शुक्राचे तुळ राशीमध्ये संक्रमण (6 सप्टेंबर, 2021)
शुक्राला प्राकृतिक रूपात शुभ ग्रह मानले जाते आणि वैदिक ज्योतिष मध्ये ही एक स्त्री ग्रहाच्या रूपात दर्शवले जाते जे जीवनात विकसिता आणि आरामाचे कारक ही आहे. शुक्र ज्योतिष मध्ये विवाह, जीवनसाथी, भौतिकवादी सुख, धन, वाहन, उत्तम व्यंजन, उत्तम भोजन, कलात्मक प्रवृत्ती इत्यादींचे मुख्य ग्रह आहे. शुक्र सुंदरता ही दर्शवते आणि जीवनात सकारात्मकता आणते.
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
शुक्र ग्रह राशीचक्र मध्ये वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी आहे. हे मीन राशीमध्ये उच्च चा तर, कन्या राशीमध्ये नीच चा असतो. शनी आणि बुध चे हे मित्र ग्रह आहे तर, सूर्य आणि चंद्राचे हे शत्रू आहे. मंगळ आणि बृहस्पती सोबत याचे संबंध तटस्थ आहे. जेव्हा शुक्राचे संक्रमण काही मित्र राशी मध्ये असतात तर, यामुळे उत्तम परिणाम प्राप्त होतात. तर शत्रू राशीमध्ये हे खूप उत्तम परिणाम देत नाही. शुक्राची आपली स्वराशी तुळ मध्ये संक्रमण तुमच्या प्रेम संबंधांना सुधारेल सोबतच, आपल्या इतर गरजू नात्यामध्ये ही तुम्ही उत्तम करू शकाल. या संक्रमणाचा फायदा तुम्ही आपल्या संबंधांना ठीक करण्यात करू शकतात. नात्याला मजबूत करू शकतात आणि आपल्या सामाजिक, रोमँटिक जीवनाला ही मजबुती प्रदान करू शकतात. या संक्रमणाच्या प्रभावाने लोक विलासिता पूर्ण आयुष्य जगू शकतात. भौतिकवादी गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. विवाहित लोकांसाठी हे संक्रमण उत्तम राहील. या काळात काही जातक प्रॉपर्टी किंवा वाहन ही खरेदी करू शकतात. शुक्र चे तुळ राशीमध्ये संक्रमण 6 सप्टेंबर 2021 ला 12:39 वर होईल आणि हे 2 ऑक्टोबर 2021 09 वाजून 35 मिनिटांपर्यंत याच राशीमध्ये राहील आणि त्या नंतर वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करेल.
चला जाणून घेऊया की, सर्व 12 राशींसाठी शुक्राचे हे संक्रमण काय परिणाम घेऊन येईल?
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष
मेष राशीतील जातकांसाठी, शुक्र दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि विवाह आणि भागीदारी च्या सातव्या भावात मेष राशीतील लोकांसाठी या ग्रहाचे संक्रमण होत आहे. या संक्रमण काळात तुम्ही आपल्या करिअर मध्ये पुढे जाल आणि पद उन्नती ची शक्यता दिसत आहे. या काळात तुमचा बॉस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध उत्तम राहतील. व्यावसायिक भागीदार आणि व्यापाराने ही या राशीतील जातकांना लाभ प्राप्त होईल. सामाजिक दृष्ट्या काही लोकांसोबत संपर्क होऊ शकतो आणि हे तुमच्या व्यवसायासाठी उपयोगी होऊ शकते. आर्थिक रूपात, ह्या संक्रमण वेळी तुम्ही धन गुंतवणूक कराल आणि पैतृक संपत्तीने ही तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्या नात्यावर नजर टाकली असता, तुम्ही विवाहित जीवनात एक उत्तम बदलाचा अनुभव घ्याल आणि जीवनसाथी सोबत आनंदाचे बरेच क्षण तुम्हाला मिळतील. या लोकांसाठी ही वेळ उत्तम आहे ज्यांना विवाह करायचा आणि त्यांना या काळात उत्तम प्रस्ताव मिळतील.
उपाय: शुक्रवारी सात प्रकार चे धान्य दान करा.
वृषभ
वृषभ राशीतील लोकांसाठी, शुक्र पहिल्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि स्पर्धा, रोग आणि तुमच्या शत्रू च्या सहाव्या भावात हे संक्रमण करेल. या संक्रमण वेळी, सहाव्या घरात शुक्र तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल आणि बऱ्याच वेळेपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करत होते त्यात तुम्हाला यश मिळेल. या राशीतील नोकरी पेशा लोकांना या काळात पद उन्नती किंवा वेतन वृद्धी मिळू शकते. करिअर मध्ये वृद्धी आणि पेशावर विकास ची अपेक्षा केली जाऊ शकते. आर्थिक रूपात आपले पैसे वाचवण्याकडे लक्ष द्या आणि आपल्या खर्चावर नजर ठेवा कारण, या वेळी अनावश्यक खर्च प्रबळ होण्याची शक्यता आहे म्हणून, अश्या खर्चापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा जे आवश्यक नाही. नात्यामध्ये, आपल्या प्रेम जीवनात मिश्रित परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही विवाहित जीवनात अशांती पाहू शकतात म्हणून, शांत राहा अथवा दांपत्य जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
उपाय: बडीशोप, मध आणि मसुराची दाळ खा.
मिथुन
चंद्र राशी मिथुन राशीतील जातकांसाठी, शुक्र पाचव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि आपले प्रेम, रोमांस आणि संतान च्या पाचव्या घरातच संक्रमण करत आहे. या संक्रमण वेळी आपल्या जीवनसाथी आणि मुलांवर तुमचे प्रमुख लक्ष राहील. संगीत आणि कलेमध्ये तुमची रुची अधिक असेल या सोबतच, तुम्ही या संक्रमण वेळी स्वतःला रोमांस ची अधिकता पहाल. पेशावर जीवनात तुम्हाला आपल्या मित्रांचे समर्थन मिळेल आणि तुमचे प्रयत्न उत्तम होतील जे तुम्हाला पुढे नेण्यात मदत करतील. या राशीतील जे जातक नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम आहे. आर्थिक रूपात हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. उच्च शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा आहे किंवा विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे तर, प्रयत्न करा यश मिळू शकते. ज्या महिला बऱ्याच वेळेपासून आई होण्याची वाट पाहत आहेत त्या ह्या काळात गर्भवती होऊ शकतात. आरोग्याची गोष्ट केली असता या संक्रमण वेळी मिथुन राशीतील लोक फीट आणि स्वस्थ्य राहतील.
उपाय: आपल्या भोजनाचा काही हिस्सा रोज गाईला द्या.
कर्क
कर्क राशीतील लोकांसाठी, शुक्र चौथ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या आराम, माता, संपत्ती, वाहन आणि सुखाच्या चतुर्थ भावात संक्रमण करेल. या संक्रमण वेळी कर्क राशीतील लोक घराला सजवणे आणि त्याला सुंदर बनवण्यासाठी घरात काही बदल करू शकतात या सोबतच, जर तुमच्या जवळ वाहन आहे तर, त्यात ही तुम्ही काही चांगले बदल करू शकतात. पेशावर जीवनाला घेऊन तुम्हाला सल्ला दिला जातो की, वरिष्ठ अधिकारी, सहकर्मी आणि अधिनस्थ सोबत काही ही प्रकारचा वाद करू नका. तुमची कठीण मेहनत आणि प्रयत्न अनुसार उत्तम फळ प्राप्त करण्यासाठी एक आव्हानात्मक काळ होऊ शकतो. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी या काळात आणि संसाधनांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. हे प्रेम आणि रोमांस साठी खूप चांगले संक्रमण असेल. चौथे घर भावनांचे घर ही म्हटले जाते म्हणून, शुक्राच्या या संक्रमण वेळी भावनात्मक रूपात तुम्ही बरेच सक्रिय होऊ शकतात आणि मोकळ्या मानाने व्यक्त करू शकतात यामुळे तुमच्या नात्यामध्ये अधिक गोडवा वाढेल.
उपाय: शुक्रवारी चना दाळ आणि हळदी विहिरीत टाका.
सिंह
सिंह राशीतील जातकांसाठी शुक्र तिसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे आणि शौक, हित आणि तुमच्या भाऊ-बहिणींच्या तिसऱ्या घरात हे संक्रमण करेल. तुम्ही आपल्या पेशावर कौशल्य वाढवाल आणि नवीन गोष्टी विकसित कराल. सामाजिक स्तरावर तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुम्ही लांबच्या यात्रा या वेळी करू शकतात. या संक्रमण वेळी तुम्हाला आपल्या सहयोगी आणि अधिनस्थ चे पूर्ण सहयोग मिळेल. या काळात तुमचे रचनात्मक पक्ष ही मजबूत होईल आणि तुम्ही या यात्रेसाठी बऱ्याच नवीन ठिकाणी फिरायला जाऊ शकतात. या राशीतील काही जातक महाग गॅझेट ही खरेदी करू शकतात. कुणाला प्रेम प्रस्ताव देण्यासाठी ही एक उत्तम वेळ आहे. या काळात या राशीतील जातकांचे विवाहित जीवन ही उत्तम राहील. आर्थिक जीवनावर नजर टाकली असता कुणाला उधार देऊ नका. गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर, सावध पूर्वक करा.
उपाय: शुक्रवारी 108 वेळा ‘ओम शुक्राय नमः’ मंत्राचा जप करा.
कन्या
कन्या राशीतील जातकांसाठी, शुक्र दुसऱ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि कुटुंब, भाषण आणि धानाच्या दुसऱ्या भावात हे संक्रमण करेल. या संक्रमण वेळी तुम्हाला आपल्या संचित धनाने लाभ प्राप्त होण्याची शक्यता आणि आणि तुम्ही धन बचत करण्यात ही सक्षम असाल. तुम्ही जर काही गुंतवणूक केली सेल तर, त्यात ही लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक रूपात ही हा काळ उत्तम असेल. तुम्हाला पैसे योग्य पद्धतीने खर्च करण्याची संधी मिळेल. कार्य क्षेत्रात तुमच्या प्रदर्शनात सुधार होईल आणि कामाच्या प्रति तुम्ही निष्ठावान व्हाल. या काळात तुमचे वरिष्ठ ही तुमचे सहायक होतील. या काळात तुमच्या काही खास व्यक्तीसोबत मिळण्याची शक्यता आहे यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही आपल्या मित्राची मदत घेऊ शकतात आणि या काळात आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत मन जुळतील. तुम्ही लहान यात्रेवर जाऊ शकतात आणि यामुळे तुम्हाला लाभ ही मिळू शकतो. या संक्रमण काळात कन्या राशीतील लोकांना आपल्या खाण्या पिण्याच्या सवयीनमध्ये सुधार केला पाहिजे.
उपाय: शुक्रवारी जुन्या गरजू लोकांना साखर, गूळ सारख्या गोड वस्तू दान करा.
तुळ
तुळ राशीतील लोकांसाठी, शुक्र प्रथम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे आणि ही तुमची आत्मा आणि व्यक्तित्वाचा प्रथम भावातच संक्रमण करेल. या संक्रमण वेळी तुमच्या समग्र व्यक्तित्वात सुधार आणेल आणि तुम्ही पेशावर जीवनासोबतच कुटुंब जीवनात ही उत्तम छाप पडाल. तुम्ही आपल्या जीवनात आत्मविश्वास आणि सकारात्मकते मध्ये सुधार पहाल आणि तुम्हाला आपल्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आणि लाभ कमावण्यासाठी ही उत्तम संधी प्राप्त होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्या वित्त मध्ये सुधार आणण्याचे काम करेल आणि तुम्ही आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकीमध्ये उत्तम लाभ कमावू शकतात. या वेळी तुम्ही उत्तम आणि महाग वस्तूंवर अधिक पैसे खर्च कराल. या राशीतील जे जातक प्रेम संबंधात आहेत त्यांचे नाते पुढील स्तरावर पोहचू शकते आणि तुम्ही आपल्या प्रिय सोबत विवाह करू शकतात. विवाहित जोडप्यांना या संक्रमण वेळी आनंद मिळेल.
उपाय: काळ्या गाईला किंवा घोड्याला नियमित पोळी खाऊ घाला.
वृश्चिक
वृश्चिक राशीतील लोकांसाठी, शुक्र सातव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान मध्ये शुक्र ग्रह तुमच्या हानी, अध्यात्मिकता, विदेशी लाभ आणि हॉस्पिटल मध्ये भर्ती होण्याच्या बाराव्या भावात संक्रमण करेल. तुम्ही या काळात पार्टीच्या मुड मध्ये राहाल यामुळे तुमचे खर्च ही वाढू शकतात. विदेशी यात्रेवर जाण्याची ही या काळात शक्यता आहे आणि तुमच्या जवळचे लोक या यात्रेला विस्मरणीय बनवू शकतात. या वेळी तुम्ही उत्तम भोजनाचा आनंद ही घेऊ शकतात. कार्य क्षेत्रात काम सहज होईल आणि वांछित परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्ही नियमावली किंवा रुटीन बनवू शकतात. विदेश संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील आणि विदेशात जॉब प्राप्त करण्यासाठी जर प्रयत्न करत आहेत तर, चांगले परिणाम प्राप्त होतील. जीवनसाथी सोबत या काळात संबंध उत्तम होतील. तुमच्या आरोग्याची तुम्हाला या काळात काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण, काही लहान मोठी समस्या होऊ शकते.
उपाय: सूर्योदयाच्या वेळी ललित सहस्त्रनामा चा पाठ करा.
धनु
धनु राशीतील जातकांसाठी, शुक्र सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आज आणि वर्तमान मध्ये हे तुमच्या कमाई, लाभ आणि इच्छेच्या अकराव्या घरात संक्रमण करतील. या संक्रमण वेळी तुम्हाला आपल्या कार्यस्थळी आपल्या वरिष्ठांकडून उत्तम प्रदर्शनासाठी पुरस्कार आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला या काळात सामाजिक लाभ मिळू शकतो सोबतच, या काळात तुम्ही आपल्या जुन्या मित्रांसोबत बऱ्याच काळानंतर भेटू शकतात यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. या राशीतील जातकांना प्रेम आणि रोमांस च्या बाबतीत वांछित परिणाम मिळतील आणि तुमचा संगी तुमच्या भावनांना पूर्णतः समजण्यात आणि त्यांचा साथ तुम्हाला प्रत्येक क्षेत्रांत प्राप्त होईल. हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल काळ आहे कारण, या काळात ते आपल्या प्रयत्नांत यशस्वी होऊ शकतात. आरोग्य जीवनावर नजर टाकली असता हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे तरी ही योग्य आहार आणि नियमित व्यायाम करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो.
उपाय: शुक्रवारी लहान कन्यांना खडी साखर आणि दूध दान करणे शुभ असेल.
मकर
मकर राशीतील जातकांसाठी शुक्र पाचव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि करिअर, नाव आणि प्रसिद्धी च्या तुमच्या दशम भावातच याचे संक्रमण होईल. या संक्रमण वेळी तुम्हाला आपल्या करिअरच्या क्षेत्रात खूप सावध राहावे लागेल कारण, तुम्ही आपल्या करिअर जीवनात खुओ बाधा चा सामना करू शकतात. आपल्या प्रयत्नांचे योग्य फळ तुम्हाला या काळात कठीणतेने भेटेल, तरी ही तुम्हाला आपल्या प्रयत्नांना इमानदारीने कायम ठेवले पाहिजे. धैया पर्यंत पोहचण्यासाठी या राशीतील जातकांना कठीण मेहनत करावी लागेल. जर नोकरी मध्ये परिवर्तन करण्याची इच्छा आहे तर, पूर्णतः तयारी आणि रिसर्च करून घ्या. या राशीतील जातक आपल्या प्रेम जीवनात या काळात बऱ्याच समस्यांचा सामना करू शकतात. विवाहित जातकाची गोष्ट केली असता, दांपत्य जीवनात ही या काळात काही चढ-उतार येऊ शकतात. या कारणाने तुमची मानसिक शांती ही भंग होऊ शकते. तुम्हाला जीवनातील समस्यांना दूर करण्यासाठी धैयाने राहिले पाहिजे आणि शालीनतेने प्रत्येक समस्या सोडवल्या पाहिजे. आरोग्य जीवनावर नजर टाकली असता काही मोठी समस्या तुम्हाला होणार नाही.
उपाय: 5 ते 6 कॅरेट चे ओपल चांदीच्या अंगठीमध्ये घाला हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल.
कुंभ
कुंभ राशीतील जातकांसाठी, शुक्र चौथ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि भाग्य, आंतराष्ट्रीय यात्रा आणि पिता च्या नवव्या घरात याचे संक्रमण होत आहे. या संक्रमण वेळी तुम्हाला आपल्या कुटुंब आणि भाग्याचे सहयोग मिळेल. तुम्ही आपली कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल बदल्यात तुम्हाला आपल्या कुटुंबातील सदस्यांचे समर्थन मिळेल. तुम्ही आर्थिक बाबतीत ही लाभ प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात. या राशीतील जे जातक नोकरी च्या शोधात आहेत त्यांना उत्तम सनदी मिळतील या सोबतच, तुम्हाला विभिन्न स्रोतांच्या माध्यमाने आपली कमाई वाढवण्याची संधी या काळात मिळेल. या राशीतील नोकरी पेशा लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होईल. आपली कठीण मेहनत या काळात रंगात येईल. भागीदारी मध्ये व्यवसाय करणाऱ्या या राशीतील जातकांना ही या काळात लाभ मिळेल. या राशीतील जातकांचे आरोग्य या काळात उत्तम असेल परंतु, आईच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: नकारात्मकता संपवण्यासाठी घरात नियमित संध्याकाळच्या वेळी कपूर लावा.
मीन
मीन राशीतील जातकांसाठी शुक्र तिसऱ्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या अचानक लाभ/हानी, मृत्यू च्या आठव्या घरात हे संक्रमण करेल. तुम्ही पारगमनच्या वेळी कुठल्या ही प्रकारचे व्यवहार करणे टाळा आणि विपरीत लिंगी लोकांसोबत बोलण्याच्या वेळी सावधान राहा. कुठल्या ही प्रकारची आपली शक्ती/ प्रतिभेचा दुरुपयोग करू नका अथवा, गंभीर परिणाम होऊ शकतात. या काळात सट्टेबाजी सारख्या गोष्टींपासून दूर राहा. या राशीतील नोकरीपेशा लोकांच्या जबाबदाऱ्या कार्य क्षेत्रात वाढू शकतात. करिअर क्षेत्रात यश सहज मिळणार नाही. या राशीतील व्यावसायिक लोकांना तेव्हाच यश मिळेल जेव्हा ते कठीण मेहनत करतील. या राशीतील काही प्रेमी प्रेमिका आपल्या प्रिय सोबत विवाह करू शकतात. या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: काही महिलांना अत्तर, कपडे आणि चांदीचे आभूषण भेट मध्ये द्या.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!