायचे झाल्यास तर म्हटले जाते की, चंद्र ग्रहणाच्या वेळी जर गर्भवती स्त्रियांवर चंद्राचा प्रकाश चुकून पडला तर यामुळे गर्भात असलेल्या बाळाच्या कुंडली मध्ये दोष असण्याची शक्यता वाढते.
वैज्ञानिक कारण: गर्भात असलेल्या बाळाला ग्रहणाने काय भीती असते या मागील वैज्ञानिक कारणाची गोष्ट केली असता, विज्ञान ही मानते की, चंद्र ग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीच्या बराच जवळ असतो आणि याचे गुरुत्वाकर्षण ही अधिक तेज असते अश्यात, चंद्र ग्रहांच्या वेळी महिलांच्या हार्मोनल बदलाची अधिक शक्यता राहते.
तथापि, चंद्राला उर्वरता चे प्रतीक मानले जाते अश्यात, चंद्र ग्रहांची वेळ त्या महिलांसाठी खूप शुभ आणि उत्तम मानली जाते जी गर्भवती होण्यासाठी ओव्यूलेशन महिन्यात असते.
या दोन्ही महत्वाच्या कारणांमुळे आज पासून नाही तर, प्राचीन वेळेपासून गर्भवती महिलांना ग्रहणाच्या वेळी घरात राहण्याचा सल्ला दिला जातो म्हणजे ग्रहणाचा दुष्प्रभाव किंवा ग्रहणाची किरणे गर्भात असलेल्या बाळावर पडू नये सोबतच, या वेळी गर्भवती महिलांना कुठली ही टोकदार वस्तू जसे कैची, चाकू किंवा शिलाई मशीन किंवा कापण्याच्या कामापासून लांब राहिले पाहिजे. या कामांमुळे ही मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
चंद्र ग्रहणाचा सूतक काळ
कुठल्या ही ग्रहणाच्या आधीच्या काळाला सुतक काळ म्हटले जाते. सुतक काळ ग्रहण काळाच्या आधीची वेळ असते आणि या वेळी कुठले ही शुभ काम वर्जित असते. सुतक काळाच्या वेळी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि घरातील देव घराचे पडदे ही लावले जातात या व्यतिरिक्त, सुतक काळाच्या वेळी पूजा पाठ करण्यासाठी मनाई असते.
जिथे चंद्र ग्रहणाचा 9 तास आधी त्याचे सुतक काळ लागते तसेच, सूर्य ग्रहणाचा 12 तास आधीपासून सुतक प्रारंभ होते. ग्रहण जेव्हा समाप्त होते तेव्हा त्यांचा सुतक काळ ही समाप्त होतो या नंतर, स्नान करण्याचा सल्ला दिला जातो, घर साफ करण्याचा सल्ला दिला जातो, मंदिर आणि घरातील कान्याकोपऱ्याची साफ सफाई केली जाते, यानंतर पूजा पाठ केला जातो. म्हटले जाते असे केल्याने ग्रहणाचे दुष्प्रभाव आपल्या जीवनावर पडत नाही.
चंद्र ग्रहण 2021: गर्भवती महिलांनी घ्यावी या गोष्टींची काळजी
-
शक्य असल्यास ग्रहणाच्या वेळी बाहेर निघणे टाळा: चंद्र ग्रहणाच्या वेळी घरातून बाहेर न जाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः गर्भवती महिलांनी बाहेर येऊ नये. म्हटले जाते की, बाहेर येण्याने बाळाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. मान्यतेच्या अनुसार म्हटले जाते की, ज्या कुणी गर्भवती महिला चंद्र ग्रहणाच्या प्रकाशात येतात त्यांच्या गर्भात असलेल्या मुलांच्या शरीरावर लाल धब्बे किंवा कुठल्या ही प्रकारची निशाणी असू शकते जी आयुष्यभर त्यांच्या सोबत कायम राहते.
-
ग्रहण काळात कुठल्या ही टोकदार किंवा धारधार वस्तूंचा उपयोग करणे टाळा: चंद्र ग्रहणाच्या पूर्ण काळात गर्भवती महिलांनी कुठल्या ही धारधार किंवा टोकाच्या वस्तूंचा उपयोग करण्यापासून दूर राहा. ग्रहण आणि सुतक काळात कैची, चाकू किंवा सुई चा वापर करू नका.
-
ग्रहण काळात काही ही खाऊ - पिऊ नका: जसे सांगितले जाते की, चंद्र देव भोजनाचा कारक आहे म्हणून, ग्रहणाच्या वेळी यात अशुद्धी ही मिळते. हेच कारण आहे की, सल्ला दिला जातो की, गर्भवती महिला ग्रहणाच्या वेळी कुठले ही भोजन ग्रहण करू नये आणि पाणी ही पिऊ नये कारण, यामुळे मुलावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. भोजनात अशुद्धी पोहचू नये म्हणून तुम्ही एक छोटासा उपाय करू शकतात की, आपल्या बनवलेल्या भोजनात तुळशीची काही पाने टाकून ठेवा.
-
ग्रहणाच्या किरणांपासून सतर्क रहा: चंद्र ग्रहणाच्या किरणांना ही हानिकारक मानले गेले आहे अश्यात, यांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहणाच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी खिडकी आणि दरवाज्यावर मोठे पडदे लावा किंवा कुठल्या ही वस्तूंनी याला झाका म्हणजे ग्रहणाची किरणे कुठल्या ही प्रकारे तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही.
-
ग्रहणा नंतर स्नान करण्याचा सल्ला दिला जातो: चंद्र ग्रहण एकदा संपल्या नंतर गर्भवती महिलांना आपल्या पाण्यात सिंधे मीठ टाकून त्याने स्नान करण्याचा सल्ला दिला आहे. असे मानले जाते की, असे केल्यास ग्रहणाचे सर्व नकारात्मक प्रभाव नष्ट केले जाऊ शकतात.
-
ग्रहणा च्या वेळी आपल्या जवळ ठेवा नारळ: चंद्र ग्रहणाच्या पूर्ण काळात जर गर्भवती महिलांनी आपल्या जवळ नारळ ठेवले तर, ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव गर्भवती महिला आणि गर्भस्थ शिशु जवळ पोहचत नाही अश्यात, नारळ ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते.
-
ध्यान आणि पूजा करण्याचा सल्ला दिला जातो: चंद्र ग्रहणाच्या पूर्ण काळात गर्भवती महिलांनी आपल्या जिभेवर तुळशीचे एक पान ठेवावे आणि हनुमान चालीसा आणि दुर्गा चालीसा म्हणावी. असे केल्याने, चंद्र ग्रहणाचे दुष्प्रहोते. भाव पडत नाही आणि ग्रहणापासून बाळाचे संरक्षण होते.
-
दान करणे फळदायी सिद्ध होऊ शकते: सनातन धर्मात आणि वैदिक संस्कृती मध्ये दान करण्याचे विशेष प्रभाव मानले जातात म्हणून, चंद्र ग्रहणा नंतर दूध आणि दुधा पासून बनवलेले उत्पादक, सफेद तीळ, सफेद कपडे इत्यादी दान करण्याचा सल्ला दिला जातो असे केल्याने ही ग्रहणाचे दुष्प्रभाव आयुष्यभर पडत नाही.
-
चंद्र ग्रहांच्या वेळी या मंत्राचा करा जप: चंद्र ग्रहणाच्या वेळी काही मंत्रांचा जप केल्याने ही गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.
“तमोमय महाभीम सोमसूर्यविमर्दन
हेमताराप्रदानेन मम शांतिप्रदो भव ॥”
“विधुन्तुद नमस्तुभ्यं सिंहिकानन्दनाच्युत दानेनानेन नागास्य रक्ष मां वेधजादभयात॥”
-
या व्यतिरिक्त, षिव मंत्र आणि संतान गोपाल मंत्राचा जप करणे ही गर्भवती स्त्रियांच्या मनाला शांतता मिळेल आणि त्यांच्या गर्भवती असलेल्या संतान ची रक्षा होईल.
आम्ही अपेक्षा करतो की, हा लेख चंद्र ग्रहणाच्या वेळी तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी मदतगार सिद्ध होईल.
आचार्या पारुल वर्मा सोबत फोन/चॅट माध्यमाने आत्ताच जोडले जा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!