केतू ग्रहाच्या आठव्या भावातील फळ - लाल किताब मराठीत
आठव्या घरात केतू ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार
आठवे घर मंगळ ग्रहाचे आहे, जो केतुचा शत्रु आहे. असे मानले जाते की, आठव्या घरामध्ये केतु शुभ असेल तर, तुमच्या ३४ वर्षाच्या वयानंतर किंवा तुमची बहीण किंवा मुलीच्या लग्नानंतर पुत्र प्राप्ती होण्याची शक्यता आहे. जर बृहस्पती किंवा मंगळ सहाव्या किंवा बाराव्या घरामध्ये असेल तर केतु अशुभ परिणाम देणार नाही, चंद्राच्या दुसऱ्या घरामध्ये असले तरी हेच परिणाम मिळतील. जर आठव्या घरामध्ये स्तिथ केतु अशुभ असेल तर तुमचा जीवनसाथी आजारी राहण्याची शक्यता असते. पुत्राचा जन्म होत नाही तुम्ही मधुमेह किंवा मूत्र रोगाने ग्रस्त असाल. जर शनी किंवा मंगळ सातव्या घरात असेल तर तुम्ही दुर्भाग्यशाली असू शकतात. आठव्या घरामध्ये अशुभ केतु असल्या कारणाने तुमचे चारित्र्य तुमच्या जीवनसाथीच्या तब्बेतीवर निर्धारित असेल. २६ वर्षाच्या वयानंतर वैवाहिक जीवनात दुःख येतात.
उपाय:
(१) एक कुत्रा पाळा.
(२) कुठल्याही मंदिरात काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कंबल दान करा.
(३) भगवान गणेशाची पुजा करा.
(४) कानामध्ये सोने घाला.
(५) डोक्यावर केशराचा टिळा लावा
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems








