Rashi Bhavishya 2018 in Marathi: राशी भविष्य
The Rashi Bhavishya 2018 is based on the ancient and time tested principles of Vedic Astrology. This Marathi horoscope is going to tell you what to do and what not to, what to look for and what to avoid in 2018. The predictions given here cover all important aspects of life like finance, love, health, marriage and love etc. Check out our astrological analysis for all zodiac signs now:
राशी भविष्य 2018 हे वेदिक ज्योतिषशास्त्राच्या संकल्पनांवर आधारित आहे. 2018 या वर्षात प्रत्येक राशीसाठी काय भविष्य आहे ते जाणून घेऊ या
सूचना - हे भविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. तुमच्या चंद्रराशीबाबत तुम्हाला खात्री नसेल तर खालील संकेतस्थळाला भेट द्या - अॅस्ट्रोसेज मूनसाइन कॅल्क्युलेटर.
मेष राशी भविष्य 2018
मेष राशी भविष्य 2018 नुसार, या वर्षाची सुरुवात उर्जेनी आणि निर्धारांनी भरलेली असेल. योग्य निर्णय तुमच्यासाठी वर्षभर चांगल्या बातम्या घेऊन येतील. तुमच्या कौटुंबिक आयुष्यात खूप गोंधळ असेल आणि तुमचे दगदगीचे वेळापत्रक व अनियमित जेवणामुळे तुम्ही आनंदी व समाधानी असणार नाही. पहिले दोन महिने आरोग्य फारसे चांगले असणार नाही. उत्पन्न वाढेल; तुम्ही कारकीर्दीत अधिक उंचीवर पोहोचाल. लांबचे प्रवास फलदायी असतील आणि त्यांचे चांगले परिणाम होतील. ऑक्टोबरच्या मध्यानंतर उत्पन्न काहीसे कमी होईल आणि कष्ट करण्याची आवश्यकता असेल. मुलांच्या आरोग्याच्या कुरबुरी राहतील, वैवाहिक आयुष्यात तुम्ही अधिक वेळ देणे आणि बांधिलकी दर्शविणे आवश्यक असेल; आणि हळुहळू तुम्ही सर्वांची मने जिंकाल. काही वेळा कामाबाबत अलिप्तता जाणवेल. एकूण, तुमच्यासाठी एक चांगले आणि प्रगतीशील वर्ष असणार आहे.
वृषभ राशी भविष्य 2018
वृषभ राशी भविष्य 2018 सुरुवातील तुम्ही थोडे आक्रमक असाल, ज्याचा विपरित परिणाम होईल, तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हळुहळू तुम्ही इच्छाशक्ती प्राप्त कराल आणि काहीतरी साध्य करावेसे वाटू लागेल. यश मिळविण्यासाठी वर्षभर तुम्हाला मेहेनत करावी लागेल. कामात काही अपेक्षाभंग होण्याचीही शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर तुमच्या आर्थिक संचयात वृद्धी होईल आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. वृषभ राशीच्या 2018 या वर्षातील राशी भविष्यानुसार, काही छोट्या प्रवासांमुळे चांगले परिणाम पाहायाला मिळतील. तुम्ही तीर्थयात्रेसाठी जाण्याचीही शक्यता आहे. मुलांची भरभराट होईल आणि त्यांची कामगिरी चांगली राहील. तुम्हाला वाद आणि भांडणे टाळणे गरजेचे आहे कारण त्यामुळे तुमच्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. पहिले दोन महिने कोणत्याही वादापासून किंवा भानगडीपासून दूर राहा, कारण त्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचण्याची शक्यता आहे. असे असले तरी, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही आयुष्यात अधिक वेगात पुढे सरकाल. आरोग्याची काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या, कारण तुमचे वजन वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आणि धार्मिक कार्यांसाठी खर्च कराल. एकूणातच हे वर्ष सर्वसाधारण असेल. या वर्षात तुम्ही अनेक नवीन गोष्टी शिकाल. तुमचे वैवाहिक आयुष्य आणि आर्थिक स्थिती चांगली असेल.
मिथुन राशी भविष्य 2018
मिथुनेची अभिव्यक्तीची शक्ती तुम्हाला वर्षभर मदत करेल. पण, पहिले दोन महिने तुम्हाला तुमच्या शब्द काळजीपूर्वक वापरावे लागतील, कारण त्या शब्दांमुळे वाद उद्भवून तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी तुम्ही घरापासून लांब जाऊ शकता आणि तिथे तुम्ही चांगली आर्थिक प्राप्ती कराल. पण, तुम्ही तुमच्या आप्तेष्टांपासून लांब राहाल. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखणे गरजेचे असेल. 2018 या वर्षातील मिथुन राशीच्या राशी भविष्यानुसार मुले खोडकर असतील, पण ती नवीन गोष्टी शिकतील आणि त्यांच्या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करतील. जर डिसेंबरच्या मध्यापर्यंत तुम्ही अविवाहित राहिलात तर तुम्ही तुमच्या इच्छित जोडीदाराशी लग्नगाठ बांधू शकाल. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये प्रमाणापेक्षा अधिक खर्च होईल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि हवेवाटे होणारे रोग, सांधेदुखी इत्यादीची लागण तुम्हाला होऊ शकेल. आंबट पदार्थ वर्ज्य करा. या वर्षात व्यवसायातून अधिक लाभ होईल. तुम्ही पूर्वी केलेल्या मेहेनतीचे फळ तुमच्या व्यावसायिक यशाचा पाया असेल. एकूण, विकास आणि प्रगती करण्यासाठी या वर्षात तुम्हाला अनेक संधी लाभतील.
कर्क राशी भविष्य 2018
कर्क राशीच्या 2018 या वर्षातील राशी भविष्यानुसार, तुमच्या आजुबाजूला अधिक उर्जा जाणवेल आणि तुम्हाला इतरांचे नेतृत्व करण्याची इच्छा निर्माण होईल. तुमचे काही आप्तेष्ट तुम्हाला योग्य प्रकारे समजून घेणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये काहीसे वितुष्ट येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य काही प्रासंगिक भांडणे वगळता हे सलोख्याचे असेल. तुमची प्रतिमा उंचावेल आणि कामाच्या स्वरुपात सुधारणा होईल. तुमचा समाजिक स्तरही उंचावेल. मुख्य लक्ष आरोग्यावर असणे आवश्यक आहे कारण गंभीर आजार बळावण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आनंद नसल्याचे वाटत राहील. तुमचे वैवाहिक आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी वाद टाळावेत. खर्च प्रमाणापेक्षा अधिक असेल. उत्पन्न असेल पण तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे आर्थिक असंतुलन निर्माण होईल. विद्यार्थी चांगली कामगिरी करतील आणि अधिक निर्धारी होतील. तुम्ही ऐशारामी आयुष्य जगाल कारण आयुष्याचा आनंद लुटणे आणि खर्च करणे हाच तुमचा उद्देश असेल. त्यासाठी तुम्ही कष्ट घ्याल. एकूणात, काही आव्हाने येतील पण हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल राहील.
सिंह राशी भविष्य 2018
सिहं राशीच्या 2018 या वर्षाच्या राशी भविष्यानुसार तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात स्वारस्य निर्माण होईल आणि तुम्ही कदाचित तीर्थयात्रेसाठी जाऊ शकाल. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत तुमच्या भावंडांच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू राहतील, पण तुमचे धैर्य वाढलेले असेल. प्रेम प्रकरणात मिश्र स्वरुपाच्या घटना घडतील. एका बाजूला तुमच्यात काही गैरसमज होतील तर दुसरीकडे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावात तुम्ही न्हाऊन निघाल. तुमच्या कष्टांमुळे तुम्ही प्रगतीपथावर जाऊ लागाल. पण, तुम्ही आळशीपणा टाळला पाहिजे. वैवाहिक सुख वाढेल. तुम्ही आयुष्यात पुढे पुढे जात आहात आणि तुम्हाला अनुकूल घटना घडत आहेत आणि तुम्ही आर्थिक प्रगती होणार आहे, याची तुम्हाला प्रचिती येईल. मुलांना थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील आणि तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांना पाठींबा द्यावा लागेल. परदेशप्रवासाची खूप शक्यता आहे. गरोदर महिलांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत विशेष काळजी घ्यावी. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल झालेले दिसून येतील. तुम्हाला जनमानसातही स्थान लाभेल.
कन्या राशी भविष्य 2018
कन्या राशीच्या 2018 या वर्षाच्या राशीभविष्यानुसार या वर्षात तुम्ही अनेक ध्येय गाठणार आहात. विविध प्रकारच्या संधींच्या माध्यमातून तुम्हाला चांगले आर्थिक परिणाम पाहायला मिळतील. तुमचे सामाजिक वर्तुळ अत्यंत सक्रीय असेल आणि तुमचे समाजातील स्थानही उंचावेल. तुम्ही मित्र आणि आप्तेष्टांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. मुलांमध्ये एकाग्रतेची कमतरता जाणवेल. त्यामुळे मेहेनत ही यशाची गुरकिल्ली असेल. तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात आणि त्यामुळे थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो. तुम्हाला व्यावसायिक आयुष्यात समाधान लाभेल. तुमच्या उपक्रमांना यश लाभेल. फार काळापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. वर्षभर उत्पन्नाची आवक चांगली राहील. जानेवारी महिन्यात अनपेक्षित लाभ संभवतो. ऑक्टोबर महिन्यानंतर या वृद्धीमध्ये अजून भर पडेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून लाभ होईल पण ऑक्टोबर महिन्यानंतर त्याच्यातील/तिच्यातील उर्जा कमी असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला त्यांच्याकडून पूर्ण पाठींबा मिळेल. कामाच्या निमित्ताने किंवा व्यावसायिक निमित्ताने तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून काही काळ लांब राहावे लागेल. घरात एखादे पवित्र कार्य पार पडेल. घरात नवी भर पडण्याचीही शक्यता आहे. एकूणात, सर्व बाजूंनी हे वर्ष तुमच्यासाठी लाभकारक असेल. तुम्ही कौटुंबिक जीवनात शांतता राखणे आणि भांडण टाळणे आवश्यक आहे.
तूळ राशी भविष्य 2018
तूळ राशीच्या 2018 या वर्षातील राशी भविष्यानुसार वर्षाची सुरुवात उर्जादायी असेल पण त्यात थोडा आक्रमकपणा असेल. कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्यात आनंद मिळविण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. जानेवारी ते मार्च महिन्यांदरम्यान तुमच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू राहतील. शब्दांवर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील आणि तुमच्या कल्पना आकार घेतील आणि तुम्ही तुमच्यासाठी अनुकूल गोष्टी करून घ्याल. आळस टाळावा. तुमचे सहकारी तटस्थ असतील. त्यामुळे तुम्ही स्वत:च्या क्षमतांवर विसंबून असावे. जानेवारी ते मार्चदरम्यान तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुमच्या मेहेनतीमुळे नवे उपक्रम राबविले जातील. कौटुंबिक आयुष्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी नसाल कारण तुमच्यात अलिप्ततेची भावना असेल आणि तुमच्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे काहीसे दुर्लक्ष होईल. कमी अंतराचे आणि काही परदेशातील प्रवासही संभवतात. मुले सुखात असतील आणि आयुष्यातील आनंद उपभोगतील. विद्यार्थी मेहेनत करतील आणि त्यांना त्यांच्या कष्टांचे फळही मिळेल. मार्च महिन्यानंतर वैवाहिक आयुष्यात सुधारणा होईल. एकूण पाहता, हे तुमच्यासाठी प्रगतीशील वर्ष असेल. तुम्ही उत्पन्नाचे मार्ग वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे.
वृश्चिक राशी भविष्य 2018
वृश्चिक राशीच्या 2018 या वर्षातील राशी भविष्यानुसार या वर्षात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी तयार असाल तर तुम्ही तुम्हाला यशप्राप्ती होईल. जानेवारी ते मार्च या कालावधीत आरोग्याच्या कुरबुरी शुरू राहतील, त्यानंतर तुमची प्रकृती ठणठणीत होईल आणि तुम्ही निरोगी व्हाल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. आर्थिक बाबींचा विचार करायचा झाल्यास, या वर्षभरात, विशेषत: ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक खर्च कराल, त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. ऑक्टोबरनंतर चांगले परिणाम दिसू लागतील. गुंतवणूक करण्याआधी नीट खात्री करून घ्या. या वर्षात अधिक कष्ट करण्यासाठी तयार राहा आणि तुमच्या या मेहेनतीमुळे तुम्ही अधिक उत्पन्न कमवू शकाल. ज्यांना शिक्षण घेण्यासाठी परदेशी जायचे आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. मुले आयुष्याचा आनंद उपभोगतील आणि अधिक खोडकर होतील. त्यांच्या एकाग्रतेच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. घरातील वातावरण स्नेहपूर्ण राहील. वैवाहिक आयुष्यही सुखकर राहील. तुमच्या सर्व प्रयत्नांना तुमच्या जोडीदाराकडून साथ मिळेल आणि सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी अनेक आव्हाने असतील, पण तुम्ही प्रगतीपथावर जाऊ शकाल. एकूण या वर्षात संमिश्र परिणाम पाहायला मिळतील.
धनु राशी भविष्य 2018
धनु राशीच्या 2018 या वर्षाच्या राशी भविष्यानुसार, आयुष्यात प्रगती करण्याच्या अनेक संधी या वर्षात तुम्हाला प्राप्त होतील. हे वर्ष परिपूर्ण आणि फलदायी राहण्याच्या दृष्टीने तुमचा जिद्द उच्च कोटीची असेल. मार्च महिन्यापर्यंत उत्पन्नाचा ओघ वाढता राहील. त्यानंतर मे महिन्यापर्यंत तुमच्या खर्चात वाढ होईल, पण त्यानंतरच्या उर्वरित वर्षात तुमची गाडी पुन्हा रुळावर येईल. त्यामुळे आर्थिक बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल आणि तुम्ही एकापेक्षा अधिक स्रोतांमधून उत्पन्न मिळवाल. तुम्ही कष्ट करावे यासाठी शनि तुम्हाला तयार करेल. पण कामात स्वत:ला बुडवून घेऊ नका, कारण त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मार्च ते मे हा कालावधी काहीसा निराशावादी असेल आणि ऑक्टोबरनंतर काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वाहन जपून चालवा. मुले कष्ट करतील आणि विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली राहील. काही अपवाद वगळता कौटुंबिक आयुष्य चांगले आणि शांततामय राहील. पण तुम्ही अलिप्त राहू नये किंवा कौटुंबिक आयुष्याबाबत असमाधानी राहू नये आणि अपशब्द उच्चारू नयेत. वैवाहिक आयुष्यात चांगले परिणाम पाहायला मिळतील पण तुमच्या जोडीदाराच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू राहतील. तुमच्या प्रेमाचे नाते अधिक घट्ट होईल. विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. एकूण, हे वर्ष तुमच्यासाठी चांगले राहील, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मकर राशी भविष्य 2018
2018 हे असे वर्ष आहे, ज्या वर्षात तुम्हाला आयुष्य म्हणजे नक्की काय, याची जाणीव होईल. एकीकडे तुमचा खर्च प्रमाणापेक्षा अधिक होईल आणि तुमची आर्थिक स्थिती खालावत असल्याची भावना तुमच्या मनात निर्माण होईल. दुसरीकडे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. पण तुमचे काही परदेशी संबंध निर्माण होतील आणि त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. वेदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2018 सालातील भविष्य सांगते की, तुमचा कल अध्यात्माकडे राहील आणि भौतिक जगापासून काही काळ दूर जाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकार प्राप्त होईल आणि तुम्हाला काही नवी कामे आणि महत्त्वाचे प्रकल्प मिळतील. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक राहील आणि त्यांना शिक्षणाकडे ओढा वाढेल व ते नव्या गोष्टी शिकतील. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा कारण ते मार्च व मे दरम्यान तुम्हाला उपकृत करतील. कौटुंबिक आयुष्य समृद्ध होईल आणि तुमच्या नात्याची वीण अधिक घट्ट होईल. वैवाहिक आयुष्यात थोडासा गैरसमज होण्याची शक्यता आहे, जो तुम्हा टाळणे गरजेचे आहे. ऑक्टोबरनंतर तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुधारणा होईल आणि तुम्ही वैयक्तिक आयुष्यातील आनंद उपभोगू शकाल. एकूणच या वर्षात तुम्हा आयुष्यात उत्कृष्टता गाठायची आहे आणि तुमच्या कमकुवतपणांमध्ये सुधारणा घडवून आणायची आहे.
कुंभ राशी भविष्य 2018
हे वर्ष कुंभ राशीचे आहे, असे 2018 या वर्षाचे राशी भविष्य सांगते. तुमच्या निर्णयांमुळे तुमच्या वर्षभरातील विकासाचा पाया रचला जाईल. तुमची संपत्ती वाढविण्यावर तुमचे लक्ष केंद्रित असेल आणि तुमच्या कष्टांमुळे तुम्ही हे वर्ष अधिक लाभकारक करू शकाल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. दूरचे प्रवास संभवतात. तुम्ही चाणाक्ष आणि फलदायी निर्णय घ्याल. तुमचे आरोग्य ठणठणीत असेल आणि तुमच्या जुन्या आजारांवर तुम्ही मात कराल. वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. तुम्ही धार्मिक कार्ये कराल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अधिक प्रेम आणि जवळीक निर्माण होईल. पण, पहिले दोन महिने खूप आव्हानात्मक असतील, कारण या कालावधीत तुमच्या जोडीदारासोबत वाद किंवा आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जे प्रेमाच्या नात्यात आहेत, त्यांना या वर्षी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी मेहेनत करतील आणि मुले काहीशी चिडचिडी होतील. पण, तुमचे प्रेम आणि काळजी यामुळे त्यांची भरभराट होईल. एकूणात, हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक आणि प्रगतीशील आहे.
मीन राशी भविष्य 2018
मीन राशीच्या 2018 या वर्षाच्या राशी भविष्यानुसार, नाजूक प्रकृतीच्या मीन राशीच्या व्यक्तींना वर्षभर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, त्यानंतर ते चांगले आयुष्य जगू शकतील. प्रमाणापेक्षा अधिक ताण घेतलात किंवा कामात बुडून गेलात तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटेल. वरिष्ठांच्या खूप अपेक्षा असतील; त्यामुळे एकाच वेळी तुम्हाला सगळ्या बाबतीत जुळवून घ्यावे लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या जानेवारी हा खूपच आव्हानात्मक महिना असेल; त्यामुळे कोणताही मोठा व्यवहार फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुढे ढकला. त्यानंतर तुमचे उत्पन्न वाढते राहील. एखादा अनिच्छित प्रवास घडू शकेल. वैवाहिक आयुष्य सुखकर असेल आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल. व्यावसायिक कारणानिमित्त तुम्हाला तुमचा वास्तव्याचा पत्ता बदलावा लागेल. मुले खोडकर राहतील आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. विद्यार्थी अभ्यासामध्ये शॉर्ट-कट आणण्याचा प्रयत्न करतील आणि ते काहीसे लहरी होतील. तुम्हीसुद्धा आयुष्यात शॉर्ट-कट घेण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील, पण कालांतराने तुम्हाला हा मार्ग सोडावा लागेल. ऑक्टोबरनंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. एकूणातच, या वर्षात तुम्हाला आरोग्याला अधिक प्राधान्य द्यावे लागेल आणि आयुष्याच्या सर्व आघाड्यांवर समतोल साधावा लागेल.
तर, आमच्या राशी फलानुसार 2018 या वर्षात तुमच्यासमोर असे चित्र असेल. या नि:शुल्क भाकितांचा सदुपयाग करा आणि हे वर्ष तुमच्यासाठी अधिक फलदायी करा.